Thursday, April 28, 2022

ShriRamCharitManas Aranyakand Part 6 Doha 12 To 14 श्रीरामचरितमानस अरण्यकाण्ड भाग ६ दोहा १२ ते १४

ShriRamCharitMana
Aranyakand Part 6 
Doha 12 To 14 
श्रीरामचरितमानस 
अरण्यकाण्ड भाग ६ 
दोहा १२ ते १४

दोहा—मुनि समूह महँ बैठे सन्मुख सब की ओर ।

सरद इंदु तन चितवत मानहुँ निकर चकोर ॥ १२ ॥

मुनींच्या समाजामध्ये श्रीरामचंद्र सर्वांच्याकडे मुख करुन बसले. सर्व मुनी त्यांना एकटक पाहू लागले. असे वाटत होते की, जणू चकोर पक्ष्यांचा जमाव शरत्पौर्णिमेच्या चंद्राकडे पाहात आहे. ॥ १२ ॥

तब रघुबीर कहा मुनि पाहीं । तुम्ह सन प्रभु दुराव कछु नाहीं ॥

तुम्ह जानहु जेहि कारन आयउँ । ताते तात न कहि समुझायउँ ॥

तेव्हा श्रीरामांनी मुनींना सांगितले की, ‘ हे प्रभो, तुमच्यापासून काही लपून नाही. मी ज्यासाठी आलो आहे, ते तुम्ही जाणताच. म्हणून हे मुनिवर्य ! मी आपल्याला स्पष्टपणे काही सांगितले नाही. ॥ १ ॥

अब सो मंत्र देहु प्रभु मोही । जेहि प्रकार मारौं मुनिद्रोही ॥

मुनि मुसुकाने सुनि प्रभु बानी । पूछेहु नाथ मोहि का जानी ॥

हे मुनिवर्य ! आता तुम्ही मला सल्ला द्या की, कशाप्रकारे मी मुनि-द्रोही राक्षसांना मारु ? ‘ प्रभूंची वाणी ऐकून मुनी हसले आणि म्हणाले,  ‘ हे नाथ, तुम्ही काय म्हणून मला हा प्रश्न विचारलात ? ॥ २ ॥

तुम्हरेइँ भजन प्रभाव अघारी । जानउँ महिमा कछुक तुम्हारी ॥

ऊमरि तरु बिसाल तव माया । फल ब्रह्मांड अनेक निकाया ॥

हे पापांचा नाश करणारे, मी जर तुमच्याच भजनाच्या प्रभावाने तुमचा काही थोडासाच महिमा जाणतो. तुमची माया ही औदुंबराच्या विशाल वृक्षासारखी आहे. अनेक ब्रह्मांडांचे समूह हे त्याचीच फळे आहेत. ॥ ३ ॥

जीव चराचर जंतु समाना । भीतर बसहिं न जानहिं आना ॥

ते फल भच्छक कठिन कराला । तव भयँ डरत सदा सोउ काला ॥

चराचर जीव हे उंबराच्या फळात राहणार्‍या लहान जंतूणप्रमाणे ब्रह्मांडरुपी फळांमध्ये राहतात आणि आपल्या त्या छोट्याशा जगाशिवाय दुसरे काही त्यांना माहीत नसते. त्या फळांना खाऊन टाकणारा कराल काल आहे. तो कालसुद्धा नेहमी तुम्हांला भिऊन असतो. ॥ ४ ॥

ते तुम्ह सकल लोकपति साईं । पूँछेहु मोहि मनुज की नाईं ॥

यह बर मागउँ कृपानिकेता । बसहु हृदयँ श्री अनुज समेता ॥

त्या सर्व लोकपालांचे स्वामी असूनही तुम्ही मला सामान्य मनुष्याप्रमाणे प्रश्न विचारला. मी असा वर मागतो की, तुम्ही सीता व लक्ष्मण यांच्यासह माझ्या हृदयात नित्य निवास करावा. ॥ ५ ॥

अबिरल भगति बिरति सतसंगा । चरन सरोरुह प्रीति अभंगा ॥

जद्यपि ब्रह्म अखंड अनंता । अनुभव गम्य भजहिं जेहि संता ॥

मला प्रगाढ भक्ती, वैराग्य, सत्संग व तुमच्या चरणकमली अतूट प्रेम मिळो. जरी तुम्ही अखंड व अनंत ब्रह्म आहात, अनुभवानेच तुम्हांला जाणता येते आणि संतजन तुमचे भजन करतात, ॥ ६ ॥

अस तव रुप बखानउँ जानउँ । फिरिफिरि सगुन ब्रह्म रति मानउँ ॥

संतत दासन्ह देहु बड़ाई । तातें मोहि पूँछेहु रघुराई ॥

जरी मी तुमचे हे रुप जाणतो आणि त्याचे वर्णनसुद्धा करतो, तरीही पुनःपुन्हा मी सगुण ब्रह्मावरच प्रेम करतो. तुम्ही नेहमी सेवकांना मोठेपण देता, म्हणून हे रघुनाथ, तुम्ही मला हे विचारले. ॥ ७ ॥   

है प्रभु परम मनोहर ठाऊँ । पावन पंचबटी तेहि नाऊँ ॥

दंडक बन पुनीत प्रभु करहू । उग्र साप मुनिबर कर हरहू ॥

हे प्रभो ! एक परम मनोहर व पवित्र स्थान आहे, त्याचे नाव पंचवटी. हे प्रभो, तुम्ही त्या दंडकवनातील पंचवटीस पवित्र करा आणि श्रेष्ठ गौतमऋषींचा कठोर शाप दूर करा. ॥ ८ ॥

बास करहु तहँ रघुकुल राया । कीजे सकल मुनिन्ह पर दाया ॥

चले राम मुनि आयसु पाई । तुरतहिं पंचबटी निअराई ॥

हे रघुकुलाचे स्वामी ! सर्व मुनींच्यावर दया करुन आपण तेथेच निवास करा. ‘ मुनींची आज्ञा मिळाल्यावर श्रीरामचंद्र तेथून निघाले आणि लवकरच पंचवटीजवळ पोहोचले. ॥ ९ ॥

दोहा---गीधराज सैं भेंट भइ बहु बिधि प्रीति बढ़ाइ ।

गोदावरी निकट प्रभु रहे परन गृह छाइ ॥ १३ ॥

तेथे गृधराज जटायु याची भेट झाली. त्याच्यावर खूप प्रेम व्यक्त करुन प्रभू रामचंद्र गोदावरीजवळच्या पंचवटीमध्ये पर्णकुटी बनवून राहू लागले. ॥ १३ ॥

जब ते राम कीन्ह तहँ बासा । सुखी भए मुनि बीती त्रासा ॥

गिरि बन नदीं ताल छबि छाए । दिन दिन प्रति अति होहिं सुहाए ॥

श्रीराम तेथे निवास करु लागले. तेव्हापासून मुनींना आनंद झाला. त्यांची भीती दूर झाली. तेथील पर्वत, वने, नदी व तलावांना शोभा आली. ते सर्व दिवसेंदिवस अधिक शोभिवंत दिसू लागले. ॥ १ ॥

खग मृग बृंद अनंदित रहहीं । मधुप मधुर गुंजत छबि लहहीं ॥

सो बन बरनि न सक अहिराजा । जहॉं प्रगट रघुबीर बिराजा ॥

पक्षी व पशू यांचे समूह आनंदित होऊन राहू लागले. भ्रमर गुंजारव करताना शोभून दिसत होते. जेथे प्रत्यक्ष श्रीराम विराजमान आहेत, त्या वनाचे वर्णन सर्पराज शेषसुद्धा करु शकणार नाही. ॥ २ ॥

एक बार प्रभु सुख आसीना । लछिमन बचन कहे छलहीना ॥

सुर नर मुनि सचराचर साईं । मैं पूछउँ निज प्रभु की नाईं ॥

एकदा प्रभू सुखाने बसले होते. त्यावेळी लक्ष्मण त्यांना सहजपणाने म्हणाला, ‘ हे देवता, मनुष्य, मुनी व चराचराचे स्वामी, मी तुम्हांला आपला स्वामी समजून विचारतो, ॥ ३ ॥

मोहि समुझाइ कहहु सोइ देवा । सब तजि करौं चरन रज सेवा ॥

कहहु ग्यान बिराग अरु माया । कहहु सो भगति करहु जेहिं दाया ॥

हे देव, मला समजावून ती गोष्ट सांगा की, ज्यायोगे सर्व काही सोडून देऊन तुमच्या चरणरजाची मी सेवा करीत राहीन. तसेच ज्ञान, वैराग्य आणि माया यांचे स्वरुप सांगा आणि ज्यामुळेतुम्ही कृपा करता, ती भक्ती मला सांगा. ॥ ४ ॥

दोहा---ईस्वर जीव भेद प्रभु सकल कहौ समुझाइ ।

जातें होइ चरन रति सोक मोह भ्रम जाइ ॥ १४ ॥

हे प्रभो, ईश्रर व जीव यांच्यातील भेदसुद्धा समजावून द्या. त्यामुळे तुमच्या चरणी मला प्रेम उत्पन्न होईल आणि माझे शोक, मोह आणि भ्रम नष्ट होतील. ॥ १४ ॥

थोरेहि महँ सब कहउँ बुझाई । सुनहु तात मति मन चित लाई ॥

मैं अरु मोर तोर तैं माया । जेहिं बस कीन्हे जीव निकाया ॥

श्रीराम म्हणाले, ‘ हे बंधो ! मी थोडक्यातच तुला सर्व समजावून सांगतो. तू मन, चित्त आणि बुद्धी लावून ऐक. मी आणि माझे, तू आणि तुझे असे मानणे हीच माया होय. तिनेच सर्व जीवांना आपल्या ताब्यात ठेवले आहे. ॥ १ ॥

गो गोचर जहँ लगि मन जाई । सो सब माया जानेहु भाई ॥

तेहि कर भेद सुनहु तुम्ह सोऊ । बिद्या अपर अबिद्या दोऊ ॥

हे बंधू, इंद्रिये, विषय आणि जेथवर मन जाते, ती सर्व माया आहे, असे समज. तिचेही विद्या माया आणि अविद्या माया असे दोन भेद आहेत, ते ऐकून घे. ॥ २ ॥

एक दुष्ट अतिसय दुखरुपा । जा बस जीव परा भवकूपा ॥

एक रचइ जग गुन बस जाकें । प्रभु प्रेरित नहिं निज बल ताकें ॥

पहिली अविद्या माया ही दुष्ट आहे आणि अत्यंत दुःखरुप आहे. तिच्या अधीन झाल्यामुळे जीव हा संसाररुपी विहिरीत पडलेला आहे. आणि दुसरी विद्या माया. हीच्या अधीन गुण आहेत. ती जगाची निर्मिती करते. प्रभूच्याद्वारे ती प्रेरित होते. तिला स्वतःचे सामर्थ्य काहीही नाही. ॥ ३ ॥

ग्यान मान जहँ एकउ नाहीं । देख ब्रह्म समान सब माहीं ॥

कहिअ तात सो परम बिरागी । तृन सम सिद्धि तीनि गुन त्यागी ॥

जेथे मान इत्यादी एकही दोष नसतो आणि जो सर्वांठायी

 समान रुपाने ब्रह्म पाहातो, ते ज्ञान होय. हे वत्सा, ज्याने

 सर्व सिद्धींचा आणि तिन्ही गुणांचा कस्पटासारखा त्याग

 केलेला आहे, त्यालाच वैराग्यवान म्हटले पाहिजे. ॥ ४ ॥



Custom Search

No comments: