Wednesday, September 14, 2016

HaridraGanesh Kavacham हरिद्रागणेश कवचं


HaridraGanesh Kavacham 
HaridraGanesh Kavacham is in Sanskrit. It is from Viswasartantre. It is told to Goddess Paravati by God Shankar. It destroys all sins, gives health, wealth and protects the reciter from enemies.
हरिद्रागणेश कवचं
ईश्र्वर उवाच
शृणु वक्ष्यामि कवचं सर्व सिद्धिकरं प्रिये ।
पठित्वा पाठयित्वा च मुच्यते सर्व सङ्कटात् ॥ १ ॥
अज्ञात्वा कवचं देवि गणेशस्य मनुंजपेत् ।
सिद्धिर्न जायते तस्य कल्पकोटिशतैरपि ॥ २ ॥
ॐ आमोदश्र्च शिरः पातु प्रमोदश्र्च शिखोपरि ।
संमदो भ्रुयुगे पातु भ्रूमध्ये च गणाधिपः ॥ ३ ॥
गणक्रीडो नेत्रयुगं नासायांगणनायकः ।
गणक्रीडान्वितः पातु वदने सर्वसिद्धयो ॥ ४ ॥
जिव्हायां सुमुखः पातु ग्रीवायां दुर्मुखः सदा ।
विघ्नेशो हृदये पातु विघ्ननाथश्र्च वक्षसि ॥ ५ ॥
गणानां नायकः पातु बाहुयुग्मं सदत्मम ।
विघ्नहर्ता च ह्युदरे विघ्नकर्ता च लिङ्ग के ॥ ६ ॥
गजवक्र कटीदेशे एकदन्तो नितम्बके ।
लम्बोदरः सदा पातु गुह्यदेशे ममारुणः ॥ ७ ॥
व्यालयज्ञोपवीतीमां पातु पाद्युगे सदा ।
जापकः सर्वदा पातु जानुजङ्घे गणाधिपः ॥ ८ ॥
हरिद्रः सर्वदा पातु सर्वांग गणनायकः ।
य इदं प्रपठे नित्यं गणेशस्य महेश्र्वरि ॥ ९ ॥ 
कवचं सर्व सिद्धाख्यं सर्व विघ्न विनाशनम् ।
सर्व सिद्धि करं साक्षात् सर्व पाप विमोचनम् ॥ १० ॥
सर्व सम्पत्प्रदं साक्षात् सर्व शत्रु क्षयंकरम् ॥ ११ ॥
ग्रहपीडा ज्वरारोगा चान्ये गुह्य कायदतः ।
पठनाद्धारणादेव नाशमायान्ति तत्क्षणात् ॥ १२ ॥
धनधान्यं करं देवि कवचं सुरपूजितम् ।
समं नास्ति महेशानि त्रैलोक्ये कवचस्य च ॥ १३ ॥
हारिद्रस्य महेशानि कवचस्य च भूतले ।
किमत्यै रसदालयैः यत्रायुः व्ययतामियात् ॥ १४ ॥  
॥ इति विश्र्वसारतन्त्रे हरिद्रा गणेश कवचं संपूर्णम् ॥  
मराठी अनुवाद (स्वैर)
शंकर म्हणाले
१) प्रिये ! सर्व सिद्धि देणारे असे कवच मी तुला सांगतो ते तू ऐक. या कवचाचा पाठ केल्याने किंवा करवून घेतल्याने सर्व सङ्कटांतुन आपली सुटका होते.
२) जर हे कवच जाणून न घेता एखाद्या माणसाने गणेशाचा जप केला तर शेकडो कल्प प्रयत्न करुनही त्याला सिद्धि मिळणार नाही.
३-९) हे आमोदा माझ्या मस्तकाचे रक्षण कर. प्रमोदा माझ्या शेंडीच्या वरच्या भागाचे रक्षण कर. संमोदा माझ्या दोन्ही भुवयांचे आणि गणाधिपा भ्रूमध्याचे रक्षण कर. गणक्रीडा माझ्या दोन्ही डोळ्यांचे , गणनायका माझ्या नाकाचे रक्षण कर. सर्वसिद्धि देणार्‍या गणक्रीडा माझ्या वदनाचे रक्षण कर.सुमुखा माझ्या जिव्हेचे आणि दुर्मुखा माझ्या ग्रीवेचे रक्षण कर.विघ्नेशा माझ्या हृदयाचे आणि विघ्ननाथा माझ्या छातीचे रक्षण कर. हे गणांचे नेतृत्व करणार्‍या सेनापती, माझ्या दोन्ही बाहूंचे नेहमी रक्षण कर. विघ्नहर्त्या माझ्या उदराचे आणि विघ्नकर्त्या माझ्या लिंगाचे रक्षण कर. गजवक्त्रा माझ्या कंबरेचे आणि हे एकदन्ता माझ्या नितम्बांचे रक्षण कर. हे तेजस्वी लम्बोदरा माझ्या गुह्यदेशाचे सदैव रक्षण कर. हे व्यालयज्ञोपवीती माझ्या दोन्ही पायांचे सदैव रक्षण कर. हरिद्रा माझे नेहमीच रक्षण कर.गणनायका माझ्या सर्वांगाचे सदैव रक्षण कर. 
या गणेशाच्या कवचाचा माहेश्र्वरीचा नित्य पाठ करणार्‍याचे सदैव रक्षण कर.
१०-१३) सर्व सिद्धि देणारे, सर्व विघ्नांचा नाश करणारे, सर्व सिद्धि करणारे,सर्व प्रकारच्या पापांचा साक्षात् नाश करणारे, सर्व प्रकारची संपत्ति देणारे, सर्व शत्रूंचा नाश करणारे, ग्रहपीडा, ज्वररोग, आणि अन्य गुह्य संकटे आदी व्याधींचा हे कवच धारण केल्याने, या कवचाचा पाठ केल्याने त्याच क्षणी नाश होतो. हे देवी त्रैलोक्यामध्ये महेशाने आणि देवांनीही पूजा केलेले धनधान्य देणारे दुसरे कवच नाही.
१४) असे हे महेशाने सांगितलेले हरिद्रागणेश कवच या भूतलावर असताना
अन्य गोष्टींमध्ये व्यर्थ आयुष्य कां घालवायचे ?

अशा रीतीने विश्र्वसारतंत्रांतील हे हरिद्रा गणेश कवच संपूर्ण झाले.
HaridraGanesh Kavacham
हरिद्रागणेश कवचं


Custom Search
Post a Comment