Friday, April 3, 2015

Maruti-Namaskar मारुति-नमस्कार


Maruti-Namaskar 
Maruti Namaskar is in Marathi. It is a God Hanuman Stotra. On every Chaitra Pournima; we celebrate God Hanuman Jayanti (God Hanuman Birthday). On 4th April 2015 we will be celebrating it. Especially for Devotees of God Hanuman this Maruti Namskar is uploaded.
मारुति-नमस्कार
महारुद्र अवतार हा सूर्यवंशी ।
अनादिनाथ पूर्ण तारावयासी ।
असा चैत्र पौर्णिमेचा जन्म झाला ।
नमस्कार माझा तया मारुतीला ॥ १ ॥
तनू शिवशक्ति असे पूर्ण ज्याचे ।
किती भाग्य वर्णूं तया अंजनीचें ।
तिच्या भक्तिलागी असा जन्म झाला ।
नमस्कार माझा तया मारुतीला ॥ २ ॥
गिळायासि जातां तया भास्करासी ।
तिथें राहु तो येउनी त्याजपाशीं ।
तया चंडकीर्णा मारितां तो पळाला ।
नमस्कार माझा तया मारुतीला ॥ ३ ॥
खरा ब्रह्मचारी मनातें विचारी ।
म्हणोनी तया भेटला रावणारी ।
दयासागरु भक्तिनें गौरवीला ।
नमस्कार माझा तया मारुतीला ॥ ४ ॥
सुमित्रासुता लागली शक्ति जेव्हां ।
धरी रुप अक्राळ विक्राळ तेव्हां ।
गिरी आणुनी शीघ्र तो ऊठवीला ।
नमस्कार माझा तया मारुतीला ॥ ५ ॥
जगीं भीम तो मारुति ब्रह्मचारी ।
समस्तांपुढें तापसी निर्विकारी ।
नमूं जावयालागिं रे मोक्षपंथा ।
नमस्कार माझा तया हनुमंता ॥ ६ ॥
॥ इति मारुति नमस्कार ॥

Maruti-Namaskar 
मारुति-नमस्कार


Custom Search
Post a Comment