Friday, February 19, 2021

Shri RamCharitManas Part 79 श्रीरामचरितमानस भाग ७९

 

Shri RamCharitManas Part 79 
Doha 354 to 356 
श्रीरामचरितमानस भाग ७९ 
दोहा ३५४ ते ३५६ 
श्रीरामचरितमानस बालकाण्ड

दोहा—सुतन्ह समेत नहाइ नृप बोलि बिप्र गुर ग्यानि ।

भोजन कीन्ह अनेक बिधि घरी पंच गइ राति ॥ ३५४ ॥

नंतर राजांनी व मुलांनी स्नान केले. राजांनी ब्राह्मण, गुरु व कुटुंबीयांना बोलावून त्यांच्यासह अनेक प्रकारचे भोजन केले. इतके होई तो पर्यंत पाच घटिका रात्र झाली. ॥ ३५४ ॥

मंगलगान करहिं बर भामिनि । भै सुखमूल मनोहर जामिनि ॥

अँचइ पान सब कॉंहू पाए । स्त्रग सुगंध भूषित छबि छाए ॥

सुंदर स्त्रिया मंगलगान करीत होत्या. ती रात्र सुखाची आणि मनोहारक ठरली. सर्वांनी आचमन करुन पान-विडा घेतला. फुलांच्या माळा, सुगंधी द्रव्ये इत्यादींनी विभूषित झालेले सर्वजण शोभून दिसत होते. ॥ १ ॥

रामहि देखि रजायसु पाई । निज निज भवन चले सिर नाई ॥

प्रेम प्रमोदु बिनोदु बड़ाई । समउ समाजु मनोहरताई ॥

श्रीरामचंद्रांना पाहून व त्यांची आज्ञा घेऊन व त्यांना नमस्कार करुन सर्वजण आपापल्या घरी गेले. तेथील प्रेम, आनंद, विनोद, महत्त्व, वेळ, समुदाय आणि मनोहरता ॥ २ ॥

कहि न सकहिं सत सारद सेसू । बेद बिरंचि महेस गनेसू ॥

सो मैं कहौं कवन बिधि बरनी । भूमिनागु सिर धरइ कि धरनी ॥

हे सर्व सरस्वती, शेष, वेद, ब्रह्मदेव, महादेव आणि गजानन हे सुद्धा सांगू शकणार नाहीत. मग मी ते कसें वर्णन करुन सांगणार बरे ? गांडूळ कधी पृथ्वीला शिरावर घेईल काय ? ॥ ३ ॥

नृप सब भांति सबहि सनमानी । कहि मृदु बचन बोलईं रानी ॥

बधू लरिकनीं पर घर आईं । राखेहु नयन पलक की नाईं ॥

राजांनी सर्वांचा सर्व प्रकारे सन्मान करुन, गोड बोलून राण्यांना बोलावले आणि सांगितले की, सुना अजुनी लहान आहेत, परक्या घरी आल्या आहेत. डोळ्यांची काळजी पापण्या घेतात, त्याप्रमाणे त्यांची काळजी घ्या, ॥ ४ ॥

 

दोहा—लरिका श्रमित उनीद बस सयन करावहु जाइ ।

अस कहि गे बिश्रामगृहँ राम चरन चितु लाइ ॥ ३५५ ॥

मुले थकून गेली आहेत. त्यांना झोपेने घेरले आहे. त्यांना नेऊन झोपवा. ‘ असे म्हणून राजा श्रीरामांच्या चरणी मन लावून आपल्या विश्रामस्थानी गेले. ॥ ३५५ ॥

भूप बचन सुनि सहज सुहाए । जरित कनक मनि पलँग डसाए ।

सुभग सुरभि पय फेन समाना । कोमल कलित सुपेतीं नाना ॥

राजांचे स्वभावतः सुंदर वचन ऐकून राण्यांनी रत्नजडित सुवर्णाचे पलंग घातले. गाद्यांवर गाईच्या दुधाच्या फेसाप्रमाणे सुंदर, कोमल व शुभ्र पलंगपोस घातले. ॥ १ ॥

उपबरहन बर बरनि न जाहीं । स्त्रग सुगंध मनिमंदिर माहीं ॥

रतनदीप सुठि चारु चँदोवा । कहत न बनइ जान जेहिं जोवा ॥

सुंदर उश्यांचे तर वर्णन करता येणार नाही. रत्नजडित मंदिरांना फुलांच्या माळा व सुगंधित द्रव्यांनी सजविले होते. सुंदर रत्न-दीप व चांदवे यांची शोभा सांगवत नव्हती. ज्याने पाहिले असेल, त्यालाच ती कळेल. ॥ २ ॥

सेज रुचिर रचि रामु उठाए । प्रेम समेत पलँग पौढ़ाए ॥

अग्या पुनि पुनि भाइन्ह दीन्ही । निज निज सेज सयन तिन्ह कीन्ही ॥

अशा प्रकारे सुंदर शय्या सजविल्यावर मातांनी श्रीरामांना उचलून मोठ्या प्रेमाने पलमगावर झोपविले. श्रीरामांनी भावांना वारंवार आज्ञा केली, तेव्हा तेही आपापल्या शय्येवर झोपले. ॥ ३ ॥

देखि स्याम मृदु मंजुल गाता । कहहिं सप्रेम बचन सब माता ॥

मारग जात भयावनि भारी । केहि बिधि तात ताड़का मारी ॥

श्रीरामांचे सावळे-सुंदर व कोमल अवयव पाहून सर्व माता प्रेमाने म्हणू लागल्या, ‘ हे लाडक्या, जाताना वाटेत तुम्ही भयंकर ताडका राक्षसीला कसे मारले ? ॥ ४ ॥

दोहा—घोर निसाचर बिकट भट समर गनहिं नहिं काहु ॥

मारे सहित सहाय किमि खल मारीच सुबाहु ॥ ३५६ ॥

जे युद्धात कोणालाही जुमानत नसत, त्या महान योद्धे असलेल्या मारीच व सुबाहू या भयंकर दुष्ट राक्षसांना व त्यांच्या अनुयायांना तुम्ही कसे बरे मारले ? ॥ ३५६ ॥

मुनि प्रसाद बलि तात तुम्हारी । ईस अनेक करवरें टारी ॥

मख रखवारी करि दुहुँ भाईं । गुरु प्रसाद सब बिद्या पाईं ॥

हे बाळांनो ! इडा-पीडा टळो. मुनींच्या कृपेमुळेच ईश्र्वराने तुमच्यावरील कित्येक संकटे दूर केली. दोघा भावांनी यज्ञाचे रक्षण करुन गुरुंच्या कृपेने सर्व विद्या मिळविल्या. ॥ १ ॥

मुनितिय तरी लगत पग धूरी । कीरति रही भुवन भरि पूरी ॥

कमठ पीठि पबि कूट कठोरा । नृप समाज महुँ सिव धनु तोरा ॥

चरणांच्या धुळीचा स्पर्श होताच मुनि-पत्नी अहल्या तरुन गेली. जगभरात ही कीर्ती सर्वत्र पसरलेली आहे. कासवाची पाठ, वज्र व पर्वत यांच्याहून कठोर शिव-धनुष्य तुम्ही सर्व राजांच्या समोर मोडून टाकले. ॥ २ ॥

बिस्व बिजय जसु जानकि पाई । आए भवन ब्याहि सब भाई ॥

सकल अमानुष करम तुम्हारे । केवल कौसिक कृपॉं सुधारे ॥

विश्र्व-विजयी कीर्ती आणि जानकी मिळविली आणि सर्व भावांचा विवाह करुन त्यांना घेऊन घरी आलात. तुमची सर्व कृत्ये अलौकिक आहेत. ती केवळ विश्र्वामित्रांच्या कृपेने पूर्ण झाली. ॥ ३ ॥

आजु सुफल जग जनमु हमारा । देखि तात बिधुबदन तुम्हारा ॥

जे दिन गए तुम्हहि बिनु देखें । ते बिरंचि जनि पारहिं लेखें ॥

हे लाडक्यांनो ! तुमचे चंद्रमुख पाहून आज आम्ही जगात

 जन्म घेतल्याचे सार्थक झाले. तुम्हांला न पाहता जे

 दिवस गेले, ते ब्रह्मदेवांनी आमच्या आयुष्यात धरु नयेत. ‘

 ॥ ४ ॥



Custom Search

No comments: