Laxmyaha Stotram
Laxmyaha Stotram is in Sanskrit. It is from Brahmavaivarta Purana Ganapati Khanda Adhyay 22/27-39. This Stotra is told by God Narayan/Hari to God Indra. It is the Praise of Goddess MahaLaxmi.
लक्ष्म्याः स्तोत्रम्
नारायण उवाच
देवि त्वां स्तोतुमिच्छामि न क्षमाः स्तोतुमीश्र्वराः ।
बुद्धेरगोचरां सूक्ष्मां तेजोरुपां सनातनीम् ।
अत्यनिर्वचनीयां च को वा निर्वक्तुमीश्र्वरः ॥ १ ॥
स्वेच्छामयीं निराकारां भक्तानुग्रहविग्रहाम् ।
स्तौमि वाङ्मनसोः पारां किं वाहं जगदम्बिके ॥ २ ॥
परां चतुर्णां वेदानां पारबीजं भवार्णवे ।
सर्वशस्याधिदेवीं च सर्वासामपि सम्पदाम् ॥ ३ ॥
योगिनां चैव योगानां ज्ञानानां ज्ञानिनां तथा ।
वेदानां च वेदविदां जननीं वर्णयामि किम् ॥ ४ ॥
यया विना जगत् सर्वमवस्तु निष्फलं ध्रुवम् ।
यथा स्तनान्धबालानां विना मात्रासुखं भवेत् ॥ ५ ॥
प्रसीद जगतां माता रक्षास्मानतिकातरान् ।
वयं त्वच्चरणाम्भोजे प्रपन्नाः शरणं गताः ॥ ६ ॥
नमः शक्तिस्वरुपायै जगन्मात्रे नमो नमः ।
ज्ञानदायै बुद्धिदायै सर्वदायै नमो नमः ॥ ७ ॥
हरिभक्तिप्रदायिन्यै मुक्तिदायै नमो नमः ।
सर्वज्ञायै सर्वदायै महालक्ष्म्यै नमो नमः ॥ ८ ॥
कुपुत्राः कुत्रचित् सन्ति न कुत्रचित् कुमातरः ।
कुत्र माता पुत्रदोषे तं विहाय च गच्छति ॥ ९ ॥
हे मातर्दर्शनं देहित स्तनान्धान् बालकानिव ।
कृपां कुरु कृपासिन्धुप्रियेऽस्मान् भक्तवत्सले ॥ १० ॥
इत्येवं कथितं वत्स पद्मायाश्र्च शुभावहम् ।
सुखदं मोक्षदं सारं शुभदं सम्पदः पदम् ॥ ११ ॥
इदं स्तोत्रं महापुण्यं पूजाकाले च यः पठेत् ।
महालक्ष्मीर्गृहं तस्य न जहाति कदाचन ॥ १२ ॥
इत्युक्त्वा श्रीहरिस्तं च तत्रैवान्तरधीयत ।
देवो जगाम क्षीरोदं सुरैः सार्धं तदाज्ञया ॥ १३ ॥
॥ इति श्रीब्रह्मवैवर्ते गणपतिखण्डे लक्ष्म्याः स्तोत्रं सम्पूर्णम् ॥
(गणपतिखण्ड २२/२७-३९)
मराठी अर्थनारायण म्हणाले
देवि ! जिचे स्तवन मोठे मोठे देव करु शकले नाहीत, त्या तुझी मी स्तुति करु इच्छितो. आपण बुद्धिच्या (आकलनाच्या) पलीकडे, सूक्ष्म, तेजोरुप, सनातन आणि अनिर्वचनीय आहात. मग आपले वर्णन कोण कसे बरे करु शकेल? जगदम्बिके ! आपण स्वेच्छामयी, निराकार भक्तांसाठी मूर्तिमान व अनुग्रहस्वरुप आणि मन व वाणीच्या पलीकडे आहात. मग मी आपली काय स्तुति करु? आपण चार वेदांच्या (आकलनाच्या) पलीकडे, भवसागर पार करण्यासाठी (भक्तांना) वाट, उपाय दाखविणार्या, सर्व अन्न व सम्पदेची अधिदेवी आहात. योग्यासाठी योग, ज्ञान्यानसाठी ज्ञान व वेद जाणणार्यासाठी वेद असणार्या आपले मी कसे वर्णन करु? आपल्याशिवाय हे जग निष्फल आहे जसे की दूध पिणार्या बालकाला आईशिवाय सुख नाही मिळत तसेच आहे. आपण जगाची आई आहात आपण प्रसन्न व्हा आणि भयभित असलेल्या आमचे रक्षण करा. आम्ही आपल्या चरणकमलांचा आश्रय घेऊन आपल्याला शरण आलो आहोत. शक्तिस्वरुप जगत्जननीला आपल्याला वारंवार नमस्कार आहे. ज्ञान, बुद्धि तसेच आम्हाला सर्वस्व देणार्या आपल्याला पुनः पुनः प्रणाम आहे. महालक्ष्मी ! आपण हरि-भक्ति देणार्या, मुक्ति देणार्या, सर्व ज्ञान देणार्या, बुद्धि देणार्या व सर्व देणार्या आहात. आपल्याला माझा वारंवार नमस्कार आहे. हे मॉं कुपुत्र तर कधी कधी आढळतात पण कुमाता मात्र कधीच नसते. मुलगा दुष्ट असला तर आई त्यााला कधी सोडून जाते कां? हे माते ! आपण कृपाळु श्रीहरिंची प्राणप्रिया आहात. भक्तांवर कृपा करण्याचा आपला स्वभाव आहे. म्हणून दूध पिणारी मुले समजुन आमच्यावर कृपा करा व आम्हाला दर्शन द्या.
वत्सा ! याप्रकारे लक्ष्मीचे ते शुभकारक स्तोत्र, जे सुख देणारे, मोक्ष देणारे, साररुप, शुभद, आणि सम्पत्तीचे आश्रयस्थान आहे ते तुला सांगितले. जो मनुष्य पूजाकाली या महान् पुण्यकारक स्तोत्राचा पाठ करतो, महालक्ष्मी त्याच्या घराचा कधीही त्याग करत नाही. इन्द्राला एवढे सांगुन श्रीहरि तेथेच अंतर्धान झाले. त्यानंतर त्यांच्या आज्ञेप्रमाणे देवराज इन्द्र इतर देवांबरोबर क्षीरसागराकडे गेले.
Laxmyaha Stotram
लक्ष्म्याः स्तोत्रम्
Custom Search
No comments:
Post a Comment