Tuesday, June 8, 2021

ShriRamCharitManas AyodhyaKanda Part 29 श्रीरामचरितमानस अयोध्याकाण्ड भाग २९

 

ShriRamCharitManas 
AyodhyaKanda Part 29 
Doha 167 to 172 
श्रीरामचरितमानस 
अयोध्याकाण्ड भाग २९ 
दोहा १६७ ते १७२

दोहा--जे परिहरि हरि हर चरन भजहिं भूतगन घोर ।

तेहि कइ गति मोहि देउ बिधि जौं जननी मत मोर ॥ १६७

 ॥

जे लोक श्रीहरि व श्रीशंकर यांना सोडून भयानक भूत-प्रेताना भजतात, हे माते, जर यात माझी संमती असेल, तर विधात्याने त्या लोकांची गती मला द्यावी. ॥ १६७ ॥

बेचहिं बेदू धरमु दुहि लेहीं । पिसुन पराय पाप कहि देहीं

 ॥

कपटी कुटिल कलहप्रिय क्रोधी । बेद बिदूषक बिस्व

 बिरोधी ॥

जे लोक वेद विकतात, धर्माचे स्वार्थापोटी शोषण करतात, जे लावालाव्या करणारे आहेत, दुसर्‍यांची पापे लोकांना सांगतात. जे कपटी, कुटिल, कलहप्रिय आणि रागीट आहेत आणि जे वेदांची निंदा करणारे व सर्व जगाचे शत्रू आहेत; ॥ १ ॥

लोभी लंपट लोलुपचारा । जे ताकहिं परधनु परदारा ॥

पावौं मैं तिन्ह कै गति घोरा । जौं जननी यहु संमत मोरा ॥

जे लोभी, लंपट आणि हावरटासारखे वर्तन करणारे आहेत, जे दुसर्‍याचे धन व परस्त्रीवर डोळा ठेवतात, हे जननी, जर या कृत्यास माझी संमती असेल तर मला वरील सर्वांची भयानक गती मिळो. ॥ २ ॥

जे नहिं साधुसंग अनुरागे । परमारथ पथ बिमुख अभागे ॥

जे न भजहिं हरि नरतनु पाई । जिन्हहि न हरि हर सुजसु

 सोहाई ॥

ज्यांना सत्संगतीविषयी प्रेम नाहीं, जे भाग्यहीन परमार्थ-मार्गापासून विन्मुख आहेत, जे मनुष्यदेह लाभला असतानाही श्रीहरीचे भजन करीत नाहीत, ज्यांना भगवान विष्णू व शंकर यांचे गुणगान आवडत नाही, ॥ ३ ॥

तजि श्रुतिपंथु बाम पथ चलहीं । बंचक बिरचि बेष जगु

 छलहीं ॥

तिन्ह कै गति मोहि संकर देऊ । जननी जौं यहु जानौं

 भेऊ ॥

जे वेदमार्ग सोडून वाम-मार्गाने जातात, जे ठक आहेत, आणि साधूचे सोंग घेऊन जगाला फसवितात, हे माते, मला जर हे षड्यंत्र माहीत असेल, तर श्रीशंकर भगवान मला वरील लोकांची गती देवोत. ' ॥ ४ ॥

दोहा--मातु भरत के बचन सुनि सॉंचे सरल सुभायँ ।

कहति राम प्रिय तात तुम्ह सदा बचन मन कायँ ॥ १६८ ॥

 माता कौसल्या भरताचे अत्यंत खरे व सरळ बोलणे ऐकून म्हणाली, ' बाबा रे ! तू मन, वचन व आचरणाने नेहमीच श्रीरामाचा आवडता आहेस. ॥ १६८ ॥

राम प्रानहु तें प्रान तुम्हारे । तुम्ह रघुपतिहि प्रानहु तें प्यारे

 ॥

बिधु बिष चवै स्त्रवै हिमु आगी । होइ बारिचर बारि

 बिरागी ॥

श्रीराम तुला प्राणाहून प्रिय आहे, आणि तूसुद्धा रघुनाथाला प्राणाहून अधिक प्रिय आहेस. चंद्र विष ओकू लागला आणि हिम आगीचा वर्षाव करु लागले, जलचर जीव जलापासून विरक्त झाले, ॥ १ ॥

भएँ ग्यानु बरु मिटै न मोहू । तुम्ह रामहि प्रतिकूल न होहू

 ॥

मत तम्हार यहु जो जग कहहीं । सो सपनेहुँ सुख सुगति

 न लहहीं ॥

आणि ज्ञान प्राप्त झाल्यावरही मोह संपला नाही, तरीही तू श्रीरामचंद्राविरुद्ध कधीही जाण्यार नाहीस. जगामध्ये जे कोणी असे म्हणतील की, या गोष्टीमध्ये तुझी संमती आहे, त्यांना स्वप्नातही सुख व शुभ गती मिळणार नाही. ' ॥ २ ॥

अस कहि मातु भरतु हियँ लाए । थन पय स्त्रवहिं नयन

 जल छाए ॥

करत बिलाप बहुत एहि भॉंती । बैठेहिं बीति गई सब राती

 ॥

असे म्हणून कौसल्येने भरताला हृदयाशी कवटाळले, तिच्या स्तनांतून दूध स्त्रवू लागले आणि नेत्रात प्रेमाश्रू टाटले. अशा प्रकारे पुष्कळ विलाप करीत बसल्या-बसल्या ती सारी रात्र संपली. ॥ ३ ॥

बामदेउ बसिष्ठ तब आए । सचिव महाजन सकल बोलाए

 ॥

मुनि बहु भॉंति भरत उपदेसे । कहि परमारथ बचन सुदेसे

 ॥

मग वामदेव व वसिष्ठ आले. त्यांनी सर्व मंत्री व प्रतिष्ठित

 लोकांना बोलावून घेतले. नंतर मुनी वसिष्ठांनी प्रसंगानुरु

 पारमार्थिक सुंदर गोष्टी सांगून पुष्कळ प्रकारे भरताला

 उपदेश केला. ॥ ४ ॥

दोहा--तात हृदयँ धीरजु करहु जो अवसर आजु ।

उठे भरत गुर बचन सुनि करन कहेउ सबु साजु ॥ १६९

 ॥

वसिष्ठ म्हणाले, ' हे कुमार ! मनात धैर्य धर आणि आज जे करण्याची वेळ आहे, ते कर. ' गुरुजींचे म्हणणे ऐकून भरत उठला आणि त्याने सर्व तयारी करण्यास सांगितले. ॥ १६९ ॥

नृपतनु बेद बिदित अन्हवावा । परम बिचित्र बिमानु

 बनावा ॥

गहि पद भरत मातु सब राखी । रहीं रानि दरसन

 अभिलाषी ॥

वेदांमध्ये सांगितलेल्या विधीप्रमाणे राजाला स्नान घातले

 आणि परम पवित्र असे विमान बनविले. भरताने सर्व

 मातांचे चरण धरुन त्यांना सती होण्यापासून परावृत्त

 केले.

 त्या राण्यासुद्धा श्रीरामांच्या दर्शनाची अभिलाषा बाळगून

 सती गेल्या नाहीत. ॥ १ ॥

चंदन अगर भार बहु आए । अमित अनेक सुगंध सुहाए ॥

सरजु तीर रचि चिता बनाई । जनु सुरपुर सोपान सुहाई ॥

चंदन, अगुरू व इतर अनेक प्रकारच्या सुगंधी द्रव्यांचे पुष्कळ ढीग आले. शरयू नदीच्या तटावर सुंदर चिता रचली. जणू ती स्वर्गाची पायरी असावी, असे वाटत होते. ॥ २ ॥

एहि बिध दाहक्रिया सब कीन्ही । बिधिवत न्हाइ

 तिलांजुलि दीन्ही ॥

सोधि सुमृति सब बेद पुराना । कीन्ह भरत दसगात

 बिधाना ॥

अशा प्रकारे दहन-क्रिया केली गेली आणि सर्वांनी विधिपूर्वक स्नान करुन तिलांजली दिली. मग वेद, स्मृती आणि पुराणे या सर्वांच्या मताप्रमाणे भरताने पित्याचे दह्य दिवसांचे कर्म केले. ॥ ३ ॥

जहँ जस मुनिबर आयसु दीन्हा । तहँ तस सहस भॉंति

 सबु कीन्हा ॥

भए बिसुद्ध दिए सब दाना । धेनु बाजि गज बाहन नाना ॥

मुनिश्रेष्ठ वसिष्ठांनी जिथे जशी आज्ञा दिली तिथे भरताने त्याप्रमाणे अनेक प्रकारची कृत्ये केली. सुतक संपल्यावर विधिपूर्वक सर्व दाने दिली. गाई, घोडे, हत्ती, इत्यादी अनेक प्रकाची वाहने,  ॥ ४ ॥

दोहा--सिंघासन भूषन बसन अन्न धरनि धन धाम ।

दिए भरत लहि भूमिसुर भे परिपूरन काम ॥ १७० ॥

सिंहासने, दागिने, कपडे, अन्न, पृथ्वी, धन व घरे भरताने दान केली. ब्राह्मणांना दानें देऊन त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण केल्या. ॥ १७० ॥

पितु हित भरत कीन्हि जसि करनी । सो मुख लाख जाइ

 नहिं बरनी ॥

सुदिनु सोधि मुनिबर तब आए । सचिव महाजन सकल

 बोलाए ॥

 पित्यासााठी भरताने जे काही केले, त्याचे वर्णन लाख मुखांनीही करता येणे शक्य नाही. मग शुभ मुहूर्त शोधून मुनिश्रेष्ठ वसिष्ठ आले आणि त्यांनी मंत्र्यांना व श्रेष्ठींना बोलाविले. ॥ १ ॥

बैठे राजसभॉं सब जाई । पठए बोलि भरत दोउ भाई ॥

भरतु बसिष्ठ निकट बैठारे । नीति धरममय बचन उच्चारे ॥

सर्वजण राजसभेमध्ये स्थानापन्न झाले. तेव्हा वसिष्ठांनी

 भरत व शत्रुघ्न या दोघा भावांना बोलावणे पाठविले.

 वसिष्ठांनी भरताला आपल्याजवळ बसवून घे

तले आणि नीतिपूर्ण व धर्मपूर्ण शब्दांत सांगितले. ॥ २ ॥

प्रथम कथा सब मुनिबर बरनी । कैकइ कुटिल कीन्हि

 जसि करनी ॥

भूप धरमब्रतु सत्य सराहा । जेहिं तनु परिहरि प्रेमु निबाहा

 ॥

मुनिवर्यांनी कैकेयीने जे कुटिल कृत्य केले होते, त्याची कथा प्रारंभी सांगितली. नंतर दशरथांनी धर्म व सत्य राखण्यासाठी श्रीरामांचा त्याग केला व स्वतः देहत्याग करुन रामावरील प्रेम व्यक्त केले, असे सांगितले. ॥ ३ ॥

कहत राम गुन सील सुभाऊ । सजल नयन पुलकेउ

 मुनिराऊ ॥

बहुरि लखन सिय प्रीति बखानी । सोक सनेह मगन मुनि

 ग्यानी ॥

श्रीरामचंद्रांचे गुण, शील व स्वभाव यांचे वर्णन करता-करता मुनिराजांच्या नेत्रांत अश्रू आले आणि त्यांचे शरीर रोमांचित झाले. नंतर लक्ष्मण व सीता यांच्या प्रेमाची थोरवी सांगत ज्ञानी मुनी शोक व प्रेम यांमध्ये मग्न झाले. ॥ ४ ॥

दोहा--सुनहु भरत भावी प्रबल बिलखि कहेउ मुनिनाथ ।

हानि लाभु जीवनु मरनु जसु अपजसु बिधि हाथ ॥ १७१ ॥

मुनिनाथ शोकाकुल होऊन म्हणाले, ' भरता, ऐक. भवितव्यता अटळ असते. हानि-लाभ, जीवन-मरण आणि कीर्ती-अपकीर्ती या गोष्टी विधात्याच्या हाती आहेत. ॥ १७१ ॥

अस बिचारि केहि देइअ दोसू । ब्यरथ काहि पर कीजिअ

 रोसू ॥

तात बिचारु करहु मन माहीं । सोच जोगु दसरथु नृपु

 नाहीं ॥

असा विचार केल्यावर दोष कुणाला द्यायचा ? आणि कुणावर व्यर्थ रोष करायचा ? कुमार ! मनात विचार कर. राजा दशरथांबद्दल दुःख करणे योग्य नाही. ॥ १ ॥

सोचिअ बिप्र जो बेद बिहीना । तजि निज धरमु बिषय

 लयलीना ॥

सोचिअ नृपति जो नीति न जाना । जेहि न प्रजा प्रिय प्रान

 समाना ॥

जो ब्राह्मण वेद जाणत नाही आणि आपला धर्म सोडून विषय-भोगामध्येच बुडालेला असतो, त्याच्याविषयी शोक केला पाहिजे. जो राजा नीति जाणत नाही आणि ज्याला आपली प्रजा प्राणांसमान प्रिय नाही, त्याच्याबद्दल शोक करावा. ॥ २ ॥

सोचिअ बयसु कृपन धनवानू । जो न अतिथि सिव भगति

 सुजानू ॥

सोचिअ सूद्रु बिप्र अवमानी । मुखर मानप्रिय ग्यान गुमानी

 ॥

जो वैश्य धनवान असूनही कंजूष आहे आणि जो अतिथि-सत्कार व श्रीशिवांची भक्ती करण्यात तत्पर नसतो, त्याच्याबद्दल चिंता करावी. जो शूद्र ब्राह्मणांचा अपमान करणारा आहे, फार बड्या बाता मारणारा आहे आणि मान-मोठेपणा यांची इच्छा बाळगणारा व ज्ञानाची घमेंड बालगणारा आहे, त्याची चिंता करावी. ॥ ३ ॥

सोचिअ पुनि पति बंचक नारी । कुटिल कलहप्रिय

 इच्छाचारी ॥

सोचिअ बटु निज ब्रतु परिहरई । जो नहिं गुर आयसु

 अनुसरई ॥

जी स्त्री पतीला फसविणारी, कुटिल, कलहप्रिय व स्वेच्छाचारिणी आहे, तिची चिंता करावी. जो ब्रह्मचारी ब्रह्मचर्य-व्रत सोडून देतो आणि गुरुच्या आज्ञेप्रमाणे वागत नाही, त्याची चिंता करावी. ॥ ४ ॥

दोहा--सोचिअ गृही जो मोह बस करइ करम पथ त्याग ।

सोचिअ जती प्रपंच रत बिगत बिबेक बिराग ॥ १७२ ॥

जो गृहस्थ मोहामुळे कर्ममार्गाचा त्याग करतो त्याची चिंता करावी. जो संन्यासी जगाच्या प्रपंचामध्ये सापडला आहे आणि ज्ञान-वैराग्यहीन आहे, त्याची चिंता करावी. ॥ १७२ ॥

बैखानस सोइ सोचै जोगू । तपु बिहाइ जेहि भावइ भोगू ॥

सोचिअ पिसुन अकारन क्रोधी । जननि जनक गुर बंधु

 बिरोधी ॥

ज्या वानप्रस्थ मनुष्याला तपस्या सोडून भोग आवडतात, त्याची चिंता करण्याजोगी आहे. जो लावालावी करणारा आहे, विनाकारण क्रोध करणारा आहे, माता-पिता, गुरु, भाऊबंद यांच्याशी वैरभाव ठेवणारा आहे, त्याची चिंता करावी. ॥ १ ॥

सब बिधि सोचिअ पर अपकारी । निज तनु पोषक

 निरदय भारी ॥

सोचनीय सबहीं बिधि सोई । जो न छाड़ि छलु हरि जन

 होई ॥

जो दुसर्‍याचे अनिष्ट करतो, आपलेच शरीर पोसतो आणि फार मोठा निर्दय आहे, त्याची सर्व प्रकारे चिंता करावी. आणि जो कपट सोडून हरीचा भक्त नसतो, तोही सर्व प्रकारे चिंता करण्याजोगा होय. ॥ २ ॥

सोचनीय नहिं कोसलराऊ । भुवन चारिदस प्रगट प्रभाऊ

 ।

भयउ न अहइ न अब होनिहारा । भूप भरत जस पिता

 तुम्हारा ॥

कोसलराज दशरथ हे चिंता करण्यासारखे नाहीत. त्यांचा प्रभाव चौदा लोकांमध्ये पसरलेला आहे. हे भरता, तुझ्या पित्यासारखा राजा झालेला नाही, आजही कोणी नाही आणि आता होणारही नाही. ॥ ३ ॥

बिधि हरि हरु सुरपति दिसिनाथा । बरनहिं सब दसरथ

 गुन गाथा ॥

ब्रह्मदेव, विष्णू, शिव, इंद्र व दिक्पाल हे सर्व दशरथांचे गुणगान करतात. ॥ ४ ॥



Custom Search

No comments: