Monday, February 22, 2021

AyodhyaKanda Dwitiy Sopan Part 6 अयोध्याकाण्ड द्वितीयसोपान भाग ६

 

AyodhyaKanda Dwitiy Sopan Part 6 
Doha 29 to 34 
अयोध्याकाण्ड द्वितीयसोपान भाग ६ 
दोहा २९ ते ३४

दोहा—कवनें अवसर का भयउ गयउँ नारि बिस्वास ।

जोग सिद्धि फल समय जिमि जतिहि अबिद्या नाम ॥ २९ ॥

कोणत्या क्षणी काय झाले ! ज्याप्रमाणे योगाच्या सिद्धीचे फळ मिलताना अविद्या योग्याला नष्ट करते, त्याप्रमाणे स्त्रीवर विश्वास ठेवून मी ठार झालो.’ ॥ २९ ॥

एहि बिधि राउ मनहिं मन झॉंखा । देखि कुभॉंति कुमति मन माखा ॥

भरतु कि राउर पूत न होंही । आनेहु मोल बेसाहि कि मोही ॥

अशा प्रकारे राजा मनातल्या मनात कुढत होते. राजांची ती दुर्दशा पाहून दुष्ट कैकेयी मनातून क्रुद्ध झाली व म्हणाली, ‘ भरत तुमचा पुत्र नाही काय ? तुम्ही मला पैसे देऊन विकत घेतले होते काय ? मी तुमची लग्नाची बायको नाही काय ? ॥ १ ॥

जो सुनि सरु अस लाग तुम्हारें । काहे न बोलहु बचनु सँभारें ॥

देहु उतरु अनु करहु कि नाहीं । सत्यसंघ तुम्ह रघुकुल माहीं ॥

माझे बोलणे ऐकताच जणू तुम्हांला बाण लागल्यागत झाले, तर तुम्ही विचार करुन का बोलला नाहीत ? बोला. होय म्हणा, नाहीतर नाही म्हणा, तुम्ही रघुवंशामध्ये सत्य प्रतिज्ञा करणारे म्हणून प्रसिद्ध आहात. ॥ २ ॥

देन कहेहु अब जनि बरु देहू । तजहु सत्य जग अपजसु लेहू ॥

सत्य सराहि कहेहु बरु देना । जानेहु लेइहि मागि चबेना ॥

तुम्ही वर देतो, असे म्हणाला होता. आता हवे तर नाही म्हणा. सत्याला सोडचिठ्ठी द्या आणि जगात अपकीर्ती मिळवा. सत्याची मोठी वाखाणणी करीत वर देतो, असे म्हणाला होता. मी चणेफुटाणे मागीन, असे तुम्हांला वाटले होते काय ? ॥ ३ ॥

सिबि दधीचि बलि जो कछु भाषा । तनु धनु तजेउ बचन पनु राखा ॥

अति कटु बचन कहति कैकेई । मानहुँ लोन जरे पर देई ॥

शिबी, दधीची आणि बली यांनी जे म्हटले ते त्यांनी शरीर व संपदा यांचा त्याग करुन पूर्ण केले.’ अशाप्रकारे जखमेवर मीठ चोळल्याप्रमाणे कैकेयी अत्यंत कटू शब्द बोलत होती. ॥ ४ ॥

दोहा—धरम धुरंधर धीर धरि नयन उघारे रायँ ।

सिरु धुनि लीन्हि उसास असि मारेसि मोहि कुठायँ ॥ ३० ॥

धर्मधुरंधर राजा दशरथांनी मोठ्या धैर्याने डोळे उघडले. डोले बडवून विलाप करीत आणि जोराने सुस्कारे टाकीत ते म्हणाले की, ‘ हिने माझ्या वर्मावर घाव घातला. यातून वाचणे कठीण आहे.’ ॥ ३० ॥

आगें दीखि जरत रिस भारी । मनहुँ रोष तरवारि उघारी ॥

मूठि कुबुद्धि धार निठुराई । धरी कूबरीं सान बनाई ॥

जणू क्रोधरुपी नंगी तलवार उभी असावी, तशी प्रचंड क्रोधाने पेटलेली ती समोर दिसली. कुबुद्धी ही त्या तलवारीची मूठ होती, निष्ठुरता धार होती आणि त्या कुबड्या मंथरारुपी निशाण्यावर घासून ती तीक्ष्ण बनली होती. ॥ १ ॥

लखी महीप कराल कठोरा । सत्य कि जीवनु लेइहि मोरा ॥

बोले राउ कठिन करि छाती । बानी सबिनय तासु सोहाती ॥

राजांनी पाहिले की, ही तलवार फारच भयानक आणि कठोर आहे. ते विचार करु लागले की, खरेच ही माझा जीव घेईल काय ? त्यांनी आपले मन घट्ट करुन, अत्यंत नम्रपणे कैकेयीला गोड वाटेल अशा वाणीने म्हटले, ॥ २ ॥

प्रिय बचन कस कहसि कुभॉंती । भीर प्रतीति प्रीति करि हॉंती ॥

मोरें भरतु रामु दुइ आँखी । सत्य कहउँ करि संकरु साखी ॥

‘ हे प्रिये, हे भीरु, विश्वास व प्रेम नष्ट करुन तू अशी दुष्ट वचने का बोलतेस ? भरत व राम हे दोघे माझे दोन डोळे आहेत, हे शंकरांच्या साक्षीने मी सत्य सांगतो. ॥ ३ ॥

अवसि दूतु मैं पठइब प्राता । ऐहहिं बेगि सुनत दोउ भ्राता ॥

सुदिन सोधि सबु साज सजाई । देउँ भरत कहुँ राजु बजाई ॥

मी उद्या सकाळीच नक्की दूत पाठवितो. भरत व शत्रुघ्न हे दोघे भाऊ निरोप मिळताच लगेच येतील. चांगला दिवस शोधून मी सर्व तयारी करुन, नगारे वाजवून भरताला राज्य देईन. ॥ ४ ॥

दोहा—लोभु न रामहि राजु कर बहुत भरत पर प्रीति ।

मैं बड़ छोट बिचारि जियँ करत रहेउँ नृपनीति ॥ ३१ ॥

रामाला राज्याचा लोभ नाही आणि भरतावर त्याचे फार प्रेम आहे. मीच माझ्या मनाने लहान-मोठ्याचा विचार करुन राजनीतीला अनुसरुन थोरल्याला राजतिलक करायला निघालो होतो. ॥ ३१ ॥

राम सपथ सत कहउँ सुभाऊ । राममातु कछु कहेउ न काऊ ॥

मैं सबु कीन्ह तोहि बिनु पूँछें । तेहि तें परेउ मनोरथ छूछें ॥

मी श्रीरामाची शंभर वेळा शपथ घेऊन प्रामाणिकपणे सांगतो की, या बाबतीत कौसल्येने मला काहीही सांगितले नव्हते. मी तुला न विचारता सर्व केले, हे खरे. त्यामुळेच माझे मनोरथ व्यर्थ ठरले. ॥ १ ॥

रिस परिहरु अब मंगल साजू । कछु दिन गएँ भरत जुबराजू ॥

एकहि बात मोहि दुखु लागा । बर दूसर असमंजस मागा ॥

आता राग सोडून दे आणि मंगल शृंगार कर. लवकरच भरत युवराज होईल. तू दुसरा जो वर मागितलास तो अडचणीचा आहे. त्याचे मला दुःख वाटत आहे. ॥ २ ॥

अजहूँ हृदय जरत तेहि आँचा । रिस परिहास कि साँचेहुँ साँचा ॥

कहु तजि रोषु राम अपराधू । सबु कोउ कहइ रामु सुठि साधू ॥

त्याच्या धगीमुळे माझे हृदय जळत आहे. हे तू थट्टेने, रागाने की खरोखरच म्हणत आहेस ? हा राग सोडून रामाचा काय अपराध आहे, ते तरी सांग. सर्वजण म्हणतात की, राम हा फार साधुवृत्तीचा आहे. ॥ ३ ॥

तुहूँ सराहसि करसि सनेहू । अब सुनि मोहि भयउ संदेहू ॥

जासु सुभाउ अरिहि अनुकूला । सो किमि करिहि मातु प्रतिकूला ॥

तू स्वतःसुद्धा रामाची प्रशंसा करीत होतीस आणि त्याच्यावर प्रेम करीत होतीस. आता मात्र हे ऐकून मला संशय वाटू लागला आहे. ज्याचा स्वभाव शत्रूलासुद्धा अनुकूल वाटतो, तो मातेला प्रतिकूल असे आचरण का करील ? ॥ ४ ॥

दोहा—प्रिया हास रिस परिहरहि मागु बिचारि बिबेकु ।

जेहिं देखौं अब नयन भरि भरत राज अभिषेकु ॥ ३२ ॥

हे प्रिये, हा जीवघेणा विनोद व क्रोध सोडून दे आणि विवेकयुक्त विचार करुन वर माग. आता मला डोळे भरुन भरताचा राज्याभिषेक पाहू दे. ॥ ३२ ॥

जिऐ मीन बरु बारि बिहीना । मनि बिनु फनिकु जिऐ दुख दीना ॥

कहउँ सुभाउ न छलु मन माहीं । जीवनु मोर राम बिनु नाहीं ॥

कदाचित मासोळी पाण्याविना जिवंत राहील आणि साप मण्याविना दीनवाणा बनून जिवंत राहील, परंतु मी प्रामाणिकपणे सांगतो, मनात कोणतेहि कपट न ठेवता सांगतो कि माझे जीवन रामाविना नाही. ॥ १ ॥

समुझि देखु जियँ प्रिया प्रबीना । जीवनु राम दरस आधीना ॥

सुनि मृदु बचन कुमति अति जरई । मनहुँ अनल आहुति घृत परई ॥

हे चतुर प्रिये, मनापासून समजून घे. माझे जीवन श्रीरामाच्या दर्शनावर अवलंबून आहे. ‘ राजांचे हे कोमल वचन ऐकून दुर्बुद्धी कैकेयी अत्यंत जळफळत होती. जणू अग्निमध्ये तुपाच्या आहुती पडत होत्या. ॥ २ ॥

कहइ करहु किन कोटि उपाया । इहॉं  न लागिहि राउरि माया ॥

देहु कि लेहु अजसु करि नाहीं । मोहि न बहुत प्रपंच सोहाहीं ॥

कैकेती म्हणाली की, ‘ तुम्ही कोटी उपाय कराना का, येथे तुमचा कावेबाजपणा चालणार नाही. एक तर मी मागितले आहे ते द्या किंवा नाही म्हणून अपकीर्ती घ्या. मला उगीच भांडणतंटा आवडत नाही. ॥ ३ ॥

रामु साधु तुम्ह साधु सयाने । राममातु भलि सब पहिचाने ॥

जस कौसिलॉं मोर भल ताका । तस फलु उन्हहि देउँ करि साका ॥

राम हा साधु आहे, तुम्ही ज्ञानी साधु आहात आणि रामाची आईसुद्धा कमी साधु नाही. मी सर्वांना चांगली ओळखून आहे. कौसल्येने माझे भले होण्याची इच्छा धरली होती. आता मी सुद्धा तिला आठवण राहील असे फळ देईन. ॥ ४ ॥

दोहा—होत प्रातु मुनिबेष धरि जौं न रामु बन जाहिं ।

मोर मरनु राउर अजस नृप समुझिअ मन माहिं ॥ ३३ ॥

सकाळ होताच मुनीचा वेष धारण करुन जर राम वनास गेला नाही, तर हे राजा, पक्के लक्षात ठेवा की, माझा मृत्यू होईल व तुमची अपकीर्ती .’ ॥ ३३ ॥

अस कहि कुटिल भई उठि ठाढ़ी । मानहुँ रोष तरंगिनि बाढ़ी ॥

पाप पहार प्रगट भइ सोई । भरी क्रोध जल जाइ न जोई ॥

असे म्हणून कुटिल कैकेयी उठून उभी राहिली. जणू क्रोधाची नदी उफाळून आली असावी. ती पापाच्या पहाडातून निघाली होती आणि क्रोधरुपी भयंकर पाण्याने भरलेली होती. त्यामुळे तिच्याकडे पाहावत नव्हते. ॥ १ ॥

दोउ बर कूल कठिन हठ धारा । भवँर कूबरी बचन प्रचारा ॥

ढाहत भूपरुप तरु मूला । चली बिपति बारिधि अनुकूला ॥

दोन वर हे त्या नदीचे दोन तट होते, कैकेयीचा हट्ट तिचा प्रचंड प्रवाह होता आणि कुबडीचे सांगणे त्यामधील भोवरे होते. ती क्रोधाची नदी राजा दशरथरुपी वृक्षाला मुळासह उपटून विपत्तिरुपी समुद्राकडे धावत होती. ॥ २ ॥

लखी नरेस बात फुरि सॉंची । तिय मिस मीचु सीस पर नाची ॥

गहि पद बिनय कीन्ह बैठारी । जनि दिनकर कुल होसि कुठारी ॥

राजांनी जाणले की, हे सर्व सत्य आहे. स्त्रीच्या निमित्ताने माझा मृत्युच  माझ्या शिरावर नाचत आहे. राजांनी कैकेयीचे पाय धरुन तिला बसविले आणि विनंती केली की, ‘ तू सूर्यकुलरुपी वृक्षासाठी कुर्‍हाड बनू नकोस. ॥ ३ ॥

मागु माथ अबहीं देउँ तोही । राम बिरहँ जनि मारसि मोही ॥

राखु राम कहुँ जेहि तेहि भॉंती । नाहिं त जरिहि जनम भरि छाती ॥

तू माझे मस्तक माग, मी ते आत्ता उतरुन देतो, परंतु रामाच्या विरहाने मला मारु नकोस. कसेही करुन तू रामाला ठेवून घे. नाहीतर जन्मभर तुझे हृदय जळत राहील. ‘ ॥ ४ ॥

दोहा—देखी ब्याधि असाध नृपु परेउ धरनि धुनि माथ ।

कहत परम आरत बचन राम राम रघुनाथ ॥ ३४ ॥

राजांनी पाहिले की, रोग असाध्य आहे, तेव्हा ते अत्यंत आर्तवाणीने ‘ हाय राम, हाय राम, हाय रघुनाथ ‘ असे म्हणत व डोके आपटून घेत जमिनीवर कोसळले. ॥ ३४ ॥

ब्याकुल राउ सिथिल सब गाता । करिनि कलपतरु मनहुँ निपाता ॥

कंठु सूख मुख आव न बानी । जनु पाठिनु दीन बिनु पानी ॥

राजा व्याकुळ झाले होते. त्यांच्या संपूर्ण शरीरातील त्राणच गेले होते. हत्तिणीने जणू कल्पवृक्ष उपटून टाकला होता. कंठ सुकून गेला होता, तोंडातून शब्द निघत नव्हता, जणू पाण्याविना पहिना नावाची मासोळी तडफडत होती. ॥ १ ॥

पुनि कह कटु कठोर कैकेई । मनहुँ घाय महुँ माहुर देई ॥

जौं अंतहुँ अस करतबु रहेऊ । मागु मागु तुम्ह केहिं बल कहेऊ ॥

कैकेयी पुन्हा कटु व कठोर बोलली. जणू जखमेवर विष चोळत होती. ती म्हणाली, ‘ शेवटी जर असे करायचे होते, तर तुम्ही कोणत्या जोरावर ‘ माग, माग, ‘ असे म्हणत होता ? ॥ २ ॥

दुइ कि होइ एक समय भुआला । हँसब ठठाइ फुलाउब गाला ॥

दानि कहाउब अरु कृपनाई । होइ कि खेम कुसल रौताई ॥

हे राजा खदखदून हसणे आणि गाल फुगविणे या दोन्ही गोष्टी एकाच वेळी होतात काय ? दानीही म्हणवायचे आणि कंजूषपणाही करायचा. राजपूतपणात खुशाली कधी असते काय ? लढाईत बहादुरी दाखवावी आणि कुठे प्रहारही लागायचा नाही, असे कसे घडेल ? ॥ ३ ॥

छाड़हु बचनु कि धीरजु धरहू । जनि अबला जिमि करुना करहू ॥

तनु तिय तनय धामु धनु धरनी । सत्यसंघ कहुँ तृन सम बरनी ॥

एक तर प्रतिज्ञा सोडून द्या किंवा धीर धरा. असे

 अबलेप्रमाणे रडत व डोके आपटत बसू नका. सत्यव्रती

 पुरुषाला शरीर, स्त्री, पुत्र, घर, धन आणि पृथ्वी हे सर्व

 गवताच्या काडीप्रमाणे तुच्छ आहे, असे म्हटले जाते.’ ॥

 ४ ॥



Custom Search

No comments: