Tuesday, December 20, 2022

SunderKanda Part 12 ShriRamCharitManas Doha 31 to Doha 33 सुंदरकाण्ड भाग १२ श्रीरामचरितमानस दोहा ३१ ते दोहा ३३

 

SunderKanda Part 12 
ShriRamCharitManas 
Doha 31 to Doha 33 
सुंदरकाण्ड भाग १२ 
श्रीरामचरितमानस 
दोहा ३१ ते दोहा ३३

दोहा---निमिष निमिष करुणानिधि जाहिं कलप सम बीति ।

बेगि चलिअ प्रभु आनिअ भुज बल खल दल जीति ॥ ३१ ॥

हे करुणानिधान, तिचा एक एक क्षण कल्पासारखा जात आहे. म्हणून हे प्रभू, लगेच चला आणि आपल्या भुजबलाने दुष्टांचे सैन्य जिंकून सीतेला घेऊन या.’ ॥ ३१ ॥

सुनि सीता दुख प्रभु सुख अयना । भरि आए जल राजिव नयना ॥

बचन कायँ मन मम गति जाही । सपनेहुँ बूझिअ बिपति की ताही ॥

सीतेचे दुःख ऐकून सुखाने धाम असलेल्या प्रभूंचे कमलनेत्र पाण्याने डबडबले. ते म्हणाले, ‘ कायावाचामनाने जिला माझाच आश्रय आहे, तिला स्वप्नातही विपत्ती येऊ शकेल काय ?’ ॥ १ ॥

कह हनुमंत बिपति प्रभु सोई । जब तव सुमिरन भजन न होई ॥

केतिक बात प्रभु जातुधान की । रिपुहि जीति आनिबी जानकी ॥

हनुमान म्हणाला, ‘ हे प्रभो, विपत्ती तेव्हाच येते, जेव्हा तुमचे भजन-स्मरण नसेल. हे प्रभो, राक्षसांचे ते काय ? तुम्ही शत्रूला जिंकून जानकीला घेऊन याल. ‘ ॥ २ ॥

सुनु कपि तोहि समान उपकारी । नहिं कोउ सुर नर मुनि तनुधारी ॥

प्रति उपकार करौं का तोरा । सनमुख होइ न सकत मन मोरा ॥

भगवान म्हणाले, ‘ हे हनुमाना, ऐक. तुझ्यासारखा माझ्यावर उपकार करणारा देव, मनुष्य किंवा मुनी असा कोणीही देहधारी नाही. मी तुला या उपकाराबद्दल काय देणार ? माझे मनही तुझ्यासमोर यायला धजावत नाही. ॥ ३ ॥   

सुनु सुत तोहि उरिन मैं नाहीं । देखेउँ करि बिचार मन माहीं ॥

पुनि पुनि कपिहि चितव सुरत्राता । लोचन नीर पुलक अति गाता ॥

हे वत्सा, मी मनात खूप विचार करुन पाहिला परंतु मी तुझ्या ॠणातून मुक्त होऊ शकत नाही. ‘ देवांचे रक्षक प्रभू वारंवार हनुमानाकडे पाहात होते. त्यांच्या नेत्रांत प्रेमाश्रू भरुन आले होते आणि त्यांचे शरीर पुलकित झाले होते. ॥ ४ ॥

दोहा—सुनि प्रभु बचन बिलोकि मुख गात हरषि हनुमंत ।

चरन परेउ प्रेमाकुल त्राहि त्राहि भगवंत ॥ ३२ ॥

प्रभूंचे बोलणे ऐकून व त्यांचे प्रसन्न मुख आणि पुलकित अंग पाहून हनुमानाला आनंद झाला आणि प्रेमाने व्याकूळ होऊन तो म्हणाला, ‘ हे भगवन, माझे करा, रक्षण करा, रक्षण करा. ‘ असे म्हणत त्याने प्रभूंच्या चरणांवर लोटांगण घातले. ॥ ३२ ॥

बार बार प्रभु चहइ उठावा । प्रेम मगन तेहि उठब न भावा ॥

प्रभु कर पंकज कपि कें सीसा । सुमिरि सो दसा मगन गौरीसा ॥

प्रभू त्याला वारंवार उठवू पाहात होते, परंतु प्रेमामध्ये बुडालेल्या हनुमानाला चरण सोडून उठावेसे वाटत नव्हते. प्रभूंचे कर-कमल हनुमानाच्या शिरावर होते. त्या स्थितीच्या आठवणीनेच शिव प्रेममग्न होऊन समाधिस्थ झाले. ॥ १ ॥

सावधान मन करि पुनि संकर । लागे कहन कथा अति सुंदर ॥

कपि उठाइ प्रभु हृदयँ लगावा । कर गहि परम निकट बैठावा ॥

मग मन सावध करुन शिवशंकर अत्यंत सुंदर गोष्ट सांगू लागले. हनुमानाला उठवून प्रभूंनी हृदयाशी धरले आणि हात धरुन आपल्याजवळ बसविले. ॥ २ ॥

कहु कपि रावन पालित लंका । केहि बिधि दहेउ दुर्ग अति बंका ॥

प्रभु प्रसन्न जाना हनुमाना । बोला बचन बिगत अभिमाना ॥

प्रभू म्हणाले, ‘ हनुमाना, सांग तर खरे, रावणाकडून सुरक्षित असलेली लंका आणि त्याचा दुर्गम दुर्ग कसा काय जाळलास ? ‘ प्रभू प्रसन्न आहेत, हे पाहून हनुमानाने कोणताही अभिमान न बाळगता सांगितले. ॥ ३ ॥

साखामृग कै बड़ि मनुसाई । साखा तें साखा पर जाई ॥

नाघि सिंधु हाटकपुर जारा । निसिचर गन बधि बिपिन उजारा ॥

‘ वानराने एका फांदीवरुन दुसर्‍या फांदीवर उडी मारणे, हाच मोठा पुरुषार्थ आहे. मी समुद्र ओलांडून सोन्याचे नगर जाळले आणि राक्षसांना मारुन अशोकवन उध्वस्त केले, ॥ ४ ॥

सो सब तव प्रताप रघुराई । नाथ न कछू मोरि प्रभुताई ॥

हे रघुनाथ, हा सर्व तुमचा प्रताप आहे, हे नाथ, यात माझे काही मोठपण नाही. ॥ ५ ॥

दोहा---ता कहुँ प्रभु कछु अगम नहिं जा पर तुम्ह अनुकूल ।

तव प्रभावँ बड़वानलहि जारि सकइ खलु तूल ॥ ३३ ॥

हे प्रभू, ज्याच्यावर तुम्ही प्रसन्न होता, त्याला काहीही कठीण नाही. तुमच्या प्रभावाने कापूससुद्धा वडवानलाला नक्कीच जाळू शकतो. ॥ ३३ ॥

नाथ भगति अति सुखदायनी । देहु कृपा करि अनपायनी ॥

सुनि प्रभु परम सरल कपि बानी । एवमस्तु तब कहेउ भवानी ॥

हे नाथ, अत्यंत सुख देणारी आपली निश्चल भक्ती कृपा करुन मला द्या. ‘ हनुमानाचे ते सरळ बोलणे ऐकून, हे भवानी, प्रभू म्हणाले, ' तथास्तु ‘. ॥ १ ॥

उमा राम सुभाउ जेहिं जाना । ताहि भजनु तजि भाव न आना ॥

यह संबाद जासु उर आवा । रघुपति चरन भगति सोइ पावा ॥

हे उमे, ज्याने श्रीरामांचा स्वभाव जाणला आहे, त्याला भजन सोडून दुसरी कोणतीही गोष्ट आवडत नाही. हा स्वामी-सेवकाचा संवाद ज्याच्या मनात ठसला, त्यालाच श्रीरामांच्या चरणांची भक्ती मिळाली.’

सुनि प्रभु बचन कहहिं कपिबृंदा । जय जय जय कृपाल सुखकंदा ॥

तब रघुपति कपिपतिहि बोलावा । कहा चलैं कर करहु बनावा ॥

प्रभूंचे बोलणे ऐकून वानरगण म्हणू लागले, ‘ कृपाळू आनंदकंद श्रीरामांचा विजय असो, विजय असो. ‘ मग श्रीरघुनाथांनी वानरराज सुग्रीवाला बोलावून सांगितले की, ‘ निघायची तयारी करा. ‘ ॥ ३ ॥

अब बिलंबु केहि कारन कीजे । तुरत कपिन्ह कहुँ आयसु दीजे ॥

कौतुक देखि सुमन बहु बरषी । नभ तें भवन चले सुर हरषी ॥

आता उशीर कशाला करायचा ? वानरांना लगेच आज्ञा

 दे.’ भगवंतांची ही रावण-वधाच्या तयारीची लीला पाहून

 देव खूप फुले उधळून आणि आनंदित होऊन

 आकाशातून आपापल्या लोकी निघून गेले. ॥ ४ ॥



Custom Search

No comments: