AyodhyaKanda Dwitiy Sopan Part 2
दोहा—कहेउ भूप मुनिराज कर जोइ आयसु होइ ।
राम राज अभिषेक हित बेगि करहु सोइ सोइ ॥ ५ ॥
महाराज म्हणाले, ‘ श्रीरामचंद्रांच्या
राज्याभिषेकासाठी मुनिराज वसिष्ठांची जी जी आज्ञा असेल, ती सर्व तुम्ही त्वरित
पूर्ण करा. ‘ ॥ ५ ॥
हरषि मुनीस कहेउ मृदु बानी । आनहु सकल सुतीरथ
पानी ॥
औषध मूल फूल फल पाना । कहे नाम गनि मंगल नाना ॥
मुनिराजांनी आनंदाने व कोमल वाणीने सांगितले
की, ‘ सर्व श्रेष्ठ तीर्थांचे जल आणा. ‘ मग त्यांनी औषधे, मुळे, फुले, पाने
इत्यादी मांगलिक वस्तूंची नावे सांगितली. ॥ १ ॥
चामर चरम बसन बहु भॉंती । रोम पाट पट अगनित जाती
॥
मनिगन मंगल बस्तु अनेका । जो जग जोगु भूप अभिषेका
॥
चवर्या, मृगचर्म, अनेक प्रकारची वस्त्रे,
असंख्य प्रकारची लोकरी व रेशमी वस्त्रे, रत्ने आणि राज्याभिषेकासाठी आवश्यक असणार्या
बर्याच वस्तू मागविण्याची आज्ञा दिली. ॥ २ ॥
बेद बिदित कहि सकल बिधाना । कहेउ रचहु पुर बिबिध
बिताना ॥
सफल रसाल पूगफल केरा । रोपहु बीथिन्ह पुर चहुँ
फेरा ॥
मुनींनी वेदांमध्ये सांगितलेले सर्व विधान
त्यांना सांगितले, ‘ नगरात अनेक मंडप सजवा. फळांसह असलेले आंबे, सुपारी व केळींचे
वृक्ष नगरातील गल्ल्यांतून चोहीकडे लावा. ॥ ३ ॥
रचहु मंजु मनि चौकें चारु । कहहु बनावन बेगि
बजारु ॥
पूजहु गनपति गुर कुदेवा । सब बिधि करहु भूमिसुर
सेवा ॥
सुंदर रत्नांच्या मनोहर रांगोळ्या काढा.
बाजार लगोलग सजविण्यास सांगा. श्रीगणेश, गुरु व कुलदेवता यांची पूजा करा व
ब्राह्मणांचा सर्व प्रकारे सन्मान करा. ॥ ४ ॥
दोहा—ध्वज पताक तोरन कलस सजहु तुरग रथ नाग ।
सिर धरि मुनिबर बचन सबु निज निज काजहिं लाग ॥ ६ ॥
ध्वज, पताका, तोरणे, कलश, घोडे, रथ व हत्ती
हे सर्व सज्ज करा. ‘ मुनिश्रेष्ठ वसिष्ठांचे सांगणे शिरोधार्य मानून सर्वजण कामाला
लागले. ॥ ६ ॥
जो मुनीस जेहि आयसु दीन्हा । सो तेहिं काजु प्रथम
जनु कीन्हा ॥
बिप्र साधु सुर पूजत राजा । करत राम हित मंगल
काजा ॥
मुनीश्र्वरांनी ज्याला जे काम सांगितले ते
त्याने इतके पटापट केले की, जणू ते त्याने पूर्वीच करुन ठेवले होते. ब्राह्मण,
साधू व देव यांची पूजा राजा दशरथ करु लागले आणि श्रीरामचंद्रांच्यासाठी मंगल
कार्ये करु लागले. ॥ १ ॥
सुनत राम अभिषेक सुहावा । बाज गहागह अवध बधावा ॥
राम सीय तन सगुन जनाए । फरकहिं मंगल अंग सुहाए ॥
श्रीरामचंद्रांच्या राज्याभिशजेकाची
शुभवार्ता ऐकताच अयोध्येमध्ये मोठ्या उत्साहाने वाद्ये वाजू लागली. श्रीरामचंद्र
आणि सीता यांच्या अंगांवर शुभ शकुन दिसू लागले. त्यांचे सुंदर मंगल अवयव स्फुरु
लागले. ॥ २ ॥
पुलकि सप्रेम परसपर कहहिं । भरत आगमनु सूचक अहहीं
॥
भए बहुत दिन अति अवसेरी । सगुन प्रतीति भेंट
प्रिय केरी ॥
पुलकित होऊन दोघे मोठ्या प्रेमाने परस्पर
म्हणू लागले की, ‘ भरत मामाच्या गावी गेला आहे, तो परत येण्याचे हे शुभ शकुन आहेत.
बरेच दिवस झाले, भेटण्याची इच्छा वारंवार मनात येते. शकुनामुळे प्रिय व्यक्तीच्या
भेटीचा विश्र्वास वाटू लागतो. ॥ ३ ॥
भरत सरिस प्रिय को जग माहीं । इहइ सगुन फलु दूसर
नाहीं ॥
रामहि बंधु सोच दिन राती । अंडन्हि कमठ हृदउ जेहि
भॉंती ॥
आणि जगात भरताशिवाय आम्हांला कोण प्रिय आहे ?
शकुनाचे हे फल असणार, दुसरे नाही. ‘ श्रीरामचंद्रांच्या मनात आपल्या भरत बमधूचाच
विचार रात्रंदिवस असे. ज्याप्रमाणे कासवीचे मन अंड्यात गुंतलेले असते. ॥ ४ ॥
ShriRamCharitManas
AyodhyaKanda
Doha 7 and 8
दोहा—एहि अवसर मंगलु परम सुनि रहँसेउ रनिवासु ।
सोभत लखि बिधु बढ़त जनु बारिधि बिचि बिलासु ॥ ७ ॥
याच वेळी ही परम मंगल वार्ता ऐकून संपूर्ण
अंतःपुर आनंदित झाले, ज्याप्रमाणे चंद्र वाढत असल्याचे पाहून समुद्रामध्ये लहरींचा
विलास शोभून दिसू लागतो. ॥ ७ ॥
प्रथम जाइ जिन्ह बचन सुनाए । भूषन बसन भूरि तिन्ह
पाए ॥
प्रेम पुलकि तन मन अनुरागीं । मंगल कलस सजन सब
लागीं ॥
अंतःपुरात जाऊन ज्यांनी ही वार्ता सर्वात
प्रथम सांगितली, त्यांना पुष्कळशी वस्त्राभूषणे बक्षीस म्हणून मिळाली. राण्यांचे
शरीर प्रेमामुळे रोमांचित झाले आणि मन प्रेममग्न झाले. त्या सर्वजणी मंगल कलश सजवू
लागल्या. ॥ १ ॥
चौकें चारु सुमित्रॉं पूरी । मनिमय बिबिध भॉंति
अति रुरी ॥
आनँद मगन राम महतारी । दिए दान बहु बिप्र हँकारी
॥
सुमित्रेने रत्नांच्या अनेक अत्यंत सुंदर व
मनोहर रांगोळ्या काढल्या. आनंद-मग्न झालेल्या श्रीरामांच्या कौसल्या मातेने
ब्राह्मणांना बोलावून पुष्कळ दाने दिली. ॥ २ ॥
पूजीं ग्रामदेबि सुर नागा । कहेउ बहोरि देन
बलिभागा ॥
जेहि बिधि होइ राम कल्यानू । देहु दया करि सो
बरदानू ॥
तिने ग्रामदेवता, देव व नाग यांची पूजा केली
आणि नवस केले. तिने सर्वांना प्रार्थना केली की, ज्यायोगे श्रीरामांचे कल्याण
होईल, असे वरदान देण्याची कृपा करा. ॥ ३ ॥
गावहिं मंगल कोकिलबयनीं । बिधुबदनीं मृगसावकनयनीं
॥
कोकिळेसारख्या मधुर वाणीच्या, चंद्रमुखी व
बालमृगनयना स्त्रिया मंगलगान करु लागल्या. ॥ ४ ॥
दोहा—राम राज अभिषेकु सुनि हियँ हरषे नर नारि ।
लगे सुमंगल सजन सब बिधि अनुकूल बिचारि ॥ ८ ॥
श्रीरामचंद्रांच्या राज्याभिषेकाची वार्ता
ऐकून सर्व स्त्री-पुरुषांच्या हृदयात हर्ष झाला आणि विधाता आपणास अनुकूल आहे, असे
मानून ते सर्व सुंदर मंगल-वेषभूषा करु लागले. ॥ ८ ॥
तब नरनाहँ बसिष्ठु बोलाए । रामधाम सिख देन पठाए ॥
गुर आगमनु सुनत रगुनाथा । द्वार आइ पद नायउ माथा
॥
मग राजांनी वसिष्ठांना पाचारण केले आणि
समयोचित उपदेश करण्यासाठी श्रीरामचंद्रांच्या महालात पाठविले. गुरुंचे आगमन होत
आहे, असे ऐकताच श्रीरघुनाथांनी दरवाजावर येऊन त्यांच्या चरणी मस्तक ठेवले. ॥ १ ॥
सादर अरघ देइ घर आने । सोरह भॉंति पूजि सनमाने ॥
गहे चरन सिय सहित बहोरी । बोले रामु कमल कर जोरी
॥
आदराने अर्घ्य देऊन त्यांना आत नेले आणि
षोडशोपचारे पूजा करुन त्यांना सन्मानित केले. नंतर सीतेसह त्यांच्या पाया पडून
कर-कमल जोडून श्रीराम म्हणाले, ॥ २ ॥
सेवक सदन स्वामि आगमनू । मंगल मूल अमंगल दमनू ॥
तदपि उचित जनु बोलि सप्रीती । पठइअ काज नाथ असि
नीती ॥
‘ सेवकाच्या घरी स्वामींनी येणे, हे जरी
मांगल्याचे मूळ आहे आणि अमंगळाचा नाश करणारे आहे, तरी हे नाथ, या दासाला प्रेमाने
कामासाठी बोलाविले असते, तर ते योग्य झाले असते. नीती असेच सांगते. ॥ ३ ॥
प्रभुता तजि प्रभु कीन्ह सनेहू । भयउ पुनीत आजु
यहु गेहू ॥
आयसु होइ सो करौं गोसाईं । सेवकु लहइ स्वामि
सेवकाईं ॥
परंतु मोठेपणा विसरुन व स्वतः येऊन जो स्नेह
आपण प्रगट केला, त्यामुळे हे घर पवित्र झाले. गुरुमहाराज, आता जी आपली आज्ञा असेल,
त्याप्रमाणे करीन. स्वामींच्या सेवेमध्येच सेवकाचा लाभ असतो. ‘ ॥ ४ ॥
दोहा—सुनि सनेह
साने बचन मुनि रघुबरहि प्रसंस ।
राम कस न तुम्ह
कहहु अस हंस बंस अवतंस ॥ ९ ॥
श्रीरामांचे हे
प्रेमपूर्ण वचन ऐकून मुनी वसिष्ठांनी श्रीरघुनाथांची प्रशंसा करीत म्हटले, ‘ हे
राम, तुम्ही असे का बरे म्हणणार नाही ? कारण तुम्ही सूर्यवंशाचे भूषण आहात. ‘ ॥ ९
॥
बरनि राम गुन सील
सुभाऊ । बोले प्रेम पुलकि मुनिराऊ ॥
भूप सजेउ अभिषेक समाजू
। चाहत देन तुम्हहि जुबराजू ॥
श्रीरामचंद्रांचे
गुण, शील आणि स्वभाव यांची वाखाणणी करीत मुनिराज प्रेम-पुलकित होऊन म्हणाले, हे
राम दशरथांनी राज्याभिषेकाची तयारी केली आहे. तुम्हाला युवराजपद देण्याची त्यांची इच्छा
आहे ॥ १ ॥
राम करहु सब संजम
आजू । जौं बिधि कुसल निबाहै काजू ॥
गुरु सिख देइ राय
पहिं गयऊ । राम हृदयँ अस बिसमउ भयउ ॥
म्हणून हे राम,
आज विधिपूर्वक उपवास, हवन इत्यादी करुन संयमाने राहा. त्यामुळे विधाता यशस्वीपणे
हे कार्य पार पाडील.’ गुरुजी उपदेश करुन राजा दशरथजांच्याकडे गेले. श्रीरामांच्या
मनात हे ऐकून या गोष्टीचे आश्र्चर्य वाटले की, ॥ २ ॥
जनमे एक संग सब
भाई । भोजन सयन केलि लरिकाई ॥
करनबेध उपबीत
बिआहा । संग संग सब भए उछाहा ॥
‘ आम्ही सर्व
बंधू बरोबर जन्मलो, आमचे खाणे-पिणे, झोपणे, लहानपणीचे खेळ, कर्णवेधन, उपनयन आणि
विवाह ह्या सर्व गोष्टी बरोबरच झाल्या. ॥ ३ ॥
बिमल बंस यहु
अनुचित एकू । बंधु बिहाइ बड़ेहि अभिषेकु ॥
प्रभु सप्रेम
पछितानि सुहाई । हरउ भगत मन कै कुटिलाई ॥
परंतु या निर्मल
सूर्यवंशात हीच एक गोष्ट अनुचित वाटते की, सर्व भावांना सोडून मोठ्या भावालाच राज्याभिषेक
होतो.’ तुलसीदास म्हणतात की, प्रभू श्रीरामचंद्रांचा हा प्रेमळ पश्र्चाताप
भक्तांच्या चित्ताची कुटिलता हरण करो. ॥ ४ ॥
दोहा—तेहि अवसर
आए लखन मगन प्रेम आनंद ।
सनमाने प्रिय बचन
कहि रघुकुल कैरव चंद ॥ १० ॥
त्याचवेळी प्रेम
व आनंदात मग्न होऊन लक्ष्मण आला. रघुकुलरुपी कुमुदाला प्रफुल्ल करणारे चंद्र
श्रीराम यांनी प्रेमळ बोलून त्याचा सन्मान केला. ॥ १० ॥
बाजहिं बाजने
बिबिध बिधाना । पुर प्रमोदु नहिं जाइ बखाना ॥
भरत आगमनु सकल
मनावहिं । आवहुँ बेगि नयन फलु पावहिं ॥
पुष्कळ प्रकारची
वाद्ये वाजत होती. नगरातील आनंदाचे वर्णन करणे अशक्य. सर्व लोक भरताचे आगमन
व्हावे, अशी कामना करीत होते. ‘ ते सुद्धा लवकरच यावेत आणि राज्याभिषेकाचा उत्सव
पाहून त्यांनी डोळ्यांचे समाधान करुन घ्यावे.’ ॥ १ ॥
हाट बाट घर गलीं
अथाईं । कहहिं परसपर लोग लोगाईं ॥
कालि लगन भलि
केतिक बारा । पूजिहि बिधि अभिलाषु हमारा ॥
बाजार, रस्ते,
घरे, गल्ल्या आणि कट्ट्यांवर जिकडे-तिकडे स्त्री-पुरुष आपापसात म्हणत होते की,
विधाता आमची अभिलाषा पूर्ण करील तो शुभ मुहूर्त उद्या केव्हा आहे ? ॥ २ ॥
कनक सिंघासन सीय
समेता । बैठहिं रामु होइ चित चेता ॥
सकल कहहिं कब
होइहि काली । बिघन मनावहिं देव कुचाली ॥
जेव्हा
श्रीरामचंद्र सीतेसह सुवर्ण सिंहासनावर विराजमान होतील, तेव्हा आमची मनोकामना
पूर्ण होईल. एकीकडे सर्वजण म्हणत आहेत की उद्याचा दिवस केव्हा उजाडणार ? दुसरीकडे
षड्यंत्र करणारे देव विघ्न आणू पाहात होते. ॥ ३ ॥
तिन्हहि सोहाइ न
अवध बधावा । चोरहि चंदिनि राति न भावा ॥
सारद बोलि बिनय
सुर करहीं । बारहिं बार पाय लै परहीं ॥
चोरांना ज्याप्रमाणे चांदणे आवडत नाही, त्याप्रमाणे देवांना अयोध्येतील
आनंदोत्सव आवडत नव्हते. सरस्वतीदेवीला बोलावून ते विनवणी करीत
होते आणि वारंवार तिच्या पाया पडून लोटांगण
घालत होते. ॥ ४ ॥

No comments:
Post a Comment