Monday, June 20, 2016

Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 10 विभूतियोग अध्याय १०


Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 10 
Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 10 is in Sanskrit. Name of this adhyay is Vibhuti Yoga. Here in this Adhyay 10 Bhagwan ShriKrishna is telling Arjuna, many of his main vibhuties. Finally he also told him that there is not a single thing in which he is not present.
विभूतियोग अध्याय १०
श्रीभगवानुवाच
भूय एव महाबाहो श्रृणु मे परमं वचः ।
यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया ॥ १ ॥
न मे विदुः सुरगणाः प्रभवं न महर्षयः ।
अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः ॥ २ ॥
यो मामजमनादिं च वेत्ति लोकमहेश्र्वरम् ।
असम्मूढः स मर्त्येषु सर्वपापैः प्रमुच्यते ॥ ३ ॥
बुद्धिर्ज्ञानमसम्मोहः क्षमा सत्यं दमः शमः ।
सुखं दुःखं भवोऽभावो भयं चाभयमेव च ॥ ४ ॥
अहिंसा समता तुष्टिस्तपो दानं यशोऽयशः ।
भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः ॥ ५ ॥
महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा ।
मद्भावा मानसा जाता येषां लोक इमाः प्रजाः ॥ ६ ॥
एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः ।
सोऽविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः ॥ ७ ॥
अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते ।
इति मत्वा भजन्ते मां बुधा भवसमन्विताः ॥ ८ ॥
मच्चित्ता मद्गतप्राणा बोधयन्तः परस्परम् ।
कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च ॥ ९ ॥
तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम् ।
ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते ॥ १० ॥
तेषामेवानुकम्पार्थमहमज्ञानजं तमः ।
नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता ॥ ११ ॥
अर्जुन उवाच
परं ब्रहं परं धाम पवित्रं परमं भवान् ।
पुरुषं शाश्वतं दिव्यमादिदेवमजं विभुम् ॥ १२ ॥ 
आहुस्त्वामृषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा ।
असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे ॥ १३ ॥
सर्वमेतदृतं मन्ये यन्मां वदसि केशव ।
न हि ते भगवन्व्यक्तिं विदुर्देवा न दानवाः ॥ १४ ॥
स्वयमेवात्मनात्मानं वेत्थ त्वं पुरुषोत्तम ।
भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते ॥ १५ ॥
वक्तुमर्हस्यशेषेण दिव्या ह्यात्मविभूतयः ।
याभिर्विभूतिभिर्लोकानिमांस्त्वं व्याप्य तिष्ठसि ॥ १६ ॥
कथं विद्यामहं योगिंस्त्वां सदा परिचिन्तयन् ।
केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया ॥ १७ ॥
विस्तरेणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन ।
भूयः कथय तृप्तिर्हि श्रृण्वतो नास्ति मेऽमृतम् ॥ १८ ॥
श्रीभगवानुवाच
हन्त ते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतयः ।
प्राधान्यतः कुरुश्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे ॥ १९ ॥
अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः ।
अहमादिश्र्च मध्यं च भूतानामन्त एव च ॥ २० ॥
आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषां रविरंशुमान् ।
मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशी ॥ २१ ॥
वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः । 
इन्द्रियाणां मनश्र्चास्मि भूतानामस्मि चेतनाः ॥ २२ ॥
रुद्राणां शङ्करश्र्चास्मि वित्तेशो यक्षरक्षसाम् ।
वसूनां पावकश्र्चास्मि मेरुः शिखरिणामहम् ॥ २३ ॥
पुरोधसां च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिम् ।
सेनानीनामहं स्कन्दः सरसामस्मि सागरः ॥ २४ ॥
महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम् ।
यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः ॥ २५ ॥
अश्र्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः ।
गन्धर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः ॥ २६ ॥
उच्चैःश्रवसमश्वानां विद्धि माममृतोद्भवम् ।
ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम् ॥ २७ ॥      
आयुधानामहं वज्रं धेनूनामस्मि कामधुक् ।
प्रजनश्चास्मि कन्दर्पः सर्पाणामस्मि वासुकिः ॥ २८ ॥
अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहम् ।
पितृणामर्यमा चास्मि यमः संयमतामहम् ॥ २९ ॥
प्रह्लादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहम् ।
मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणाम् ॥ ३० ॥
पवनः पवतामस्मि रामः शस्त्रभृतामहम् ।
झषाणां मकरश्चास्मि स्त्रोतसामस्मि जाह्नवी ॥ ३१ ॥
सर्गाणामादिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुन ।
अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहम् ॥ ३२ ॥
अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च ।
अहमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतोमुखः ॥ ३३ ॥
मृत्युः सर्वहरश्र्चाहमुद्भवश्र्च भविष्यताम् ।
कीर्तिः श्रीर्वाक्च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा ॥ ३४ ॥
बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम् ।
मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकरः ॥ ३५ ॥
द्यूतं छलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् ।
जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्त्वं सत्त्ववतामहम् ॥ ३६ ॥
वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनञ्जयः ।
मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुशना कविः ॥ ३७ ॥
दण्डो दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषताम् ।
मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहम् ॥ ३८ ॥
यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन ।
न तदस्ति विना यत्स्यान्मया भूतं चराचरम् ॥ ३९ ॥
नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप ।
एष तूद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया ॥ ४० ॥
यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा ।
तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोंऽशसम्भवम् ॥ ४१ ॥
अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन ।
विष्टभ्याहमिदं कृत्स्नमेकांशेन स्थितो जगत् ॥ ४२ ॥
॥ हरि ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे विभूतियोगो नाम  दशमोऽध्यायः ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
मराठी अर्थ
श्रीभगवान म्हणाले
१) हे पराक्रमी अर्जुना, पुनः आणखी एक माझें श्रेयस्कर भाषण ऐक. माझा उपदेश ऐकून संतोष पावणार्‍या तुला तें मी तुझ्या हितासाठीं सांगत आहे.
२) माझा जन्म केव्हां झाला हे देव आणि महर्षीही जाणत नाहींत कारण मीच त्या देवांचें आणि महर्षींचे सर्वप्रकारें आदिकारण आहें. 
३) जो मला (मी) जन्मरहित, अनादि व सर्व लोकांचा महेश्र्वर असें जाणतो, तो मनुष्यांमध्यें मोहरहित होऊन सर्व पापांपासून मुक्त होतो.
४-५) बुद्धि, ज्ञान,जागरुकता, क्षमा, सत्य, इंद्रियनिग्रह, शांति, सुख, दुःख, उत्पत्ति, लय, भय, अभय, अहिंसा, समता, संतोष, तप, दान, यश, अपयश इत्यादि निरनिराळ्या प्रकारचे प्राण्यांचे भाव माझ्यापासून उत्पन्न होतात.
६) सात महर्षि, तसेच पूर्वीचे चार मनु, ज्यांपासून या लोकांमध्ये ही प्रजा उत्पन्न झाली, ते माझेच मानस, म्हणजे मनानें निर्माण केलेले भाव होत.
७) जो पुरुष माझी ही विभूति म्हणजे विस्तार आणि योगशक्ति खरोखरच जाणतो,  त्याला स्थिर कर्मयोग प्राप्त होतो, ह्यांत संशय नाहीं.
८) मी सर्वांचे उत्पत्तिस्थान असून, माझ्यामुळेंच सर्व जग कार्यांत प्रवृत्त होतें असें जाणून शहाणे पुरुष मला भावानें भजतात.
९) तें माझ्या ठिकाणीं चित्त लावून व माझ्या ठिकाणीं प्राण अर्पण करुन, परस्परांना मजविषयीं बोध करीत, माझ्या गुणलिलांचे कीर्तन करीत, त्यांतच नेहमीं संतोष व आनंद पावतात.
१०) अशा नेहमीं युक्त म्हणजे समाधानानें राहून प्रेमपूर्वक भजन करणार्‍या भक्तांना ज्यायोगें ते मला प्राप्त होतील, असा समत्वबुद्धियोग मी देतों.
११) त्या भक्तांवर कृपा करण्यासाठींच त्यांच्या हृदयांत शिरुन मी तेजस्वी ज्ञानरुप दिव्यानें त्यांचा अज्ञानजन्य अंधकार नाहींसा करतों.
अर्जुन म्हणाला 
१२-१३) श्रीकृष्णा, तूं परब्रह्म, श्रेष्ठस्थान व परम पवित्र वस्तु आहेस. तुला अविनाशी दिव्य पुरुष, देवाधिदेव, जनमरहित व व्यापक असें प्राचीन ऋषि देवर्षि नारद, असित, देवल व व्यास हे म्हणतात आणि तूं स्वतःही मला तेंच सांग त आहेस.    
१४) हे केशवा, तूं जें सांगतोस तें मी सत्य मानितो. हे भगवंता, देवांना आणि दानवांना तुझें मूळ कळलेलें नाही.
१५) हे भूतभावना, भूतेशा, देवाधिदेवा जगत्पते, हे पुरुषोत्तमा ! तूं स्वतःच आपण आपल्याला जाणतोस.
१६) ज्या विभूतींनीं तूं ह्या जगांत भरुन राहिला आहेस, त्या सर्व दिव्य विभूति तूंच मला सांग. 
१७) हे योगेश्र्वरा, मी कशा रीतीनें निरंतर चिंतन करीत तुला जाणावें बरें ? आणि कोणकोणत्या पदार्थांमध्यें मीं तुझें चिंतन करावें ?
१८) हे जनार्दना, तुझी विभूति व योग विस्तारानें सांग, कारण तुझें अमृतासारखें भाषण ऐकत असतां माझी तृप्ति होत नाहीं.
श्रीभगवान म्हणाले
१९) हे कुरुश्रेष्ठा, ठीक आहे तुला मी आपल्या मुख्य मुख्य दिव्य विभुति सांगतो. कारण माझ्या विभूतींच्या विस्ताराला अंतच नाही.
२०) हे गुडाकेशा, सर्व भूतांच्या अंतरीं असणारा आत्मा मी आहें. सर्व भूतांचा आदि, मध्य व अंतही मीच आहे.
२१) अदितीच्या द्वादशपुत्रांमध्ये म्हणजे आदित्यांमध्ये विष्णु मी, तेजस्व्यांमध्ये किरणशाली सूर्य मी, सात किंवा एकूणचाळीस मरुतांत मरीचि मी व नक्षत्रांत चंद्रमा मी आहे.
२२) तीन वेदांमध्ये सामवेद मी, स्वर्गीय देवांमध्ये इंद्र मी, इंद्रियांतील मन मी व प्राण्यांमधील चैतन्य मी आहे.
२३) एकादश रुद्रांमध्ये शंकर मी, यक्षराक्षसांमध्येकुबेर मी, वसूंमध्ये अग्नि मी आणि पर्वतांमध्ये मेरु मीच आहे.
२४) हे अर्जुना, पुरोहितांमध्यें मुख्य जो बृहस्पति तो मी, सेनापतींमध्यें कार्तिकस्वामी मी व जलाशयांमध्यें समुद्र मीच आहे.
२५) महर्षींमध्यें भृगु मी, वाणीमध्ये एकाक्षर ॐ मी आहे. सर्व प्रकारच्या यज्ञांमध्यें जपयज्ञ व स्थावरांमध्यें हिमालय मी आहे.
२६) सर्व वृक्षांमध्यें पिंपळ वृक्ष मी, देवर्षींमध्यें नारद मी, गंधर्वांमध्ये चित्ररथ गंधर्व मी व सिद्ध लोकांत कपिल मुनि मी आहे.
२७) अश्र्वांमध्यें अमृतमंथनाचे वेळीं उत्पन्न झालेला उच्चैःश्रवा नांवाचा अश्र्व मी आहे. गजेंद्रामध्ये ऐरावत व मनुष्यांमध्यें राजा मी आहे. 
२८) शस्त्रांमध्ये इंद्राचे वज्र, व गाईमध्यें कामधेनु मी आहे. प्रजोत्पत्ति करणारा काम व सर्पामध्यें वासुकि सर्प मी आहे.
२९) नागांमध्यें अनंत (शेष) मी व जलचरांमध्ये वरुण मी आहे. पितृगणांमध्यें अर्यमा, व निग्रह करणार्‍यांत यमधर्म मी आहे.
३०) दैत्यांमध्यें प्रल्हाद मी व ग्रासणार्‍यांत काळ मी आहे. पशूंमध्यें सिंह मी आहे. व पक्ष्यांमध्यें गरुड मी आहे.
३१) वेगवानांत वायु मी व शस्त्र धारण करणार्‍यांत राम मी आहे. जलचर प्राण्यांत मी मगर आहें. व नद्यांमध्ये गंगा (भागीरथी) नदी मी आहे. 
३२) हे अर्जुना, सृष्टीचा आदि, अंत व मध्य मी असून सर्व विद्यांमध्ये अध्यात्मविद्या मी आहे. तसेंच वाद करणारांचा ( तत्त्वनिर्णयासाठी केला जाणारा) वाद मी आहे.
३३) वर्णमालेंतले अ हें अक्षर मी आहे. शब्दाच्या समासांत द्वंद्वसमास मी आहे. अक्षय काल मी आहे. व चारही बाजूंनी मुखें असणारा धाता म्हणजे ब्रह्मदेव मी आहे. 
३४) सर्वांचा नाश करणारा मृत्यु मी असून पुढें उत्पन्न होणार्‍या वस्तूंचा उगमही मीच आहे. स्त्रीलिंगवाचक वस्तूमध्यें कीर्ति, श्री, वाणी, स्मृति, मेधा, धृति व क्षमा मी आहे. 
३५) गावयाच्या वैदिक स्तोत्रांत बृहत्साम स्तोत्र मी व छंदांमध्ये गायत्री छंद मी आहे. मासांमध्यें मार्गशीर्ष व ऋतूंमध्यें वसंत मी आहे. 
३६) कपटाचरण करणार्‍यांचा जुगार मी असून तेजस्वी वस्तूंमधिल तेज मी आहे. (विजयी पुरुषांचा) जय मी आहे. निश्र्चय मी आहे. सात्त्विकांचा सत्त्वगुण मी आहे.
३७) यादवांमध्यें वासुदेव मी व पाडंवांमध्ये धनंजय मी आहे. मुनींमध्यें व्यास व कवींमध्यें शुक्राचार्य मी आहे.
३८) शासन करणारांचे साधन जो दंड तो मी आहे. जयाची इच्छा करणारांमध्ये नीति म्हणजे मसलत मी आहे. गुह्यापैकीं मौनही मी आहे, आणि ज्ञानी लोकांचे ज्ञानही मीच आहे. 
३९) अर्जुना, ह्याशिवाय आणखी सर्व पदार्थांचे बीज तें मीच; मी ज्यात नसेन अशी वस्तूच चराचर सृष्टींत अस्तित्वांत नाही.
४०) हे अर्जुना, माझ्या दिव्य विभूतींना अंत नाही. विभूतींचा हा विस्तार दिग्दर्शनार्थ मीं तुला सांगितला. 
४१) जो जो पदार्थ, वैभव, लक्ष्मी किंवा प्रभाव यांनी युक्त आहे, तो तो माझ्या तेजाच्या अंशापासून उत्पन्न झाला आहे असे समज.
४२) हे अर्जुना, तुला हा पसारा जाणून काय करावयाचें आहें ? थोडक्यांत सांगतों कीं, हे संपूर्ण विश्र्व, मी एका अंशानें व्यापून धारण करुन राहिलो आहे. 
अशा रीतीने श्रीकृष्णांनी गायिलेल्या उपनिषदांतील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रांतील ' विभूति योग ' ह्या नांवाचा दहावा अध्याय संपूर्ण झाला. 
Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 10 विभूतियोग अध्याय १०



Custom Search

No comments: