Tuesday, May 31, 2022

ShriRamCharitManas Aranyakand Part 7 Doha 15 and 16 श्रीरामचरितमानस अरण्यकाण्ड भाग ७ दोहा १५ व १६

 

ShriRamCharitManas 
Aranyakand Part 7 
Doha 15 and 16 
श्रीरामचरितमानस 
अरण्यकाण्ड भाग ७ 
दोहा १५ व १६

दोहा---माया ईस न आपु कहुँ जान कहिअ सो जीव ।

बंध मोच्छ प्रद सर्बपर माया प्रेरक सीव ॥ १५ ॥

जो माया, ईश्र्वर व आपले स्वरुप जाणत नाही, त्याला जीव म्हणावे. जो कर्म-बंधनापासून मुक्त करणारा सर्वांच्या पलीकडचा आणि मायेचा प्रेरक आहे, तो ईश्र्वर होय. ॥ १५ ॥

धर्म तें बिरति जोग तें ग्याना । ग्यान मोच्छप्रद बेद बखाना ॥

जातें बेगि द्रवउँ मैं भाई । सो मम भगति भगत सुखदाई ॥

धर्माच्या आचरणामुळे वैराग्य आणि योगामुळे ज्ञान होते  आणि ज्ञान हे मोक्ष देणारे आहे, असे वेदांनी वर्णन केले आणि हे बंधू, ज्यामुळे मी शीघ्र प्रसन्न होतो, ती माझी भक्ती आहे. ती भक्तांना सुख देणारी आहे. ॥ १ ॥

सो सुतंत्र अवलंब न आना । तेहि आधीन ग्यान बिग्याना ॥

भगति तात अनुपम सुखमूला । मिलइ सो संत होइँ अनुकूला ॥

ती भक्ति स्वतंत्र आहे. तिला दुसर्‍या कशाचीही गरज नसते. ज्ञान व विज्ञान हे तिच्या अधीन असतात. हे बंधो ! भक्ती ही अनुपम व सुखाचे मूळ आहे आणि जेव्हा संत प्रसन्न होतात, तेव्हाच ती मिळते. ॥ २ ॥

भगति कि साधन कहउँ बखानी । सुगम पंथ मोहि पावहिं प्रानी ॥

प्रथमहिं बिप्र चरन अति प्रीती । निज निज कर्म निरत श्रुति रीती ॥

आता मी भक्तीचे साधन विस्ताराने सांगतो. हा मार्ग सोपा आहे. त्यामुळे जीव मला सहजपणे प्राप्त करतो. प्रथम, ब्राह्मणांच्या चरणी अत्यंत प्रेम असावे आणि वेद-रीतीप्रमाणे आपापल्या वर्णाश्रमकर्मामध्ये रत असावे. ॥ ३ ॥

एहि कर फल पुनि बिषय बिरागा । तब मम धर्म उपज अनुरागा ॥

श्रवनादिक नव भक्ति दृढ़ाहीं । मम लीला रति अति मन माहीं ॥

याचे फल म्हणून मग विषयांपासून वैराग्य येईल. वैराग्य आल्यावर माझ्या भागवत धर्माबद्दल प्रेम निर्माण होईल. तेव्हा श्रवणादी नऊ प्रकारच्या भक्ती दृढ होतील आणि मनात माझ्या लीलांविषयी अत्यंत प्रेम उत्पन्न होईल. ॥ ४ ॥

संत चरन पंकज अति प्रेमा । मन क्रम बचन भजन दृढ़ नेमा ॥

गुरु पितु मातु बंधु पति देवा । सब मोहि कहँ जानै दृढ़ सेवा ॥

ज्याला संतांच्या चरणकमलांविषयी अत्यंत प्रेम असेल, जो गुरु, पिता, माता, बंधू, पती आणि देव हे सर्व काही मलाच मानतो व सेवा करण्यात दृढ असतो, ॥ ५ ॥

मम गुन गावत पुलक सरीरा । गदगद गिरा नयन बह नीरा ॥

काम आदि मद दंभ न जाकें । तात निरंतर बस मैं ताकें ॥

माझे गुण गाताना ज्याचे शरीर पुलकित होते, वाणी सद्गदित होते, नेत्रांतून प्रेमाश्रूंचे जल वाहू लागते आणि काम, मद आणि दंभ इत्यादि ज्याच्यामध्ये नसतील, हे बंधू, मी नेहमी त्याला वश असतो. ॥ ६ ॥   

दोहा---बचन कर्म मन मोरि गति भजनु करहिं निःकाम ।

तिन्ह के हृदय कमल महुँ करउँ सदा बिश्राम ॥ १६ ॥

जो कायावाचामनाने मलाच शरण आहे आणि जो निष्काम भावाने माझे भजन करतो, त्याच्या हृदय कमलामध्ये मी नित्य विसावा घेत असतो. ‘ ॥ १६ ॥

भगति जोग सुनि अति सुख पावा । लछिमन प्रभु चरनन्हि सिरु नावा ॥

एहि बिधि गए कछुक दिन बीती । कहत बिराग ग्यान गुन नीती ॥

हा भक्तियोग ऐकून लक्ष्मणाला अत्यंत आनंद झाला आणि त्याने प्रभूंच्या चरणी मस्तक ठेवले. अशा प्रकारे वैराग्य, ज्ञान, गुण आणि नीती समजावून सांगत काही दिवस गेले. ॥ १ ॥

सूपनखा रावन कै बहिनी । दुष्ट हृदय दारुन जस अहिनी ॥

पंचबटी सो गइ एक बारा । देखि बिकल भइ जुगल कुमारा ॥

शूर्पणखा नावाची रावणाची एक बहीण होती. जी नागिणीसारखी भयानक आणि दुष्ट मनाची होती. ती एकदा पंचवटीत गेली आणि दोन्ही राजकुमारांना पाहून कामासक्त झाली. ॥ २ ॥

भ्राता पिता पुत्र उरगारी । पुरुष मनोहर निरखत नारी ॥

होइ बिकल सक मनहि न रोकी । जिमि रबिमनि द्रव रबिहि बिलोकी ॥

काकभुशुंडी म्हणतात, की ‘ हे गरुडा, शूर्पणखेसारखी राक्षसी, धर्मज्ञानशून्य, कामांध स्त्री मनोहर पुरुष पाहून, मग तो, भाऊ, बाप, पुत्र का असेना, बैचेन होते आणि मन आवरु शकत नाही. ज्याप्रमाणे सूर्यकांतमणी हा सूर्याला पाहाताच पाझरु लागतो. ॥ ३ ॥

रुचिर रुप धरि प्रभु पहिं जाई । बोली बचन बहुत मुसुकाई ॥

तुम्ह सम पुरुष न मो सम नारी । यह सँजोग बिधि रचा बिचारी ॥

ती सुंदर रुप धारण करुन प्रभूंच्याजवळ आली आणि मोहक हास्य करीत म्हणाली, ‘ तुमच्यासारखा कोणी पुरुष नाही आणि माझ्यासारखी स्त्री. विधात्याने ही आपली जोडी खूप विचार करुन बनविली आहे. ॥ ४ ॥

मम अनुरुप पुरुष जग माहीं । देखेउँ खोजि लोक तिहु नाहीं ॥

तातें अब लगि रहिउँ कुमारी । मनु माना कछु तुम्हहि निहारी ॥

मी तिन्ही लोक शोधले, परंतु माझ्याजोगा पुरुष जगात कोठेही नाही, त्यामुळे मी अजुनही कुमारी राहिले आहे. आता तुम्हांला पाहून माझे मन मोहित झाले. ॥ ५ ॥

सीतहि चितइ कही प्रभु बाता । अहइ कुआर मोर लघु भ्राता ॥

गइ लछिमन रिपु भगिनी जानी । प्रभु बिलोकि बोले मृदु बानी ॥

प्रभु रामचंद्र सीतेकडे पाहात म्हणाले की, ‘ माझा लहान भाऊ कुमार आहे’ तेव्हा ती लक्ष्मणाकडे गेली. लक्ष्मणाने ती शत्रूची बहीण आहे, हे ओळखून प्रभूंकडे पाहात कोमल वाणीने थट्टेने तिला म्हटले, ॥ ६ ॥

सुंदरि सुनु मैं उन्ह कर दासा । पराधीन नहिं तोर सुपासा ॥

प्रभु समर्थ कोसलपुर राजा । जो कछु करहिं उनहि सब छाजा ॥

‘ हे सुंदरी, ऐक. मी तर त्यांचा दास आहे. मी पराधीन आहे, म्हणून तुला सुख मिळणार नाही. प्रभु समर्थ आहेत, कोसलपुरचे राजे आहेत, त्यांनी काहीही केले, तरी ते त्यांना शोभते. ॥ ७ ॥

सेवक सुख चह मान भिखारी । ब्यसनी धन सुभ गति बिभिचारी ॥

लोभी जसु चह चार गुमानी । नभ दुहि दूध चहत ए प्रानी ॥

सेवकाने सुखाची इच्छा करणे, भिकार्‍याने सन्मानाची इच्छा करणे, व्यसनी माणसाने पैशाचीव व्यभिचार्‍याने शुभगतीची इच्छा करणे, लोभ्याने कीर्तीचा हव्यास धरणे आणि दूताने मानाचा हव्यास धरणे, हे सर्व आकाशाची धार काढून दूध मिळविण्यासारखे आहे. ॥ ८ ॥

पुनि फिरि राम निकट सो आई । प्रभु लछिमन पहिं बहुरि पठाई ।

लछिमन कहा तोहि सो बरई । जो तृन तोरि लाज परिहरई ॥

तेव्हा ती परत श्रीरामांच्याजवळ आली. प्रभूंनी तिला लक्ष्मणाकडे पाठविले. लक्ष्मण म्हणाला, ‘ जो अत्यंत निर्लज्ज असेल, तोच तुला वरील. ॥ ९ ॥

तब खिसिआनि राम पहिं गई । रुप भयंकर प्रगटत भई ॥

सीतहि सभय देखि रघुराई । कहा अनुज सन सयन बुझाई ॥

मग ती चिडून श्रीरामांच्याकडे गेली आणि तिने आपले भयंकर रुप प्रगट केले. तिला पाहून सीता भयभीत झाल्याचे पाहिले, तेव्हा श्रीरघुनाथांनी लक्ष्मणाला इशारा केला. ॥ १० ॥




Custom Search

No comments: