Tuesday, April 5, 2016

Shri Navanath Bhaktisar Adhyay 40 Part 1/2 श्रीनवनाथ भक्तिसार अध्याय चाळीसावा (४०) भाग १/२


Shri Navanath Bhaktisar Adhyay 40 
This is the last Adhyay of Shri Navanath Bhaktisar. God Indra called all the nine nathas for the Somabhasa Yadnya at Swarga. After completion of daily practices of Yadnya; Machchhindra used to teach Astravidya of the Nathpanth to his son Meennath who was living with his mother Kilotala in the Swarga. God Indra who was very eager to learn all the Nathpantha's Astravidya, used to be there in the form of a peacock while Machchhindra was teaching Meennath. God Indra learnt all. However on the last day of the Yadnya, he asked all to forgive him for his act of learning by cheating. Indra was cursed and told that whatever knowledge he had acquired would be useless to him and he would not remember anything. However Uparicharvasu, father of Machchhindra requested to forgive God Indra. Navanath agreed to it and asked God Indra to perform tapas of Twelve years. Then in this Adhyay Malu has told the importance of reading or listening of each and every Adhyay from 1 to 40 and the gain of it. Thus here completes the Navanath Bhaktisar Grantham which is told to us by Dhundisut Malu from Narahari family.
श्रीनवनाथ भक्तिसार अध्याय चाळीसावा (४०) भाग १/२
श्रीगणेशाय नमः ॥
जयजयाजी पंढरीनाथा । पुंडलिकवरदा रुक्मिणीकांता ।
दीनबंधो अनाथनाथा । पुढें ग्रंथा बोलवीं ॥ १ ॥
मागिले अध्यायीं रसाळ वचन । तुवां बोलविले कृपेंकरुन ।
स्वर्गीं चरपटनाथें जाऊन । इंद्राचा गर्व हरिलासे ॥ २ ॥
हरिहरांची जिंकूनि कोटी । पुढें लोभाची केली भेटी । 
गमनकळा नारदहोटीं । प्राप्त झाली महाराजा ॥ ३ ॥
उपरी मणिकर्णिंकेचें करुनि स्नान । पुढें पातले पाताळभुवन ।
घेऊनि बळीचा गौरव मान । वामनातें भेटला ॥ ४ ॥
भोगावतीची करुनि आंघोळी । पुनः पातला भूमंडळीं ।
यावरी कथा पुढें कल्होळीं । नवरसांतें वाढीं कां ॥ ५ ॥
असो आतां रमारमण । ग्रंथाक्षरीं बैसला येऊन ।
तरी पुढें श्रोतीं सावधान । कथारस घ्यावा कीं ॥ ६ ॥
इंद्र चरपटीनें जिंकिला । वैभवें मशकतुल्य केला ।
तरी तो विस्मयवान खोंचला । खडतरपणीं हृदयांत ॥ ७ ॥
मग जो गुरु वाचस्पती । परम ज्ञाता सर्वज्ञमूर्ती ।
सहस्त्रनयन तयाप्रती । घेऊनियां बैसलासे ॥ ८ ॥
देवमंडळांत सहस्त्रनयन । घेऊनि बैसलासे कनकासन ।
जैसा नक्षत्रीं रोहिणीरमण । अति तेजें मिरवला ॥ ९ ॥
ऐशा रीतीं पाकशासन । बैसला सेवूनि सभास्थान । 
मग बृहस्पतीसी विस्मयरत्न । चरपटप्रताप सांगतसे ॥ १० ॥
अहा वय धाकुटें सान स्वरुप । परी अर्कासमान थोर प्रताप ।
हरिहरादि करुनि लोप । स्थापूनि गेला आपुलेंचि ॥ ११ ॥   
तरी वाताकर्षणविद्या सबळ । देवदानव झाले निर्बळ । 
नाथपंथीं हें महाबळ । आतळलें कैसें कळेना ॥ १२ ॥
तरी यातें करुनि उपाव । साध्य करावी इतुकी ठेव ।
या कर्मासी कोण लाघव (कौशल्य) । स्वीकारावें महाराजा ॥ १३ ॥
कीं तयाच्या गृहाप्रती जाऊन । दास्य करावें मनोधर्में । 
तोषवूनि सर्व कर्म । महीवरी मिरवावें ॥ १४ ॥
असो यापरी यत्न करुन । भेट घ्यावी त्या गंवसून ।
परी ते जोगी तीव्रपणें । वर्तताती सर्वदा ॥ १५ ॥
तरी उगलीच घेऊनि सदृढ भेट । अर्थ वदावा तयासी निकट ।
परी काय चाड आमुची अलोट । कार्यार्थी भीड कोणती ॥ १६ ॥
तरी भिडेचें उपजेपण । उजेड पडेल दासत्वेंकरुन । 
तयामागें रानोरान । अपार मही हिंडावी ॥ १७ ॥
तरी हिंडल्यानें कोणे काळीं । उदय पावेल कृपानव्हाळी ।
अमरपुरींची देवमंडळी । तेजोयुक्त होईल ॥ १८ ॥
म्हणाल ऐसें कासयानें । हा विपर्यास येईल घडोन ।
तरी महीं होतो पुण्यपावन । आसन माझें घेतसे ॥ १९ ॥
तरी मी येथें सावधान । करुनि रक्षितों आपुलें आसन ।
तस्मात् अमरावती सोडून । जाणें नाहीं मजलागीं ॥ २० ॥
ऐसें बोलतां अमरपती । बोलता झाला वाचस्पती ।
म्हणे महाराजा नाथाप्रती । येथेंचि आणावें महायंत्नें ॥ २१ ॥
तरी तो यत्न म्हणसील कैसा । यत्न करावा सोमभासा । 
त्या निमित्तें नाथ राजसा । घेऊनि यावें स्वर्गासी ॥ २२ ॥
मग तो येथें आल्यापाठीं । दावूनि भक्तिची अपार कोटी । 
मोह उपजवोनि नाथापोटीं । कार्य साधूनि घेइंजे ॥ २३ ॥
ऐसें बोलतां तपोद्विज । परम तोषला अमरराज ।
उपरी म्हणे महाराज । कोणा पाठवूं पाचाराया ॥ २४ ॥
यावरी बोले कचतात । हे महाराज अमरनाथ ।
मच्छिंद्रपिता अष्टवसूंत । उपरिचर नामें मिरवतसे ॥ २५ ॥
उपरिचर जातां महीतळवटीं । मच्छिंद्राची घेईल भेटी ।
सांगूनि त्यातें कार्य शेवटीं । मग मच्छिंद्र आम्हां बोधील ॥ २६ ॥
तरी त्यातें पाचारुन । कार्ययज्ञाचा वदूनि काम ।
विमानयानीं आरुढ करुन । पाठवावा महाराजा ॥ २७ ॥
यापरी मच्छिंद्रनाथ । आला असतां अमरपुरींत । 
गौरवोनि तुवां त्यातें । तुष्टचित्तीं मिरवावा । २८ ॥
तरी शक्ति तव सरितालोट । मच्छिंद्र उदधिपोट ।
संगमितां पात्र अलोट । प्रेमतोय भरलें असे ॥ २९ ॥ 
तरी सुमुखाचें पडतां जळ । कार्यशुक्तिकामुक्ताफळ । 
तूतें ओपील तपोबळ । नवनाथ आणोनियां ॥ ३० ॥
मग तो मुक्त अविंधविधी । लावी भक्तीच्या शस्त्रास्त्रसंधी ।
मग तें रत्न कर्णविधीं । स्वीकारीं कां महाराजा ॥ ३१ ॥
ऐसें ऐकूनि गुरुवचन । परम तोषला सहस्त्रनयन । 
मग रथीं मातली (सारथी) पाठवोन । उपरिचरा पाचारी ॥ ३२ ॥
उपरिचर येतां वदे त्यातें । म्हणे महाराजा कामना मनांत ।
उदेली करुं सोममखातें (सोमयज्ञ) । पूर्ण करीं आतां तूं ॥ ३३ ॥
तरी विमानयानीं करोनि आरोहण । जाऊनियां पाहीं मच्छिंद्रनंदन ।
उपरी त्यातें सवें घेऊन । जावें नवनाथमेळीं ॥ ३४ ॥
मग ते आर्या भावार्थित । मेळवोनि आणि अमरपुरींत ।
सोममखाचें सकळ कृत्य । तयां हस्तें संपादूं ॥ ३५ ॥
अवश्य म्हणे वसुनाथ । तत्काळ विमानयानीं बैसत ।
बद्रिकाश्रमीं मच्छिंद्रनाथ । लक्षूनिया पातला ॥ ३६ ॥
तों गोरक्ष धर्मनाथ । चौरंगी कानिफा गोपीचंद राजसुत ।
जालंदर अडभंगीनाथ । तीर्थस्थानीं ऐक्यमेळा झाला असे ॥ ३७ ॥
ऐशा समुदायांत मच्छिंद्रनाथें । अवचटपणीं देखिला तात ।
मग उठोनि मौळी चरणांते । समर्पीत महाराजा ॥ ३८ ॥
मग नाथ वसु भेटून । बैसला सकळांमध्यें वेष्टून । 
म्लानवाणीं कार्यरत्न । अमरांचें सांगतसे ॥ ३९ ॥      
म्हणे महाराज हो शक्रापोटीं । अर्थ उदेला मखकोटीं ।
तरी आपण नवही जेठी । साह्य व्हावें कार्यार्था ॥ ४० ॥
बहुतांपरी करुनि भाषण । सर्वांचे तुष्ट केलें मन ।
उपरी मच्छिंद्रातें बोधून । अवश्यपणीं वदविलें ॥ ४१ ॥
मग जालंदर कानिफा चौरंगी । मच्छिंद्र गोरक्ष अडभंगी ।
गोपीचंद रायादि अन्य जोगी । आरुढ झाले विमानीं ॥ ४२ ॥
गौडबंगालीं हेलापट्टण । प्रविष्ट झालें तैं विमान ।
रावगोपीचंदमातेसी भेटून । समागमें घेतली ॥ ४३ ॥
उपरी विमानयानी होऊन । पहाते झाले वडवालग्राम तेथून ।
तेथें वटसिद्धनागनाथ पाहून । आरुढ केला विमानीं  ॥ ४४ ॥
तेथूनि भर्तरीचें करुनि काम । विमान चालविती इच्छिल्या व्योमें ।
तों गौतमीतीरीं नाथ उत्तम । जती भर्तरी अवतरला असे ॥ ४५ ॥
यापरी तीर्थें करितां महीपाठीं । महासिद्ध जो नाथ चरपटी ।
अवंतीसी होता ताम्रपर्णीकांठीं । सवें घेतला महाराजा ॥ ४६ ॥
तेथूनि पुण्यमान देशीं विटग्राम नामानें । पाहते झाले विमानयानें ।
तेथें रेवणसिद्ध बोधून । आरुढ केला विमानीं ॥ ४७ ॥
असो नवनाथ परिवारासहित । ते विमानयानीं झाले स्थित ।
चौर्‍यायशीं सिद्धांसमवेत । अमरपुरीं पातले ॥ ४८ ॥    
विमान येतां ग्रामद्बारीं । सामोरा आला वृत्रारी (इंद्र) ।
परम गौरवोनि वागुत्तरीं । चरणांवरी लोटला ॥ ४९ ॥
सकळां करोनि नमनानमन । नेत सदना सहस्त्रनयन । 
आपुल्या आसनीं बैसवोन । षोडशोपचारें पूजिलें ॥ ५० ॥
नवनाथां पाहोनि सकळ अमर । मनीं संतोषले अपार । 
तेज पाहोनियां गंभीर । उभे तेथें ठाकले ॥ ५१ ॥
मग हवनकृत्य मनकामना । वदता झाला सकळ जनां ।
म्हणे महाराजा कवणे स्थाना । सिद्धअर्थ अर्थावा ॥ ५२ ॥
मग वाचस्पति आणि मच्छिंद्रनाथ । म्हणती सुरवरपाळा ऐक मात ।
सिंहलद्वीपीं स्थान अद्भुत । यज्ञ तेथे करावा ॥ ५३ ॥
अटव्य कानन आहे तुमचें । शीतळ छायाभरित जळाचें ।
तेथें न्यून साहित्याचें । पडणार नाहीं कांहींच ॥ ५४ ॥
उपरिचर वसु गंधर्व घेऊन । पाहते झाले अटव्यवन । 
तेथें यज्ञसाहित्य आहुती करुन । यज्ञआरंभ मांडिला ॥ ५५ ॥
दंपत्य बैसोनि सहस्त्रनयन । मंत्रप्रयोगीं बृहस्पति आपण ।
यज्ञआहुती नवही जण । स्वाहा म्हणोनि कुंडीं टाकिती ॥ ५६ ॥
परी कीलोतळेचे सीमेआंत । अटव्यवन होतें अद्भुत ।
यज्ञ होतां मीननाथ । मच्छिंद्रातें आठवला ॥ ५७ ॥
मग पाचारोनि उपरिचर तात । मच्छिंद्र म्हणे जी वसु समर्थ ।
सिंहलद्वीपीं मीननाथ । कवण ग्रामीं ठेविला ॥ ५८ ॥
येरु म्हणे त्याच्या ग्रामसीमेंत । अटव्यवन हें विख्यात विराजित ।
तरी कीलोतळेसहित मीननाथ । पाचारितों आतांचि ॥ ५९ ॥
मग उपरिचर वसु प्रत्यक्ष जाऊन । मीननाथासह कीलोतळेरत्न ।
पाचारुनि एक क्षण । भेटी केली उभयतां ॥ ६० ॥
परम स्नेहानें क्षणएक कांहीं । वाहवले मोहप्रवाहीं ।
उपरी दारा सुत तया ठायीं । मच्छिंद्रानें ठेविले ॥ ६१ ॥  
चौरंगी आणि अडभंगीनाथ । मिरवत बैसविले समुदायांत ।
यज्ञआहुती तयांचे हस्तें । स्वीकारीत महाराजा ॥ ६२ ॥
दहा नाथ यज्ञआहुती । प्रवाहीं चाले मच्छिंद्रजती । 
पुत्रमोह धरोनि चित्तीं । अभ्यासातें बैसविला ॥ ६३ ॥
अभ्यास करितां मीननाथ । वाचस्पती शक्रासी बोलत ।
म्हणे महाराजा यज्ञार्थ । तुम्ही बैसतां सरेना ॥ ६४ ॥
तरी दंपत्यार्थ उपरिचरवसु । बैसवोनि पहावा अर्थ सुरसु ।
ऐसें बोलतां प्राज्ञ विशेषु । अमरपाळ समजला ॥ ६५ ॥
मग हातींचें सोडूनि यज्ञकंकण । वसुहातीं केलें स्थापन ।
मग न्यूनपणें बहुतां प्रार्थून । निजदृष्टीं विलोकी ॥ ६६ ॥
सर्व पदार्थ आणवोनि आपण । अंगें झिजे शचीनंदन (इंद्रपुत्र जयंत) ।
उदकपात्र मागतां जाण । सिद्ध होय पुढारा ।॥ ६७ ॥
स्वाद्य भोज्य षड्रस अन्न । करें आणीतसे पात्रीं वाढून ।
शेवटीं शिणले जतींचे चरण । निजहस्तीं चुरीतसे ॥ ६८ ॥
ऐसी सेवा करितां संपन्न । तुष्ट होतसे जतींचें मन । 
हृदयीं भाविती यावरुन । प्राणसांडी करावी ॥ ६९ ॥
येरीकडे मीननाथ- ।-सुतासी विद्या अभ्यासीत । 
तो समय जाणोनि सापेक्ष । इंद्र मयूरवेषें नटलासे ॥ ७० ॥
निकट तरुशाखेवरती । विद्या अभ्यासीत गुप्तपंथीं ।
तों अकस्मात वातास्त्र जपती । वाताकर्षण लाधलें ॥ ७१ ॥
दैवें सर्व तपरहाटी । सकळ लाधली हातवटी ।
उपरी वाताकर्षणविद्या पाठीं । वातप्रेरक अस्त्र लाधलें ॥ ७२ ॥
ऐसी विद्या होतां सघन । परम हरुषला सहस्त्रनयन । 
परी एक संवत्सर होतां यज्ञ । अभ्यासीत तंववरी ॥ ७३ ॥
असो हवनअर्पणआहुती । मख (यज्ञ) पावूनि पूर्ण समाप्ती ।
मग मच्छिंद्रनाथ प्राज्ञिक जती । अग्रपूजे बैसला ॥ ७४ ॥        
मग पूजा करोनि सांगोपांग । उपरी त्रिदर्शनाथें पूजिलें अंग ।
वस्त्रभूषणें चांग । देऊनियां गौरविलें ॥ ७५ ॥
सकळां बैसवोनि कनकासनीं । उभा राहिला जोडोनि पाणी । 
सर्वांसी वदे म्लानवदनीं । नाथ वचन माझें परिसा ॥ ७६ ॥
मातें घडला एक अन्याय । परी आपण सहन करा समुदाय ।
म्यां मयूरवेष धरुनि मायें । अभ्यासिलें विद्येतें ॥ ७७ ॥
मीनजतीचा प्रताप गहन । मज सांपडले विद्यारत्न ।
तरी आपुला वर त्यातें देऊन । सनाथपणीं मिरवावें ॥ ७८ ॥
ऐसें बोलतां अमरनाथ । सर्वांसी समजले तस्करीकृत्य (चोरीचें काम) ।
मग ते कोपोनि परम चित्तांत । शापवचन बोलताती ॥ ७९ ॥
म्हणती इंद्रा तूं कृत्रिम । आणिलें ठकवावया कारण ।
तरी चोरुनि घेतलें विद्यारत्न । निष्फळ होईल तुजलागीं ॥ ८० ॥  
ऐसें बोलतां सकल जती । मग उपरिचर वसु वाचस्पती । 
गौरवोनि अपार युक्तीं । तुष्ट केलें चित्तांत ॥ ८१ ॥ 
म्हणती महाराजा शपमोचन । पुढें बोला कांहीं वचन ।
मग ते बोलती तयाकारण । तप आचरावें इंद्रानें ॥ ८२ ॥
द्वादश वर्षें तप आचरितां । विद्या फळेल तत्त्वतां ।
परी नाथपंथीं छळ न होतां । पदरावरी पडेल ॥ ८३ ॥
ऐसें बोलोनि सकळ जती । विमानारुढ झाले समस्ती ।
खालीं उतरुनि महीवरती । नाना तीर्थें भ्रमताती ॥ ८४ ॥
ऐसें भ्रमण करितां जती । तीर्थें झालीं अपरिमिती । 
याउपरी कीलोतळेतें मच्छिंद्रजती । पुसोनियां चालिला ॥ ८५ ॥
मग तें कीलोतळेचें नमन । अवर्ण्य आहे अनुष्ठान ।
नेत्रीं प्रेमबिंदु आणोन । बोळविलें नाथांसी ॥ ८६ ॥
हेलापट्टणीं मैनावती । पोहोंचवोनि तीर्थें हिंडती ।
तेव्हां मीननाथें तीर्थक्षितीं । सिद्ध तीन निर्मिले ॥ ८८ ॥
तयांचें सांगितलें पूर्वीं नाम । आतां सांगावया नाहीं काम । 
असो सिद्धकटकासह उत्तम । तीर्थे करीत भ्रमताती ॥ ८९ ॥
येरीकडे अमरनाथ । लक्षूनियां सह्याद्रिपर्वत । 
द्वादश वर्षें तप निश्र्चित । तीव्रपणीं आचरला ॥ ९० ॥
परी तें आचरितां तीव्रपणीं । मंत्रप्रयोगें सोडी पाणी । 
तेणें सरितालोट लोटोनी । भीमरथीतें भेटला ॥ ९१ ॥
तें मणिकर्णिकेचें जीवन । आणिलें होतें कमंडलू भरोन ।
परी इंद्रहस्ती प्रवाही होऊन । इंद्रायणीं पडियेलें ॥ ९२ ॥
ऐसें तप करोन । स्वस्थानासी इंद्र जाऊन ।
उपरी नवनाथ करितां तीर्थाटन । बहुत दिवस लोटले ॥ ९३ ॥
शके सत्राशें दहापर्यंत । प्रकटरुपें मिरवले नाथ ।
मग येऊनि आपुले स्थानांत । गुप्तरुपें राहिले ॥ ९४ ॥
मठींत राहिला कानिफाजती । उपरी मच्छिंद्रासी मायबाप म्हणती ।
जानपीर तो जालंदर जती । गर्भगिरीं नांदतसे ॥ ९५ ॥       
त्याहूनि खालता गैबीपीर । गहिनीनाथ परम सुंदर ।
वडवाळग्रामीं समाधिपर । नागनाथ असे कीं ॥ ९६ ॥
विटग्रामीं मानवदेशांत । तेथें राहिले रेवणनाथ ।
चरपट चौरंगी अडभंगी तीर्थ । गुप्त अद्यापि करिताती ॥ ९७ ॥
भर्तरी राहिला पातालभुवनीं । मीननाथ गेला स्वर्गालागोनी ।
गिरनार पर्वतीं गोरक्षमुनी । दत्ताश्रमीं राहिला ॥ ९८ ॥
गोपीचंद आणि धर्मनाथ । ते स्वसामर्थ्येंं गेले वैकुंठांत ।
विमान पाठवोनि मैनावतीतें । घेऊनि विष्णु गेलासे ॥ ९९ ॥
पुढें चौर्‍यायशीं सिद्धांपासून । नाथपंथ मिरवला अति सामर्थ्यानें ।
येथूनि चरित्र झालें संपूर्ण । सर्व नाथांचे महाराजा ॥ १०० ॥
Shri Navanath Bhaktisar Adhyay 40 श्रीनवनाथ भक्तिसार अध्याय चाळीसावा (४०) 


Custom Search

No comments: