Friday, November 20, 2015

Shree Navanath Bhaktisar adhyay 8 Part 1/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय आठवा ( ८ ) भाग १/२


Shree Navanath Bhaktisar adhyay 8 
Shree Navanath Bhaktisar adhyay 8 is in Marathi. Machchhindra came to Ayodhya to visit ShriRma temple. He was not aloud to enter into the temple as at the same time king Pashupat was there in the temple for ShriRam darshan. Machchhindra was very angry he thought instead of punishing the servants, better to punish king. Hence used sparashstra by chanting mantras while king was boing to ShriRam. King became helpless and could not getup from the ground. He was sucked to the ground. Then a brilliant Mantri was called to help in the situation. He came and found out the reason behind it. He approached Machchhindra and asked to forgive him and requested to help the king to be free from ground. Then he took Machchhindra in the temple where Machchhindra used vibhaktastra so that king would become free from the ground. Then king honoured Machchhindra took him to his palace and remained in his service. Machchindra was pleased and asked him if he wished something. King told him that since he was from Sun family and Ishvaku vansha; he wished to have a darshan of God Rama. The wish was fulfilled by Machchhindra by calling a war against Aaditya (God Sun), defeating him and on the request of God Vishnu; Machchhindra told him everything and asked him to fulfil the desire of king Pashupat of God Ramas' darshan. Then also he made God Rama and God Sun to agree to be helpful for his shabari kavitva vidya. Malu son of Dhundi from Narahari family will tale us the story; In the next ninth adhyay how Machchhindra took out Goraksha out of the mud.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय आठवा ( ८ ) भाग १/२
श्रीगणेशायनमः ॥
ॐ नमोजी गुरुराया । भवच्छेदका पळवीं माया ।
श्रीज्ञानेश्र्वरा सदयहृदया । मम किंचित नाम मिरविशी ॥ १ ॥
अघा हे ज्ञानदिवटी । आम्हा साधकां जे दिठी ।
मिरवला आहेसी पूर्णकोटी । हितकारक महाराजा ॥ २ ॥
तरी मागिले अध्यायीं कथन । विधियुक्त वीरभद्र केला प्रसन्न । 
आणि स्वर्गवासातें भोगून । महीलागीं मच्छिंद्र उतरला ॥ ३ ॥
आणि वज्रावटिके वज्र भगवती । तोषविलें स्नानाप्रती ।
उष्णोदकीं भोगावती । जगामाजी मिरविली ॥ ४ ॥
यापरी द्वारका करुनि तीर्थ । गोमतीं स्नानविधी यथार्थ ।
करुनियां द्वारकानाथ । प्रसन्न चित्तीं आगळा ॥ ५ ॥
त्यावरी आला अयोध्येसी । तरी श्रोतिया कथा परियेसीं ।
स्नान करुनि शरयूतीरासी । रामदर्शना जातसे ॥ ६ ॥
तों पशुपतराव तया ग्रामीं । रामवंशांत पराक्रमी । 
तो देवालयीं पूजेलागुनी । आला होता संभारें ॥ ७ ॥
अपार सैन्य जें भोंवतीं । सदनीं तुरंगमें राबती । 
छत्रचामरें कळसदीप्ती । लाजविती भानूतें ॥ ८ ॥
वाजी गज यांचे रंग आणिक । तेही चपळ अलोलिक ।
वाताकृती लक्ष एक । तयाभोवतें फिरताती ॥ ९ ॥
सकळ वाजी श्रृंगारयुक्त । जडित पाखरा हाटकवत ।
रत्नकोंदणीं हार लखलखीत । कीं नक्षत्रमणी मिरवले ॥ १० ॥
त्यांतही झळकत झालरीयुक्त । गुणीं ओविले अपार मुक्त ।
कोणी विराजत गंगावत । शुभ्रतेजीं मितवले ॥ ११ ॥
ग्रीवे माळा रत्नवती । हाटकासी जे ढाळ देती ।
रत्न नोहे तेजगभस्ती । चमूलागी मिरवला ॥ १२ ॥
पदीं पैंजण रुणझुणती । कीं वीरांची वीरश्री वाचे वदती ।
कीं शत्रुगणींच्या अपार पंक्ती । ब्रीद म्हणती विभांडूं ॥ १३ ॥
ऐशियापरी वाजी ते हौसे । कीं चिंतल्या ठायीं दाविती वास ।
अतिवातचपळगतीस । सर सर म्हणती माघारा ॥ १४ ॥
अगा ते वाजी न म्हणूं महीचे । कीं इंदुबंधुरत्न उदधीचे । 
विशाळ शुक्तीकापात्र अब्धीचें । मुक्त करुनि आणिले ते ॥ १५ ॥
याचकनीती विकासूनि अवनीं । हत्ती मिरवती पृतनेलागुनी ।
विशाळ गंडस्थळ दंतकदनी । चूडे सुवर्ण मिरवलें ॥ १६ ॥
हाटक व्यक्त त्यां भूषण । हौदे अंबारिया देदीप्यमान । 
कीं पृतनामहीचे नग ते पूर्ण । भावनीं ऐसें पाहे कां ॥ १७ ॥
अपार सैन्य बहु संभार । पाहतां उचलिले जे गिरिवर । 
कीं पर्वत माथां तरुशृंगार । तैशा पताका गजपृष्ठीं ॥ १८ ॥
एकाहूनि एक अधिक । महारथी ते युद्धकामुक । 
दहा सहस्त्र रायासवें लोक । युद्धकामुक असती ॥ १९ ॥
परी युद्धशास्त्री चतुर सुगम । कीं परमशक्तीस देती दम ।
ऐसे प्रतापीक स्तोम । इंद्रसुखा आगळे कीं ॥ २० ॥
पायींचे पायदळ अपार । वस्त्राभरणीं मंडिताकार ।
छडीदार आणि चोपदार । जासूद हलकारे मिरवती ॥ २१ ॥
हेमभूषणीं मुक्तमाळा । सकळ पाइकां झळकती गळां ।
जडितरत्नीं अति तेजाळा । हेमालंकार करकमळीं ॥ २२ ॥
दाहीं अंगुळीं मुद्रिका गहन । हेमयुक्तें ते मिरवती श्रवण ।
पहातेपणीं राणीवपण । भार पडेल लोकातें ॥ २३ ॥
असो ऐशी अपार संपत्ती । मिरवला पाशुपत अयोध्यापती ।
ते सकळ दाटी देवळाभोंवतीं । राजीराजीने मिरवली ॥ २४ ॥
त्यांत श्रीरामदर्शनाकारण । जाता झाला योगद्रुम । 
परी ते द्वारपाळ परम । नाथालागीं बोलत ॥ २५ ॥
परम पाप संचल्या तुंबळ । तेव्हां मिरवे द्वारपाळ । 
प्रथम धर्मालागीं काळ । अधर्मपरी मिरवतसे ॥ २६ ॥
त्या धर्मद्वारींचे म्हणती श्र्वान । ते द्वारपाळ द्वाररक्षण ।
आपण बुडुनि यजमाना । बुडवूं पाहती निश्र्चयें ॥ २७ ॥
महानष्ट जातां समोर । कदा न म्हणती लहानथोर । 
न भीड चित्तीं परम निष्ठुर । वाचे कठोर बोलती ॥ २८ ॥
सप्तजन्म तस्करनीती । शत ब्रह्महत्या जया घडती ।
तेव्हां तो पावे द्वारपाळ क्षितीं । धर्मविनाश रायाचा ॥ २९ ॥
ऐसियेपरी द्वारपाळ । राजद्वारीं असती सकळ ।
मच्छिंद्र जातां उतावेळ । हटकूनि डंभ केली असे ॥ ३० ॥
तीव्र वाचे बोलती वचन । म्हणती कान फाडूनि बुद्धिहीन ।
कोठें जासी तांतडीनें । मतिमंदा हे मूर्खा ॥ ३१ ॥
हे भ्रष्टा तूतें कैसें कळेना । कीं राव आला आहे दर्शना ।
त्यात तूं जासी बुद्धिहीना । सर परता माघारा ॥ ३२ ॥
ऐसें म्हणूनि निष्ठुर वचन हातीं । लोटिलें मच्छिंद्रनाथाप्रती ।
येणेकरुनि परम चित्तीं । विक्षेपातें पावला ॥ ३३ ॥
परी तो सर्वज्ञ संतापासी । विवेक अर्गळा घाली त्यासी ।
तो म्हणे सेवकांसीं । संवाद करणें विहित नव्हे ॥ ३४ ॥
पतिस्वाधीन पतिव्रता । कीं पात्रसोई वाहे सरिता ।
तेवीं बुद्धि करुनि पाशुपता । सेवक सेवा आव्हानिती ॥ ३५ ॥
कीं सुईमागें गुंतोजातां । कीं मित्रामागें रश्मी येतां ।
तदनबुद्धि पाशुपता । सेवक सेवा आव्हानिती ॥ ३६ ॥
कीं रत्नामागे सकळकळा । माउलीसवे आव्हानूं बाळा ।
तदनबुद्धि अयोध्यानृपाळा । सेवक सेवा आव्हानिती ॥ ३७ ॥
कीं माळी मळ्याचा योजूनि पंथ । सयुक्त सोडी उदक आत ।
तदनबुद्धि पाशुपत । सेवक सेवा आव्हानिती ॥ ३८ ॥   
ऐसिये शब्दां सद्गुणवाणी । बोधी सकळां विवेकखाणी ।
बंधनीं निर्मूनि विक्षेप मनाचे चरणीं । घालितां झाला महाराज ॥ ३९ ॥
परी बुद्धिप्रकरण । आणिक सुचलें तयाकारण ।
कीं सेवकांतें काय बोलून । शिक्षा देऊं राजातें ॥ ४० ॥
एक रांव आर्‍हाटिता । संपूर्ण सेवकां दाटे व्यथा । 
जेवीं गवसणी मित्रा घालितां । रश्मी आतुडती सहजचि ॥ ४१ ॥
शरीरीं कोठें घालितां घाय । परी सर्वोपरी दुःख होय ।
तदनुशिक्षा योजितां राया । दुःख मिरवी पृतनेतें ॥ ४२ ॥
ऐसें योजूनि मच्छिंद्रनाथ । भस्मचिमुटी कवळी हाता ।
स्पर्शास्त्रमंत्रप्रयुक्ता । रामनामीं जल्पला ॥ ४३ ॥
येरीकडे पाशुपत । देवा बद्धांजुळी होऊनि प्रणत ।
रामासन्मुख दंडवत । महीं मस्तक ठेवीतसे ॥ ४४ ॥
तों स्पर्श मग येऊनि निकट । करिता झाला अंग झगट ।
झगट होतां महीपाठ । भाळा सहज झालीसे ॥ ४५ ॥
राव उठूं पाहे क्षणीं । परी सुदृढ युक्त न सोडी मेदिनी ।
भाळपदादी उभयपणीं । महीयुक्त झालीं तीं ॥ ४६ ॥
करितां यत्न बहुतांपरी । परी विभक्त नोहे कदा धरित्री ।
बहु श्रमला नानापरी । उपाय कांही चालेना ॥ ४७ ॥
मग बोलावूनि सेवकमंत्री । वृत्तांत सांगे झाल्यापरी ।
म्हणे कदा न सोडी धरित्री । व्यक्त झाली सर्वस्वें ॥ ४८ ॥
परी मंत्री बुद्धिमंत । एकटाचि तेव्हां बाहेर येत ।
सेवकां पुसे रळी मात । कोणी कोणातें झाली कां ॥ ४९ ॥
मनांत म्हणे कोणी जाती । आला असेल नगराप्रती । 
गांजिला असेल राजदूतीं । म्हणून क्षोभला असेल तो ॥ ५० ॥
मग त्यातें क्षोभ न येतां । क्षोभ वरिला श्रीभगवंता । 
तयाचे साधु जगीं छळितां । क्रोध नावरे देवासी ॥ ५१ ॥
महीं श्रेष्ठ तो अत्रिनंदन । परी उगेंचि क्षोभवूनि आपुलें मन ।
श्रीअंबऋषींचे केले छळण । तरी न साहे देवातें ॥ ५२ ॥
तेणें सुदर्शन लावूनि पाठीं । गर्भ सोसी आपण जगजेठी ।
तस्मात् भक्त गांजिल्यापाठीं । कदा न राहवे देवातें ॥ ५३ ॥
भजनीं प्रेमा प्रल्हादबाळा । परम आवडे तमाळनीळा ।
दानवीं गांजितां उतावळा । कोरडे काष्ठीं प्रगटला ॥ ५४ ॥
धर्महवनीं मंडूकबाळ । तप्तोदकीं केले शीतळ । 
तस्मात् संकटी भक्त प्रेमळ । कदा न राहवे देवातें ॥ ५५ ॥
रणीं होतां कडकडाट बहुत । पक्षिजोडा बाळें टाकूनि जात ।
बाळकांनीं स्मरतां रमानाथ । करिवंटा टाकी तयांवरी ॥ ५६ ॥
पारधी पक्षिप्राणहरणीं । व्याळरुप झाले चक्रपाणी ।
तस्मात् दासाचा छळ कोणीं । कदाकाळीं करुं नये ॥ ५७ ॥
जळीं पदातें नक्र ओढी । स्मरतां धांवला अतितांतडी ।
सुदर्शन प्रेरुनि घाली उडी । निजदासा रक्षावया ॥ ५८ ॥
याचि नीतीं कोणें दूतीं । गांजिली असेल हरिभक्ती ।
म्हणूनि लोभे सायक हातीं । हरीनें वरिला असेल कीं ॥ ५९ ॥
ऐशी भावना आणूनि चित्तीं । शोध करीतसे पृतनेप्रती ।
शोध सोचिता द्वारा निगुती । वृत्तांत तो प्रविष्ट झाला ॥ ६० ॥
मंत्री वृत्तांत ऐकूनि कानीं । शोधूनि काढी मच्छिंद्रमुनी ।
धन्य मंत्री तो शोधप्रकरणीं । अर्थपैशुन्य निवडिता ॥ ६१ ॥
अहो तो मंत्री नोहे मोहरा । अमृत घेऊनि सांडी मदिरा ।
कीं चिंता मणिराज अधीरा । राजचिंताहरणार्थ ॥ ६२ ॥
तन्न्यायें तो सुघडकरणी । त्वरें लागला मच्छिंद्रचरणीं ।
मग म्हणे महाराजा औदार्यपणीं । कृपादान ओपावें ॥ ६३ ॥
तुम्ही संत ते स्नेहभरित । पूर्णशांतीचे भांडारयुक्त ।
औदार्य सांगतां नाहीं मित । अपराध क्षमा करावा ॥ ६४ ॥
मेघ जरी उदार म्हणावा । तोही समता न करी संतभावा ।
मेघ विसरे दातृत्चमाया । तेवीं संत नोहे तो ॥ ६५ ॥
जरी परिसाची उपमा देऊं । तो लोहातेचि देत हाटकभाऊ ।
इतर धातूसी होत परिभवू । न चले शक्ती तयाची ॥ ६६ ॥
कल्पतरु जरी करावा समान । शुभाशुभ दावी रत्न । 
तेवीं नोहे संतजन । शुभचिन्हेंचि वांछिती ॥ ६७ ॥
ऐसें बोलतां मच्छिंद्रनाथ । प्रसन्न झाले स्वचित्तांत ।
क्रोध आवरुनि होतां शांत । प्रसाद देऊं म्हणतसे ॥ ६८ ॥
मग करीं कवळूनि भस्म चिमुटी । विभक्त अस्त्र मंत्रपोटीं ।
कविराज जल्पतां होटीं । धरा चिमुटी सोडीतसे ॥ ६९ ॥
राव उठूनि बैसे धरित्री । वेगीं पाचारीतसे सुहितमंत्री ।
सवेंचि येऊनि झडकरी । दूती राजाज्ञा निवेदिली ॥ ७० ॥
पत्रिके बोलावूनि निकट दूत । विचारुनि घेतो राजक्षेमांत ।
तंव ते शुभवार्ता सांगत । कल्याणें राजा विराजला ॥ ७१ ॥
मग मच्छिंद्राचा धरुनि पाणी । मंत्री नेत तया लागुनी ।
प्रवेश होता तये क्षणीं । वृत्तांत रायातें निवेदिला ॥ ७२ ॥
रायें ऐकूनि सकळ वृत्तांत । मच्छिंद्र चरणीं भाळ अर्पीत ।
अति गौरवें स्नेहभरित । नाम पुसे तयाप्रती ॥ ७३ ॥
येरी म्हणे नरेंद्रपाळा । मज मच्छिंद्र म्हणती तान्हुल्या बाळा ।
रायें ऐकूनि वृत्तांत सकळा । मच्छिंद्र चरणीं प्रेरीतसे ॥ ७४ ॥
पूर्वी मच्छिंद्रकृतिरत्न । सांठवलें श्रवणाकारणें ।
तेणेकरुनि दर्शनभूषण । स्वीकारावयासी पहातसे ॥ ७५ ॥
ऐसी इच्छा अब्धापाठीं । तो मच्छिंद्रचंद्र देखीला दृष्टी ।
मग परम मनीं आनंददाटी । चित्रपात्री हेलावली ॥ ७६ ॥
मग सुखासनें सिद्ध करुन । राजाने मच्छिंद्राचा हात धरुन ।
आपुले सभास्थानीं नेऊन । कनकासनी बैसविला ॥ ७७ ॥
षोडशोपचारें पूजन । अर्पिता झाला तन मन धन ।
वरी परम आदरें भक्तिरत्न । मच्छिंद्रनाथ ओपीतसे ॥ ७८ ॥
सदा सर्वदा आसनीं शयनीं । गमनीं भोजनीं जोडूनि पाणी ।
निरंतर उभा सेवेलागुनी । अन्य कांहीं सुचेना ॥ ७९ ॥
ऐसिया भक्तीचा पाहतां पाठ मच्छिंद्रकृपेचा लोटला लोट ।
म्हणे कोण नरेंद्र कामनालोट । कवण चित्तीं दाटतसे ॥ ८० ॥
येरु म्हणे जी योगद्रुमा । मी सूर्यवंशी पाशुपतनामा ।
राम अवलाद कुशपत्नीधामा । अवलाद देह असे हा ॥ ८१ ॥
तरी वडील माझा विजयी ध्वज । श्रीराम अवतरे तेजःपुंज ।
मातें भेटवी महाराजा । मित्रकुळाचा टिळक जो ॥ ८२ ॥
येरी म्हणे रे भाऊका दिठीं । आतां करितों तयाची भेटी ।
मग सभेबाहेरी तपोजेठी । राया घेऊनि येतसे ॥ ८३ ॥
उभा राहूनि राजांगणीं । धूमास्त्र मंत्र जल्पे वाणी ।
भस्मचिमुटी संजीवनी । अर्कावरी प्रेरितसे ॥ ८४ ॥
तेणें ध्रुव खगमंडळ संपूर्ण । धूम्रे भरुनि गेले गगन । 
दिशांसह अर्क संपूर्ण । झांकाळूनि पैं गेला ॥ ८५ ॥
धूम्रास्त्रानें भरले नयन । नेत्र पुसीतसे सारथी अरुण ।
धूम्र संचारोनि मुखाकारण । कासावीस होतसे ॥ ८६ ॥
तें पाहुनि सविताराज । म्हणे अस्त्रविद्ये धूम्र विराजे ।
क्षत्रिय कुळांतील नरेंद्र ओजें । तेणें प्रेरली ही विद्या ॥ ८७ ॥
मग तो महाराज जगलोचन । कवळूनि सायका चढवूनि गुण ।
वायुअस्त्र शर निर्मून । सोडिता झाला महाराजा ॥ ८८ ॥
तंव तो शर प्रतापवंत । लवकरी प्रगटवी स्थावर मारुत ।
तेणें मंदराचळ पर्वत । हालूं पाहती डगडगां ॥ ८९ ॥
गगनापासूनि महीपर्यंत । प्रगट झाला प्रलयवात ।
तरु उचंबळूनि नभीं भ्रमत । पक्षी जेवीं भूगोलातें ॥ ९० ॥
ऐसा वात होतां प्रगट । धूम्रें फुटला दिशापाट ।
सदनालागीं निर्मळ वाटे । गमन करितां येईना ॥ ९१ ॥
तें पाहुनिया योगद्रुम । जल्पता झाला अस्त्र उत्तम ।
तें पर्वतास्त्र विशाळ प्रकाम । आड झालें रथातें ॥ ९२ ॥
विशाळपणीं सांगूं कितुलें । कीं मंदराचळचि दुजे उगवले ।
तेणे मार्ग कुंठित जाहले । वातचक्राचे महाराजा ॥ ९३ ॥
मग ते अस्त्रीं नारायण । पर्वत पाहतां विशाळपणें ।
मग वज्रास्त्रसंधान । करिता झाला अर्क तो ॥ ९४ ॥
तंव वज्रास्त्र अतिकठिण । पर्वतमाथें गेले भेदून ।
तेणें घायें शतचूर्ण । त्वरें झाले नगराज ॥ ९५ ॥
पर्वत चूर्ण होतां निगुतीं । तें पाहुनि मच्छिंद्रजती ।
भ्रमी अस्त्र योजूनि उपरती । मित्र भागीं सांडीतसे ॥ ९६ ॥
तें अस्त्र होतां स्पंदनी प्रविष्ट । वाजींसह अरुण झाला भ्रमिष्ट ।
सांडूनि रहाणीची नित्य वाट । स्पंदन नेती भलतीकडे ॥ ९७ ॥
तें पाहूनियां द्वादशनामी । ज्ञानशराच्या न उरल्या गुणऊर्मी ॥ ९८ ॥
जैसा पेटला पावक । त्यावरी सोपविलें सकळ उदक ।
मग तो उरे केवीं दाहक । तेवीं अर्का झाले असे ॥ ९९ ॥
कीं अज्ञानपण साधकाचें । श्रीसद्गुरु निवारीत वाचें ।
अंगीं भूषण ज्ञानपणाचें । बोधगुणीं गोवीतसे ॥ १०० ॥
Shree Navanath Bhaktisar adhyay 8 
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय आठवा (८)


Custom Search

No comments: