Wednesday, December 6, 2017

Ganesh Geeta Mahatmya and Nyasa सार्थ श्रीगणेशगीता महात्म्य व न्यास


Ganesh Geeta Mahatmya and Nyasa 
Shri Ganesh Geeta is in Sanskrit. It is from Ganesh Purana. It is told to king Varenya by God Ganesh. There are 11 Adhyayan of Ganesh Geeta.
सार्थ श्रीगणेशगीता महात्म्य व न्यास
सार्थ श्रीगणेशगीता
श्रीगणेशगीता ही संस्कृतमध्यें असून श्रीगणेश पुराणांत उत्तरखंडामध्यें क्रीडाखंडांत अध्याय १३८ ते १४८ पर्यंत आली आहे. ती श्रीगजानन व राजा वरेण्य यांच्या संवादांत आली आहे.  श्रीगणेशगीतेचे एकंदर अकरा अध्याय असून ही श्रीगजाननांनी वरेण्य राजाला सांगितली आहे. राजा वरेण्य हा विरक्त व मुमुक्षु होता. तो श्रीगजाननाचा परम भक्त होता. तो गजाननाला प्रश्र्ण विचारत आहे. श्रीगजानन काय सांगतांत तें ऐकण्यास तो अगदी अधीर झाला आहे.      
वरेण्य उवाच 
विघ्नेश्र्वर महाबाहो सर्वविद्याविशारद ।
सर्वशास्त्रार्थतत्त्वज्ञ योगं मे वक्तुमर्हसि ॥ 
असे राजा वरेण्य श्रीगणेशाला विचारत आहे. 
श्रीगजानन उवाच
सम्यग्व्यवसिता राजन् मतुस्तेऽनुग्रहान्मम ।
शृणु गीतां प्रवक्ष्यामि योगामृतमयीं नृप ॥
या श्र्लोकांत श्रीगणेशांनी श्रोतृप्रशंसापूर्वक बोलण्यास आरंभ केला.     
या गीतेच्या मनन निदिध्यासनाने राजा वरण्यानें मोक्ष मिळविला. 
श्रीगणेश उपासकांना ही श्रीगणेशाची उपासना करण्यास अत्यंत उपयुक्त आहे.  अनुष्ठानानें भक्तांच्या अनेक इच्छा पूर्ण होऊं शकतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थीचे दिवशीं श्रीगणेशाची वाहन व आयुधयुक्त मूर्ति करुन जो विधीयुक्त पूजा करील व सातवेळा श्रीगणेशगीता वाचील/ ऐकेल त्याच्या सर्व कामना पूर्ण होऊं शकतात. पुत्रपौत्र, धन, धान्य, रत्नादि संपत्ती मिळते असा या गणेशगीतेच्या अकराव्या अध्यायांत उल्लेख आहे. 
मराठी भाषांतर श्री दत्तात्रेय रघुनाथशास्त्री देवधर, मिरज यांनी केलेले असून श्री विनायक रंगो फडके गणेशमंदिर,  फडकेवाडी, वसई जिल्हा ठाणे. यांनी प्रकाशित केले आहे. त्यामुळे त्यांचे आभार व ऋण मानून हे सादर केले आहे.   
वरेण्य उवाच 
संसारेबहुदुःखानि दृष्टानि दुःसहानि च ।
इदानीं मोक्षमार्गं मे कृपया दिश दुःखहन् ॥ १ ॥
साक्षात्कारे कथं बंधस्तव स्याद् द्विरदानन ।
येनोपदेशेन मुक्तिं यास्यामि तद्वदस्व मे ॥ २ ॥
योगं तं येन सन्त्यक्ष्ये कामं क्रोधं मृतेर्भयम् ।
अर्थ
वरेण्य म्हणाल, हे देवा, या संसारांत दुःसह अशी पुष्कळ दुःखें मला भोगावीं लागली. यांतून मुक्त होण्याचा मार्ग कृपा करुन मला सांगा. तुमचा साक्षात्कार झाल्यावर बंध कसा शिल्लक राहील ? हे गजानना, मला असा उपदेश करा कीं, ज्याच्या योगानें मी मोक्षाला जाईन. असाही योग सांगा कीं, ज्याच्या योगानें कामक्रोध नष्ट होतील व मृत्युचें भय राहाणार नाही. वरेण्यानें असा प्रश्र्ण विचारल्यावर श्रीगजाननांनी राजाला आपल्याजवळ बसवून घेतले. त्याचे मस्तकावर हात ठेवला. त्याचे सर्व संशय दूर केलें, विश्र्वरुप दर्शन करविले. तत्त्वज्ञान सांगितले. राजा वरेण्याला पूर्ण वैराग्य येऊन त्याने आपल्या मुलाला राज्यावर बसविले. सर्वसंग परित्याग करुन तो अरण्यांत गेला. तेथें श्रीगणेशाच्या उपदेशाचे आचरण करुन तो मुक्त झाला.  
यथा जलं जले क्षिप्तं जलमेच हि जायते ।
तथा तद्ध्यानतः सोऽपि तन्मयत्वमुपाययौ ॥
जलांत जल टाकिलें कीं ते जलमय होते. तद्दत् श्रीगणेशाच्या ध्यानानें राजा वरेण्य गजाननच झाला. 
श्रीगजानन प्रसीदतु ॥
नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्या प्रदायिने ।
यस्याऽगस्त्यायते नाम विघ्नसागरशोषणे ॥

ब्रह्मविद्या देणार्‍या व अगस्तीप्रमाणें (भक्तांच्या) विघ्नांचा सागर शोषणार्‍या त्या गणेशाला नमस्कार असो व त्याची सर्वांवर कृपा होवो. 
 श्रीगणेशगीता न्यस
अथ श्रीगणेशगीतायाः न्यासः ध्यानं च ।
अस्य श्रीगणेशगीतामालामन्त्रस्य श्रीवेदव्यासऋषिः ।
अनुष्टुप् छन्दः । श्रीमहागणपतिर्देवता । गं इति बीजं ।
अं इति शक्तिः । स्वाहा इति कीलकम् । 
श्रीमहागणपतिप्रसादसिद्धर्थं पाठे विनियोगः ।
गां अंगुष्ठाभ्यां नमः । हृदयाय नमः । इत्यादि दीर्घेण षडंगन्यासः ।
अथ ध्यानम् ।
वरेण्याख्याय भक्ताय बोधयामास यां स्वयम् ।
एकादशाध्यायवर्ती विघ्नराजो गजाननः ॥ १ ॥    
ध्यायामि त्वामहं गीते योगद्वैतप्रकाशिनीम् ।
एकदन्तं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणम् ॥ २ ॥
रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम् ।
रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम् ॥ ३ ॥
रक्तगंधानुलिप्तांगं रक्तपुष्पैः सुपूजितम् । 
भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम् ॥ ४ ॥
आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात् परम् ।
एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः ॥ ५ ॥
इति धयात्वा लं पृथिव्यात्मकं श्रीमहागणपतये नमः ।
गंधं परिकल्पयामि । हं आकाशात्मकं पुष्पं परिकल्पयामी नमः ।
यं वाय्वात्मकं धूपं परिकल्पयामि नमः ।
रं तैजसात्मकं दीपं परिकल्पयामि नमः ।
वं अमृतात्मकं अमृतं परिकल्पयामि नमः ।
सं सर्वात्मकाम् सर्वोपचारान् राजोपचारान् दिव्योपचारान् परिकल्पयामि नमः । श्रीमहागणपतये नमः । अनन्तकोटिनमस्कारान् परिकल्पयामि नमः । इत्यादि मानसोपचारैः संपूज्य । 
गणेशन्यासः
श्रीगणेशाय नमः ॥
आचम्य प्राणायामं कृत्वा ।
दक्षिणहस्ते वक्रतुंडाय नमः। वामहस्ते शूर्पकर्णाय नमः ।
ओष्ठे विघ्नेशाय नमः । अधरोष्ठे चिंतामणयेनमः ।
संपुटे गजाननाय नमः । दक्षिणपादे लंबोदराय नमः ।
वामपादे एकदंताय नमः । शिरसि एकदंताय नमः ।
चिबुके ब्रह्मणस्पतये नमः । 
दक्षिणनासिकायां विनायकाय नमः ।
वामनासिकायां ज्येष्ठराजाय नमः ।
दक्षिणनेत्रे विकटाय नमः । वामनेत्रे कपिलाय नमः ।
दक्षिणकर्णे धरणीधराय नमः ।
वामकर्णे आशापूरकाय नमः । नाभौ महोदराय नमः ।
हृदये धूम्रकेतवे नमः। ललाटे मयूरेशाय नमः ।
दक्षिणबाहौ स्वानंदवासकारकाय नमः ।
वामबाहौ सच्चित्सुखधाम्ने नमः ।
इति गणेशन्यासः ।   
 Ganesh Geeta Mahatmya and Nyasa
सार्थ श्रीगणेशगीता महात्म्य व न्यास


Custom Search

No comments: