ShriRamCharitManas
दोहा—अबिरल भगति मागि बर
गीध गयउ हरिधाम ।
तेहि की क्रिया जथोचित निज
कर कीन्ही राम ॥ ३२ ॥
असे अखंड भक्तीचे वरदान
मागून गृध्रराज जटायू श्रीहरींच्या परमधामाला गेला. श्रीरामचंद्रांनी त्याच्या
दहनादी क्रिया योग्य प्रकारे स्वतःच्या हातांनी केल्या. ॥ ३२ ॥
कोमल चित अति दीनदयाला ।
कारन बिनु रघुनाथ कृपाला ॥
गीध अधम खग आमिष भोगी । गति
दीन्ही जो जाचत जोगी ॥
श्रीरघुनाथ अत्यंत कोमल
चित्ताचे, दीनदयाळु आणि अकारण कृपाळू आहेत. जटायू हा एक क्षुद्र गिधाड आणि
मांसाहारी होता. त्यालाही श्रीरामांनी योगीजनांना जी हवी असते, ती गती दिली. ॥ १ ॥
सुनहु उमा ते लोग अभागी ।
हरि तजि होहिं बिषय अनुरागी ॥
पुनि सीतहि खोजत द्वौ भाई ।
चले बिलोकत बन बहुताई ॥
श्रीशिव म्हणतात, ‘ हे
पार्वती, ऐक. जे लोक भगवंतांना सोडून विषयांवर प्रेम करतात, ते दुर्दैवी होत. ‘
नंतर दोघे बंधू सीतेला शोधत पुढे निघाले. वाटेतील घनदाट वने पाहात ते जात होते. ॥
२ ॥
संकुल लता बिटप घन कानन ।
बहु खग मृग तहँ गज पंचानन ॥
आवत पंथ कबंध निपाता । तेहिं
सब कही साप कै बाता ॥
ते दाट वन
वृक्ष-वेलींनी भरलेले होते. त्यात पुष्कळ पक्षी, मृग, हत्ती आणि सिंह राहात होते.
श्रीरामांनी वाटेत आलेल्या कबंध राक्षसाला ठार मारले.त्याने अपल्या शापाची सर्व
हकिगत सांगितली. ॥ ३ ॥
दुरबासा मोहि दीन्ही सापा ।
प्रभु पद पेखि मिटा सो पापा ॥
सुनु गंधर्ब कहउँ मैं तोही
। मोहि न सोहाइ ब्रह्मकुल द्रोही ॥
तो म्हणाला, ‘
दुर्वासांनी मला शाप दिला होता. आता प्रभूंच्या चरणांच्या दर्शनाने ते पाप नाहीसे
झाले. ‘ श्रीराम म्हणाले, ‘ हे गंधर्वा, मी सांगून ठेवतो की ब्राह्मणकुळाचा अपराध
करणारा मला आवडत नाही. ॥ ४ ॥
दोहा---मन क्रम बचन कपट तजि
जो कर भूसुर सेव ।
मोहि समेत बिरंचि सिव बस
ताकें सब देव ॥ ३३ ॥
कायावाचामनाने
ब्राह्मणांचा जो निष्कपट सेवा करतो, त्याला माझ्यासह ब्रह्मदेव, शिव इत्यादी सर्व
देव वश होतात. ॥ ३३ ॥
सापत ताड़त परुष कहंता ।
बिप्र पूज्य अस गावहिं संता ॥
पूजिअ बिप्र सील गुन हीना ।
सूद्र न गुन गन ग्यान प्रबीना ॥
शाप देणारा, मारणारा
आणि कठोर बोलणारासुद्धा ब्राह्मण पूजनीय आहे, असे संत म्हणतात. शीलहीन आणि गुणहीन
ब्राह्मणसुद्धा पूजनीय होय पण गुणगणांनी युक्त आणि ज्ञानात निपुण असलेला शूद्रही
पूजनीय नाही. ‘ ॥ १ ॥
कहि निज धर्म ताहि समुझावा
। निज पद प्रीति देखि मन भावा ॥
रघुपति चरन कमल सिरु नाई ।
गयउ गगन आपनि गति पाई ॥
श्रीरामांनी त्याला
आपला भागवत धर्म समजावून सांगितला. आपल्या चरणी त्याचे प्रेम आहे, असे पाहून तो
त्यांना आवडला. त्यानंतर श्रीरघुनाथांच्या चरणकमली नतमस्तक होऊन तो आपली गंधर्वाची
गती प्राप्त करुन आकाशात निघून गेला. ॥ २ ॥
ताहि देइ गति राम उदारा ।
सबरी कें आश्रम पगु धारा ॥
सबरी देखि राम गृहँ आए ।
मुनि के बचन समुझि जियँ भाए ॥
उदार राम त्याला गती
देऊन शबरीच्या वनात आले. श्रीराम आपल्या घरी आल्याचे शबरीने पाहिले, तेव्हा मतंग
मुनींचे वचन आठवून तिचे मन प्रसन्न झाले. ॥ ३ ॥
सरसिज लोचन बाहु बिसाला ।
जटा मुकुट सिर उर बनमाला ॥
स्याम गौर सुंदर दोउ भाई ।
सबरी परी चरन लपटाई ॥
कमलासारखे नेत्र व
विशाल भुजा असलेल्या, शिरावर जटांचा मुकुट आणि गळ्यात वनमाला धारण केलेल्या, सुंदर,
सावळ्या आणि गोर्या त्या दोघा बंधूंचे चरण शबरीने धरले. ॥ ४ ॥
प्रेम मगन मुख बचन न आवा ।
पुनि पुनि पद सरोज सिर नावा ॥
सादर जल लै चरन पखारे ।
पुनि सुंदर आसन बैठारे ॥
ती प्रेमात इतकी मग्न झाली होती की, तोंडातून शब्द
निघत नव्हता. वारंवार चरण-कमलांवर नतमस्तक होत
होती. नंतर तिने पाणी आणून मोठ्या आदराने दोघा
भावांचे चरण धुतले आणि त्यांना सुंदर आसनांवर
बसविले. ॥ ५ ॥

No comments:
Post a Comment