Saturday, January 17, 2009

Aaditya Hrudaya Stotra
AdityaHrudyaStotra is from Walmiki Ramayan. At the time of Ram-Ravan Yudha (War) this stotra was told by Agasti Rushi to Rama. As advised by the rushi, Rama prayed to Aditya i.e. Sun and received strength, power and blessings from Aditya. Sorrow, disappointment vanished and Rama won the war with Ravana. He killed Ravana and become victorious.
This is a very auspicious and powerful stotra. We can be successful in our every endeavour, by reciting this stotra once in a day with concentration, devotion and faith. Those who are suffering from heart disease are requested to recite this stotra daily. This stotra cures there disease.


Astrology

Fifth House in our Horoscope: Please see my earlier post for the diagram of the horoscope showing houses with there numbers, so that you will get the idea of the house which I am referring here.

The fifth house rules life, knowledge, intelligence, knowledge of future, investment and income in shares, races, lottery etc., children, love affairs, speculation, belly, morals, courtships, emotions, piousness etc.
Mangal or Mars and Venus or Shukra in this house shows love affairs. Owner of this house if posited in this house and with Guru or Jupiter /or in aspect of Guru Or Jupiter indicates children.

Thought for the Day

Life is exciting and positive and rewarding.
Hence enjoy it happily.
.
Success

There is every chance that cleverer or more talented people may fell but persistent people can always be successful.
वाल्मीकी रामायाणांतील अगस्ती ऋषींनी सांगितलेल्या आदित्य हृदय स्तोत्राचा मराठी अर्थ:
१) युद्धांत दमलेल्या व चिंताग्रस्त असलेल्या रामाने आपल्या समोर युद्धाला आलेल्या रावणाला बघितले. 
२) देवांसह आलेल्या भगवान अगस्ती ऋषींनी रणांगणावर असलेल्या रामाला सांगितले, 
३) हे महाबाहो रामा, सर्व शत्रूंवर विजय मिळवून देणारे गुप्त, गुह्य ज्ञान ऐक. 
४) अत्यंत कल्याणकारी, सर्व शत्रुंचा नाश करून जय देण्यार्या पुण्यकारक आदित्य हृदयाचे नेहमी पठण करावे. 
५-६) सर्व मंगलांमध्ये मंगल, सर्व पापे नष्ट करणारा, चिंता व शोक नाहीसे करणारा, आयुष्यवर्धन करणारा अत्यंत तेजाने उदय पावणार्या, देवा व दानवांनी नमस्कार केलेल्या, अशा विश्वाच्या ईश्वराची विवस्वान भास्कराची पूजा करावी. 
७) अत्यंत तेजस्वी किरण असलेला देवात्मक असा सूर्य देव लोकांचे आणि देवांचे रक्षण करो. 
८-१५ ) हा सूर्य ब्रह्मा, विष्णू, शिव,स्कंद, इंद्र, कुबेर, काल, यम, पाण्याचा अधिपती चंद्र, पितृदेव, वसु, साध्या, अश्विनीकुमार, मरूद, मनु, वायु, अग्नी, प्रजेचा प्राण, ऋतुनिर्माण करणारा, प्रभाकर, आदित्य, सविता, सूर्य, आकाशांत भ्रमण करणारा, पोषण करणारा, गभस्ती, सोनेरी, तप्त, भानु, स्वर्णरेतस, दिवाकर, हरी अश्व रथाला असणारा, सहस्र किरण असणारा, सात घोड्यांच्या रथांत बसलेला, मरीची, अंधार नाहीसा करणारा, शंभु, त्वष्टा, मार्तंड, अंशुमान, हिरण्यगर्भ, शिशिर, तपन, भास्कर, रवी, अग्निगर्भ, अदितीचा पुत्र, शंख, थंडीचा नाश करणारा, आकाशाचा स्वामी, काळोख नाहीसा करणारा, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद यामध्ये प्रवीण, धनुषी, पाऊस, अपामित्र, विंध्यपर्वत उड्या मारत ओलांडणारा, आतपी, (सभोवताली तेजो) मंडळ असणारा, मृत्यु, पिंगल, सर्व तापविणारा, विश्वाचा कवी, अत्यंत तेजस्वी, लाल रंगाचा, सर्व निर्माण करणारा, नक्षत्र-ग्रह-तारांचा अधिपती, विश्वभावन, तेजस्वींमध्ये तेजस्वी, बारा नावांनी-रूपांत असलेल्या सूर्याला (माझा) नमस्कार असो. 
१६) पूर्व-पश्चिम दिशेकडील पर्वतरूपी सूर्याला नमस्कार असो, ज्योतीचा स्वामी व दिवसाचा अधिपतीला (माझा) नमस्कार असो. 
१७) जय, जय भद्र, हरी अश्वला (माझा) नमस्कार असो. सहस्रांशुला (माझा) नमस्कार असो. आदित्याला (माझा) नमस्कार असो. 
१८) उग्राला, वीराला, सारंगाला (माझा) नमस्कार असो. पद्मप्रबोध, प्रचंड सूर्याला (माझा) नमस्कार असो. 
१९) ब्रह्मेश, अच्युत, देवांमध्ये श्रेष्ठ, भास्वत, सर्व भक्षण करणारा, रौद्र, वपुधारी सूर्याला (माझा) नमस्कार असो. 
२०) तमाचा नाशक, हिमाचा नाशक, शत्रुंचा नाशक, सर्वात्मा, कृतघ्नाचा नाशक, तारकांचा अधिपती, देवाला, सूर्याला (माझा) नमस्कार असो. 
 २१) तापलेल्या सोन्याप्रमाणे तेजस्वी, हरी, विश्वकर्मा, अंधकार नष्ट करणार्या, रुची, लोकसाक्षी सूर्याला (माझा) नमस्कार असो. 
२२) सूर्य देव हे विश्व उत्पन्न करतो आणि नष्टही करतो. त्याचे पालन पोषण पर्जन्य आणि उष्मा देऊन करतो. 
२३) झोपलेल्यांना जागृत करतो, यज्ञांतील अग्निहोम आणि अग्निहोत्राचे फळ हाच सूर्य आहे. 
२४-२५ ) या लोकी देव, ऋतु आदीकरीता सहेतुक केलेल्या कृत्यांचे (यज्ञांचे) फळ हाच सूर्य आहे. कृच्छादी संकटे निवारणार्थ केलेल्या कर्माचे फळ हा सूर्य देतो. हे रामा, त्याचे (सूर्याचे) स्मरण करणार्याचा कधी नाश (पराभव) होत नाही. 
२६) एकाग्र चित्ताने या जगत्पती सूर्याचे पूजन करून तीनवेळा याचा (या स्तोत्राचा) जप केल्याने तूं युद्धांत विजयी होशील. 
२७) हे महाबाहो रामा, या क्षणी तूं रावणावर विजय मिळवशील. असे सांगून अगस्ती ऋषी जसे आले होते तसेच निघून गेले. 
२८) हे ऐकून महातेजस्वी राम शोकमुक्त झाला आणि धीर धरून तो आनंदित झाला. 
२९-३०) सूर्य देवाकडे बघून अत्यंत आनंदाने तीन वेळा आचमन करून, (या स्तोत्राचा) जप करून, शुद्ध होऊन, धनुष्य घेऊन, रावणाकडे बघून युद्धाला तयार झाला. सर्व प्रकारच्या प्रयत्नांनी रावणाच्या वधाचा त्याने निश्चय केला. 
३१) वर देणार्या व यशस्वी करणार्या सूर्याकडे बघून अत्यंत आनंदित मनाने राक्षसराज रावणाचा वध करण्याच्या इच्छेने देवांच्यामध्ये असलेल्या रामाला (देवांनी या रावणाचा) त्वरित वध कर असे सांगितले. 
अशा प्रकारे वाल्मीकी रामायणांतील अगस्ती ऋषींनी सांगितलेले आदित्य हृदय स्तोत्र पूर्ण झाले.
AdityaHrudaya Stotra


Custom SearchPost a Comment