Indra Krut Surabhi Stotra
इन्द्रकृत श्रीसुरभी स्तोत्र
पुरन्दर उवाच
नमो देव्यै महादेव्यै सुरभ्यै नमो नमः I
गवां बीज स्वरुपायै नमस्ते जगदम्बिके II १ II
नमो राधाप्रियायै च पद्मांशायै नमो नमः I
नमः कृष्णप्रियायै च गवां मात्रे नमो नमः II २ II
कल्पवृक्षस्वरुपायै सर्वेषां सततं परम् I
श्रीदायै धनदायै च वृद्धिदायै नमो नमः II ३ II
शुभदायै प्रसन्नायै गोप्रदायै नमो नमः I
यशोदायै कीर्तिदायै धर्मज्ञायै नमो नमः II ४ II
II इति श्री इंद्रकृत श्री सुरभी स्तोत्र सुरभीमातार्पणस्तु II
इन्द्रकृत श्रीसुरभी स्तोत्र
मराठी अर्थ:
पुरंदर (देवराज इंद्र) म्हणाले:
देवी, तसेच महादेवी सुरभीला माझा वारंवार नमस्कार आहे.
जगदंबिके ! तू सर्व गाईंची बीजस्वरूप आहेस. तुला मी नमस्कार
करतो. तू राधेची आवडती आहेस. तुला मी नमस्कार
करतो. तू लक्ष्मीची अंशभूत आहेस. तुला माझा वारंवार नमस्कार आहे.
श्रीकृष्णाला आवडणार्या तुला माझा नमस्कार. गाईंच्या मातेला माझा
वारंवार नमस्कार. जी सर्वासाठी कल्पवृक्षस्वरूप आहे, तसेच श्री, धन आणि
वृद्धी करणारी आहे, त्या भगवती सुरभीला माझा वारंवार नमस्कार आहे.
शुभदा, प्रसन्ना आणि गोप्रदा सुरभीला माझा वारंवार नमस्कार आहे. यश आणि
कीर्ती देणारी धर्मज्ञा देवीला माझा वारंवार नमस्कार आहे.
अशा रीतीने हे इंद्राने केलेले सुरभी स्तोत्र सुरभीमातेला अर्पण करू.
Indra Krut Surabhi Stotra
No comments:
Post a Comment