Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 6
Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 6 is in Sanskrit. Name of this adhyay is AatmaSayam Yoga. Here in this Adhyay 6 Bhagwan ShriKrishna is telling Arjuna, that a mind developed through the training of Yoga, is taught to come under the intelligent will of its determined trainer, the very seeker. The mind then is a better equipped instrument for higher purposes of Self-contemplation and Self unfoldment.
आत्मसंयम योग अध्याय ६
श्रीभगवानुवाच
आनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः ।
स सन्न्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः ॥ १ ॥
यं सन्न्यासमिति प्राहुर्योगं तं विद्धि पाण्डव ।
न ह्यसन्न्यस्तसङ्कल्पो योगी भवति कश्र्चन ॥ २ ॥
आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते ।
योगारुढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते ॥ ३ ॥
यदा हि नेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्जते ।
सर्वसङ्कल्पसन्न्यासी योगारुढस्तदोच्यते ॥ ४ ॥
उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् ।
आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः ॥ ५ ॥
बन्धुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः ।
अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत् ॥ ६ ॥
जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः ।
शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयोः ॥ ७ ॥
ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः ।
युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्चनः ॥ ८ ॥
सुहृन्मित्रार्युदासीनमध्यस्थद्वेष्यबन्धुषु ।
साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते ॥ ९ ॥
योगी युञ्जीत सततमात्मानं रहसि स्थितः ।
एकाकी यतचित्तात्मा निराशीरपरिग्रहः ॥ १० ॥
शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः ।
नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरम् ॥ ११ ॥
तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः ।
उपविश्यासने युञ्ज्याद्योगमात्मविशुद्धये ॥ १२ ॥
समं कायशिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिरः ।
सम्प्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्र्चानवलोकयन् ॥ १३ ॥
प्रशान्तात्मा विगतभीर्ब्रह्मचारिव्रते स्थितः ।
मनः संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः ॥ १४ ॥
युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः ।
शान्तिं निर्वाणपरमां मत्संस्थामधिगच्छति ॥ १५ ॥
नात्यश्र्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्र्नतः ।
न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन ॥ १६ ॥
युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु ।
युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा ॥ १७ ॥
यदा विनियतं चित्तमात्मन्येवावतिष्ठते ।
निःसृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा ॥ १८ ॥
यथा दीपो निवातस्थो नेङ्गते सोपमा स्मृता ।
योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः ॥ १९ ॥
यत्रोपरमते चित्तं निरुद्धं योगसेवया ।
यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति ॥ २० ॥
सुखमात्यन्तिकं यत्तद्बुद्धिग्राह्यमतीन्द्रियम् ।
वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्र्चलति तत्त्वतः ॥ २१ ॥
यं लब्धा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः ।
यस्मिन्स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते ॥ २२ ॥
तं विद्याद् दुःखसंयोगवियोगं योगसञ्ज्ञितम् ।
स निश्र्चयेन योक्तव्यो योगोऽनिर्विण्णचेतसा ॥ २३ ॥
सङ्कल्पप्रभवान्कामांस्त्यक्त्वा सर्वानशेषतः ।
मनसैवेन्द्रियग्रामं विनियम्य समन्ततः ॥ २४ ॥
शनैः शनैरुपरमेद्बुद्ध्या धृतिगृहीतया ।
आत्मसंस्थं मनः कृत्वा न किञ्चिदपि चिन्तयेत् ॥ २५ ॥
यतो यतो निश्र्चरति मनश्र्चञ्चलमस्थिरम् ।
ततस्ततो नियम्यैतदात्मन्येव वशं नयेत् ॥ २६ ॥
प्रशान्तमनसं ह्येनं योगिनं सुखमुत्तमम् ।
उपैति शान्तरजसं ब्रह्मभूतकल्मषम् ॥ २७ ॥
युञ्जन्नेवं सदात्मानं योगी विगतकल्मषः ।
सुखेन ब्रह्मसंस्पर्शमत्यन्तं सुखमश्र्नुते ॥ २८ ॥
सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ।
ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः ॥ २९ ॥
यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति ।
तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति ॥ ३० ॥
सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः ।
सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते ॥ ३१ ॥
आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन ।
सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः ॥ ३२ ॥
अर्जुन उवाच
योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन ।
एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वात्स्थितिं स्थिराम् ॥ ३३ ॥
चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद्दृढम् ।
तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम् ॥ ३४ ॥
श्रीभगवानुवाच
असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् ।
अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते ॥ ३५ ॥
असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः ।
वश्यात्मना तु यतता शक्योऽवाप्तुमुपायतः ॥ ३६ ॥
अर्जुन उवाच
अयतिः श्रद्धयोपेतो योगाच्चलितमानसः ।
अप्राप्य योगसंसिद्धिं कां गतिं कृष्ण गच्छति ॥ ३७ ॥
कच्चिन्नोभयविभ्रष्टश्छिन्नाभ्रमिव नश्यति ।
अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथि ॥ ३८ ॥
एतन्मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्यशेषतः ।
त्वदन्यः संशयस्यास्य छेत्ता न ह्युपपद्यते ॥ ३९ ॥
श्रीभगवानुवाच
पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते ।
न हि कल्याणकृत्कश्चिद्दुर्गतिं तात गच्छति ॥ ४० ॥
प्राप्य पुण्यकृतां लोकानुषित्वा शाश्वतीः समाः ।
शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते ॥ ४१ ॥
अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम् ।
एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदीदृशम् ॥ ४२ ॥
तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकम् ।
यतते च ततो भूयः संसिद्धौ कुरुनन्दन ॥ ४३ ॥
पूर्वाभ्यासेन तेनैव हिृयते ह्यवशोऽपि सः ।
जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्मातिवर्तते ॥ ४४ ॥
प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्धकिल्बिषः ।
अनेकजन्मसंसिद्धस्ततो याति परां गतिम् ॥ ४५ ॥
तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः ।
कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद्योगी भवार्जुन ॥ ४६ ॥
योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना ।
श्रद्धावान्भजते यो मां स मे युक्ततमो मतः ॥ ४७ ॥
॥ हरि ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे आत्मसंयमयोगो नाम षष्ठोऽध्यायः ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
मराठी अर्थ
श्रीभगवान म्हणाले
१) कर्माच्या फळाची अपेक्षा न करितां जो आपले कर्तव्यकर्म करतो, तोच संन्यासी व योगी होय. गृहस्थाश्रमाचा अग्निहोमाचा त्याग करणारा व कांहींही कर्म न करणारा संन्यासीही नव्हे व योगीही नव्हे.
२) हे अर्जुना, ज्याला संन्यास असें म्हणतात, तोच कर्मयोग आहे असे समज. कारण असें, कीं वासनांचा संन्यास केल्याविना कोणीही खरा कर्मयोगी होऊं शकत नाहीं.
३) योगसिद्धि संपादन करुं इच्छिणार्यास निष्काम कर्म हें साधन सांगितलें आहे आणि योग प्राप्ति झालेल्यास समत्व-बुद्धि स्थिर राखण्याला शांति हेंच साधन होय असें म्हणतात.
४) योगसिद्धि संपादन करुं इच्छिणार्यास निष्काम कर्म हें साधन सांगितलें आहे आणि योग प्राप्ति झालेल्यास समत्व-बुद्धि स्थिर राखण्याला शांति हेच साधन होय असें म्हणतात.
५) जेव्हां जो इंद्रियभोगाच्या व कर्माच्याही ठिकाणीं आसक्त होत नाहीं व सर्व वासनांचा त्याग करतो, तेव्हांच त्याला योगारुढ म्हणतात.
६) मनुष्यानें स्वतःच स्वतःचा उद्धार करावा. आपला नाश आपण करुन घेऊं नये. कारण आपणच आपला (मदत करणारा) बंधु व आपणच आपला शत्रु होय.
७) ज्यानें आपणच आपल्याला जिंकले, तो आपल्या स्वतःचा बंधु होतो. पण जो आपल्याला ओळखीत नाही, त्याचें तो स्वतःच शत्रूप्रमाणें वैर करितो.
८) ज्यानें आपले अंतःकरण जिंकले, अशा अत्यंत शांत झालेल्या पुरुषाचा परमात्मा शीत-उष्ण, सुख-दुःख त्याचप्रमाणें मानापमान इत्यादि द्वंद्वांविषयीं अत्यंत सम झालेला असतो.
९) आत्मज्ञान व इतर विविध (सृष्टि) ज्ञान ह्या दोहोनीं ज्यांचे अंतःकरण तृप्त झाले आहे, जो निर्विकार आहे; जो जितेंद्रिय आहे; मातीचें ढेकूळ, दगड व सोनें जो समान लेखतो असा जो त्यालाच योगी म्हणतात.
१०) हितकर्ता, मित्र, वैरी, तटस्थ, मध्यस्थ, द्वेष करण्यासारखा, बांधव, सज्जन आणि दुर्जन ह्यांविषयीं समबुद्धि ठेवणारा पुरुष विशेष योग्यतेचा होय.
११-१२) पवित्र व शुद्ध अशा भूमीवर आधी दर्भ, त्यावर हरणाचे कातडे, त्यावर वस्त्र अंथरुन, फार सखल नव्हे व फार उंच नव्हे , असे आपले आसन स्थिर मांडून त्या आसनावर बसून चित्त व इंद्रियें ह्यांचे व्यापार नियमित करुन व आपलें मन एकाग्र करुन चित्तशुद्धीसाठी योगाभ्यास करावा.
१३-१४) आसनावर निश्र्चल बसून पाठ, मान व डोकें एका रेषेंत धरुन, निश्र्चल होऊन, इकडे तिकडे न पाहातां, स्वतःच्या नाकाच्या शेंड्यावर दृष्ट लावून मन शांत व निर्भय ठेवून,ब्रह्मचर्यव्रतानें राहून, मनाचे पूर्ण संयमन करुन व तें केवळ माझ्या ध्यानाकडेच लावून मी हेंच सर्वस्व मानावें.
१५) ह्याप्रमाणें आपला योगाभ्यास सतत चालू ठेवणार्या आणि आपल्या मनाचें नियमन करणार्या योग्याला माझ्या ठायीं असणारी मोक्षरुप परमशांति प्राप्त होते.
१६) हे अर्जुना, अतिशय खाणाराला किंवा मुळींच न खाणाराला, अति झोपाळूला किंवा अति जागरण करणाराला हा योग साधत नाही.
१७) ज्याचा आहारविहार, कर्माचरण, निद्रा आणि जागृति हीं यथायोग्य असतात., त्यालाच हा दुःखनाशक योग साध्य होतो.
१८) जेव्हां त्याचें आवरलेले चित्त आत्म्याच्या ठिकाणी स्थिर होतें, आणि जेव्हां तो साधक सर्व वासना सोडून पूर्ण निरिच्छ होतो, तेव्हां तो योगी झाला असें म्हणतात.
१९) निवांत स्थळीं ठेवलेल्या दिव्याची ज्योत अगदीं निश्र्चल राहाते. हीच उपमा चित्त आवरुन आपला योगाभ्यास करणार्या योग्याला दिलेली आहे.
२०) ज्या स्थितींत योगाभ्यासानें नियमन केलेलें चित्त शांत होतें. ज्या स्थितींत तो शुद्धमनानें आत्म्याला पाहून आत्म्यांतच संतुष्ट होतो.
२१-२३) जे इंद्रियांनीं जाणणे अशक्य आहे व जें बुद्धीनेंच ग्रहण करण्यास योग्य असें निरतिशय सुख ज्या स्थितींत हा योगी अनुभवतो व ज्या तत्त्वापासून कधींच ढळत नाही; जी स्थिति प्राप्त झाल्यावर तिच्याहून दुसरा कोणताही लाभ अधिक वाटत नाही, आणि जेथें स्थिरावलाा म्हणजे कितीही मोठें दुःख असलें तरी तें (त्याला) तेथून चाळवूं शकत नाहीं; त्याला दुःखाच्या स्पर्शापासून वियोग म्हणजे " योग " ह्या नांवाची स्थिति समजतात; आणि हा " योग " मन कंटाळूं न देता निश्र्चयाने आचरला पाहिजे.
२४-२५) विषयचिंतनापासून उत्पन्न होणार्या सर्व वासनांचा सर्वस्वी त्याग करुन आणि इंद्रियसमूहांचे बाह्य विषयांपासून मनानेंच नियमन करुन, धैर्ययुक्त बुद्धीनें हळूहळू क्रमानें मन आत्मस्वरुपाचे ठिकाणी स्थिर करावें. इतर कशाचेंही चिंतन करुं नये.
२६) स्वभावतःच चंचल असें मन जिकडे तिकडे धांव घेईल, तिकडून तिकडून तें आवरुन आत्म्याच्या ताब्यांत आणावें.
२७) अशा रीतीनें रजोगुण शांत होऊन ज्याचें मन पूर्णपणें शांत झालें आहे, त्या ब्रह्मस्वरुप झालेल्या निष्पाप योग्यालाच उत्तम सुख प्राप्त होतें.
२८) ह्याप्रमाणें नेहमी अंतःकरण स्थिर ठेवणारा निष्पाप योगी ब्रह्मप्राप्तिरुप निरतिशय सुखाचा उपभोग सुखानें घेतो.
२९) योगयुक्त व सर्वत्र एकसारखेंच तत्त्व पाहणारा पुरुष सर्व प्राणीमात्रांमध्यें स्वतःला व स्वतःचे ठिकाणी सर्व प्राणिमात्र पाहतो.
३०) जो पुरुष सर्वत्र मला पाहतो व माझ्याठायीं सर्व पाहातो त्याला मी कधीं दृष्टीआड नाही व तोही मला कधी दृष्टीआड होत नाही.
३१) जो योगी सर्व भूतांत असणार्या मला अभेदबुद्धीने भजतो, तो कशाही प्रकारें वर्तत असला तरी माझ्याच ठिकाणीं राहातो.
३२) अर्जुना, आपणाला जसें सुखदुःख, तसेंच सर्व जीवमात्रांना होतें अशा दृष्टीनें जो सर्वत्र सारखें पाहूं लागतो, तो योगी सर्वांत श्रेष्ठ होय.
अर्जुन म्हणाला
३३) हे कृष्णा, साम्यबुद्धीनें प्राप्त होणारा जो हा योग तूं सांगितलास, तो मनाच्या चांचल्यामुळें (माझ्यांत) कायमचा टिकेल असें मला वाटत नाही.
३४) कारण हे कृष्णा, मन हें चंचल, दांडगें, बलिष्ठ व दृढ म्हणजे वळविण्यास कठीण आहे. त्याला आवरणे हें वार्याची मोट बांधण्यासारखेंच अत्यंत कठीण वाटते.
श्रीभगवान म्हणाले,
३५) हे पराक्रमी अर्जुना, हे मन चंचल व आवरण्यास कठीण आहे यांत शंका नाही. पण हे कौन्तेया ! अभ्यासानें व वैराग्यानें ते स्वाधीन ठेवतां येतें.
३६) ज्याचें मन स्वाधीन नाही, त्याला हा योग साधणें फार कठीण असें माझें मत आहे. पण मन ताब्यांत ठेवणार्या पुरुषाला उपायानें आणि प्रयत्नानें हा योग साधणें शक्य आहे.
अर्जुन म्हणाला
३७) हे कृष्णा, एखादा पुरुष श्रद्धेनें युक्त असून देखील प्रयत्न ढिला पडल्यामुळें योगाची सिद्धि प्राप्त होण्यापूर्वींच योगापासून चलितचित्त झाला, तर त्याची पुढें काय गति होते?
३८) हे कृष्णा, ब्रह्मप्राप्तीच्या मार्गांत मोहानें स्थिर न झाल्यास प्रपंच व परमार्थ या दोहोंकडून भ्रष्ट झालेला हा पुरुष फुटक्या ढगाप्रमाणें नाश पावत नाहीं ना?
३९) हें कृष्णा, तूं माझा संशय पूर्णपणें फेडावा. कारण हा संशय नष्ट करणारा तुझ्यावांचून दुसरा कोणीही समर्थ नाहीं.
श्रीभगवान म्हणाले
४०) त्याला इहलोकीं किंवा परलोकीही विनाश नाही. कारण अरे, सत्कर्म करणारा कोणीही अधोगतीला जात नाही.
४१) असा योगभ्रष्ट पुरुष पुण्यवानांना मिळावयाच्या स्वर्गादि लोकाला जाऊन, तेथें दीर्घकालपर्यंत राहून नंतर शुद्धाचरणी अशा श्रीमंताच्या घराण्यांत जन्माला येतो.
४२) अथवा तो ज्ञानवान अशा योग्यांच्या कुळांत जन्माला येतो. अशा प्रकारचा जन्म मिळणें हे या लोकीं अतिशय दुर्लभ आहे.
४३) हे अर्जुना, त्याला त्या नव्या देहांत पूर्वजन्माच्या देहांतल्या बुद्धिसंस्काराचा लाभ होतो आणि तो पुनः अधिक योगसिद्धिसाठी झटूं लागतो.
४४) तो परतंत्र असला तरी त्याच्या पूर्वजन्मींच्या अभ्यासाने कर्मयोगाकडे आकर्षिला जातो. योगमार्गाची ज्याला नुसती जिज्ञासा उत्पन्न झाली, तो पुरुष वैदिक (यज्ञयागादि काम्य) कर्में करणार्याहून अधिक श्रेष्ठ असें म्हणावयास हरकत नाही.
४५) परंतु प्रयत्नपूर्वक उद्योग करितां करितां निष्पाप झालेला आणि अनेक जन्मांनीं पूर्ण सिद्धिप्रत पावलेला तो योगी अखेर परम गतीला (मोक्षाप्रत) जातो.
४६) तपस्व्यांपेक्षा योगी श्रेष्ठ, ज्ञान्यांपेक्षांही योगी श्रेष्ठ आणि सकाम कर्में करणार्या कर्मठांपेक्षांही योगी श्रेष्ठ आहे म्हणून हे अर्जुना, तूं कर्मयोगी हो.
४७) सर्व कर्मयोग्यांमध्ये जो माझ्या ठिकाणीं अंतःकरण लावून श्रद्धेनें मला निरंतर भजतो, तो योगी मला सर्वांत श्रेष्ठ वाटतो.
याप्रमाणें श्रीकृष्णांनी गायिलेल्या उपनिषदांतील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रांतील ' आत्मसंयम योग ' या नावांचा सहावा अध्याय संपूर्ण झाला.
Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 6 आत्मसंयम योग अध्याय ६
Custom Search
No comments:
Post a Comment