Monday, January 27, 2014

Shri Ganesh Kavacha (Marathi) श्रीगणेश कवच


Shri Ganesh Kavacha (Marathi) 

Shri Ganesh kavacha is in Marathi. Original Shri Ganesh Kavacha from Ganesh Purana; is in Sanskrit. This Marathi Shri Ganesh kavacha is written by Shri Diwakar Anant Ghaisas, based on Original kavacha. I thank him for doing this wonderful job for devotees of God Ganesh. I am really grateful to him and present this kavacha for devotees of God Ganesh. Benefits of Kavacha, Falashruti: as described in Shri Ganesh Kavacha. Removes fear from Ghosts, Body becomes Strong and healthy, If recited before travel then travel becomes trouble free, Victory in war, debate. All difficulties and troubles are vanished. If recited 7 times every day for 21days then desires are satisfied. If recited before going to any governmental work then it becomes successful. If recited 21 times a day for 21 days then the devotee receives Moksha. 

 श्रीगणेश कवच 

परात्पर परमात्मा पूर्ण । ' विनायक ' करो शिखा रक्षण । 
 मस्तकासी करो रक्षण । ' अतिसुंदर-रुप ' तो ॥ १ ॥ 
' कश्यप ' रक्षक ललाटा । ' महोदर ' रक्षो भ्रूतटा । 
लोचनां आणि ओष्ठां । ' भालचंद्र ' ' गजास्य ' तो ॥ २ ॥ 
जिव्हेसी रक्षो ' गणक्रीड ' । हनुवटीसी ' गिरिजासुत ' । 
सांभाळो तो वाचा दंत । ' विनायक ' ' विघ्नहा ' ॥ ३ ॥ 
माझिया कर्णद्वयांते । ' पाशपाणि ' करो रक्षणाते । 
' चिंतितार्थद ' नासिकेते । रक्षण करो सर्वदा ॥ ४ ॥ 
' गणेश ' रक्षो मुखासी । ' धनंजय ' तो कंठासी । 
' गजस्कंध ' तो स्कंधांसी । उर ' विघ्नविनाशक ' ॥ ५ ॥ 
' गणनाथ ' रक्षो हृदयाते । ' हेरंब ' रक्षो जठराते । 
पार्श्र्वभाग रक्षावयाते । सज्ज राहो धराधर ॥ ६ ॥ 
' शुभ ' ' विघ्नहर ' पृष्ठासी । ' वक्रतुंड ' लिंगासी । 
' महाबल ' तो गुह्यासी । रक्षण करो निजबळे ॥ ७ ॥ 
' गणक्रीड ' मम जंघा-जानूते । ' मंगलमूर्ति ' अंकांते । 
गोफे आणिक चरणांते । ' एकदंत ' ' महाबुद्धि ' ॥ ८ ॥ 
बाहूंसी ' क्षिप्र-प्रसादन ' । ' आशाप्रपूरक ' करो रक्षण । 
' पद्महस्त ' अंगुलित्राण । ' अरिनाशन ' नखांते ॥ ९ ॥ 
' मयूरेश ' सर्वांगासी । ' विश्र्वव्यापी ' करो रक्षणासी । 
' धूम्रकेतु ' अन्य स्थानांसी । सर्वही करो सुरक्षित ॥ १० ॥ 
सन्मुख रक्षो ' आमोद ' । पाठीं रक्षो ' प्रमोद ' । 
पूर्व रक्षो सदोदित । ' सिद्धिविनायक बुद्धीश ' ॥ ११ ॥ 
दक्षिणेकडुनी ' उमा-अपत्य ' । ' गणेश्र्वर ' रक्षो नैर्ऋत्य । 
 पक्ष्चिम रक्षो सत्य सत्य । ' विघ्नहर्ता ' तो मम ॥ १२ ॥ 
वायव्येसी ' गजकर्णक ' । आग्नेयेसी ' विधिपालक ' । 
ईशान्येकडुनी रक्षक । ' ईशनंदन ' तो होवो ॥ १३ ॥ 
दिवसा रक्षो ' एकदंत ' । सायं रात्रौ सुरक्षित । 
 ठेवो ' विघ्नहृत् ' संतत । विनंती ' श्रीगणेशा ' ॥ १४ ॥ 
राक्षस असुर वेताळ । ग्रहभुते पिशाचे सबळ । 
तयांपासुनी मम सांभाळ । करो ' पाशांकुशधर ' ॥ १५ ॥ 
' स्मृतिरुपी ' तिन्ही गुण । रक्षण करो ' गजानन ' । 
धर्म वैभव कीर्ति ज्ञान । कुलाचरपालन ॥ १६ ॥ 
पुत्रपौत्र स्नेही मित्र । आप्तइष्ट जे सर्वत्र । 
रक्षण करो पवित्र । गजानन ' स्मृति ' मात्रे ॥ १७ ॥ 
' मयूरेश ' सर्वायुधधर । कृपाछत्र धरो सर्वांवर । 
संबंधी जे जन इतर । अनुकूल ते होवोत ॥ १८ ॥ 
अजादिकां सांभाळो ' कपिल ' । ' विकट ' पाळो अश्र्वगजबळ । 
सर्वथा मज वज्रबळ । ' गजानन ' देवो हा ॥ १९ ॥ 
जो कोणी हे लिहुनी । ठेवील कंठी बांधुनी । 
ताम्रपुटी नीट जपुनी । पिशाचभय टळेल ॥ २० ॥ 
सकाळ माध्याह्न सायंकाळ । पठण करिता त्रिकाळ । 
वज्रापरी देह सकळ । होईल तो तयाचा ॥ २१ ॥ 
यात्रेचिया काळीं म्हणतां । निर्विघ्न होईल ती यात्रा । 
युद्धकाळी पठण करिता । जय रणी पावेल ॥ २२ ॥ 
मंत्र-प्रभावी हो निश्र्चित । अरींचा करील निःपात । 
गणेश तयासी रक्षीत । पुढती तो येवोनी ॥ २३ ॥ 
एकवीस दिनपर्यंत । आवृत्या प्रत्यही सप्त । 
करितां इष्ट फल प्राप्त । निःसंशय ते होतसे ॥ २४ ॥ 
एकवीस वेळां प्रतिदिन । म्हणतां हे एकवीस दिन । 
बंदीतुनी मोक्ष होऊन । मरण टळेल तेथील ॥ २५ ॥ 
राजदर्शनाकरितां गमन । त्रिवार करावे पठण । 
 नृप अनुकूल वर्तोन । जनी पडे प्रभाव ॥ २६ ॥ 
ॐ गँ गणपतये नमः । मज कृपादृष्टीने पहा । 
गणेश कवचासी महा । पुण्यवंत परं[परा ॥ २७ ॥ 
कश्यप मुद्गल मांडव्य । कवच बोलती पवित्र भव्य । 
मुखोद्गत ते कर्तव्य । मुनि म्हणती श्रीगौरीते ॥ २८ ॥ 
जो नसेल श्रद्धावंत । नसेल भक्ति हृदयांत । 
दुराचारी जो जनांत । तेणे नच म्हणावे ॥ २९ ॥ 
परी दैत्यराक्षसांपासुन । व्हावयाते निजरक्षण । 
नित्य करावे हे पठण । बाधा हरती सर्वही ॥ ३० ॥ 
इति श्री गणेशपुराणी । कवच जे गीर्वाणवाणी । 
प्रकट केले ऋषींनी । सज्जनांचिया रक्षणा ॥ ३१ ॥ 
गीर्वाणवाणी लोपता । लोकांतुनी विस्मृत होता । 
उपलब्ध असावें गणेशभक्तां । प्राकृती म्हणावया ॥ ३२ ॥ 
करुनी श्रीगणेश सेवा । प्रसाद तयाचा घ्यावा । 
ऐसिया धरुनी भावा । ओवियांत गुंफिले ॥ ३३ ॥ 
दिवाकर अनंत-सुत । हेरंब-चरणी विनीत । 
सर्वांलागी विनवीत । मान्य होवो ही सेवा ॥ ३४ ॥ 
॥ इति श्रीगणेश कवच संपूर्ण ॥

Shri Ganesh Kavacha (Marathi) 
 श्रीगणेश कवच


Custom Search

No comments: