Sunday, October 30, 2016

Laxmi Kavacham लक्ष्मीकवचम्


Laxmi Kavacham 
Laxmi Kavacham is in Sanskrit. It is from Brahmavaivart Purana Ganapati Khanda Adhyay 22 from 1 to 17. This kavacham is given to Indra by God Hari. The devotee who wears this kavacham around his neck or on right hand becomes a wealthy person, victorious in all his endeavours or wars against enemies.
लक्ष्मीकवचम्
नारद उवाच
आविर्भूय हरिस्तस्मै किं स्तोत्रं कवचं ददौ ।
महालक्ष्म्याश्र्च लक्ष्मीशस्तन्मे ब्रूहि तपोधन ॥ १ ॥
नारायण उवाच 
पुष्करे च तपस्तप्त्वा विरराम सुरेश्र्वरः ।
आविर्बभूव तत्रैव क्लिष्टं दृष्ट्वा हरिः स्वयम् ॥ २ ॥
तमुवाच हृषीकेशो वरं वृणु यथेप्सितम् ।
स च वव्रे वरं लक्ष्मीमीशस्तस्मै ददौ मुदा ॥ ३ ॥
वरं दत्वा हृषीकेशः प्रवक्तुमुपचक्रमे । 
हितं सत्यं च सारं च परिणामसुखावहम् ॥ ४ ॥
श्रीमधुसुदन उवाच 
गृहाण कवचं शक्र सर्वदुःखविनाशनम् ।
परमैश्वर्यजनकं सर्वशत्रुविमर्दनम् ॥ ५ ॥
ब्रह्मणे च पुरा दत्तं संसारे च जलप्लुते ।
यद् धृत्वा जगतां श्रेष्ठः सर्वैश्र्वर्ययुतो विधिः ॥ ६ ॥
बभूवुर्मनवः सर्वे सर्वैश्र्वर्ययुता यतः ।
सर्वैश्र्वर्यप्रदस्यास्य कवचस्य ऋषिर्विधिः ॥ ७ ॥
पङ्क्तिश्छश्र्च सा देवी स्वयं पद्मालया सुर ।
सिद्धैश्र्वर्यजपेष्वेव विनियोगः प्रकीर्तितः ॥ ८ ॥
यद् धृत्वा कवचं लोकः सर्वत्र विजयी भवेत् ।
मस्तकं पातु मे पद्मा कण्ठं पातु हरिप्रिया ॥ ९ ॥     
नासिकां पातु मे लक्ष्मीः कमला पातु लोचनम् । 
केशान् केशवकान्ता च कपालं कमलालया ॥ १० ॥
जगत्प्रसूर्गण्डयुग्मं स्कन्धं सम्पत्प्रदा सदा ।
ॐ श्रीं कमलवासिन्यै स्वाहा पृष्ठं सदावतु ॥ ११ ॥
ॐ श्रीं पद्मालयायै स्वाहा वक्षः सदावतु ।
पातु श्रीर्मम कङ्कालं बाहुयुग्मं च ते नमः ॥ १२ ॥
ॐ हृीं श्रीं लक्ष्म्यै नमः पादौ पातु मे संततं चिरम् ।
ॐ हृीं श्रीं नमः पद्मायै स्वाहा पातु नितम्बकम् ॥ १३ ॥
ॐ श्रीं महालक्ष्म्यै स्वाहा सर्वाङ्गं पातु मे सदा ।
ॐ हृीं श्रीं क्लीं महालक्ष्म्यै स्वाहा मां पातु सर्वतः ॥ १४ ॥
इति ते कथितं वत्स सर्वसम्पत्करं परम् ।
सर्वैश्र्वर्यप्रदं नाम कवचं परमाद्भुतम् ॥ १५ ॥
गुरुमभ्यर्च्य विधिवत् कवचं धारयेत्तु यः ।
कण्ठे वा दक्षिणे बाहौ स सर्वविजयी भवेत् ॥ १६ ॥    
महालक्ष्मीर्गृहं तस्य न जहाति कदाचन ।
तस्य छायेव सततं सा च जन्मनि जन्मनि ॥ १७ ॥
इदं कवचमज्ञात्वा भजेल्लक्ष्मीं सुमन्दधीः ।
शतलक्षप्रजप्तोऽपि न मन्त्रः सिद्धिदायकः ॥ १८ ॥
॥ इति श्रीब्रह्मवैवर्ते इन्द्रं प्रति हरिणोपदिष्टं लक्ष्मीकवचं सम्पूर्णम् ॥
(गणपतिखण्ड अध्याय २२/१-१७)
लक्ष्मीकवच मराठी अर्थ (स्वैर)
नारदांनी विचारले,
तपोधन ! लक्ष्मीपती श्रीहरिने प्रगट होऊन इन्द्राला महालक्ष्मीचे कोणचे कवच व स्तोत्र दिले, ते मला सांगा.
नारायण म्हणाले, 
नारदा ! जेव्हां इंद्राने पुष्करमध्ये तपस्या केली व शान्त झाले, तेव्हां त्याचे ते कष्ट बघून स्वतः श्रीहरिनी त्याला दर्शन दिले. त्या हृषीकेशाने सांगितले की, तुझ्या इच्छेनुसार वर मागुन घे. तेव्हां इन्द्राने लक्ष्मी(ऐश्र्वर्य,सम्पत्ती) मागुन घेतली. ती श्रीहरिने त्याला आनंदाने दिली. वर दिल्यानंतर हृषीकेशाने हितकारक, सत्य, साररुप आणि सुखदायक परिणाम देणारे असे वचन सांगावयास सुरवात केली. 
श्रीमधुसुदन म्हणाले,
इन्द्रा ! लक्ष्मी (ऐश्र्वर्य,सम्पत्ती)  प्राप्त होण्यासाठी तू हे लक्ष्मीकवच ग्रहण कर. ते सर्व दुःखांचा नाश करणारे, परम ऐश्र्वर्य देणारे आणि सर्व शत्रुंचा नाश करणारे आहे. पूर्वी जेव्हां सर्वत्र जल पसरले होते, तेव्हां मी ब्रह्मदेवाला हे दिले होते. ज्याच्या धारणामुळे ब्रह्मदेव तीन्ही लोकीं श्रेष्ठ होऊन ऐश्र्वर्य संपन्न झाले. याच्या धारणामुळे सर्व मनुही ऐश्र्वर्यसंपन्न झाले होते. 
देवराज या सर्वैश्र्वर्यप्रद कवचाचे ब्रह्मा ऋषि आहेत. पक्तिं छंद आहे. स्वतः पद्मालया देवता आहे. आणि याचा विनियोग सिद्धैश्र्वर्य जपामध्ये याचा विनियोग सांगितला गेला आहे. या कवचाला धारण करुन लोक सर्वत्र विजयी होतात. 
कवच
पद्मा माझ्या मस्तकाचे रक्षण करो.  हरिप्रिया माझ्या कण्ठाचे रक्षण करो. लक्ष्मी माझ्या नाकाचे, कमला माझ्या नेत्रांची रक्षा करो. केशवकान्ता केसांची, कमलालया कपाळाची, जगत् जननी दोन्ही गालांची आणि सम्पतप्रदा माझ्या खांद्यांची नेहमी रक्षा करो.    
ॐ श्रीं कमलवासिन्यै स्वाहा माझ्या पाठीचे नेहमी रक्षण करो.   
ॐ श्रीं पद्मालयायै स्वाहा माझ्या वक्षःस्थळाचे रक्षण करो. 
श्री देवीला नमस्कार. ती माझ्या दोन्ही भुजांचे व दोन्ही पायांचे रक्षण करो. 
ॐ हृीं श्रीं नमः पद्मायै स्वाहा माझ्या नितम्बांचे रक्षण करो. 
ॐ श्रीं महालक्ष्म्यै स्वाहा माझ्या सर्वांगांचे रक्षण करो. 
ॐ हृीं श्रीं क्लीं महालक्ष्म्यै स्वाहा माझी सर्व बाजुंकडून रक्षा करो. 

पुत्रा, अशा प्रकारे मी तुला या सर्वैश्र्वर्यप्रद नावाच्या परमोत्कृष्ट कवचाचे कथन केले. हे परम अद्भुत कवच सर्व सम्पत्ती देणारे आहे. जो मनुष्य विधिपूर्वक गुरुची पूजा करुन या कवचाला गळ्यांत अथवा उजव्या दंडावर धारण करतो, तो सर्वांचा जेता होतो. महालक्ष्मी त्याच्या घराचा कधीही त्याग करत नाही. जन्मोजन्मी त्याच्या सावलीसारखी त्याच्याजवळ राहाते. जो मन्दबुद्धि ह्या कवचाला जाणून घेतल्याशिवाय लक्ष्मीची करोडो जप करुन भक्ति करतो त्याची मंत्रसिद्धि होत नाही.  
Laxmi Kavacham
लक्ष्मीकवचम्


Custom Search
Post a Comment