Shri Navanath Bhaktisar Adhyay 2 is in Marathi. I am trying to describe in short for the benefit of the devotees who don't know Marathi. God Shiva and God Dattatreya were walking in the forest of Bhagirathi, saw Machchhindra performing rigorous tapas. Machchhindra's body was completed dried. His legs and hands were become like a dried branch of a tree. Skin was fixed to the bones. Eyes were dried and became like camphor. There was a sound of chanting the mantra was the only sign of life remaining in the Machchhindra's body. Both gods were surprised knowing that in Kaliyuga Machchhindra was doing these hard rigorous tapas. God Datta approached Machchhindra and asked him why he was performing hard tapas. Then he blessed Machchhindra with mantra-diksha. Machchhindra received the super most knowledge. Everywhere he experienced oneness. God datta took him to God Shiva who realized that God Kavi Narayan had taken a birth as Machchhindra. Then God Shiva asked Datta to impart all the necessary knowledge to Machchhindra so that he can establish Nath-Sampradaya in this Kaliyuga. After getting all the knowledge from Guru Dattatreya, Machchhindra proceeded for TirthYatra. He also got blessings from Goddess Amba and all other gods so that they would be helpful to him for writing Shabari Vidya in Kavitva (poetry form). On his way to tirthyatra, he came to village Chandragiri in Bengal. He went to a goud Brahmin Sarvopdayal's house for bhiksha. Saraswati wife of the Brahmin served him bhiksha. She told him that they were unhappy since they don't have a child. Machchhindra took out vibhuti from his bag and chanted a God Surya mantra and asked god to enter into the vibhuti. Then he gave the vibhuti to Saraswati and asked to eat it in the night. He further told her that she would have a very brilliant childlike God Surya. Machchhindra also told her that he would came back after 12 years to give Mantra-Diksha to the child. Then he went away. Saraswati shared the fact with other ladies. They advised her not to believe in such things. Hence Saraswati had thrown the mantra vibhuti in the shade where cows used to live. This is a very short story of this Adhyay 2.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय दुसरा (२) भाग २/२
तों आदित्यनामें कुंडीं तीव्र । ते वेल पाहे साचोकार ।
तों दृष्टीं पडले पल्लवाकार । स्नान तेथें सारिलें ॥ ९१ ॥
स्नान झालिया उदकपान । होतांचि व्यापिलें अतिमूर्च्छेन ।
परी द्वादश नामीं मंत्रसाधन । सोडिलें नाहीं तयाने ॥ ९२ ॥
परी मूर्च्छा ओढवली अतितुंबळ । शरीर झालें अतिविकळ ।
स्वेद नेत्रें गेला अनिळ । देह सांडोनि तयाचा ॥ ९३ ॥
ब्रह्मांडांतोनि अंतर्ज्योती । तीही वेंधों पाहे अंती ।
तरी आदित्यनांवे जाण होतीं । जपालागीं नित्य करीत ॥ ९४ ॥
असें जागृती घडोनि येत । तोंचि स्वप्नीं जीव घोकीत ।
त्याची न्यायें उरला हेत । जीव जपी अर्का तो ॥ ९५ ॥
ऐसें संकट घडतां थोर । खालीं उतरला प्रभाकर ।
कृपें स्पर्शोनि नयनीं कर । सावध केला महाराज ॥ ९६ ॥
मग कामनेचा पुरवोनि हेत । मस्तकीं ठेविला वरदहस्त ।
म्हणे बा रे योजिला अर्थ । सिद्धी पावसी येणे तूं ॥ ९७ ॥
ऐसें बोलोनि आदित्य गेला । तेणें काचकुपिका भरोनि वहिला ।
पुन्हा मार्तंडपर्वती आला । येऊनि नमी अश्र्वत्थ ॥ ९८ ॥
आदित्यनामें करोनि चिंतन । आदित्य तेथें झाला प्रसन्न ।
म्हणे महाराजा काय कामना । निवेदावी मज आतां ॥ ९९ ॥
येरु म्हणे कवित्व करीन । तया साह्य तुवां होऊन ।
मंत्रविद्या तव नामानें । फळास येवो महाराजा ॥ १०० ॥
अवश्य म्हणूनि तमभंजन । मंत्रविद्या साध्य करुन ।
बांधला गेला जलजलोचन । मंत्रशक्तिकार्यार्थ ॥ १०१ ॥
ऐसा सप्त मास येरझारा करुन । दैवतांसी करोनि घेतलें प्रसन्न ।
मग शाबरीविद्येचा ग्रंथ निर्मून । बंगाल देशीं चालता झाला ॥ १०२ ॥
असो ऐसी गोरक्षकथा । वदला आहे किमयागारग्रंथा ।
तेथें किमयांचीं स्थानें सर्वथा । सांगितली आहेत जी ॥ १०३ ॥
परी प्रथम अवघड करणें । तें मानवातें न ये घडोन ।
ते अवतारी असती परिपूर्ण । म्हणोनि घडलें तयांसी ॥ १०४ ॥
परी सांगावया कारण । स्वमुखें गोरक्ष वदला आहे कथन ।
त्या ग्रंथाचा आश्रय पाहून । नवही योगी वर्णिले ग्रंथीं ॥ १०५ ॥
तरी श्रोतीं तया ग्रंथा । दोष न ठेवावा सर्वथा ।
संशय आलिया किमयागारग्रंथा । विलोकावें विचक्षणीं ॥ १०६ ॥
मुळावेगळें कांहीं कथन । येत नाहीं जी घडोन ।
म्हणोनि सकळ संशय सांडोन । ग्रंथ श्रवणीं स्वीकारा ॥ १०७ ॥
यापरी बळचि चाळवोनि दोष । निंदोनिं जो कां मोडील हरुष ।
विकल्पपंथी मिरवितां जगास । पावेल वंशबुडी तो ॥ १०८ ॥
आणिक वाणी जाईल झडोन । नरकीं पडेल सप्त जन्म ।
आणि जन्मोजन्मीं शरीरेंकरोन । क्षयरोग भोगील तो ॥ १०९ ॥
असो तीर्थ उद्देशीं । मच्छिंद्र गेला बंगालदेशीं ।
तेथे फिरत तीर्थवासीं । हेळा समुद्रीं पातला ॥ ११० ॥
तये देशीं चंद्रगिरि ग्राम । तेथे नरसिंहाचा झाला जन्म ।
सुराज पिता विप्रोत्तम । कृतिदेवीकुशीं झाला तों ॥ १११ ॥
असो तेथें जाऊनि नाथ । सहज भिक्षेसी हिंडतां गांवात ।
तों तेथें भविष्य उत्तरकथेंत । काय वर्तलें तें ऐका ॥ ११२ ॥
तया गांवीं गौडब्राह्मण । सर्वोपदयाळ तया नाम ।
वसिष्ठगोत्री आचारनेम । सकळ धर्म पाळी तो ॥ ११३ ॥
आधीं तपन यजन याजन । स्नानसंध्यामाजी निपुण ।
तयाची कांता गुणोत्तम । सरस्वती नामें मिरवतसे ॥ ११४ ॥
सदा सुशील लावण्यखाणी । कीं नक्षत्रपातीं विराजे मांडणी ।
वाटे काम इच्छा धरुनि मनीं । तेथें येऊनि बैसला ॥ ११५ ॥
कीं स्वर्गी मेघांचे मंडळ पाहीं । तेथोनि चपळा उदया ये ही ।
कीं अर्क होऊनि गृहीं गोसावी । तेजभिक्षा मागतसे ॥ ११६ ॥
जियेचे अधरपंवळदेठी । द्विज विराजती वरती थाटीं ।
जैसे रत्न हेमी शेवटी । स्वतेजें तगटीं मिरवितसे ॥ ११७ ॥
भाळ विशाळ सोगयांजन । कुंकुमरसें शोभलें गहन ।
मुक्तानक्षत्रवरीं संगोन । चंद्राबिजोरा विराजवी ॥ ११८ ॥
नासिक सरळाकृती । ते शुक्तिकारत्नहेमगुप्ती ।
मुक्तनळे जैसे गभस्ती । नासिकपात्रीं विराजले ॥ ११९ ॥
कर्णबिंदीं वलयाकृती । हेममुगुटीं ढाळ देती ।
रत्नताटंके नक्षत्रपातीं । करुं वश्य ती पातले ॥ १२० ॥
असो ऐसी श्रृंगारखाणी । सकळ संपत्ति नटली कामिनी ।
रुपवंती सकळ गुणीं । जगामाजीं मिरवतसे ॥ १२१ ॥
परी उदरीं नाहीं संतान परम । तेणें उचंबळोनी योगकाम ।
न आवडे धंदा धामाश्रम । सदा वियोग बाळाचा ॥ १२२ ॥
देवदेव्हारे उपाय अनेक । करिती झाली कामनादिक ।
परी अर्थ कोठें उदयदायक । स्वप्नामाजीं आतळेना ॥ १२३ ॥
नावडे आसन वसन गात्र । विकळ मिरविती निराशगात्र ।
शून्यधामीं चित्त । पवित्र नांदणुकी नांदतसे ॥ १२४ ॥
प्रपंच मानिती अतिहीन । जैसे दीपाविण शून्य सदन ।
कीं सकळ स्वरुपीं दाराहरण । परी नासिकहीन मिरवतसे ॥ १२५ ॥
कीं वज्राउपरी गिरे गोमट । परी वसतीस दिसे तळपट ।
तेथें पाहतां दानवी पिष्ट । कांडिती ऐसें वाटे कीं ॥ १२६ ॥
कीं तरुविण अरण्य कर्कश । कीं सरिताविण जैसें विरस ।
मग तें क्षणैक पशुमात्रास । भयंकर दरी वाटतसे ॥ १२७ ॥
कीं शरीरीं चांगुलपण । परिधानिलें वस्त्रानें भूषण ।
परी चतुःस्कंधीं शवदर्शन । सुगम कांहीं वाटेना ॥ १२८ ॥
तें शरीर घ्राणाविण । आप्तवर्गातें वाटे हीन ।
तेवीं सर्व उपचार कांतेलागोन । संसार हीन वाटतसे ॥ १२९ ॥
ऐसें असतां भावस्थिती । गृही दर्शिली योगमूर्ती ।
नाथ मच्छिंद्र अंगणाप्रती । अलक्ष सवाल वदतसे ॥ १३० ॥
तंव ते कांतेनें पाहूनि त्यातें । चरणीं लोटली शोकभरितें ।
आणोनि शीघ्र वस्त्र आसनांतें । विराजविला महाराज ॥ १३१ ॥
आपण बैसोनि नाथानिकट । सांगती वियोग शोक उल्हाट ।
हृदयीं भरोनि नेत्रपाट । क्लेशांबु मिरविले ॥ १३२ ॥
म्हणे महाराजा अनाथनाथा । तुम्ही सर्वगुणी विद्येसी जाणतां ।
तरी मम हृदयीं शोकसरिता । नाशजळा वाटतसे ॥ १३३ ॥
म्हणे तरी यातें उपाव कांहीं । सांगा म्हणोनि लागतें पायीं ।
पुन्हां स्पर्शोनि मौळी प्रवाहीं । कवण शब्दा वाढवीतसे ॥ १३४ ॥
पुढें ठेवोनि भिक्षान्न । पुन्हां कवळी मोहें चरण ।
आणि नेत्रां घनाची वृष्टि जीवन । पदमहीतें सिंचीतसे ॥ १३५ ॥
तेणें मच्छिंद्रचित्तसरिते । मोहसराटे अपार भरुते ।
शब्दें तोयओघ मिरवत । होतें सुखसरितेसी ॥ १३६ ॥
म्हणे वो साध्वी क्लेशवंत । किमर्थ कामनीं चित्त ।
तें मज वद कीं चित्तार्थ । सकळां मुक्ती लाहील कीं ॥ १३७ ॥
ऐसें शब्दवर्गउगमा । ऐकोनि बोले द्विजरामा ।
म्हणे महाराज योगद्रुमा । संतती नाही वंशातें ॥ १३८ ॥
तेणें वियोगें खदिरांगार । झगट करितो अतितीव्र ।
तेणेकरोनि चित्त शरीर । दाह पाये महाराजा ॥ १३९ ॥
ऐसे क्लेश चित्तशक्ती । कदा न वसे धैर्यपाठी ।
दुःख गोंधळी शोकपाती । नृत्य करी कवळूनी ॥ १४० ॥
तरी हा शोकवडवानळ । जाळूं पाहे धैर्यजळ ।
त्यांत स्वामींनी होऊनि दयाळ । शोकाग्नींतें विझवावें ॥ १४१ ॥
ऐसी वदतां वाग्भगवती । प्रेमा उदेला नाथचित्तीं ।
मग आदित्यनामें मंत्रविभुती । महाशक्ती निर्मीतसे ॥ १४२ ॥
नाथाकरीं भस्मचिमुटी । तेथें वीर्य करी राहाटी ।
मग तें भस्म तपोजठी । तियें हातीं वोपीतसे ॥ १४३ ॥
म्हणे माय वो शुभाननी । हे भस्मचिमुटी करीं कवळुनी ।
घेई सेवीं आपुले शयनीं । निशीमाजी जननीये ॥ १४४ ॥
म्हणसील भस्म नोहे पूर्ण गभस्ती । जो हरिनारायणउदयो कीर्ति ।
प्रभा मिरवोनि त्रिजगतीं । मोक्षमांदुसा मिरवेल ॥ १४५ ॥
तरी तूं सहसा हळवटपणी । कामना न वरीं भस्मासनीं ।
म्यांही पुढील भविष्य जाणोनि । चिद्भवानी वदविली ॥ १४६ ॥
या भस्माची प्रतापस्थित । तव उदरीं होईल जो सुत ।
तयातें अनुग्रह देऊनिया स्वतः । करीन सरस ब्रह्मांडीं ॥ १४७ ॥
मग तो सुत न म्हणे माय । सकळ सिद्धींचा होईल राय ।
जैसा खगीं नक्षत्रमय । शशिनाथ मिरवेल ॥ १४८ ॥
मग तो न माय ब्रह्मांडभरी । कीर्तिरश्मीचे तेजविवरीं ।
आणि वंद्य होईल चराचरीं । मानवदानवदेवादिकां ॥ १४९ ॥
तरी माये संशयो न धरितां । भक्षीं भस्म सांडोनि चिंता ।
ऐसी सांगोनि सकळ वार्ता । नाथ उठे तेथूनि ॥ १५० ॥
यावरी बोले शुभाननी । कीं महाराजा योगधामीं ।
तुम्ही केव्हां याल परतोनी । सुता अनुग्रह वोपावया ॥ १५१
॥
नाथ ऐकोन बोले तीतें । म्हणे ऐक वो सद्गुणसरिते ।
पुन्हां येऊनि देई उपदेशातें । द्वादशवर्षाउपरांतीं ॥ १५२ ॥
ऐसे वदोनि शब्द सुढाळ । निघता झाला सिद्धपाळ ।
तीर्थउद्देशीं नानास्थळ । महीलागीं लंघीतसे ॥१५३ ॥
तेरीकडे भस्मचिमुटी । सदृढ बांधोनि ठेविली गांठी ।
हरुष न राहे पोटीं । उचंबळोनि दाटलासे ॥ १५४ ॥
मग ती सवेंचि नितंबिनी । जाऊनि बैसे शेजारसदनीं ।
तेथें सात पांच व्रतजवासिनि । येऊनि त्या स्थानीं बैसल्या ॥ १५५ ॥
ते त्या जाया शब्दरहाटीं । सहज बोलती प्रपंचगोष्टी ।
त्यांत ही जाया हर्ष पोटीं । कथा सांगे ती आपुली ॥१५६ ॥
म्हणे माय वो ऐका वचन । चित्त क्षीण झालें संततीविण ।
परी आज आला सर्वार्थ घडोन । तो श्रवणपुटें स्वीकारा ॥ १५७ ॥
एक अकस्मात माझ्या सदनीं । बोवा आला कान फाडोनि ।
कानफाडी केवळ तरणी । मातें दिसूनि आला तो ॥ १५८ ॥
मग म्यां त्यासी स्तवोनी भक्तीं । प्रसन्न केली चित्तभगवती ।
मग प्रसाद वोपूनि माझे हातीं । गमन करिता झाला तो ॥ १५९ ॥
तरी तो प्रसाद भस्मचिमुटी । मातें दिधली पुत्रवृष्टी ।
परी सांगोनि गेला स्वयें होटीं । भक्षण करीं शयनांत ॥ १६० ॥
तरी माय वो सांगा नीती । तेणें वाढेल काय संतती ।
येरी ऐकोनि न मानिती । तेणें काय होईल गे ॥ १६१ ॥
अगे ऐसीं सोंगें महीवरती । कितीएक ठक बहु असती ।
नाना कवटाळे करुनि दाविती । जग भोंदिती जननीये ॥ १६२ ॥
आणि दुसरा त्यांत आहे अर्थ । कानफाडे कवटाळे व्यक्त ।
नानापरींच्या विद्या बहुत । तयांपासी असती वो ॥ १६३ ॥
काय वो सांगूं शुभगात्री । कानफाडे कृत्रिम मंत्री ।
जाया पाहोनि शुभगात्री । करिती कुत्री मंत्रानें ॥ १६४ ॥
मग ते तयांते सवें घेऊनी । हिंडती वस्ती क्षेत्रमेदिनी ।
रात्रीमाजी कांता करोनी । सुखशयनीं भोगिती ते ॥ १६५ ॥
तरी दिवसां कुत्री रात्रीं जाया । करिती त्यांसी जाण माया ।
तूं कोणीकडूनि भ्रमांत या । पडली आहेस जननीये ॥ १६६ ॥
परी हें आम्हांसी दिसतें वोखट । तूं शुभानन जाया अतिवरवंट ।
पदरीं बांधोनि घेतले कपट । यांत बरवे दिसेना ॥ १६७ ॥
ऐसे बोल बोलतां युवती । भवव्याघ्राची झाली वस्ती ।
मग ती परम विटूनी चित्तीं । सदनाप्रती आलीसे ॥ १६८ ॥
मग ती कवळोनि भस्मचिमुटीसी । येती झाली गोठ्यापासीं ।
तेथें गोरजकेरांसीं । मिरवलीसे उकरडा ॥ १६९ ॥
तयामाजी भस्मचिमुटी । सांडिती झाली ते गोरटी ।
तयामाजी हरिजेठी । संचार करी महाराज ॥ १७० ॥
जो नवनारायण कीर्तिध्वज । प्रत्यक्ष विष्णु तेजःपुंज ।
हरि ऐसे नाम साजे । कीर्ति रत्नामाझारीं ॥ १७१ ॥
असो ऐसी अद्वैतराहटी । करोनि जाती झाली गोरटी ।
सदनीं येऊनि प्रपंचदिठीं । सदा सर्वदा मिरवतसे ॥ १७२ ॥
असो ऐशी कथाअवसर । पुढें निवेदूं ग्रंथ सादर ।
तरी श्रोतीं क्षीरोदकसार । पुढिलें अध्यायीं स्वीकारणें ॥ १७३ ॥
भक्तिसार हा कथार्थ ग्रंथ । शुक्तिकानवरत्नमुक्त ।
तुम्हां श्रोत्यांचे कर्णग्रीवेंत । भूषणांते शृंगारुं हो ॥ १७४ ॥
यापरी निंदक खळ दुर्जन । असो त्यांचें कांजीपान ।
तयांचे निंद्य वचन ऐकोन । सोडों नका क्षीरोदका ॥ १७५ ॥
धुंडीसुत मालूचें वचन । नरहरि वदे जग सुगम ।
भावार्थगुणीं गुंफोन । माळ स्वीकारी श्रोत्यांसी ॥ १७६ ॥
स्वस्तिश्रीभक्तिकथासार । संमत गोरक्षकाव्य किमयागार ।
सदा परिसोत भाविक चतुर । द्वितीयोध्याय गोड हा ॥ १७७ ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥
॥ श्रीनवनाथभक्तिसार द्वितीयोध्याय संपूर्ण ॥
Shri Navanath Bhaktisar Adhyay 2

Custom Search
No comments:
Post a Comment