Shri RamCharitManas Part 66
दोहा—सोभा दसरथ भवन कइ को कबि बरनै पार ।
जहॉं सकल सुर सीस मनि राम लीन्ह अवतार ॥ २९७ ॥
दशरथांच्या महालाची शोभा कोणता कवी वर्णू
शकेल ? जेथे सर्व देवाधिदेव श्रीरामचंद्रांनी अवतार घेतला होता. ॥ २९७ ॥
भूप भरत पुनि लिए बोलाई । हय गय स्यंदन साजहु जाई
॥
चलहु बेगि रघुबीर बराता । सुनत पुलक पूरे दोउ
भ्राता ॥
मग राजांनी भरताला बोलावून घेतले आणि म्हटले,
‘ जाऊन घोडे, हत्ती व रथ लवकर सज्ज कर. श्रीरामांच्या वर्हाडाबरोबर जायचे आहे. ‘
‘ हे ऐकताच दोन्ही भाऊ, भरत व शत्रुघ्न आनंदाने मोहोरुन गेले. ॥ १ ॥
भरत सकल साहनी बोलाए । आयसु दीन्ह मुदित उठि धाए
॥
रचि रुचि जीन तुरग तिन्ह साजे । बरन बरन बर बाजि
बिराजे ॥
भरताने पागांच्या प्रमुखांना बोलावले आणि
त्यांना घोडे सजविण्याची आज्ञा दिली. ते प्रमुखही प्रसन्न होऊन धावत गेले. त्यांनी
मनापासून योग्य तर्हेने जीन घालून घोडे सजविले. रंगी बेरंगी उत्तम घोडे शोभून
दिसत होते. ॥ २ ॥
सुभग सकल सुठि चंचल करनी । अय इव जरत धरत पग धरनी
॥
नाना जाति न जाहिं बखाने । निदरि पवनु जनु चहत
उड़ाने ॥
सर्व घोडे फारच सुंदर व वेगवान होते. ते
जमिनीवर अशा रीतीने पाय टाकीत होते की जणू धगधगत्या लोखंडावर पाय टाकीत आहेत. अनेक
जातींचे घोडे होते, त्यांचे वर्णन करता येत नाही. ते वेगवान चालीने जणू हवेला मागे
टाकून पळू पाहात होते. ॥ ३ ॥
तिन्ह सब छयल भए असवारा । भरत सरिस बय राजकुमारा
॥
सब सुंदर सब भूषनधारी । कर सर चाप तून कटि भारी ॥
त्या सर्व घोड्यांवर भरताचे समवयस्के देखणे
राजकुमार बसले. ते सर्व सुंदर होते आणि सर्वांनी आभूषणें घातली होती. त्यांच्या
हाती बाण व धनुष्य होते. कमरेला भरलेले भाते बांधलेले होते. ॥ ४ ॥
दोहा--छरे छबीले छयल सब सूर सुजान नबीन ।
जुग पदचर असवार प्रति जे असिकला प्रबीन ॥ २९८ ॥
सर्वजण निवडक देखणे शूरवीर, चतुर व नवयुवक
होते. प्रत्येक घोडेस्वाराबरोबर दोन पायदळ शिपाई होते. ते मोठे तलवारबाज होते. ॥
२९८ ॥
बॉंधें बिरद बीर रन गाढ़े । निकसि भए पुर बाहेर
ठाढ़े ॥
फेरहिं चतुर तुरग गति नाना । हरषहिं सुनि सुनि
पनव निसाना ॥
शूराचा वेष घातलेले ते सर्व रणधीर वीर
नगराबाहेर येऊन उभे राहिले. ते चतुर वीर आपल्या घोड्यांना तर्हेतर्हेच्या
चालींनी फिरवत होते आणि तुतार्या व नगार्यांच्या आवाजाने आनंदित होत होते. ॥ १ ॥
रथ सारथिन्ह बिचित्र बनाए । ध्वज पताक मनि भूषन
लाए ॥
चवँर चारु किंकिनि धुनि करहीं । भानु जान सोभा
अपहरहीं ॥
सारथ्यांनी ध्वजा, पताका, रत्ने व आभूषणे
लावून रथ फार विलक्षण सजविले होते. त्यांमध्ये सुंदर चवर्या लावल्या होत्या.
घंट्या सुंदर किणकिण करीत होत्या. ते रथ इतके सुंदर होते की, सूर्याच्या रथाची
शोभा हरण करीत होते. ॥ २ ॥
सावँकरन अगनित हय होते । ते तिन्ह रथन्ह सारथिन्ह
जोते ॥
सुंदर सकल अलंकृत सोहे । जिन्हहि बिलोकत मुनि मन
मोहे ॥
असंख्य दिव्य श्यामकर्ण घोडे होते. त्यांना
सारथ्यांनी रथांना जुंपले. सर्व घोडे दिसायला सुंदर आणि अलंकारांनी सजविलेले शोभून
दिसत होते. त्यांना पाहून मुनींचे मनसुद्धा मोहून जात होते. ॥ ३ ॥
जे जल चलहिं थलहि की नाईं । टाप न बूड़ बेग
अधिकाईं ॥
अस्त्र सस्त्र सबु साजु बनाई । रथी सारथिन्ह लिए
बोलाई ॥
ते घोडे पाण्यावरही जमिनीप्रमाणेच चालत होते.
अत्यंत वेगामुळे त्यांची टाप पाण्यात बुडत नव्हती. अस्त्र-शस्त्र आणि सर्व
साजश्रृंगार सजवून सारथ्यांनी रथींना बोलावले. ॥ ४ ॥
दोहा—चढ़ि चढ़ि रथ बाहेर नगर लागी जुरन बरात ।
होत सगुन सुंदर सबहि जो जेहि कारज जात ॥ २९९ ॥
रथांवर चढून वर्हाड नगराबाहेर येऊ लागले.
कामासाठी जात असलेल्या सर्वांनाच शुभशकुन होत होते. ॥ २९९ ॥
कलित करिबरन्हि परीं अँबारी । कहि न जाहिं जेहि
भॉंति सँवारीं ॥
चले मत्त गज घंट बिराजी । मनहुँ सुभग सावन घन
राजी ॥
श्रेष्ठ हत्तींच्यावर सुंदर अंबार्या
होत्या. त्या अशाप्रकारे सजविल्या होत्या की काही सांगता येत नाही. मस्त हत्ती
घंट्यांनी सुशोभित होऊन चालत होते, जणू श्रावणातील सुंदर घन-समूह गर्जना करीत जात
असावेत. ॥ १ ॥
बाहन अपर अनेक बिधाना । सिबिका सुभग सुखासन जाना
॥
तिन्ह चढ़ि चले बिप्रबर बृंदा । जनु तनु धरें सकल
श्रुति छंदा ॥
सुंदर पालख्या, सुखासनी शिबिका आणि रथ
इत्यादी इतरही अनेक प्रकारची वाहने होती. त्यांवर विद्वान ब्राह्मणांचे समूह आरुढ
होऊन निघाले. जणू ते सर्व वेदांचे छंदरुप शरीर धारण करुन निघाले होते. ॥ २ ॥
मागध सूत बंदि गुनगायक । चले जान चढ़ि जो जेहि
लायक ॥
बेसर ऊँट बृषभ बहु जाती । चले बस्तु भरि अगनित
भॉंती ॥
मागध, सूत, भाट आणि गुण-गान करणारे हे सर्वजण
आपापल्या योग्यतेप्रमाणे वाहनांमध्ये बसले. अनेक जातींची खेचरे, उंट व बैल हे
असंख्य प्रकारच्या वस्तू वाहून नेत होते. ॥ ३ ॥
कोटिन्ह कॉंवरि चले कहारा । बिबिध बस्तु को बरनै
पारा ॥
चले सकल सेवक समुदाई । निज निज साजु समाजु बनाई ॥
कोट्यावधी हमाल सामानाच्या कावडी उचलून
निघाले होते. त्यांमध्ये इतक्या प्रकारच्या इतक्या वस्तू होत्या की, त्यांचे वर्णन
कुणाला करता येईल ? सर्व सेवकांचे जत्थे आपापले गट करुन निघाले. ॥ ४ ॥
दोहा—सब कें उर निर्भर हरषु पूरित पुलक सरीर ।
कबहिं देखिबे नयन भरि रामु लखनु दोउ बीर ॥ ३०० ॥
सर्वांच्या मनांत अपार हर्ष होता आणि शरीर
पुलकित होते. सर्वांना एकच लालसा होती की, आपण राम-लक्ष्मणांना केव्हा डोळे भरुन
पाहू शकू ? ॥ ३०० ॥
गरजहिं गज घंटा धुनि घोरा । रथ रव बाजि हिंस चहु
ओरा ॥
निदरि घनहि घुर्म्मरहिं निसाना । निज पराइ कछु
सुनिअ न काना ॥
हत्ती चीत्कार करीत होते, त्यांच्या
घंटिकांचा तुंबळ ध्वनी होत होता. चोहीकडे रथांची घरघराट आणि घोड्यांच्या
खिंकाळण्याचा आवाज येत होता. नगारे इतके मोठ्याने वाजत होते की, मेघ गर्जनाही
तुच्छ वाटत होत्या. कुणालाही आपले किंवा दुसर्याचे बोलणे ऐकू येत नव्हते. ॥ १ ॥
महा भीर भूपति के द्वारें । रज होइ जाइ पषान
पबारें ॥
चढ़ी अटारिन्ह देखहिं नारीं । लिएँ आरती मंगल
थारीं ॥
राजा दशरथांच्या द्वारावर एवढी गर्दी झाली
होती की, तेथे दगड फेकला तर तोही चिरडून माती झाला असता. गच्च्यांवर चढलेल्या
स्त्रिया मंगल-तबकांमध्ये आरत्या घेऊन पाहात होत्या. ॥ २ ॥
गावहिं गीत मनोहर नाना । अति आनंदु न जाइ बखाना ॥
तब सुमंत्र दुइ स्यंदन साजी । जोते रबि हय निंदक
बाजी ॥
आणि नाना प्रकारची मनोहर गीते गात होत्या.
त्यांच्या आनंदाचे वर्णन करणे शक्य नाही. सुमंताने दोन रथ सजवून त्याला सूर्याच्या
घोड्यांवरही मात करणारे घोडे जुंपले. ॥ ३ ॥
दोउ रथ रुचिर भूप पहिं आने । नहिं सारद पहिं
जाहिं बखाने ॥
राज समाजु एक रथ साजा । दूसर तेज पुंज अति भ्राजा
॥
दोन्ही सुंदर रथ सुमंताने राजा दशरथांच्याजवळ आणले.
त्या रथांच्या सौंदर्याचे वर्णन सरस्वतीदेवीही करु शकली
नसती. एका रथावर राजेशाही सामान सजविले होते
आणि दुसरा रथ तेजःपुंज व सुंदर दिसत होता. ॥ ४ ॥

No comments:
Post a Comment