BibhishanKrutam Hanumat Stotram
BibhishanKrutam Hanumat Stotram is in Sanskrit. It is created by Bibhishan. This stotra is from ShriSudarshan Sanhita. It has arisen from the discussion between Bibhishan and Garuda. This is a God Hanuman Stuti and description of what God Hanuman has done for God Ram in the war with Ravana. All desires of the devotee who recites this stotra daily with faith, devotion and concentration are fulfilled by the blessings of God Hanuman.
बिभीषणकृतं हनुमत्स्तोत्रम्
नमो हनुमते तुभ्यं नमो मारुत्सूनवे ।
नमः श्रीरामभक्ताय श्यामास्याय ते नमः ॥ १ ॥
नमो वानरवीराय सुग्रीवसख्यकारिणे ।
लङ्काविदाहनार्थाय हेलासागरतारिणे ॥ २ ॥
सीताशोकविनाशाय राममुद्राधरायच ।
रावणान्तकुलच्छेदकारिणे ते नमो नमः ॥ ३ ॥
मेघनादमखध्वंससकारिणे ते नमो नमः ।
अशोकवनविध्वंसकारिणे भयहारिणे ॥ ४ ॥
वायुपुत्राय वीराय आकाशोदरगामिने ।
वनपालशिरश्छेदलङ्काप्रासादभञ्जिने ॥ ५ ॥
ज्वलत्कनकवर्णाय दीर्घलाङ्गूलधारिणे ।
सौमित्रिविजयदात्रे च रामदूताय ते नमः ॥ ६ ॥
अक्षस्य वधकर्ते च ब्रह्मपाशनिवारिणे ।
लक्ष्मणाङ्गमहाशक्तिघातक्षतविनाशिने ॥ ७ ॥
रक्षोघ्नाय रिपुघ्नाय भूतघ्नाय च ते नमः ।
ऋक्षवानरवीरौघप्राणदाय नमो नमः ॥ ८ ॥
परसैन्यबलघ्नाय शस्त्रास्त्रघ्नाय ते नमः ।
विषघ्नाय द्विषघ्नाय ज्वरघ्नाय च ते नमः ॥ ९ ॥
महाभयरिपुघ्नाय भक्तत्राणैककारिणे ।
परप्रेरितमन्त्राणां यन्त्राणां स्तम्भकारिणे ॥ १० ॥
पयःपाषाणतरणकारणाय नमो नमः ।
बालार्कमण्डलग्रासकारिणे भवतारिणे ॥ ११ ॥
नखायुधाय भीमाय दन्तायुधधराय च ।
रिपुमायाविनाशाय रामाज्ञालोकरक्षिणे ॥ १२ ॥
प्रतिग्रामस्थितायाथ रक्षोभूतवधार्थिने ।
करालशैलशस्त्राय द्रुमशस्त्राय ते नमः ॥ १३ ॥
बालैकब्रह्मचर्याय रुद्रमूर्तिधराय च ।
विहंगमाय सर्वाय वज्रदेहाय ते नमः ॥ १४ ॥
कौपीनवाससे तुभ्यं रामभक्तिरताय च ।
दक्षिणाशाभास्कराय शतचन्द्रोदयात्मने ॥ १५ ॥
कृत्याक्षतव्यथाघ्नाय सर्वक्लेशहराय च ।
स्वाम्याज्ञापार्थसंग्रामेसंख्ये संजवधारिणे ॥ १६ ॥
भक्तान्तदिव्यवादेषु संग्रामे जयदायिने ।
किल्किलाबुबुकोच्चारघोर शब्दकराय च ॥ १७ ॥
सर्पाग्रिव्याधिसंस्तम्भकारिणे वनचारिणे ।
सदा वनफलाहारसंतृप्ताय विशेषतः ॥ १८ ॥
महार्णवशिलाबद्धसेतुबन्धाय ते नमः ।
वादे विवादे संग्रामे भये घोरे महावने ॥ १९ ॥
सिंहव्याघ्रादिचोरेभ्यः स्तोत्रपाठाद् भयं न हि ।
दिव्ये भूतभये व्याधौ विषे स्थावरजङ्गमे ॥ २० ॥
राजशस्त्रभये चोग्रे तथा ग्रहभयेषु च ।
जले सर्प महावृष्टौ दुर्भिक्षे प्राणसम्प्लवे ॥ २१ ॥
पठेत् स्तोत्रं प्रमुच्येत भयेभ्यः सर्वतो नरः ।
तस्य क्वापि भयं नास्ति हनुमत्स्तवपाठतः ॥ २२ ॥
सर्वदा वै त्रिकालं च पठनीयमिदं स्तवम् ।
सर्वान् कामानवाप्नोति नात्र कार्या विचारणा ॥ २३ ॥
बिभीषणकृतं स्तोत्रं तार्क्ष्येण समुदीरितम् ।
ये पठिष्यन्ति भक्त्या वै सिद्धवस्तत्करे स्थिताः ॥ २४ ॥
॥ इति सुदर्शनसंहितायां बिभीषण-गरुड संवादे बिभीषणकृतं
हनुमत्स्तोत्रं सम्पूर्णम् ॥
मराठी अर्थ:
१) हनुमान आपल्याला नमस्कार. मारुतनन्दन आपल्याला नमस्कार. श्रीरामभक्त आपल्याला नमस्कार. आपल्या मुखाचा रंग श्याम आहे आपल्याला नमस्कार आहे.
२) आपण श्रीराम-सुग्रीव यांची मैत्री करुन देणारे, लंकादहन करणारे आणि खेळता खेळता महासागर पार करुन जाणारे वानर वीर आहात आपल्याला नमस्कार आहे.
३) आपण राममुद्रीका धारण करणारे, सीतेचे दुःख हरण करणारे आणि रावणकुलाचा नाश करणारे आहात आपल्याला पुनःपुनः नमस्कार आहे.
४) आपण अशोकवन उध्वस्त करणारे, मेघनादाच्या (मेघनाद नावाचा राक्षस) यज्ञाचा विध्वंस करणारे, भय हरण करणारे आपल्याला परत परत नमस्कार आहे.
५) आपण वायु पुत्र आहात, अशोकवनाच्या रक्षकांचा
शिरच्छेद करणारे आहात, लंकेच्या राजवाड्याच्या तटबंदीची तोडफोड करणारे आहात.
६) आपल्या शरीर कांतीचा वर्ण तापलेल्या सुवर्णासारखा आहे. आपली शेपटी फार लांब आहे आणि आपण सुमित्रेचा मुलगा लक्ष्मण याला विजय मिळवून देणारे आहात. आपल्याला पुनः पुनः नमस्कार आहे.
७) आपण अक्षकुमाराचा वध करणारे, ब्रह्मपाशाचे निवारण करणारे, लक्ष्मणाच्या शरिरावर शक्तीच्या आघाताने झालेल्या घावाचे निवारण करणारे आहात.
८) राक्षस, शत्रु व भूतांचे संहार करणारे आणि वानरवीरांच्या समुदायाचे जीवनदाते आहात. आपल्याला पुनःपुनः नमस्कार आहे.
९) आपण शत्रु सैन्याचा नाश करणारे, त्यांच्या शस्त्रास्त्रांचे विनाशक आहात आपल्याला नमस्कार आहे. आपण वीष, शत्रु आणि ज्वर यांचे विनाशक आहात आपल्याला नमस्कार आहे.
१०) आपण महाभयंकर शत्रुचा नाश करणारे, भक्तजनांचे एकमेव तारणकर्ता आणि दुसर्यांनी केलेल्या मंत्र-यंत्रांना स्तंभित करणारे आहात.
११) समुद्र जलावर तरंगणार्या शिलांचे कारण स्वरुप आहात आपल्याला पुनःपुनः नमस्कार आहे. आपण बाल-सूर्य-मंडलाचा ग्रास करणारे आणि (भक्तजनांवाचे) भवसागरांतुन तारण करणारे आहात.
१२) आपले स्वरुप महाभयंकर आहे. आपण नखें आणि दात यांनाच शस्त्र म्हणुन धारण करता. शत्रुच्या मायेपासुन निवारण करणारे आहात तसेच श्रीरामांच्या आज्ञेने लोकांचे पालन करणारे आहात.
१३) राक्षस व भूतांचा नाश करणे हेच आपले प्रयोजन आहे. प्रत्येक गावामध्ये आपण मूर्तरुपाने आहात. विशाल पर्वत आणि मोठेमोठे वृक्ष ही आपली शस्त्रे आहेत आपल्याला नमस्कार आहे.
१४) आपण ब्रह्मचारी आहात, रुद्ररुपामध्ये अवतरित असून आकाशामध्ये संचार करणारे आहात. आपले शरीर वज्रासारखे आहे. आपणास परत परत नमस्कार आहे.
१५) कौपीन हेच आपले वस्त्र आहे, नेहमी रामभक्तीमध्ये आपण मग्न असता, दक्षिणदिशा उजळून टाकण्यासाठी आपण सूर्यासारखे आहात. शेकडो चंद्रांसारखी आपली शरीर कांती आहे.
१६) आपण कृत्यांनी केलेल्या आघातांच्या घावांचे नाश करणारे आहात.सर्व कष्टांचे निवारक आहात. स्वामींच्या (रामाज्ञेने) अर्जुनाच्या (कौरवाशी झालेल्या) युद्धांत मैत्रीभावाचे (त्याच्या रथावर राहून) संस्थापन करणारे आहात.
१७) भक्तांना दिव्या वाद-विवादांत अंतिम जय देणारे व युद्धांत विजय मिळवुन देणारे आहात. किलकिला आणि बुबुकह्यांचे भिषण उच्चार करणारे आहात.
१८) आपण सर्प, अग्नि आणि वाघ यांचे स्तंभन करणारे आहात. वनचारी आणि आपण महाजंगलांतील फळांचा आहार करुन विशेषतः तृप्त होणारे आहात.
१९-२२) आपण समुद्रावर शिलाखंडांचा पूल निर्माण करणारे आहात. आपल्याला नमस्कार आहे. या स्तोत्राचा पाठ करणारास वाद-विवाद, युद्ध, महाभयंकर अरण्य सिंह-वाघ आदि हिंसक प्राण्यांपासून आणि चोरांपासून भयप्राप्ती होते. यासर्वा पासून त्रास होत नाही. जर एखाद्याने या स्तोत्राचा पाठ केला तर दैविक व भौक्तिक दुःख,व्याधि,संकटे; स्थावर-जंगम यासंबंधी त्रास, राजभय, ग्रहांचे भय, पाणी, साप, महावृष्टी, दुर्भिक्ष आणि घोर प्राणसंकट यासर्वांपासून भय राहात नाही. या सर्वांपासून काहीही त्रास होत नाही.
२३) सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी या स्तोत्राचा पाठ केला पाहीजे. असे केल्यावर सर्व प्रकारच्या
इच्छा-आाकांक्षाची पूर्ति होते. याबद्दल पुनर्विचार करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे हे होतेच यांत संशय नाही.
२४) बिभिषणाने केलेल्या या स्तोत्राचा गरुडाने सम्यक पाठ केला. जो कोणी या स्तोत्राचा भक्तिपूर्वक पाठ करतो त्याच्या करतलावर सर्व सिद्धि राहतात.
अशारीतीने सुदर्शनसंहितेंतील हे बिभिषणाने केलेले हनुमान स्तोत्र संपूर्ण झाले.

Custom Search
No comments:
Post a Comment