Saturday, March 21, 2015

ShriRam MangalaShanam श्रीराममङ्गलाशासनम्


ShriRam MangalaShanam 
ShriRam MangalaShanam is in Sanskrit. It is a beautiful creation of Shri Varvarmuni.We are celebrating GudiPadva Today on 21st March 2015 which is the first day of the year for us, Hence I am uploading ShriRam MangalaShasanam.
श्रीराममङ्गलाशासनम्
मङ्गलं कौशलेन्द्राय महनीयगुणाब्धये । 
चक्रवर्तितनूजाय सार्वभौमाय मङ्गलम् ॥ १ ॥
वेदवेदन्तवेद्याय मेघश्यामलमूर्तये । 
पुंसां मोहनरुपाय पुण्यश्लोकाय मङ्गलम् ॥ २ ॥
विश्र्वामित्रान्तरङ्गाय मिथिलानगरीपतेः ।
भाग्यानां परिपाकाय भव्यरुपाय मङ्गलम् ॥ ३ ॥
पितृभक्ताय सततं भ्रातृभिः सह सीतया ।
नन्दिताखिललोकाय रामभद्राय मङ्गलम् ॥ ४ ॥
त्यक्तसाकेतवासाय चित्रकूटविहारिणे ।
सेव्याय सर्वयमिनां धीरोदयाय मङ्गलम् ॥ ५ ॥
सौमित्रिणा च जानक्या चापबाणासिधारिणे ।
संसेव्याय सदा भक्त्या स्वामिने मम मङ्गलम् ॥ ६ ॥
दण्डकारण्यवासाय खरदूषणशत्रवे ।
गृध्रराजाय भक्ताय मुक्तिदायास्तु मङ्गलम् ॥ ७ ॥
सादरं शबरीदत्तफलमूलाभिलाषिणे ।
सौलभ्यपरिपूर्णाय सत्त्वोद्रिक्ताय मङ्गलम् ॥ ८ ॥
हनुमत्समवेताय हरीशाभीष्टदायिने ।
बालिप्रमथनायास्तु महाधीराय मङ्गलम् ॥ ९ ॥
श्रीमते रघुवीराय सेतुल्लङ्घितसिन्धवे ।
जितराक्षसराजाय रणधीराय मङ्गलम् ॥ १० ॥
बिभीषणकृते प्रीत्या लङ्काभीष्टप्रदायिने ।
सर्वलोकशरण्याय श्रीराघवाय मङ्गलम् ॥ ११ ॥
आसाद्य नगरीं दिव्यामभिषिक्ताय सीतया ।
राजाधिराजराजाय रामभद्राय मङ्गलम् ॥ १२ ॥
ब्रह्मादिदेवसेव्याय ब्रह्मण्याय महात्मने ।
जानकीप्राणनाथाय रघुनाथाय मङ्गलम् ॥ १३ ॥
श्रीसौम्यजामातृमुनेः कृपयास्मानुपेयुषे ।
महते मम नाथाय रघुनाथाय मङ्गलम् ॥ १४ ॥
मङ्गलाशासनपरैर्मदाचार्यपुरोगमैः ।
सर्वैश्र्च पूर्वैराचार्यैः सत्कृतायास्तु मङ्गलम् ॥ १५ ॥
रम्यजामातृमुनिना मङ्गलाशासनं कृतम् ।
त्रैलोक्याधिपतिः श्रीमान् करोतु मङ्गलं सदा ॥ १६ ॥
॥ इति श्रीवरवरमुनिस्वामिकृत श्रीराममङ्गलाशासनं सम्पूर्णम् ॥
श्रीराममङ्गलाशासनंचा मराठी अर्थ:
१) प्रशंसनीय गुणांचे सागर असलेल्या कौशलेन्द्र श्रीरामचमद्रांचे मंगल होवो. चक्रवर्ती राजा दशरथाचे पुत्र सार्वभौम श्रीरामचंद्रांचे मंगल होवो.
२) ज्यांना वेद, वेदान्त ज्ञात आहेत, मेघासारखे श्यामरंगाचे आहेत, पुरुषांमध्ये जे अत्यंत स्वरुपवान आहेत, त्या पुण्यश्र्लोक श्रीरामांचे मंगल होवो.
३) जे विश्र्वामित्र ऋषिचे आवडते आणि राजा जनकाचे भाग्य उजळवणारे आहेत त्या भव्यरुपवान श्रीरामांचे मंगल होवो.
४) जे नेहमीच आदर्श पितृभक्त आहेत, जे आपल्या बंधू आणि पत्नी सीतेबरोबर शोभून दिसतात, ज्यानी सर्व लोकांना आनंदी केले आहे, अशा श्रीरामांचे मंगल होवो. 
५) ज्यांनी अयोध्येचा राजवाडा सोडून चित्रकूत पर्वतावर निवास केला, जे सर्व यती लोकांचे सेव्य आहेत त्या धीरोदात्त श्रीरामांचे मंगल होवो. 
६) लक्ष्मण व जानकी ज्यांची सेवा करतात, ज्यांनी धनुष्य-बाण व तलवार धारण केलेली आहे त्या माझ्या स्वामी रामचंद्राचे ममगल होवो.
७) ज्यांनी दण्डकवनांत निवास केला आहे, जे खर-दूषणाचे शत्रु आहेत  ज्यांनी आपला भक्त गृधराजाला मुक्ति दिली त्या प्रभु रामचंद्रांचे मंगल होवो.
८) जे आदराने शबरीने दिलेल्या फल-मूलांचे अभिलाषी झाले, जे सुलभतेने प्राप्त होऊ शकतात आणि जे अत्यंत सत्वगुणी आहेत त्या श्रीरामांचे मंगल होवो. 
९) जे सदा हनुमानाशी जोडलेले आहेत, जे सुग्रीवाचे अभिष्ट करणारे आहेत आणि वालीला मारणारे आहेत त्या श्रीरामांचे मंगल असो.
१०) ज्यांनी सेतु बांधुन समुद्राला पार केले आणि राक्षसराज रावणावर विजय मिळविला त्या रणधीर श्रीरघुवीरांचे मंगल होवो.
११) ज्यांनी आनंदाने बिभीषणाकडे लंकेचे राज्य सोपविले, जे सर्व लोकांना आपल्या संरणांत ठेवतात, त्या श्रीराघव रघुभद्राचे मंगल होवो.
१२) वनामधून दिव्य नगरी अयोध्येला आल्यावर ज्यांचा सीतेसह राज्याभिषेक झाला, त्या महाराज्याचे राजा असणार्‍या राजा रानभद्राचे मंगल असो.
१३) जे ब्रह्मदेव व इतर देवांना पूजनीय सेव्य आहेत, ब्राह्मणांची व वेदांची रक्षा करणारे आहेत, जे जानकीचे प्राणनाथ आहेत, त्या रघुकुल नाथ श्रीरामांचे मंगल होवो. 
१४) जे श्रीसम्पन्न सुन्दर आकार असणारे जामाता मुनिंच्या कृपेने आम्हाला प्राप्त झाले त्या प्रभु रामचंद्रांचे मंगल होवो.
१५) माझे आचार्य ज्यांत मुख्य आहेत अशा प्राचीन आचार्यांनी मंगलाचरणांत परायण होऊन ज्यांचा सत्कार केला आहे त्या श्रीरामचंद्रांचे मंगल होवो. 
१६) जामातामुनिंनी या सुंदर मंगलाचरणाला निर्माण केले ह्याने प्रसन्न होऊन तीन लोकांचे अधिपती श्रीमान् रामचंद्र आमचे सदा मंगल करोत.          

ShriRam MangalaShanam 
श्रीराममङ्गलाशासनम्


Custom Search

No comments: