Thursday, July 10, 2014

ShriRamdasSwamiKrut Karunashtake रामदासस्वामीकृत करुणाष्टके


Karunashtake 
Karunashtake are creation of Ramdas Swami, Great God Ram devotee. Karunashtake are in Marathi. When a person reaches to a higher most state of spiritual development how he feels and what are his thoughts about his life on the earth, are well described here, He realizes that it was useless to run after money, material, things, relations which he collected and acquired and never brought a real happiness and peace to him. He totally surrenders to the God, he believes in. and finds the house of unending happiness and everlasting peace.
श्रीरामदासस्वामीकृत करुणाष्टके 
अनुदिन अनुतापें तापलों रामराया । 
परमदिनदयाळा नीरसीं मोहमाया ।। 
अचपळ मन माझें नावरे आवरीतां । 
तुजविण शिण होतो धांव रे धांव आतां ॥ १ ॥ 
भजनरहित रामा सर्वही जन्म गेला । 
स्वजनजनधनाचा व्यर्थ म्यां स्वार्थ केला ।। 
रघुपति मति माझी आपुलीशी करावी । 
सकळ त्यजुनि भावें कांस तूझी धरावी ॥ २ ॥ 
विषयजनित सूखें सौख्य होणार नाहीं । 
तुजविण रघुनाथा वोखटें सर्व कांहीं ।। 
रघुकुळटिळका रे हीत माझें करावें । 
दुरित दुरि हरावें सस्वरुपीं भरावें ॥ ३ ॥ 
तनु-मन-धन माझें राघवा रुप तूझें । 
तुजविण मज वाटे सर्व संसार वोझें ।। 
प्रचलित न करावी सर्वथा बुद्धि माझी । 
अचल भजनलिला लागली आस तूझी ॥ ४ ॥ 
चपळपण मनाचें मोडितां मोडवेना । 
सकळ स्वजनमाया तोडितां तोडवेना ।। 
घडि घडि विघडे हा निश्र्चयो अंतरींचा । 
म्हणवुनि करुणा हे बोलतों दीनवाचा ॥ ५ ॥ 
 जळत हृदय माझें जन्म कोट्यानुकोटी । 
मजवरि करुणेचा राघवा पूर लोटीं ।। 
तळमळ निववीं रे राम कारुण्यसिंधू । 
षड्रिपुकुळ माझें तोडिं याचा समंधू ॥ ६ ॥ 
तुजविण करुणा हे कोण जाणेल माझी । 
शिणत शिणत पोटीं लागली आस तुझी ।। 
झडकरि झड घालीं धांव पंचानना रे । 
तुजविण मज नेती जंबुकी वासना रे ॥ ७ ॥ 
सबळ जनक माझा राम लावण्यकोटी । 
म्हणवुनि मज पोटीं लागली आस मोठी ।। 
दिवस गणित बोटीं ठेवूनि प्राण कंठी । 
अवचट मज भेटी होत घालीन मीठी ॥ ८ ॥ 
जननिजनकमाया लेंकरुं काय जाणे । 
पथ न लगत मूखीं हाणितां वत्स नेणे ।। 
जळधरकण आशा लागली चातकासी । 
हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी ॥ ९ ॥ 
तुजविण मज तैसें जाहलें देवराया । 
विलग विषमकाळीं तूटली सर्व माया ।। 
सकळजनसखा तूं स्वामि आणीक नाही । 
वमकवमन जैसें त्यागिलें सर्व कांहीं ॥ १० ॥ 
स्वजनजनधनाचा कोण संतोष आहे । 
रघुपतिविण चित्त कोठे न राहे ।। 
जिवलग जिव घेती प्रेत सांडूनि जाती । 
विषय सकळ नेती मागुता जन्म देती ॥ ११ ॥ 
सकळ जन भवाचे आधिले वैभवाचे । 
जिवलग मग कैंचे चालतें हेंचि साचें ।। 
विलग विषमकाळीं सांडिती सर्व माळीं । 
रघुविर सुखदाता सोडवी अंतःकाळीं ॥ १२ ॥ 
सुख सुख म्हणतां हें दुःख ठाकूनि आलें । 
भजन सकळ गेलें चित्त दुश्र्चीत जालें ।। 
भ्रमित मन कळेना हीत तें आकळेना । 
परम कठिण देहीं देहबुद्धी वळेना ॥ १३ ॥ 
उपरति मज रामीं जाहली पूर्णकामीं । 
सकळभ्रमविरामीं राम विश्रामधामीं ।। 
घडिघडि मन आतां रामरुपीं भरावें । 
रघुटिळका रे आपुलेंसे करावें ॥ १४ ॥ 
जळचर जळवासी नेणती त्या जळासी । 
निशिदिन तुजपासीं चूकलों गूणरासी ।। 
भुमिधर निगमांसीं वर्णवेना जयासी । 
सकळभुवनवासी भेट दे रामदासीं ॥ १५ ॥ 
असंख्यात ते भक्त होउनि गेले । 
तिंहीं साधनांचे बहु कष्ट केले ।। 
नव्हे कार्यकर्ता भुमीभार जालों । 
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥ १६ ॥ 
बहू दास ते तापसी तीर्थवासी । 
गिरीकंदरी भेटि नाहीं जनासी ।। 
स्थिती ऐकतां घोर विस्मीत झालों । 
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥ १७ ॥ 
सदा प्रेमराशी तयां भेटलासी । 
तुझ्या दर्शनें स्पर्शनें सौख्यराशी ।। 
अहंता मनीं शब्दज्ञाने बुडालों । 
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥ १८ ॥ 
तुझ्या प्रीतिचे दास जन्मास आले । 
असंख्यात ते कीर्ति बोलोनि गेले । 
बहु धारणा घोर चकीत जालों । 
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥ १९ ॥ 
बहुसाल देवालयें हाटकाचीं । 
रसाळ कळा लाघवें नाटकाचीं ।। 
पुजा देखिता जाड जीवीं गळालों । 
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥ २० ॥ 
कितेकीं देह त्यागिले तूजलागीं । 
पुढें जाहले संगतीचे विभागी ।। 
देहेदुःख होतांचि वेगीं पळालों । 
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥ २१ ॥ 
 किती योगमूर्ती किती पुण्यमूर्ती । 
किती धर्मसंस्थापना अन्नशांती ।। 
पस्तावलों कावलों तप्त जालों । 
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥ २२ ॥ 
सदा सर्वदा राम सोडूनि कामीं । 
समर्था तुझे दास आम्ही निकामी ।। 
बहू स्वार्थबुद्धिनें रे कष्टवीलों । 
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥ २३ ॥ 
नसे भक्ति ना ज्ञान ना ध्यान कांही । 
नसे प्रेम हें राम विश्राम नाहीं ।। 
असा दीन अज्ञान मी दास तूझा । 
समर्था जनीं घेतला भार माझा ॥ २४ ॥ 
उदासीन हे वृत्ति जीवीं धरावी । 
अती आदरें सर्व सेवा करावी ।। 
सदा प्रीति लागों तुझे गुण गातां । 
रघूनायका मागणें हेंचि आतां ॥ २५ ॥ 
सदा सर्वदा योग तूझा घडावा । 
तुझें कारणीं देह माझा पडावा ।। 
उपेक्षूं नको गूणवंता अनंता । 
रघूनायका मागणें हेंचि आतां ॥ २६ ॥ 
नको द्रव्य-दारा नको येरझारा । 
नको मानसीं ज्ञानगर्वें फुगारा ।। 
सगूणीं मना लाविं रे भक्तिपंथा । 
रघूनायका मागणें हेंचि आतां ॥ २७ ॥ 
 मनीं कामना कल्पना ते नसावी । 
कुबुद्धी कुडी वासना नीरसावी ।। 
नको संशयो तोडिं संसारव्यथा । 
रघूनायका मागणें हेंचि आतां ॥ २८ ॥ 
समर्थापुढें काय मागों कळेना । 
दुराशा मनीं बैसली हे ढळेना ।। 
तुटो संशयो नीरसीं सर्व चिंता । 
रघूनायका मागणें हेंचि आतां ॥ २९ ॥ 
 बिद्राकारणें दीन हातीं धरावें । 
म्हणे दास भक्तांसि रे उद्धरावे ।। 
सुटे बीद्र आम्हांसि सांडूनि जातां । 
रघूनायका मागणें हेंचि आतां ॥ ३० ॥ 
विश्रांति देहीं अणुमात्र नाहीं । 
कुळाबभिमानें पडिलों प्रवाहीं ।। 
स्वहीत माझें होतां दिसेना । 
तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ३१ ॥ 
विषयीं जनानें मज लाजवीलें । 
 प्रपंचसंगे आयुष्य गेलें ।। 
समयीं बहु क्रोध शांती घडेना । 
तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ३२ ॥ 
संसारसंगे बहु पीडलों रे । 
कारुण्यसिंधू मज सोडवीं रे ।। 
कृपाकटाक्षें सांभाळिं दीना । 
तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ३३ ॥ 
आम्हां अनाथांसि तूं एक दाता । 
संसारचिंता चुकवीं समर्था ।। 
दासा मनीं आठव वीसरेना । 
तुजवीण रामामज कंठवेना ॥ ३४ ॥ 
॥ इति श्रीरामदास स्वामिकृत करुणाष्टके समाप्त ॥
ShriRamdasSwamiKrut Karunashtake 
रामदासस्वामीकृत करुणाष्टके


Custom Search

No comments: