Monday, October 24, 2016

Rudra Sukta रुद्र सूक्त


Rudra Sukta 
Rudra Sukta is in Sanskrit. This is a God Shiva Sukta. It is important while performing RudraBhishekha. This sukta gives Moksha to devotee. After RudraBhisheka, reciting this sukta for 11 times completes RudraBhishek.
रुद्र सूक्त 
नमस्ते रुद्र मन्यव उतो त इषवे नमः ।
बाहुभ्यामुत ते नमः ॥ १ ॥
मराठी अर्थ (स्वैर)
१) हे रुद्र ! आपल्याला नमस्कार आहे. आपल्या क्रोधाला नमस्कार आहे. आपल्या बाणाला नमस्कार आणि आपल्या भुजांना नमस्कार आहे. 
या ते रुद्र शिवा तनूरघोराऽपापकाशिनी । 
तया नस्तन्वा शन्तमया गिरिशन्ताभि चाकशीहि ॥ २ ॥
२) हे गिरिशन्त ! अर्थात पर्वतावर राहून सुख वाढविणारे रुद्र ! आम्हाला आपल्या मङ्गलमयी मूर्तिने बघा.  जी सौम्य असल्याकारणाने केवळ पुण्याचेच फळ प्रदान करणारी आहे. 
यामिषुं गिरिशन्त हस्ते बिभर्ष्यस्तवे ।
शिवां गिरित्र तां कुरु मा हि ँूसीः पुरुषं जगत् ॥ ३ ॥
३) हे गिरिशन्त ! हे गिरीश ! अर्थात् पर्वतावर राहून त्राण करणार्‍या आपण प्रलय करण्यासाठी ज्या बाणाला आपण हातात धारण करता त्याला सौम्य (थोपवा) करा आणि जगतांतील जीवांची हिंसा करुं नका.
शिवेन वचसा त्वा गिरिशाच्छा वदामसि ।
यथा नः सर्वमिज्जगदयक्ष्मः सुमना असत् ॥ ४ ॥
४) हे गिरिश ! आम्ही आपल्या(कृपे)ला प्राप्त करण्यासाठी मंगलमयी स्तोत्राने आपली प्रार्थना करत आहोत. ज्यामुळे आमचे संपूर्ण जग रोगरहित व प्रसन्न होवो.
अध्यवोचदधिवक्ता प्रथमो दैव्यो भिषक् ।
अहींश्र्चसर्वाञ्जम्भयन्त्सर्वाश्र्चयातुधान्योऽधराचीः परा सुव ॥ ५ ॥  
५) शास्त्रला धरुन बोलणार्‍या, देवांचे हित कारणार्‍या, सर्व रोगांचा नाश करणार्‍या प्रथम रुद्र ! आमचे इष्ट सर्पादिकांचा नाश आणि अधोगामिनी राक्षसींना पण आमच्यापासून दूर ठेवो.  
असौ यस्ताम्रो अरुण उत बभ्रुः सुमङ्गलः ।
ये चेन ँू रुद्रा अभितो दिक्षु श्रिताः सहस्त्रशोऽवैषा ँू हेडईमहे ॥ ६ ॥ 
६) हे जे ताम्र, अरुण आणि पिङ्गल वर्णाचे मङ्गलमय सूर्यरुप रुद्र आहेत व ज्यांच्या चारी बाजूंना सहस्त्र किरणरुपी रुद्र आहेत त्यांच्या क्रोधाचे आम्ही भक्ति करुन निवारण करतो.
असौ योऽवसर्पति नीलग्रीवो विलोहितः ।
उतैनं गोपा अदृश्रन्नदृश्रन्नुदहार्यः स दृष्टो मृडयाति नः ॥ ७ ॥
७) हे जे विशेष रक्तवर्ण सूर्यरुपी नीलकण्ठ रुद्र चलस्वरुप आहेत, त्यांना गोप बघत आहेत, नद्या बघत आहेत ते त्यांना आम्ही बघितल्यावर ते आमचे कल्याण करोत.
नमोऽस्तु नीलग्रीवाय सहस्त्राक्षाय मीढुषे ।
अथो ये अस्य सत्वानोऽहं तेभ्योऽकरं नमः ॥ ८ ॥
८)  सिंचन करणार्‍या सहस्त्र नेत्र असलेल्या पर्जन्यरुप नीलकण्ठ रुद्राला आमचा नमस्कार आहे. त्यांचे जे अनुचर आहेत त्यांनापण आमचा नमस्कार आहे. 
प्रमुञ्च धन्वनस्त्वमुभयोरार्त्न्योर्ज्याम् ।
याश्च ते हस्त इषवः परा ता भगवो वप ॥ ९ ॥
९) हे भगवन् ! आपल्या धनुष्यामध्ये ही जी दोरी आहे ती सोडा करा व हातामध्ये जो बाण आहे तो पण बाजुला करुन आमच्यासाठी सौम्य (कृपाळु) व्हा.
विज्यं धनुः कपर्दिनो विशल्यो बाणवाँ उत ।
अनेशन्नस् या इषव आभुरस्य निषङ्गधिः ॥ १० ॥
१०) जटाधारी रुद्राचे धनुष्य दोरी नसलेले, भाता बाण नसलेला आणि म्यान खड्ग नसलेले होवो.
या ते हेतिर्मीढुष्टम हस्ते बभूव ते धनुः ।
तयाऽस्मान्विश्वतस्त्वमयक्ष्मया परि भुज ॥ ११ ॥ 
११) हे संतृप्त करणार्‍या रुद्र ! आपल्या हातांत जी आयुधे आहेत व जे आपले धनुष्य आहे त्या (आम्हाला) उपद्रव न देणार्‍या आयुधांनी व धनुष्याने सर्व बाजुंनी आमचे रक्षण करा.
परि ते धन्वनो हेतिरस्मान्वृणक्तु विश्वतः ।
अथो य इषुधिस्तवारे अस्मन्नि धेहि तम् ॥ १२ ॥
१२) धनुर्धारी असणार्‍या आपले जे हे शस्त्र आहे ते आमचे रक्षण करण्यासाठी आमच्या चारी बाजु व्यापुन राहो. परंतु आपला तीरकमठा मात्र आमच्यापासुन लांब ठेवा. 
अवतत्य धनुष्ट्व ँू सहस्त्राक्ष शतेषुधे ।
निशीर्य शल्यानां मुखा शिवो नः सुमना भव ॥ १३ ॥
१३) हे सहस्त्र नेत्र असणार्‍या, शेकडो भाते असलेल्या रुद्र ! आपण आपले धनुष्य दोरी रहित व बाणांची टोके धाररहित करुन आमच्यासाठी कल्याणदायी व आनंददायी व्हा.
नमस्त आयुधायानातताय धृष्णवे ।
उभाभ्यामुत ते नमो बाहुभ्यांतव धन्वने ॥ १४ ॥
१४) हे रुद्र ! धनुष्यावर न चढवलेल्या आपल्या बाणांना नमस्कार आहे. आपल्या दोन्ही भुजांना नमस्कार आहे.  तसेच शत्रु संहारक आपल्या धनुष्याला नमस्कार आहे.
मानो महान्तमुत मा नो अर्भकं मा न उक्षन्तमुत मा न उक्षितम् ।
मा नो वधीः पितरं मोत मातरं मा नः प्रियास्तन्वो रुद्र रीरिषः ॥ १५ ॥
१५) हे रुद्र ! आमच्या ज्येष्ठ जनांना मारु नका. आमच्या मुलांना मारु नका. आमच्या तरुणांना मारु नका. आमच्या भ्रूणांना मारु नका. आमच्या माता-पित्याची हिंसा करु नका. आमच्या प्रिय जनानां मारु नका. आमचे पुत्र-पौत्रादिक यांना मारु नका.
मा नस्तोके तनये मा न आयुषि मा नो गोषु मा नो अश्वेषु रीरिषः ।
मा नो वीरान् रुद्र भामिनो वधीर्हविष्मन्तः सदमित्वा हवामहे ॥ १६ ॥ 

१६) हे रुद्र ! आमच्या मुलांवर व पौत्रांवर क्रोध करु नका. आमच्या वीरांना मारु नका. आम्ही हविष्य घेऊन निरन्तर यज्ञार्थ असलेल्या गायी व घोड्यांवर क्रोध करु नका. आम्ही क्रोधयुक्त असलेल्या आपले आवाहन करतो.
शंकरांच्या प्रसन्नतेसाठी या सूक्ताचा पाठ विशेष महत्वाचा सांगितलेला आहे. शंकरांची पूजा करतांना जलधारेचे अनन्यसाधारण महत्व पूर्वींपासून मानलेले आहे.  म्हणूनच भगवान शंकरांच्या पूजेंत रुद्राभिषेकाची परंपरा आहे. या रुद्राभिषेकामध्ये या रुद्र सूक्ताचे अग्रस्थान आहे. 
रुद्राभिषेकामध्ये रुद्राष्टाध्यायीच्या पाठामध्ये अकरावेळा या सूक्ताची आवृत्तीकेल्यावर पूर्ण रुद्राभिषेक मानला जातो. हे रुद्र सूक्त त्रिविध तापांपासून मुक्त करणारे व मोक्षप्राप्तीच्या मार्गावर नेणारे मानले जाते. 

(सर्व माहिती आधारित वेद-कथाङ्क- कल्याण गीता प्रेस गोरखपुर )   
Rudra Sukta
रुद्र सूक्त 


Custom Search
Post a Comment