ShriRamcharitmans Part 46
Doha 225 to 227
श्रीरामचरितमानस भाग ४६
दोहा २२५ ते २२७
रामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा--सभय सप्रेम बिनीत अति सकुच सहित दोउ भाइ ।
गुर पद पंकज नाइ सिर बैठे आयसु पाइ ॥ २२५ ॥
नंतर भय, प्रेम, विनय आणि मोठ्या संकोचाने दोन्ही भावांनी गुरुंच्या चरण-कमलांवर मस्तक ठेवून, त्यांच्या आज्ञेने ते बसले. ॥ २२५ ॥
निसि प्रबेस मुनि आयसु दीन्हा । सबहीं संध्याबंदनु कीन्हा ॥
कहत कथा इतिहास पुरानी । रुचिर रजनि जुग जाम सिरानी ॥
संध्याकाळ होताच मुनींनी आज्ञा केली, तेव्हा सर्वांनी संध्या-वंदन केले. नंतर प्राचीन कथा आणि इतिहास सांगता-सांगता सुंदर रात्रीचे दोन प्रहर निघून गेले. ॥ १ ॥
मुनिबर सयन कीन्हि तब जाई । लगे चरन चापन दोउ भाई ॥
जिन्ह के चरन सरोरुह लागी । करत बिबिध जप जोग बिरागी ॥
तेव्हा मुनिवर्य झोपण्यास गेले. दोन्ही भाऊ त्यांचे पाय चेपू लागले. ज्यांच्या चरण-कमलांच्या ( दर्शनासाठी व स्पर्शासाठी ) वैराग्यशील पुरुषसुद्धा तर्हेतर्हेचे जप व योगसाधना करतात, ॥ २ ॥
तेइ दोउ बंधु प्रेम जनु जीते । गुर पद कमल पलोटत प्रीते ॥
बार बार मुनि अग्या दीन्ही । रघुबर जाइ सयन तब कीन्ही ॥
तेच दोन्ही बंधू जणू प्रेमाने जिंकले गेल्यामुळे प्रेमपूर्वक गुरुजींची चरण-कमले चेपीत होते. मुनींनी जेव्हा वारंवार सांगितले, तेव्हा श्रीरघुनाथ जाऊन झोपले. ॥ ३ ॥
चापत चरन लखनु उर लाएँ । सभय सप्रेम परम सचु पाएँ ॥
पुनि पुनि प्रभु कह सोवहु ताता । पौढ़े धरि उर पद जलजाता ॥
श्रीरामांचे चरण हृदयीं धरुन भय व प्रेमाने परम सुखाचा अनुभव घेत लक्ष्मण श्रीरामांचे चरण चेपू लागले. प्रभू रामचंद्र वारंवार म्हणत होते की, ' बाबा रे, आता तू झोप. ' तेव्हा लक्ष्मण त्यांचे चरणकमल हृदयी धरुन पहुडला. ॥ ४ ॥
दोहा--उठे लखनु निसि बिगत सुनि अरुनसिखा धुनि कान ।
गुर तें पहिलेहिं जगतपति जागे रामु सुजान ॥ २२६ ॥
पहाटे कोंबड्याचे आरवणे ऐकून लक्ष्मण उठला. जगताचे स्वामी श्रीरामचंद्रही गुरुंच्या पूर्वी उठले. ॥ २२६ ॥
सकल सौच करि जाइ नहाए । नित्य निबाहि मुनिहि सिर नाए ॥
समय जानि गुर आयसु पाई । लेन प्रसून चले दोउ भाई ॥
प्रातर्विधी झाल्यावर त्यांनी जाऊन स्नान केले. नंतर ( संध्या-अग्निहोत्रादी ) नित्यकर्म आटोपल्यावर त्यांनी मुनींच्या चरणी मस्तक ठेवले. पूजेची वेळ झाल्याचे पाहून गुरुंच्या आज्ञेने दोघे बंधू फुले आणण्यासाठी निघाले. ॥ १ ॥
भूप बागु बर देखेउ जाई । जहँ बसंत रितु रही लोभाई ॥
लागे बिटप मनोहर नाना । बरन बरन बर बेलि बिताना ॥
त्यांनी जाऊन राजा जनकांची बाग पाहिली. तेथे वसंत-ऋतू लुब्ध होऊन राहिला होता. मनाला मोहित करणारे अनेक वृक्ष तेथे होते. रंगी-बेरंगी सुंदर वेलींचे मंडप पसरलेले होते. ॥ २ ॥
नव पल्लव फल सुमन सुहाए । निज संपति सुर रुख लजाए ॥
चातक कोकिल कीर चकोरा । कूजत बिहग नटत कल मोरा ॥
नवपल्लव, फळे आणि फुले यांनी भरलेले सुंदर वृक्ष आपल्या या ऐश्वर्यामुळे कल्पवृक्षालाही लाजवत होते. चातक, कोकिळा, पोपट, चकोर इत्यादी पक्षी मधुर कूजन करीत होते आणि मोर सुंदर नृत्य करीत होते. ॥ ३ ॥
मध्य बाग सरु सोह सुहावा । मनि सोपान बिचित्र बनावा ॥
बिमल सलिलु सरसिज बहुरंगा । जलखग कूजत गुंजत भृंगा ॥
बागेच्या मधोमध सुंदर सरोवर शोभत होते. त्याला रत्नजडित पायर्या विलक्षण पद्धतीने बनविलेल्या होत्या. त्याचे जल निर्मल होते, त्यामध्ये अनेक रंगांची कमळे फुललेली होती. जलपक्षी कलरव करीत होते आणि भ्रमर गुंजारव करीत होते. ॥ ४ ॥
दोहा--बागु तड़ागु बिलोकि प्रभु हरषे बंधु समेत ।
परम रम्य आरामु यहु जो रामहि सुख देत ॥ २२७ ॥
बाग व सरोवर पाहून प्रभू श्रीराम व लक्ष्मण दोघे आनंदित झाले. ती बाग खरोखरच अत्यंत रमणीय होती. कारण ( जगाला सुख देणार्या ) श्रीरामचंद्रांनाही तिने सुख दिले. ॥ २२७ ॥
चहुँ दिसि चितइ पूँछि मालीगन । लगे लेन दल फूल मुदित मन ॥
तेहि अवसर सीता तहँ आई । गिरिजा पूजन जननि पठाई ॥
चोहीकडे नजर टाकून व माळ्यांना विचारुन ते प्रसन्न चित्ताने पाने-फुले तोडू लागले. त्याचवेळी मातेने गिरिजेची पूजा करण्यासाठी सीतेला पाठविले होते. ती तेथे आली. ॥ १ ॥
संग सखीं सब सुभग सयानीं । गावहिं गीत मनोहर बानीं ॥
सर समीप गिरिजा गृह सोहा । बरनि न जाइ देखि मनु मोहा ॥
तिच्या सोबत सुंदर व चतुर सख्या होत्या. त्या मधुर वाणीने गीत गात होत्या. सरोवराजवळ गिरिजेचे मंदिर शोभून दिसत होते. त्याच्या सौंदर्याचे वर्णन करणेच कठीण. ते पाहून मन मोहून जात होते. ॥ २ ॥
मज्जनु करि सर सखिन्ह समेता । गई मुदित मन गौरि निकेता ॥
पूजा कीन्हि अधिक अनुरागा । निज अनुरुप सुभग बरु मागा ॥
सख्यांसह सरोवरात स्नान करुन सीता प्रसन्नतेने गिरिजा-मंदिरात गेली. तिने मोठ्या प्रेमाने पूजा केली आणि आपल्याला योग्य असा सुंदर वर मिळावा, म्हणून प्रार्थना केली. ॥ ३ ॥
एक सखी सिय संगु बिहाई । गई रही देखन फुलवाई ॥
तेहिं दोउ बंधु बिलोके जाई । प्रेम बिबस सीता पहिं आई ॥
एक सखी सीतेला तेथे सोडून बाग पाहायला गेली. तिने त्या दोघा भावांना पाहिले व प्रेम विव्हळ होऊन ती सीतेजवळ आली. ॥ ४ ॥

Custom Search
No comments:
Post a Comment