Thursday, October 20, 2011

Jay Durga Stotra जय दुर्गा स्तोत्र

Jay Durga Stotra 

Jay Durga Stotra is in Sanskrit. It is praised of Goddess Durga by God Brahma. Brahma said: Durge, Shive, Abhave, Maye, Narayani, Sanatani, Jaye please bless me. SarvaMangale I bow to you. It is said that meaning of the letter d in your name Durga is destroyer of demons. Ukara is called as destroyer of all troubles and difficulties in Vedas. Ref is destroyer of deceases. Gakar is destroyer of sins. Aakar is destroyer of fear and enemies. Bhagavati Durga is called as energy of God ShriHari. Remembering, reciting and singing the name of Bhagavati Durga, the demons are destroyed. This is said by not anybody else but by God ShriHari only. The word Durga indicates troubles or difficulties. Aakar indicates removal or destroying. Hence the Goddess who destroys troubles and difficulties is called by the name Durga. Durga word also indicates the king of demons Durgamasur. Aakar indicates destroying. Long back Goddess Durga had destroyed king Durgamasur. Hence the Goddess is named as Durga by rushies and learned people. In the name Shiva; Shakar indicates blessings, Ekar indicates collection or many things, Vakar indicates donor. The Goddess is giver of blessings and many good things and hence she is called by the name “Shiva”. She is “Shiv” i.e. pious and hence she is called by the name “Shiva”. Shiv means Moksha (removal of worldly bondage). Aakar indicates giver. Goddess is giver of Moksha and hence she is called as Shiva. Abhaya means to remove fear. Aakar means giver. Goddess removes fear from our life and hence she is called by the name “Abhaya”. Ma means wealth. Ya mean giver. Hence Goddess who gives us wealth within no time is called by the name “Maya”. The Goddess represents half body of God Narayan and she is as pious and lustrous as God Narayan hence she is called by the name “Narayani”. The word Sanatan indicates Goddess was there, is there and will be there always in Nirgun (without form) roopa. Hence she is called by the name “Sanatani”. The word Jay indicates victory. Aakar indicates giver. Goddess is giving us victory over our enemies hence she is called by the name “Jaya”. The word SarvaMangal indicates wealth, property and all desired. Aakar indicates giver. Goddess gives us wealth, property and all desired. Hence she is called by the name “SarvaMangala”. These eight names of Goddess are very pious, holy and very important names of Goddess. This Stotra is filled with these names with their meaning. This stotra was told by God Narayan to God Brahma who was sitting on nabhiKamal. Then God Narayan went in deep mediation. When Demons Madhu and Kaikatabha came to kill God Brahma; he praised Goddess Durga by this “Jay Durga Stotra”. Goddess Durga pleased by this stotra removed fear of God Brahma and made him fearless. Here completes this Jay Durga Stotra which comes in ShriKrishna Janma Khanda from Brahma Vaivarta Purana. (Adhya 27—17-to 34)
जयदुर्गा स्तोत्र 
ॐ नमो जयदुर्गायै
ब्रह्मो उवाच
दुर्गे शिवेSभये माये नारायणि सनातनि I
जये मे मङ्गलं देहि नमस्ते सर्वमङ्गले II १ II 
दैत्यनाशार्थवचनो दकारः परिकीर्तितः I 
उकारो विघ्ननाशार्थवाचको वेदसम्मतः II २ II 
रेफ़ो रोगघ्नवचनो गश्च पापघ्नवाचकः I 
भयशत्रुघ्नवचनश्चाकारः परिकीर्तितः II ३ II 
स्मृत्युक्तिस्मरणाद् यस्या एते नश्यन्ति निश्चितम् I 
अतो दुर्गा हरे: शक्तिर्हरिणा परिकीर्तिता II ४ II 
विपत्तिवाचको दुर्गश्चाकारो नाशवाचकः I
दुर्गं नश्यति या नित्यं सा दुर्गा परिकीर्तिता II ५ II 
दुर्गो दैत्येन्द्रवचनोSप्याकारो नाशवाचकः I 
तं ननाश पुरा तेन बुधैर्दुर्गा प्रकीर्तिता II ६ II
शश्च कल्याणवचन इकारोत्कृष्टवाचकः I
समूहवाचकश्चैव वाकारो दातृवाचकः II ७ II 
श्रेयःसंगोत्कृष्टदात्री शिवा तेन प्रकीर्तिता I
शिवराशिर्मूर्तिमति शिवा तेन प्रकीर्तिता II ८ II
शिवो हि मोक्षवचनश्चकारो दातृवाचकः I 
स्वयं निर्वाणदात्री या सा शिवा परिकीर्तिता II ९ II 
अभयो भयनाशोक्तश्चाकारो दातृवाचकः I
प्रददात्यभयं सद्यः साभया परिकीर्तिता II १० II 
राजश्रीवचनो माश्च याश्च प्रापणवाचकः I 
तां प्रापयति या सद्यः सा माया परिकीर्तिता II ११ II 
माश्च मोक्षार्थवचनो याश्च प्रापणवाचकः I
तं प्रापयति या नित्यं सा माया परिकीर्तिता II १२ II
नारायाणार्धाङ्गभूता तेन तुल्या च तेजसा I 
तदा तस्य शरीरस्था तेन नारायणी स्मृता II १३ II 
निर्गुणस्य च नित्यस्य वाचकश्च सनातनः I 
सदा नित्या निर्गुणा य कीर्तिता सा सनातनी II १४ II 
जयः कल्याणवचनो ह्याकारो दातृवाचकः I 
जयं ददाति या नित्यं सा जया परिकीर्तिता II १५ II
सर्वमङ्गलशब्दश्च संपूर्णैश्वर्यवाचकः I 
आकारो दातृवचनस्तद्दात्री सर्व मङ्गला II १६ II 
नामाष्टकमिदं सारं नामार्थ सहसंयुतम् I 
नारायणेन यद् दत्तं ब्रह्मणे नाभिपङ्कजे II १७ II
तस्मै दत्वा निद्रितश्च बभूव जगतां पतिः I 
मधुकैटभौ दुर्गान्तौ ब्रह्माणं हन्तुमुद्यतौ II १८ II 
स्तोत्रेणानेन स ब्रह्मा स्तुतिं नत्वा चकार ह I 
II इति श्रीब्रह्मवैवर्ते ब्रह्मकृतं जयदुर्गा स्तोत्रं श्रीदुर्गा मातायै समर्पितं अस्तु II
जयदुर्गा स्तोत्र
ॐ नमो जय दुर्गायै 

मराठी अर्थ:
ब्रह्मदेव म्हणाले, 

दुर्गे, शिवे, अभये, माये, नारायणि, सनातनि, जये माझे कल्याण कर. सर्वमंगले मी तुला नमस्कार करतो. दुर्गाचा 'दकार' चा अर्थ दैत्यांचा नाश असा आहे. 'उकार' याचा अर्थ विघ्नांचा नाश असा आहे. हा अर्थ वेद संमत आहे. 'रेफ' रोगांचा नाश करणारा आहे. 'गकार' याचा अर्थ पाप नाशक असा आहे आणि 'आकार' भीती व शत्रुंचा नाश अशा अर्थी आहे. जिच्या चिंतनाने, स्मरणाने आणि कीर्तनाने दैत्यांचा वगैरे नाश होतो अशी ती भगवती दुर्गा श्रीहरीची शक्ती म्हणून सांगितली गेली आहे. 'दुर्ग' हा शब्द विपत्ती व 'आकार' हा नाश अर्थी आहे. म्हणून दुर्ग म्हणजे विपत्तिंचा नाश करणारी ही देवी नेहमी "दुर्गा" म्हणून ओळखली जाते. "दुर्गा" हां शब्द दैत्यराज दुर्गमासुर या अर्थी आहे. "आकार" नाश या अर्थी आहे. पूर्वी देवीने त्या दुर्गामासूराचा नाश केला होता. म्हणून विद्वानांनी तिचे नाव दुर्गा असे ठेवले. "शिवा" या शब्दांतील 'शकार' कल्याण अर्थी, 'इकार' उत्कृष्ट तसेच समूह अर्थी तर 'वाकार' दाता या अर्थी वापरतात. जी देवी कल्याण करणार्या वस्तूंचा समूह देणारी आहे तिला "शिवा" म्हंटले गेले आहे. ती शिव म्हणजे कल्याणाची मूर्तिमंत राशी आहे म्हणून सुद्धा तिला "शिवा" म्हंटले गेले आहे. "शिव" म्हणजे मोक्ष आणि "आकार" म्हणजे देणारा. त्यामुळे हि देवी मोक्ष देणारीसुद्धा आहे व म्हणूनच तिला शिवा म्हटले आहे. "अभय" चा अर्थ आहे भयाचा नाश आणि "आकार" चा अर्थ आहे "करणारा" ,हि देवी त्तकाळ अभय देणारी आहे म्हणून तिला "अभया" म्हटले आहे. "मा" चा अर्थ आहे, राजलक्ष्मी आणि "या" चा अर्थ आहे प्राप्ती करून देणारा. हि देवी शीघ्र राजलक्ष्मीची प्राप्ती करून देते म्हणून तिला "माया" म्हटले आहे. "मा"चा दुसरा अर्थ मोक्ष व "या" प्राप्ती करू देणारी; मोक्षाची प्राप्ती करून देणारी; म्हणून सुद्धा तिला "माया" म्हटले आहे. हि देवी भगवान नारायणाचे अर्धे अंग आहे, त्यांच्याच प्रमाणे तेजस्विनी आहे आणि त्यांच्या शरीरांत राहाते म्हणून तिला "नारायणी" म्हणतात. "सनातन" हा शब्द नित्य, नेहमी असणारा व निर्गुण अशा अर्थी आहे. हि देवी नित्य व निर्गुण आहे.म्हणून हिला "सनातनी" असे म्हटले आहे. "जय" हा शब्द जय, यश अशा अर्थी आहे. "आकार" हा देणारा या अर्थी. म्हणून जी देवी नेहमी जय देते, तिला "जया" म्हटले आहे. "सर्वमंगल" शब्द संपूर्ण ऐश्वर्य दर्शवितो आणि "आकार" देणारी म्हणून या देवीला "सर्वमंगला" असे म्हटले आहे. हि देवीची आठ सारभूत नावे आहेत आणि हे स्तोत्र त्या नावांच्या अर्थासह आहे. भगवान नारायणाने नाभीकमलावर बसलेल्या ब्रह्मदेवाला हे सांगितले. नंतर जगदीश्वर योगनिद्रेमध्ये निद्रिस्त झाले. त्यानंतर मधु व कैटभ नावांचे दैत्य ब्रह्मदेवाना मारण्यासाठी आले, तेव्हां या स्तोत्राने ब्रह्मदेवाने दुर्गा मातेला प्रसन्न करून घेतले. अशा रीतीने हे जयदुर्गा स्तोत्र श्रीदुर्गा मातेला समर्पित करुया.
Jay Durga Stotra जय दुर्गा स्तोत्र 


Custom Search

No comments: