Saturday, October 29, 2016

Ashtavakrakrut Shrikrishna Stotra अष्टावक्रकृतं श्रीकृष्णस्तोत्रम्


Ashtavakrakrut Shrikrishna Stotra 
Ashtavakrakrut Shrikrishna Stotra is in Sanskrit. It is a beautiful creation of Asit putra (son) Deval (Ashtavakra). He was a great devotee of God Shrikrishna. He devoted God Shrikrishna for many thousand years.
अष्टावक्रकृतं श्रीकृष्णस्तोत्रम् 
अष्टावक्र उवाच
गुणातीत गुणाधार गुणबीज गुणात्मक ।
गुणीश गुणिनां बीज गुणायन नमोऽस्तु ते ॥ १ ॥
सिद्धिस्वरुप सिद्ध्यंश सिद्धिबीज परात्पर ।
सिद्धिसिद्धगणाधीश सिद्धानां गुरवे नमः ॥ २ ॥
हे वेदबीज वेदज्ञ वेदिन् वेदविदां वर ।
वेदाज्ञातोऽसि रुपेश वेदज्ञेश नमोऽस्तु ते ॥ ३ ॥
ब्रह्मानन्तेश शेषेन्द्र धर्मादीनामधीश्र्वर ।
सर्व सर्वेश शर्वेश बीजरुप नमोऽस्तु ते ॥ ४ ॥
प्रकृते प्राकृत प्राज्ञ प्रकृतीश परात्पर ।
संसारवृक्ष तद्बीज फलरुप नमोऽस्तु ते ॥ ५ ॥
सृष्टिस्थित्यन्तबीजेश सृष्टस्थित्यन्तकारण ।
महाविराट् तरोर्बीज राधिकेश नमोऽस्तु ते ॥ ६ ॥  
अहो यस्य त्रयः स्कन्धा ब्रह्मविष्णुमहेश्र्वराः ।
शाखा प्रशाखा वेदाद्यास्तपांसि कुसुमानि च ॥ ७ ॥
संसारविफला एव प्रकृत्यङ्कुरमेव च ।
तदाधार निराधार सर्वाधार नमोऽस्तु ते ॥ ८ ॥
तेजोरुप निराकार प्रत्यक्षानूहमेव च ।
सर्वाकारातिप्रत्यक्ष स्वेच्छामय नमोऽस्तु ते ॥ ९ ॥
॥ इति श्रीब्रह्मवैवर्ते अष्टावक्रकृतं श्रीकृष्णस्तोत्रं सम्पूर्णम् ॥
(श्रीकृष्णजन्मखण्ड अध्याय २९/४०-४८)
मराठी अर्थ (स्वैर)
अष्टावक्र म्हणाले

हे भगवन् ! आपण (सत्व,रज व तम) तीनही गुणांच्या पलीकडे असुनही सर्व गुणांचे आधार आहात. गुणांचे कारण व गुणस्वरुप आहात. गुणांचे स्वामी तसेच त्यांचे आदिकारण आहात. गुणनिधे ! आपल्याला नमस्कार आहे. आपण सिद्धिस्वरुप आहात. सर्व सिद्धि आपल्या अंशरुप आहेत. आपण सिद्धिंचे बीज व परात्पर आहात. सिद्धि व सिद्धगणांचे अधीश्र्वर आहात. तसेच सर्व सिद्धांचे गुरु आहात. आपल्याला नमस्कार आहे. वेदांच्या बीजस्वरुप असलेल्या हे परमात्मन् ! आपण वेदांचे ज्ञाते, वेदवान् तसेच वेदवेत्तांमध्ये श्रेष्ठ आहात. वेदसुद्धा तुम्हांला पूर्णपणे ओळखु शकले नाहीत. रुपेश्र्वर आपण वेदज्ञानींचे स्वामी आहात. आपल्याला नमस्कार आहे. आपण ब्रह्मा, विष्णु, शंकर, शेष, इन्द्र, आणि धर्म आदिंचे अधिपती आहात. स्रस्वरुप सर्वेश्र्वर आपण महादेवांचेही स्वामी आहात. सर्वांच्या बीजरुपी गोविन्दा ! आपल्याला नमस्कार आहे. आपणच प्रकृति व त्यांतील पदार्थ आहात. प्राज्ञ, प्रकृतिचे स्वामी व परात्पर आहात. संसार वृक्ष, त्याचे बीज आणि फलरुप आहात. आपल्याला नमस्कार आहे. सृष्टि, रक्षण व संहार कारण आहात. महाविराट् (नारायण) रुपी वृक्षाचे बीज राधावल्लभ ! आपल्याला नमस्कार आहे. अहो ! आपण ज्याचे बीज आहात त्या महाविराट् रुपी वृक्षाचे तीन खांदे ब्रह्मा, विष्णु व महेश आहेत. वेदादि शास्त्र त्याच्या फांद्या व उपफांद्या आहेत आणि तपस्या हे फुल आहे. ज्याचे फल संसार आहे. हा वृक्ष प्रकृतिचे कार्य आहे. आपणच त्याचा आधार आहात. परंतु आपला आधार कोणीही नाही. सर्वाधार असलेल्या आपल्याला नमस्कार आहे. तेजःस्वरुप, निराकार, सर्वरुप, प्रत्यक्षाचा अविशष, स्वेच्छामय परमेश्र्वरा आपल्याला नमस्कार आहे.       Ashtavakrakrut Shrikrishna Stotra
 अष्टावक्रकृतं श्रीकृष्णस्तोत्रम् 
  

Custom Search
Post a Comment