Wednesday, December 13, 2017

Adhyay Tisara Vidnyana Pratipadan Yoga अध्याय तिसरा विज्ञानप्रतिपादन



Adhyay Tisara Vidnyana Pratipadan Yoga 
Ganesh Geeta Adhyay Tisara Vidnyana Pratipadan Yoga is in Sanskrit. It is told by God Gajanan to King Varenya.
अध्याय तिसरा विज्ञानप्रतिपादन
श्रीगजानन उवाच 
पुरा सर्गादिसमये त्रैगुण्यं त्रितनूरुहम् ।
निर्माय चैनमवदं विष्णवे योगमुत्तमम् ॥ १ ॥
१) श्री गजानन म्हणाले, सृष्टीच्या पूर्वीं प्रकाश, प्रवृत्त व नियम अशी तीन कार्यें व सत्त्व, रज व तम असे तीन गुण जिच्यांत आहेत अशा मायेला  ( त्रिगुणात्मक माया ) व ब्रह्मदेवदि तीन देह निर्मण करुन त्यांतील विष्णूला हा योग मी सांगितला.
अर्यम्णे सोऽब्रवीत्सोऽपि मनवे निजसूनवे ।
ततः परंपरायातं विदुरेनं महर्षयः ॥ २ ॥
२) हा योग नंतर विष्णुने रवीला सांगितला. रवीनें आपल्या मनु नावाच्या मुलाला सांगितला नंतर परंपरेने हा योग महर्षींनी जाणला.
कालेन बहुना चाऽयं नष्टः स्याच्चरमे युगे ।
अश्रद्धेयो ह्यविश्र्वास्यो विगीतव्यश्र्च भूमिप ॥ ३ ॥
३) पुष्कळ काल मध्ये गेल्यावर कलियुगांत हा नष्ट होईल.कारण यावर कुणाची श्रद्धा राहणार नाही.कोणी विश्र्वास ठेवणार नाही. उलट याची निंदा मात्र करतील.  
एवं पुराभवं योगं श्रुतवानसि मन्मुखात् ।
गुह्याद्गुह्यतमं वेदरहस्यं परमं शुभम् ॥ ४ ॥
४) तूं जो माझ्या मुखांतून हा योग ऐकला आहेस तो फार पुरातन आहे व अतिशय गुह्य, परमशुभ असे वेदांतील रहस्य आहे.   
वरेण्य उवाच 
सांप्रतं चावतीर्णोऽसि गर्भतस्त्वं गजानन ।
प्रोक्रवान्कथमेतं त्वं विष्णवे योगमुत्तमम् ॥ ५ ॥  
५) राजा वरेण्य म्हणाला, हे गजानना, सांप्रत काळीं तूं गर्भापासून अवतीर्ण झाला आहेस असे असतांना त्या पुराणकालींच्या विष्णुला हा योग तूं कसा सांगितलास ?
श्रीगजानन उवाच 
अनेकानि च ते जन्मान्यतीतानि ममापि च ।
संस्मरे तानि सर्वाणि न स्मृतिस्तव वर्तते ॥ ६ ॥
६) श्रीगजानन म्हणाले, यापूर्वी तुझें अनेक जन्म होऊन गेले आहेत. तसेंच माझेही पण होऊन गेलें आहेत. त्या सर्वांचे मलास्मरण आहे; परंतु तुला ते स्मरण नाही. 
मत्त एव महाबाहो जाता विष्ण्वादयः सुराः ।
मय्येव च लयं यान्ति प्रलयेषु युगे युगे ॥ ७ ॥
७) हे महाबाहो वरेण्या, विष्णु इत्यादिक सर्व देव माझ्यापासूनच उत्पन्न झाले असून युगायुगी होणार्‍या प्रलयांत ते माझ्यांतच लीन होतात.  
अहमेवाऽपरो ब्रह्मा महारुद्रोऽहमेव च ।
अहमेव जगत्सर्वं स्थावरं जङ्गमं  च यत् ॥ ८ ॥
८) सृष्टीकर्ता श्रेष्ठ ब्रह्मदेव व प्रळय करणारा महारुद्र मीच आहे. तसेंच स्थावर जंगम सर्व विश्र्वही मीच आहे. 
अजोऽव्ययोऽहं भूतात्माऽनादिरीश्र्वर एव च ।
आस्थाय त्रिगुणां मायां भवामि बहुयोनिषु ॥ ९ ॥
९) अज, अव्यय, सर्व भूतांचा आत्मा व अनादि ईश्र्वर मीच आहे. त्रिगुणात्मक मायेच्या आश्रयाने मी अनेक योनींत जन्म घेतो. 
अधर्मोपचयो धर्मापचयो हि यदा भवेत् ।
साधून्संरक्षितुं दुष्टांस्तानत्तुं संभवाम्यहम् ॥ १० ॥
१०) जेव्हां अधर्म वाढतो व धर्माचा र्‍हास होतो तेव्हां मी साधूंचे रक्षण व दुष्टांचा नाश करण्याकरितां जन्म घेतो. 
उच्छिद्याऽधर्मनिचयं धर्मं संस्थापयाम्यहम् ।
हन्मि दुष्टांश्र्च दैत्यांश्र्च नानालीलाकरो मुदा ॥ ११ ॥
११) अधर्माची पाळेंमुळें खणून टाकतों. व धर्माची स्थापना करतो. प्रेमानें अनेक लीला करुन दुष्ट व दैत्य यांचा नाश करतो.  
वर्णाश्रमान्मुनीन्साधून्पालये बहुरुपधृक् ।
१२) वर्ण व आश्रम तसेंच साधुमुनि या सर्वांचे मी अनेक रुपें घेऊन पालन करतो.
एवं यो वेत्ति संभूतीर्मम दिव्या युगे युगे ॥ १२ ॥
तत्तत्कर्म च वीर्यं च मम रुपं समासतः ।
त्यक्त्वाऽहंममताबुद्धिं न पनर्भूः स जायते ॥ १३ ॥   
१३) युगायुगीं होणार्‍या अशा माझ्या दिव्य जन्मांना जो जाणतो तें तें माझे कर्म व वीर्य यांचेहि थोडक्यांत ज्याला आकलन करितां येते. अहंता, ममता व बुद्धि यांचा त्याग करुन तो पुन्हा जन्मास येत नाहीं.     
निरीहा निर्भयारोषा मत्परा मद्व् व्यपाश्रयाः ।
विज्ञानतपसा शुद्धा अनेके मामुपागताः ॥ १४ ॥
१४) ज्यांना इच्छा, भय व क्रोध असत नाही, ज्यांना मीच श्रेष्ठ वाटतो,जे माझा आश्रय करतात, विज्ञानरुपी तपानें शुद्ध झालेले असे अनेक लोक मला प्राप्त झाले आहेत. 
येन येन हि भावेन संसेवन्ते नरोत्तमाः ।
तथा तथा फलं तेभ्यः प्रयच्छाम्यव्ययः स्फुटम् ॥ १५ ॥
१५) हे भूपा, श्रेष्ठ पुरुष ज्या ज्या भावाने माझी सेवा करतात, अव्यय असा मी त्यांना त्यांच्या त्यांच्या भावाप्रमाणें फल देतो.
जनाः स्युरितरे राजन्मम मार्गानुयायिनः ।
तथैव व्यवहारं च स्वेषु चान्येषु कुर्वते ॥ १६ ॥
१६) हे राजा, इतरही लोक माझ्या मार्गानें जाणारे आहेत. त्यांचा स्वजनांशीं व इतरांबरोबर अनुरुपच व्यवहार होत असतो.  
कुर्वन्ति देवताप्रीतिं वाच्छन्तः कर्मणां फलम् ।
प्राप्नुवन्तीह ते लोके शीघ्रं सिद्धिं हि कर्मजाम् ॥ १७ ॥
१७) कर्मफलाची इच्छा करणारे देवांवर प्रीति करतात. कर्मापासून मिळणारी सिद्धि त्यांना या लोकीं शीघ्र मिळतें.
चत्वारो हि मया वर्णा रजःसत्त्वतमोशतः ।
कर्मांशतश्र्च संसृष्टा मृत्युलोके मयाऽनघ ॥ १८ ॥
१८) विप्रादि चार वर्ण सत्त्व, रज, तम या तीन गुणांच्या अंशानें व कर्माच्या अंशानें या मृत्यु लोकांत मीच निर्माण केले आहेत.
कर्तारमपि मां तेषामकर्तारं विदुर्बुधाः ।
अनादिमीश्र्वरं नित्यमलिप्तं कर्मजैर्गुणैः ॥ १९ ॥
१९) सर्व वर्णांचा मी कर्ता असतांनाहि ज्ञानी लोक मी कर्ता नाहीं हें जाणतात. कारण मी अनादि, सर्वांचा नियंता, नित्य व कर्मज बर्‍यावाईट गुणांनी अलिप्त असा आहे.  
निरीहं योऽभिजानाति कर्म बाध्नाति नैव तम् ।
चक्रुः कर्माणि बुद्ध् वैवं पूर्वं पूर्वं मुमुक्षवः ॥ २० ॥
२०) निरीह अशा मला जाणून जे कर्म करतात. त्यांना कर्म बद्ध करीत नाहीं. पूर्वींच्या मुमुक्षूंनीं असें जाणून कर्म केलें आहे. ( त्यामुळें ते बद्ध झाले नाहीत. )
वासनाशितादाद्यात्संसारकारणाद् दृढात् ।
अज्ञानबन्धनाज्जन्तुर्बुद्ध्वा यं मुच्यतेऽखिलात् ॥ २१ ॥
२१) अनंत वासनांनी भरलेल्या संसाराचे दृढ असें आद्यकारण जो अज्ञानरुपी बंध त्यापासून मनुष्य ज्याच्या ज्ञानानें मुक्त होतो. 
तदकर्म च कर्मापि कथयाम्यधुना तव ।
यत्र मौनं गता मोहादृषयो बुद्धिशालिनः ॥ २२ ॥
२२) अकर्म व कर्म काय आहे तें मी आतां तुला सांगतो. ज्याच्या विषयीं बुद्धिशाली ऋषीही मोह पावून मौन धरतात. 
तत्त्वं मुमुक्षुणा ज्ञेयं कर्माकर्मविकर्मणाम् ।
त्रिविधानीह कर्माणि सुनिम्नैषां गतिः प्रिय ॥ २३ ॥
२३) कर्म, अकर्म व विकर्म यांचें तत्त्व मुमुक्षूनें अवश्य समजून घ्यावें. या जगांत कर्में तीन प्रकारची आहेत. हे प्रिय भूपा, त्या कर्मांची गति परम गहन आहे.
क्रियायामक्रियाज्ञानमक्रियायां क्रियामतिः ।
यस्य स्यात्स हि मर्त्योऽस्मिँल्लोके मुक्तोऽखिलार्थकृत् ॥ २४ ॥
२४) जो कर्मांत अकर्म व अकर्मांत कर्म पाहतो तो मनुष्य या लोकीं मुक्त व सर्व कर्में करणारा असतो.  
कर्मांकुरवियोगेन यः कर्माण्यारभेन्नरः ।
तत्त्वदर्शननिर्दग्धक्रियमाहुर्बुधा बुधम् ॥ २५ ॥
२५) जो मनुष्य अशी कर्में करितो कीं, ज्यांना कर्मांकुर फुटत नाहीत, त्याची सर्व कर्में तत्त्वज्ञानानें दग्ध झालीं आहेत असें बुद्धिमान वदतात.
फलतृष्णां विहाय स्यात्सदा तृप्तो विसाधनः ।
उद्युक्तोऽपि क्रियां कर्तुं किंचिन्नैव करोति सः ॥ २६ ॥ 
२६) ज्यानें फलाची इच्छा सोडली आहे, जो सदा तृप्त आहे, तसेच साधनांची जुळवाजुळव जो करीत नाहीं, तो कर्म करितांना दिसला तरीही तो वास्तविक कांहींच करीत नाही.           
निरीहो निगृहीतात्मा परित्यक्तपरिग्रहः ।
केवलं वैग्रहं कर्माऽऽचरन्नायति पातकम् ॥ २७ ॥
२७) ज्याला कसलीही इच्छा नाही, ज्यानें मन जिंकिलें आहे व ज्यानें सर्व परिग्रहाचा त्याग केला आहे अशा पुरुषानें शरीर पोषणापुरतें कर्म केलें तरी त्याला दोष लागत नाही.
अद्वन्द्वोऽमत्सरो भूत्वा सिध्यसिध्योः समश्र्च यः ।
यथाप्राप्त्येह सन्तुष्टः कुर्वन्कर्म न बध्यते ॥ २८ ॥
२८) जो सुखदुःखादि द्वंद्वांपासून मुक्त झाला, ज्याला मत्सर असत नाही, कार्यांत सिद्धि मिळाली अगर न मिळाली तरीही ज्याची समता ढळत नाही, अशा मनुष्यानें कर्म केलें तरी ते त्याला बंधक होत नाहीं.
अखिलैर्विषयैर्मुक्तो ज्ञानविज्ञानवानपि ।
यज्ञार्थं तस्य सकलं कृतं कर्म विलीयते ॥ २९ ॥
२९) ज्याचे सर्व विषय सुटले, शास्त्रज ज्ञान व सृष्टिनियमांपासून उत्पन्न झालेलें विज्ञान ज्याला असते असा पुरुष ईश्र्वरार्पणबुद्धिनें कर्म करीत असेल तर ते त्याचें सर्व कर्म लीन होते. 
अहमग्निर्हविर्होता हुतं यन्मयि चाऽर्पितम् ।
ब्रह्माऽऽप्तव्यं च तेनाऽथ ब्रह्मण्येव यतो रतः ॥ ३०॥
३०) ज्ञानी पुरुषाला अग्नि, हविर्द्रव्य, हवन करणारा, हवनक्रिया अर्पण केलेले द्रव्य व त्या कर्मानें मिळणारें फल हें सर्व मी-ब्रह्मच असते, कारण तो ब्रह्मांत रमलेला असतो.  
योगिनः केचिदपरे दिष्टं यज्ञं वदन्ति च ।
ब्रह्माग्निरेव यज्ञो वै इति केचन मेनिरे ॥ ३१ ॥
३१) कित्येक अन्य योगी दिष्ट म्हणजे भाग्यच यज्ञ असें मानतात; तर दुसरें कांहीं योगी ब्रह्मरुपी अग्नीलाच यज्ञ असें समजतात.  
संयमाग्नौ परे भूप इन्द्रियाण्युपजुह्वति ।
खाग्निष्वन्ये तद्विषयाञ्छब्दादीनुपजुह्वति ॥ ३२ ॥
३२) कांहीं योगी संयमरुप अग्नींत इंद्रियांचे हवन करतात; तर कित्येक योगी इन्द्रियरुप अग्नींत शब्दादि विषयांचे हवन करितात.  
प्राणानामिन्द्रियाणां च परे कर्माणि कृत्स्नशः ।
निजात्मरतिरुपेऽग्नौ ज्ञानदीप्ते प्रजुह्वाति ॥ ३३ ॥
३३) कित्येक दुसरें योगी प्राणांची व इन्द्रियांची सर्व कर्मे ज्ञानानें चेतविलेल्या निजात्मरतिरुप अग्नीमध्यें हुत करितात.
द्रव्येण तपसा वापि स्वाध्यायेनापि केचन ।
तीव्रव्रतेन यतिनो ज्ञानेनापि यजन्ति माम् ॥ ३४ ॥
३४) कोणी द्रव्यानें, कोणी तपानें, कोणी स्वाध्याय करुन, तर कित्येक खडतर व्रतें करुन माझें यजन करितात. यतिलोक तर ज्ञानानेंच माझें यजन करितात.    
प्राणेऽपानं तथा प्राणमपाने प्रक्षिपन्ति ये ।
रुद्ध्वा गतीश्र्चोभयोस्ते प्राणायामपरायणाः ॥ ३५ ॥
३५) प्राणवायूंतअपानाला व अपानवायूंत प्राणाला घालून व त्या दोहोंचेंही निरोधन करुन कित्येक प्राणायामांत रत असतात. 
जित्वा प्राणान्प्राणगतीरुपजुह्वति तेषु च ।
एवं नानायज्ञरता यज्ञध्वंसितपातकाः ॥ ३६ ॥
३६) कित्येक योगी प्राणायामानें प्राणांना जिंकून म्हणजे सूक्ष्म करुन प्राणांच्या अधीन ज्यांच्या गती आहेत अशा इंद्रियांच्या व मनाच्या गतींचें त्यांच्यांत हवन करितात. याप्रमाणें अनेक प्रकारचे यज्ञ करुन त्या यज्ञानें सर्व पातकांचा नाश करुन ते पापमुक्त होतात. 
नित्यं ब्रह्म प्रयान्त्येते यज्ञशेषामृताशिनः ।
अयज्ञकारिणो लोको नाऽयमन्यः कुतो भवेत् ॥ ३७ ॥
३७) यज्ञशिष्टास अमृत म्हणतात. तें भक्षण करणारें नित्य अशा ब्रह्माला प्राप्त होतात. जे यज्ञच करीत नाहीत त्यांना इहलोकही सुखद होत नाहीं; मग परलोक कसा होणार?   
कायिकादित्रिधाभूतान्यज्ञान्वेदे प्रतिष्ठितान् ।
ज्ञात्वा तानखिलान्भूप मोक्ष्यसेऽखिलबन्धनात् ॥ ३८ ॥
३८) कायिक, वाचिक व मानसिक असे यज्ञाचे तीन भेद वेदांत सांगितले आहेत. हे जाणल्यानें राजा, तुझे कर्मबंध नष्ट होतील. 
सर्वेषां भूप यज्ञानां ज्ञानयज्ञः परो मतः ।
अखिलं लीयते कर्म ज्ञाने मोक्षस्य साधने ॥ ३९ ॥
३९) हे राजा, या सर्व यज्ञांत ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. तो मोक्षाचे साधन असून त्यांत सर्व कर्मे लीन होतात.
तज्ज्ञेयं पुरुषव्याघ्र प्रश्र्नेन नतितः सताम् ।
शुश्रूषया वदिष्यन्ति सन्तस्तत्त्वविशारदाः ॥ ४० ॥
४०) हे पुरुषश्रेष्ठा, हें ज्ञान प्रश्र्ण केला असतां अगर वंदन केले असतां तत्त्वज्ञ, ज्ञानी लोक तुला सांगतील.
नानासंगाञ्जुनः कुर्वन्नैकं साधुसमागमम् ।
करोति तेन संसारे बन्धनं समुपैति सः ॥ ४१ ॥
४१)  मनुष्य अनेकांशी संग करतो; पण एक साधूंचा तेवढा संग करीत नाही. म्हणून या संसारांत त्याला बंधांत पडावें लागते.
सत्सङ्गाद्गुणसंभूतिरापदां लय एव च ।
स्वहितं प्राप्यते सर्वैरिह लोकेपरत्र च ॥ ४२ ॥
४२) सत्संगानें सद् गुण उत्पन्न होतात, व सर्व आपत्ति नष्ट होतात. तो या लोकीं व परलोकींही सर्वांना स्वहित प्राप्त करुन देतो. 
इतरत्सुलभं राजन्सत्सङ्गोऽतीव दुर्लभः ।
यज्ज्ञात्वा न पुर्बन्धमेति ज्ञेयं च तत्त्वतः ॥ ४३ ॥
४३) सत्संगापेक्षां इतर संग सुलभ आहे. सत्संग फारच दुर्लभ आहे. तो ज्याला लाभला त्याला सर्व बंध ज्याच्या योगानें तुटतात अशा ज्ञेय ब्रह्मवस्तूचे ज्ञान होते. 
ततः सर्वाणि भोतानि स्वात्मन्येवाभिपश्यति ।
अतिपापरतो जन्तुस्ततस्तस्यात्प्रमुच्यते ॥ ४४ ॥
४४) ( ज्ञेय ब्रह्माचे ज्ञान झाल्यावर ) सर्व भूतें त्याला स्वात्म्यांत दिसूं लागतात. तो पापी असला तरीही ज्ञानानें तो पापांपासून मुक्त होतो. 
द्विविधानीह कर्माणि ज्ञानाग्निर्दहति क्षणात् ।
प्रसिद्धोऽधिर्यथा सर्वं भस्मतां नयति क्षणात् ॥ ४५ ॥
४५) दोन्ही प्रकारची कर्में ज्ञानरुपी अग्निमध्यें क्षणांत नष्ट होतात, जसा प्रसिद्ध अग्नि थोडयाच वेळांत सर्व दग्ध करतो.
न ज्ञानसमतामेति पवित्रमितरन्नृप ।
आत्मन्येवाऽवगच्छन्ति योगात्कालेन योगिनः ॥ ४६ ॥
४६) या जगांत अनेक पवित्र वस्तु आहेत, पण त्यांना ज्ञानाची सर येणार नाहीं. तें ज्ञान योग्याला कांहीं कालानें या शरिरांतच प्राप्त होते. 
भक्तिमानिन्द्रियजयी तत्परो ज्ञानमाप्नुयात् ।
लब्ध्वा तत्परमं मोक्षं स्वल्पकालेन यात्यसौ ॥ ४७ ॥
४७) भक्तिमान्, इंद्रियांचा जय करणारा व योगरत अशा पुरुषास ज्ञान प्राप्त होतें. तें ज्ञान झाल्यासवर त्याला मोक्ष तत्काल मिळतो. 
भक्तिहीनोऽश्रद्दधानः सर्वत्र संशयी तु यः ।
तस्य शं नापि कल्याणमिह लोको न वा परः ॥ ४८ ॥
४८) भक्ति व श्रद्धा यांनीं रहित व सर्वत्र संशयी अशा पुरुषाला इहलोकीं व परलोकींही सुख मिळत नाहीं. 
आत्मज्ञानरतं ज्ञाननाशिताखिलसंशयम् ।
योगास्ताखिलकर्माणं बध्नन्ति तानि भूप न ॥ ४९ ॥
४९) जो आत्मज्ञानांत रमलेला असतो, ज्ञानानें ज्याचे सर्व संशय दूर झालेले असतात व योगानें ज्याच्या सर्व कर्मांचा निरास झालेला असतो, त्या पुरुषास कर्में बंधक होत नाहीत.
ज्ञानखङ्गप्रहारेण संभूतमज्ञताबलात् ।
छित्त्वाऽन्तःसंशयं तस्माद्योगयुक्तो भवेन्नरः ॥ ५० ॥
५०) अज्ञानाचे बलावर उत्पन्न झालेला जो अंतःसंशय त्याला ज्ञानरुप खङ्गानें नाहींसे करुन टाकावें व सदैव योगरत व्हावें. 

ॐ तत्सदिति श्रीमद्गणेशगीतासूपनिषदर्थगर्भासु योगामृतार्थशास्त्रे श्रीगणेशपुराणे उत्तरखंडे श्रीगजाननवरेण्यसंवादे विज्ञानप्रतिपादनो नाम तृतीयोऽध्यायः ॥
Adhyay Tisara VidnyanaPratipadan Yoga

अध्याय तिसरा विज्ञानप्रतिपादन



Custom Search

No comments: