ShriRamcharitmans
श्रीरामचरितमानस
श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा—असुर मारि थापहिं
सुरन्ह राखहिं निज श्रुति सेतु ।
जग बिस्तारहिं बिसद जस
राम जन्म कर हेतु ॥ १२१ ॥
ते असुरांना ठार मारुन
देवांची स्थापना करतात, आपल्या ( श्वासरुप असलेल्या ) वेदांच्या मर्यादेचे रक्षण
करतात आणि जगामध्ये आपली उज्ज्वल कीर्ती पसरवितात. श्रीरामचंद्रांच्या अवताराचे हे
कारण आहे. ॥ १२१ ॥
सोइ जस गाइ भगत भव
तरहीं । कृपासिंधु जन हित तनु धरहीं ॥
राम जनम के हेतु अनेका
। परम बिचित्र एक तें एका ॥
ते यशोगान कर-करुन
भक्तजन भवसागर तरुन जातात. कृपासागर भगवान भक्तांच्या हितासाठी देह धारण करतात.
श्रीरामचंद्रांनी जन्म घेण्याचीअनेक कारणे आहेत. ती एकाहून एक विलक्षण आहेत. ॥ १ ॥
जनम एक दुइ कहउँ बखानी
। सावधान सुनु सुमति भवानी ॥
द्वारपाल हरि के प्रिय
दोऊ । जय अरु बिजय जान सब कोऊ ॥
हे बुद्धिमती भवानी,
त्यांपैकी एक-दोन जन्मांचे वर्णन मी विस्ताराने करतो. तू लक्षपूर्वक ऐक.
श्रीहरींचे जय व विजय नावाचे दोन प्रिय द्वारपाल आहेत. त्यांना सर्वजण जाणतात. ॥ २
॥
बिप्र श्राप तें दूनउ
भाई । तामस असुर देह तिन्ह पाई ॥
कनककसिपु अरु हाटकलोचन
। जगत बिदित सुरपति मद मोचन ॥
त्या दोन भावांना
सनकादिकांच्या शापाने असुरांचे तामसी देह मिळाले. एकाचे नाव होते हिरण्यकशिपु आणि
दुसर्याचे हिरण्याक्ष. त्यांनी इंद्राची गुर्मी उतरविली होती, हे सर्व जगाला ठाऊक
आहे. ॥ ३ ॥
बिजई समर बीर बिख्याता
। धरि बराह बपु एक निपाता ॥
होइ नरहरि दूसरा पुनि
मारा । जन प्रहलाद सुजस बिस्तारा ॥
युद्धामध्ये विजय
मिळविणारे ते विख्यात वीर होते. यांपैकी हिरण्याक्षाला भगवंतानी वराहाचे शरीर धारण
करुन मारले. नंतर हिरण्यकशिपूचा नरसिंह रुप धारण करुन वध केला आणि आपला भक्त
प्रल्हाद याची उत्तम कीर्ती पसरविली. ॥ ४ ॥
दोहा—भए निसाचर जाइ तेइ महाबीर बलवान ।
कुंभकरन रावन सुभट सुर बिजई जग जान ॥ १२२ ॥
पुढे ते ( दोघे ) देवांना जिंकणारे आणि बडे योद्धे असलेले
रावण आणि कुंभकर्ण नावाचे मोठे बलवान व महावीर राक्षस झाले. त्यांना संपूर्ण जग
जाणते. ॥ १२२ ॥
मुकुत न भए हते भगवाना । तीनि जनम द्विज बचन प्रवाना ॥
एक बार तिन्ह के हित लागी । धरेउ सरीर भगत अनुरागी ॥
भगवंतांकडून मारले गेल्यावरही ते दोघे ( हिरण्याक्ष व
हिरण्यकशिपू ) मुक्त झाले नाहीत. कारण ब्राह्मणांच्या शापाचा परिणाम तीन जन्मांचा
होता, म्हणून ते मुक्त झाले नाहीत. त्यांना तीन जन्म घ्यावे लागले. तेव्हा
भक्तप्रेमी भगवंतांनी त्यांच्या कल्याणासाठी पुन्हा एकदा अवतार घेतला. ॥ १ ॥
कस्यप आदिति तहाँ पितु माता । दसरथ कौसल्या बिख्याता ॥
एक कलप एहि बिधि अवतारा । चरित पवित्र किए संसारा ॥
त्या अवतारामध्ये कश्यप आणि अदिती हे त्यांचे माता-पिता
होते. तेच पुढे दशरथ व कौसल्या या नावाने प्रसिद्ध झाले. एका कल्पात अशाप्रकारे
त्यांनीं अवतार घेऊन जगामध्ये पवित्र लीला केल्या. ॥ २ ॥ २ ॥
एक कलप सुर देखि दुखारे । समर जलंधर सन सब हारे ॥
संभु कीन्ह संग्राम अपारा । दनुज महाबल मरइ न मारा ॥
एका कल्पात जलंधर दैत्याकडून पराजित झाल्यामुळे सर्व देव
दुःखी झालेले पाहून शिवांनी त्याच्याशी घनघोर युद्ध केले, परंतु तो महाबली दैत्य
मारुनही मरत नव्हता. ॥ ३ ॥
परम सती असुराधिप नारी । तेहिं बल ताहि न जितहिं पुरारी ॥
त्या दैत्यराजाची पत्नी मोठी पतिव्रता होती. तिच्या
प्रतापामुळे त्रिपुरासुरासारख्या अजेय शत्रूचा नाश करणारे शिवसुद्धा त्याला जिंकू
शकले नाहीत. ॥ ४ ॥
दोहा—छल करि टारेउ तासु ब्रत प्रभु सुर कारज कीन्ह ।
जब तेहिं जानेउ मरम तब श्राप कोप करि दीन्ह ॥ १२३ ॥
तेव्हा प्रभूने कपटाने तिच्या पातिव्रत्याचा भंग करुन
देवांचे काम फत्ते केले. जेव्हा तिला हे रहस्य सनजले, तेव्हा तिने रागाने
भगवंतांना शाप दिला. ॥ १२३ ॥
तासु श्राप हरि दीन्ह प्रमाना । कौतुकनिधि कृपाल भगवाना ॥
तहाँ जलंधर रावन भयऊ । रन हति राम परम पद दयऊ ॥
लीलाधर कृपाळू हरींनी त्या स्त्रीचा शाप प्रमाण मानून
स्वीकारला. तोच जलंधर त्या कल्पामध्ये रावण झाला. त्याला श्रीरामचंद्रांनी युद्धात
मारुन परमपद दिले. ॥ १ ॥
एक जनम कर कारन एहा । जेहि लगि राम धरी नरदेहा ॥
प्रति अवतार कथा प्रभु केरी । सुनु मुनि बरनी कबिन्ह घनेरी
॥
एका जन्माचे हे कारण होते. त्यासाठी श्रीरामांनी मनुष्यदेह
धारण केला. हे भरद्वाज मुनी, ऐका. प्रभूंच्या प्रत्येक अवताराची कथा कवींनी
नानाप्रकारे वर्णन केलेली आहे. ॥ २ ॥
नारद श्राप दीन्ह एक बारा । कलप एक तेहि लगि अवतारा ॥
गिरिजा चकित भईं सुनि बानी । नारद बिष्नुभगत पुनि ग्यानी ॥
एकदा नारदांनी शाप दिला,म्हणून त्यासाठी एका कल्पात
भगवंतांचा अवतार झाला. ‘ ही गोष्ट ऐकून पार्वती मोठी चकित झाली. ( आणि ती म्हणाली
) ‘ नारद तर विष्णुभक्त आणि ज्ञानी आहेत. ॥ ३ ॥
कारन कवन श्राप मुनि दीन्हा । का अपराध रमापति कीन्हा ॥
यह प्रसंग मोहि कहहु पुरारी । मुनि मन मोह आचरज भारी ॥
मग नारदमुनींनी भगवंतांना का शाप दिला ? लक्ष्मीपती
भगवंतांनी त्यांच काय अपराध केला होता ? हे नाथ ! ती कथा मला सांगा. नातदमुनींच्या
मनातही मोह उत्पन्न झाला, ही मोठी आश्र्चर्याची गोष्ट आहे. ‘ ॥ ४ ॥
दोहा—बोले बिहसि महेस तब ग्यानी मूढ न कोइ ।
जेहि जस रघुपति करहिं जब सो तस तेहि छन होइ ॥ १२४ ( क ) ॥
तेव्हा महादेव हसत-हसत म्हणाले, ‘ कोणी ज्ञानी नाही, आणि
मूर्खही नाही. श्रीरघुनाथ ज्याला जसे बनवितात, त्याक्षणी तो तसा बनतो. ‘ ॥ १२४ ( क
) ॥
सो—कहउँ राम गुन गाथा भरद्वाज सादर सुनहु ।
भव भंजन रघुनाथ भजु तुलसी तजि मान मद ॥ १२४ ( ख ) ॥
( याज्ञवल्क्य म्हणतात--) ‘ हे भरद्वाज, मी
श्रीरामचंद्रांच्या गुणांची कथा सांगतो, ती तुम्ही आदराने ऐका. ‘ तुलसीदास
म्हणतात, ‘ मान व मद सोडून जन्म-मृत्यूचा नाश करणार्या श्रीरामांना भजा. ‘ ॥ १२४
( ख ) ॥
हिमगिरि गुहा एक अति पावनि । बह समीप सुरसरी सुहावनि ॥
आश्रम परम पुनीत सुहावा । देखि देवरिषि मन अति भावा ॥
हिमालय पर्वतामध्ये एक मोठी पवित्र गुहा होती. तिच्या जवळून
सुंदर गंगा वाहात होती. तो परम पवित्र आश्रम पाहून नारदांच्या मनाला अतिशय आनंद
झाला. ॥ १ ॥
निरखि सैल सरि बिपिन बिभागा । भयउ रमापति पद अनुरागा ॥
सुमिरत हरिहि श्राप गति बाधी । सहज बिमल मन लागि समाधी ॥
पर्वत, नदी आणि वनाचे ( सुंदर ) विभाग पाहून नारदांना
लक्ष्मीकांत भगवंतांविषयी प्रेम वाटू लागले. भगवंतांचे स्मरण करताच त्यांच्या (
नारदांच्या ) शापाची गती ( दक्ष प्रजापतीने नारदांना शाप दिला होता, म्हणून ते एका
जागी थांबू शकत नव्हते. ) थांबली आणि त्यांचे मन स्वभावतःच निर्मळ असल्यामुळे
त्यांची समाधी लागली. ॥ २ ॥
मुनि गति देखि सुरेस डेराना । कामहि बोलि कीन्ह सनमाना ॥
सहित सहाय जाहु मम हेतू । चलेउ हरषि हियँ जलचरकेतू ॥
नारदांची स्थिती पाहून देवराज इंद्र घाबरला. त्याने
कामदेवाला बोलावून त्याचा आदर-सत्कार केला, ( आणि म्हटले ) ‘ माझ्या कल्याणासाठी
तू आपल्या साहाय्यकांसह ( नारदांची समाधी भंग करण्यास ) जा. ‘ ( हे ऐकून ) कामदेव
मनात प्रसन्न होऊन निघाला. ॥ ३ ॥
सुनासीर मन महुँ असि त्रासा । चहत देवरिषि मम पुर बासा ॥
जे कामी लोलुप जग माहीं । कुटिल काक इव सबहि डेराहीं ॥
इंद्राच्या मनात भीती वाटत होती की, देवर्षी नारदांना
माझ्या पुरी ( अमरावती ) चे राज्य हवे आहे. जगामध्ये जे कामी व लोभी असतात, ते
दुष्ट कावळ्याप्रमाणे सर्वांना घाबरतात. ॥ ४ ॥
दोहा—सूख हाड लै भाग सठ स्वान निरखि मृगराज ।
छीनि लेइ जनि जान तिमि सुरपतिहि न लाज ॥ १२५ ॥
ज्याप्रमाणे मूर्ख कुत्रा सिंहाला पाहून वाळलेले हाड तोंडात
धरुन पळत सुटतो. त्या मूर्खाला वाटते की, आपले हाडूक सिंह पळवून नेईल, त्याप्रमाणे
इंद्राला ( नारद आपले राज्य हिरावून घेतील, असा विचार करताना ) लाज वाटली नाही. ॥
१ ॥
तेहि आश्रमहिं मदन जब गयऊ । निज मायाँ बसंत निरमयऊ ॥
कुसुमित बिबिध बिटप बहुरंगा । कूजहिं कोकिल गुंजहिं भृंगा ॥
जेव्हा कामदेव त्या आश्रमात गेला, तेव्हा त्याने आपल्या मायेने
तेथे वसंतऋतू उत्पन्न केला. त्यामुळे नानातर्हेच्या वृक्षांवर रंगीबेरंगी फुले
उमलली. त्यांच्यावर बसून कोकिळा कुहूकुहू करु लागल्या आणि भ्रमर गुंजारव करु
लागले. ॥ १ ॥
चली सुहावनि त्रिबिध बयारी । काम कृसानु बढावनिहारी ॥
रंभादिक सुरनारि नबीना । सकल असमसर कला प्रबीना ॥
कामाग्नी भडकाविणार्या तीन प्रकारच्या ( शीतल, मंद व
सुगंधी ) हवेच्या लहरी वाहू लागल्या. रंभा इत्यादी कामकलेमध्ये निपुण असलेल्या सर्व
नवयौवना देवांगना-॥ २ ॥
करहिं गान बहु तान तरंगा । बहुबिधि क्रीडहिं पानि पतंगा ॥
देखि सहाय मदन हरषाना । कीन्हेसि पुनि प्रपंच बिधि नाना ॥
अनेक प्रकारच्या ताना घेत गाऊ लागल्या आणि हातात चेंडू घेऊन
नाना प्रकारचे खेळ खेळू लागल्या. कामदेव आपल्या या साहाय्यकांना पाहून प्रसन्न
झाला आणि त्याने नाना प्रकारचे मायाजाल पसरले. ॥ ३ ॥
काम कल कछु मुनिहि न ब्यापी । निज भयँ डरेउ मनोभव पापी ॥
सीम कि चाँपि सकइ कोउ तासू । बड रखवार रमापति जासू ॥
परंतु कामदेवाची कोणतीही कला मुनींवर प्रभाव टाकू
शकली नाही. तेव्हा तो पापी कामदेव स्वतःच्या
नाशाच्या भीतीने घाबरुन गेला. लक्ष्मीपती भगवंत ज्याचे रक्षक असतील त्याची धर्ममर्यादा कोण भंग करु शकेल बरे ? ॥ ४ ॥

Custom Search
No comments:
Post a Comment