Wednesday, October 26, 2016

Go (Cow) Sukta गो-सूक्तGo (Cow) Sukta 
Go (Cow) Sukta is in Sanskrit. It is from Atharvaveda 4th Kanda 21st Sukta. Rushi is Brahma and Devata is Go Mata. Go is our wealth. It is said that everything man acquires is because of Go Mata. It is a praise of Go Mata.
गो-सूक्त 
माता रुद्राणां दुहिता वसूनां स्वसादित्यानाममृतस्य नाभिः ।
प्र नु वोचं चिकितुषे जनाय मा गामनागामदितिं वधिष्ट ॥ १ ॥ (पा.गृ.सू. १/३/२७)
आ गावो अग्मन्नुत भद्रमक्रन्त्सीदन्तु गोष्टे रणयन्त्वस्मे ।
प्रजावतीः पुरुरुपा इह स्युरिन्द्राय पूर्वीरुषसो दुहानाः ॥ २ ॥
न ता नशन्ति न दभाति तस्करो नासामामित्रो व्यथिरा दधर्षति ।
देवांश्र्च याभिर्यजते ददाति च ज्योगित्ताभिः स च ते गोपतिः सह ॥ ३ ॥
गावो भगो गाव इन्द्रो म इच्छाद्गावः सोमस्य प्रथमस्य भक्षः ।
इमा या गावः स जनास इन्द्र इच्छामि हृदा मनसा चिदिन्द्रम् ॥ ४ ॥   
यूयं गावो मेदयथा कृशं चिदश्रीरं चित्कृणुथा सुप्रतीकम् ।
भद्रं गृहं कृणुथ भद्रवाचो बृहद् वो वय उच्यते सभासु ॥ ५ ॥
प्रजावतीः सूयवसे रुशन्तीः शुद्धा अपः सुप्रपाणे पिबन्तीः ।
मा व स्तेन ईशत माघशंसः परि वो रुद्रस्य हेतिर्वृणक्तु ॥ ६ ॥
इति गो-सूक्त
गो-सूक्त मराठी अर्थ (स्वैर) 
१) गाय रुद्रांची माता, वसुंची कन्या, अदितिपुत्रांची बहिण आणि तुपरुपी अमृताचा खजिना आहे. प्रत्येक विचारशील पुरुषाला मी हे समजावून सांगितले आहे की, निरपराध व अवध्य गाईचा वध करु नको.
२) गायींनी आमच्याकडे येऊन आमचे कल्याण केले आहे. त्यांनी आमच्या गोशाळेंत सुखाने बसावे आणि त्यांच्या सुंदर आवाजाने ती (गोशाळा) भरुन जाऊ दे. या विविध रंगांच्या गायी अनेक प्रकारची वासरे जन्मास घालूं देत. आणि इंद्राच्या यजनासाठी (पूजनासाठी) उषःकालाच्या आधी दूध देणारी होवो.
३) त्या गायी नष्ट न होवोत. त्यांना चोर चोरुन न नेवो. त्यांना शत्रु त्रास न देवो. ज्या गायींच्यामुळे त्यांचा मालक देवतांचे यजन करण्यास व दान देण्यास समर्थ होतो, त्या नेहमी त्याच्याजवळ कायम (जोडलेल्या) राहोत.
४) गायी आमचे मुख्य धन होवोत. इन्द्र आम्हाला गोधन देवो. तसेच यज्ञांची मुख्य वस्तु सोमरसाच्या बरोबरीने दूध हाही नैवेद्य बनो. ज्याच्याजवळ गायीं आहेत तो एकप्रकारे इंद्रच आहे. मी श्रद्धायुक्त अंतःकरणाने गायीपासून प्राप्त झालेल्या (दूध, तूपआदी) पदार्थांनी इन्द्र देवांचे पूजन करु इच्छितो. 
५) गायीनो ! तुम्ही कृश शरीराच्या व्यक्तिस धष्ट-पुष्ट बनवता. तेजोहिनाला सुंदर (तेजस्वी) बनविता. आमच्या घर आपल्या मंगलमय हंबरड्याने मंगलमय बनविता. म्हणूनच सभांमध्ये तुमचेच महात्म्य गायीले जाते. 

६) गायींनो तुम्ही पुष्कळ वासरांना जन्म द्या. तुम्हाला चरण्यासाठी चांगला चारा मिळो. चांगल्या जलाशयांतील स्वच्छ पाणी तुम्हाला पिण्यास मिळो. तुम्ही चोर व दुष्ट हिंसक जीवांपासून सावध रहा आणि रुद्राचे शस्त्र तुमचे सर्व बाजूंनी रक्षण करो.  
Go (Cow) Sukta
गो-सूक्त 


Custom Search
Post a Comment