Thursday, October 6, 2016

JanakiKrutam Paravati Stotram जानकीकृतं पार्वती स्तोत्रं


JanakiKrutam Paravati Stotram 
JanakiKrutam Paravati Stotram is in Sanskrit. It is from Brahmvaivart Purana, Krishna Janma Khanda. Janaki in earlier birth was a Gopkanya in Goloka. She performed a varta so that she could have Krishna as a husband. She devoted goddess Parvati after performing the varta and pleased her with this Stotra. Goddess Parvati blessed her and told her that there will be God Rama in Tretayug. Your desire will be fulfilled and you will be his wife as Sita with your earlier name as Janaki. If there is a delay, problem in marriage for ladies then if they recite this stotra daily with devotion and faith then by the blessings of Goddess they will have a good husband like God Ram.
जानकीकृतं पार्वती स्तोत्रं
जानक्युवाच
शक्तिस्वरुपे सर्वेषां सर्वाधारे गुणाश्रये ।
सदा शंकरयुक्ते च पतिं देहि नमोऽस्तु ते ॥ १ ॥
सृष्टिस्थित्यन्तरुपेण सृष्टिस्थित्यन्तरुपिणि ।
सृष्टस्थित्यन्तबीजानां बीजरुपे नमोऽस्तु ते ॥ २ ॥ 
हे गौरि पतिमर्मज्ञे पतिव्रतपरायणे ।
पतिव्रते पतिरते पतिं देहि नमोऽस्तु ते ॥ ३ ॥
सर्वमङ्गलमङ्गल्ये सर्वमङ्गलसंयुते ।
सर्वमङ्लबीजे च नमस्ते सर्वमङ्गले ॥ ४ ॥  
सर्वप्रीये सर्वबीजे सर्वाशुभविनाशिनि ।
सर्वेशे सर्वजनके नमस्ते शंकरप्रिये ॥ ५ ॥
परमात्मस्वरुपे च नित्यरुपे सनातनि । 
साकारे च निराकारे सर्वरुपे नमोऽस्तु ते ॥ ६ ॥
क्षुत्तृष्णेच्छा दया श्रद्धा निद्रा तन्द्रा स्मृतिः क्षमा ।
एतास्तव कलाः सर्वा नारायणि नमोऽस्तु ते ॥ ७ ॥
लज्जा मेधा तुष्टिपुष्टिशान्तिसम्पत्तिवृद्धयः ।
एतास्तव कलाः सर्वा सर्वरुपे नमोऽस्तु ते ॥ ८ ॥
दृष्टादृष्टस्वरुपे च तयोर्बीजफलप्रदे ।
सर्वानिर्वचनीये च महामाये नमोऽस्तु ते ॥ ९ ॥ 
शिवे शंकरसौभाग्ययुक्ते सौभाग्यदायिनि ।
हरिं कान्तं च सौभाग्यं देहि देवि नमोऽस्तु ते ॥ १० ॥ 
स्तोत्रेणानेन याः स्तुत्वा समाप्तिदिवसे शिवाम् ।
नमन्ति परया भक्त्या ता लभन्ति हरिं पतिम् ॥ ११ ॥
इह कान्तसुखं भुक्त्वा पतिं प्राप्य परात्परम् ।
दिव्यं स्यन्दनमारुह्य यान्त्यन्ते कृष्णसंनिधिम् ॥ १२ ॥
॥ इति श्रीब्रह्मवैवर्ते श्रीकृष्णजन्मखन्डे जानकीकृतं पार्वतीस्तोत्रं संपूर्णम् ॥
 श्रीब्रह्मवैवर्ते श्रीकृष्णजन्मखन्डे अध्याय २७/१७३-१८४.
मराठी अर्थ (स्वैर) 
जानकी म्हणाली
सर्वांच्या शक्तिस्वरुपे शिवे ! आपण सर्व जगाची आधारभूत व सर्व सद्गुणांचा आश्रय आहात. नेहमी आपण शंकरासन्निध असता. आपल्यालानमस्कार आहे. मला सर्वश्रेष्ठ पति द्या. सृष्टि, पालन व संहारीणीरुप आपलेच आहे. सृष्टि, पालन आणि संहाररुपिणी बीज आपणच आहात. आपल्याला नमस्कार आहे. पतिचे मर्म जाणणार्‍या, पतिव्रतपरायण गौरी, पतिव्रते, पत्यनुरागिणि आपल्याला नमस्कार आहे. मला (सर्वश्रेष्ठ) पति द्या. सर्व मंगलाचे कारण आपण आहात. सर्व मांगल्याचे बीज व सर्व मांगल्याने सम्पन्न व सर्व मंगल करणार्‍या सर्वमंगले ! आपल्यला नमस्कार आहे. सर्व अशुभाचा नाश करणारी, सर्वांची ईश्र्वरी व सर्वांची जननी आपण आहात. शंकराला प्रिय असणार्‍या आपल्याला नमस्कार आहे. आपण परमात्मस्वरुपी, नित्यरुपी, सनातनी, साकार व निराकार आहात. सर्वरुपे आपल्याला नमस्कार आहे. क्षुधा, तृष्णा, इच्छा, दया, श्रद्धा, निद्रा, तन्द्रा, स्मृति आणि क्षमा या सर्व आपल्या कला आहेत. नारायणि आपल्याला नमस्कार आहे. लज्जा (विनम्रता), मेधा, तुष्टि, पुष्टि, शान्ति, सम्पत्ति आणि वृद्धि याही सर्व आपल्या कला आहेत. सर्वरुपिणि आपल्याला नमस्कार आहे. दृष्ट व अदृष्ट दोन्ही आपलीच रुपे आहेत. त्यांचे बीज व फळ देणारी आपणच आहात. आपले वर्णन, स्तुति कोणीही करु शकत नाही. महामाये ! आपल्याला नमस्कार आहे. शिवे ! आपण शंकररुपी सौभाग्याने सम्पन्न आहात. तसेच आपण सर्वांना सौभाग्य देणार्‍या आहात. देवि ! हरि माझे पति म्हणुन सौभाग्य मला दे. आपल्याला नमस्कार आहे. ज्या स्त्रिया व्रताच्या समाप्तिच्या दिवशी या स्तोत्राने मोठ्या भक्तिने शिवेची स्तुति करतात, त्यांना साक्षात श्रीहरि सारखा पति लाभतो. या लोकी असा (श्रीहरिसारखा) पति लाभून अन्ती दिव्य विमानी आरुढ होऊन त्याना भगवान श्रीकृष्णाचे सान्निध्य लाभते. अशा रीतीने जानकीने केलेली पार्वती स्तोत्ररुपी स्तुति संपूर्ण झाली.   
रामचरित मानसमधिल चौपाई
JanakiKrutam Paravati Stotram
जानकीकृतं पार्वती स्तोत्रं


Custom Search
Post a Comment