Shradha Sookta
Shradha Sookta is in Sanskrit. These are 5 ruchas or sholakas from Rugved from 10th mandal 151. Since these sholaks are from Rugved these are 5 powerful mantras.If anybody chants these sholaks he fills himself with Shardha (Unshakable faith) and attracts Success in all his projects.
श्रद्धा-सूक्त
श्रद्धयाग्निः समिध्यते श्रद्धया हूयते हविः ।
श्रद्धां भगस्य मूर्धनि वचसा वेदयामसि ॥ १ ॥
प्रियं श्रद्धे ददतः प्रियं श्रद्धे दिदासतः ।
प्रियं भोजेषु यज्वस्विदं म उदितं कृधि ॥ २ ॥
यथा देवा असुरेषु श्रद्धामुग्रेषु चक्रिरे ।
एवं भोजेषु यज्वस्वस्माकमुदितं कृधि ॥ ३ ॥
श्रद्धां देवा यजमाना वायुगोपा उपासते ।
श्रद्धां हृदय्य याकूत्या श्रद्धया विन्दते वसु ॥ ४ ॥
श्रद्धां प्रातर्हवामहे श्रद्धां मध्यंदिनं परि ।
श्रद्धां सूर्यस्य निम्रुचि श्रद्धे श्रद्धापयेह नः ॥ ५ ॥
॥ इति श्रद्धा सूक्त ॥
श्रद्धा सूक्तचा मराठी अर्थः
ऋग्वेदांतील दशम मंडलांतील १५१ व्या सूक्ताला " श्रद्धा-सूक्त " असे म्हणतात. याची ऋषिका श्रद्धा कामायनी, देवता श्रद्धा आणि छन्द अनुष्टुप् आहे. या सूक्तामध्ये श्रद्धेचा महिमा सांगितला आहे. अग्नि, इन्द्र, वरुण अशा मोठ्या देवता व अन्य छोट्या देवता यांच्यात काहीहि फरक नाही असे सांगितले आहे. सर्व यज्ञ-कर्म, पूजा-पाठ अशा सर्वांत श्रद्धेची अत्यंत आवश्यकता असते. ऋषिनी या सूक्तांत श्रद्धेचे देवीरुपांत आवाहन करुन सांगितले आहे की, ती आमच्या हृदयांत श्रद्धा उत्पन्न करो.
१) श्रद्धेनेच अग्निहोत्राचा अग्नि प्रदीप्त होतो. श्रद्धेनेच हविची आहुति यज्ञांत दिली जाते. धन-ऐश्र्वर्य मिळण्यासाठीच आम्ही श्रद्धेची स्तुति करतो.
२) हे श्रद्धे ! देणारा दाता जो आहे त्याचे अभिष्ट होईल असे फल दे. दान देण्याची जो इच्छा करतो त्याचेही हित कर. भोगैश्र्वर्याची इच्छा करणार्याचे सुद्धा प्रार्थित फळ त्याना दे.
३) ज्या प्रकारे देवांनी असुरांना हरविण्यासाठी निश्र्चय केला की या असुरांना नष्टच केले पाहिजे. त्याचप्रमाणे हे जे श्रद्धाळु याज्ञिक आणि भोगार्थी आहेत त्याना इच्छित भोग प्रदान कर.
४) बलवान वायुकडून रक्षण प्राप्त करुन देव व मनुष्य श्रद्धेची उपासना करतात. ते अंतःकरणांत संकल्पानेच श्रद्धेची उपासना करतात. श्रद्धेने धन प्राप्त होते.
५) आम्ही प्रातःकाळी श्रद्धेची प्रार्थना करतो. मध्याह्नि श्रद्धेची उपासना करतो. हे श्रद्धादेवि ! या जगांत आम्हाला श्रद्धावान बनव.
Shradha Sookta
श्रद्धा-सूक्त
Custom Search
No comments:
Post a Comment