Sunday, June 19, 2016

Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 9 राजविद्या राजगुह्य योग अध्याय ९


Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 9 
Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 9 is in Sanskrit. Name of this adhyay is Rajvidya-Rajguhya Yoga. Here in this Adhyay 9 Bhagwan ShriKrishna is telling Arjuna, the art of living which is to be followed by every individual to reach to a self-perfection path in our life.
राजविद्या राजगुह्य योग अध्याय ९ 
श्रीभगवानुवाच 
इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ।
ज्ञानं विज्ञानसहितं यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात् ॥ १ ॥
राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम् ।
प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्यवम् ॥ २ ॥  
अश्रद्दधानाः पुरुषा धर्मस्यास्य परन्तप ।
अप्राप्य मां निवर्तन्ते  मृत्युसंसारवर्त्मनि ॥ ३ ॥
मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना ।
मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थितः ॥ ४ ॥
न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्र्वरम् ।
भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः ॥ ५ ॥
यथाकाशस्थितो नित्यं वायुः सर्वत्रगो महान् ।
तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानीत्युपधारय ॥ ६ ॥
सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम् ।
कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम् ॥ ७ ॥
प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः ।
भूतग्राममिमं कृत्स्नमवशं प्रकृतेर्वशात् ॥ ८ ॥
न च मां तानि कर्माणि निबन्धन्ति धनञ्जय ।
उदासीनवदासीनमसक्तं तेषु कर्मसु ॥ ९ ॥
मयाध्यक्षेण प्रकृतिः सूयते सचराचरम् ।
हेतुनानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते ॥ १० ॥
अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम् ।
परं भावमजानन्तो मम भूतमहेश्र्वरम् ॥ ११ ॥
मोघाशा मोघकर्माणो मोघज्ञाना विचेतसः ।
राक्षसीमासुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं श्रिताः ॥ १२ ॥
महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः ।
भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम् ॥ १३ ॥
सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्र्च दृढव्रताः ।
नमस्यन्तश्र्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते ॥ १४ ॥
ज्ञानयज्ञेन चाप्यन्ते यजन्तो मामुपासते ।
एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्र्वतोमुखम् ॥ १५ ॥
अहं क्रतुरहं यज्ञः स्वधाहमहमौषधम् ।
मन्त्रोऽहमहमेवाज्यमहमग्निरहं हुतम् ॥ १६ ॥
पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः ।
वेद्यं पवित्रमोङ्कार ऋक्साम यजुरेव च ॥ १७ ॥
गतिर्भर्ता प्रभुः साक्षी निवासः शरणं सुहृत् ।
प्रभवः प्रलयः स्थानं निधानं बीजमव्ययम् ॥ १८ ॥
तपाम्यहमहं वर्षं निगृह्णाम्युत्सृजामि च ।
अमृतं चैव मृत्युश्र्च सदसच्चाहमर्जुन ॥ १९ ॥
त्रैविद्या मां सोमपाः पूतपापा- 
यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ।
ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोक- 
मश्र्नन्ति दिव्यान्दिवि देवभोगान् ॥ २० ॥
ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं-
क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति ।
एवं त्रयीधर्ममनुप्रपन्ना-
गतागतं कामकामा लभन्ते ॥ २१ ॥
अनन्याश्र्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते ।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥ २२ ॥
येऽप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः ।
तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम् ॥ २३ ॥
अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च ।
न तु मामभिजानन्ति तत्त्वेनातश्च्यवन्ति ते ॥ २४ ॥
यान्ति देवव्रता देवान्पितृन्यान्ति पितृव्रताः ।
भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम् ॥ २५ ॥
पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति ।
तदहं भक्त्युपहृतमश्र्नामि प्रयतात्मनः ॥ २६ ॥
यत्करोषि यदश्र्नासि यज्जुहोषि ददासि यत् ।
यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम् ॥ २७ ॥
शुभाशुभफलैरेवं मोक्ष्यसे कर्मबन्धनैः ।
सन्न्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि ॥ २८ ॥
समोऽहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः ।
ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम् ॥ २९ ॥
अपि चेत्सुदुराचारो भजते मामनन्यभाक् ।
साधुरेव स मन्तव्यः सम्यग्व्यवसितो हि सः ॥ ३० ॥
क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति ।
कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति ॥ ३१ ॥    
मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः ।
स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम् ॥ ३२ ॥
किं पुनर्ब्राह्मणाः पुण्या भक्ता राजर्षयस्तथा ।
अनित्यमसुखं लोकमिमं प्राप्य भजस्व माम् ॥ ३३ ॥ 
मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु ।
मामेवैष्यसि युक्त्वैवमात्मानं मत्परायणः ॥ ३४ ॥
॥ हरि ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे राजविद्याराजगुह्ययोगो नाम नवमोऽध्यायः ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
मराठी अर्थ
श्रीभगवान म्हणाले
१) आतां तूं दोषदर्शी नाहीस म्हणून अत्यंत गुह्य असे ज्ञान विज्ञानासहित मी तुला सांगतो. हें ज्ञान झालें असतां तूं कर्मबंधापासून मुक्त होशील.
२) हे (ज्ञान) सर्व गुह्यांत राजा म्हणजे श्रेष्ठ, राजविद्या म्हणजे सर्व विद्यांमध्यें श्रेष्ठ, पवित्र, उत्तम, प्रत्यक्षबोध होणारें, आचरण्यास सुखकारक, अव्यय आणि धर्म्य आहे.
३) अर्जुना, या धर्मावर श्रद्धा न ठेवणारे पुरुष मला येऊन न मिळतां मृत्युयुक्त संसारमार्गांत परत येतात.        
४) मी आपल्या अव्यक्त स्वरुपानें हें जग विस्तारले किंवा व्यापिलें आहे. माझ्या ठायीं सर्व भूतें आहेत, पण मी त्यांच्या ठायीं नाहीं.
५) तथापि भूतेंही माझ्या ठायीं नाहीत. माझी ही परमेश्र्वरी करणी किंवा योगसामर्थ्य पहा, भूतें उत्पन्न करणारा माझा आत्मा भूतें धारण करुनही (पुनः) भूतांत नाही.
६) ज्याप्रमाणे सर्वत्र संचार करणारा महान् वायु नेहमीं आकाशाच्या ठायी असतो, त्याचप्रमाणें सर्व भूतमात्र सृष्टि माझें ठिकाणी असते असे समज.
७) हे कौन्तेया, कल्पक्षयाचे वेळीं सर्व भूतें माझ्या अव्यक्त प्रकृतींत लीन होतात, तीं मी पुनः दुसर्‍या कल्पाचे प्रारंभी उत्पन्न करितों.
८) मी माझ्या प्रकृतीला हाती धरुन त्या प्रकृतीच्या ताब्यांत गेल्यामुळे परतंत्र असलेल्या ह्या संपूर्ण भूतवर्गास पुनः पुन्हां उत्पन्न करितो. 
९) हे अर्जुना, ह्या कर्माविषयीं माझी आसक्ति नसल्याने अनासक्त व तटस्थाप्रमाणें राहाणार्‍या मला तीं कर्मे बंधनकारक होत नाहीत.
१०) माझा आश्रय मिळाल्यावर प्रकृतीकडून सर्व चराचर सृष्टी मी प्रसवितों. या कारणामुळें हे कौन्तेया, जगाची ही घडामोड चालली आहे.
११) माझें सर्वश्रेष्ठ स्वरुप न जाणणारे मूर्ख लोक, मनुष्यदेह धारण करणारा जो मी, त्या माझी मनुष्यदेहधारी समजून अवज्ञा करितात. 
१२) ते भ्रष्टचित्त पुरुष मोह पाडणार्‍या राक्षसी व आसुरी स्वभावाचा आश्रय करुन वागतात, म्हणून त्यांच्या सर्व आशा व्यर्थ होतात. त्यांची कर्मे निरर्थक होतात. त्यांचे ज्ञानही फुकट जाते. 
१३) पण हे पार्था दैव प्रकृतीचा आश्रय केलेले महात्मे, मी सर्व भूतांचे आदिस्थान व अव्यय आहे असे जाणून अनन्य भावाने मला भजतात. 
१४) आणि यत्नशील, दृढव्रत आणि नित्य योगयुक्त होत्साते माझें सतत कीर्तन-वंदन करीत भक्तीनें माझी उपासना करतात.
१५) तसेंच दुसरे कित्येक सर्वतोमुख जो मी, त्या माझें एकत्वाने म्हणजे अभेदभावानें, पृथक्त्वानें म्हणजे भेदभावानें, किंवा बहुप्रकारें ज्ञानयज्ञानें भजन करुन उपासना करीत असतात.           
१६) श्रौतयज्ञ मी, स्मार्तयज्ञ मी, श्राद्धांत पितरांना अर्पिलेले अन्न मी, वनस्पतिजन्य अन्न मी, मंत्र मी, तूप इत्यादि होमद्रव्य मी, अग्नींत अर्पिलेल्या आहुति मी आहे.
१७) ह्या जगताचा मी पिता, मी माता, आधार मी, मी पित्याचाही पिता आहे. जें पवित्र किंवा जें कांही ज्ञेय आहे तें मी, ॐकार मी, ऋग्वेद, सामवेद व यजुर्वेद मीच आहे.
१८) (सर्वांची) गति, पोषणकर्ता, प्रभु, साक्षी, निवास, शरण, सखा, उत्पत्ति, प्रलय, स्थिति, निधन आणि अव्यय बीज मी.
१९) मी जगाला उष्णता देतो, मीच पाण्याचें आकर्षण करतों, मीच पुनः पाऊस पाडतों. तसेंच हे अर्जुना, अमृत व मृत्यु आणि सत् व असत् म्हणजे ज्याला अस्तित्व आहे व ज्याला अस्तित्व नाहीं तें मीच आहे.
२०) त्रैविद्या म्हणजे ऋ्ग्वेद व सामवेद या तीन वेदांतील कामें करणारे जे सोमप म्हणजे सोमयाजी व निष्पाप पुरुष माझें यज्ञानें पूजन करुन स्वर्गलोकप्राप्तीची इच्छा करितात, ते इंद्राच्या पुण्यलोकास पोंचून स्वर्गांत देवांचे अनेक दिव्य भोग भोगतात.
२१) ते त्या विशाल स्वर्गलोकाचा उपभोग घेऊन पुण्याची पुंजी संपली म्हणजे, परत मृत्युलोकांत जन्माला येतात. अशा प्रकारें तीन वेदांतील यज्ञयागादि श्रौतधर्म पाळणारे व काम्य उपभोगाच्या मागे लागलेले कर्मठ ह्याप्रमाणें स्वर्ग व मृत्युलोक यांच्या येरझारा करितात. 
२२) जे अनन्यभावानें माझें चिंतन करीत मला भजतात, त्या नेहमी मला एकनिष्ठ अशा पुरुषांचा योगक्षेम मी चालवितों.
२३) हे कुंतीपुत्रा, पण जे श्रद्धायुक्त भक्त अन्य देवतांची उपासना करतात, ते देखील विधिपूर्वक नसली तरी पर्यायानें माझीच आराधना करतात. 
२४) कारण मी परमात्माच सर्व यज्ञांचा फलभोक्ता व फलदाता स्वामी आहे. परंतु ते मला तत्त्वतः जाणत नाहींत म्हणून घसरत असतात.
२५) देव, पितर आणि भूतें यांची आराधना करणारे लोक त्यांच्या त्यांच्या लोकांस जातात आणि माझीच उपासना करणारे माझ्याच परमात्मस्वरुपाला प्राप्त होतात.
२६) जो कोणी (भक्त) मला एखादें पान, फूल, फल किंवा यथाशक्ति पाणीही भक्तीनें अर्पण करतो, त्या नियतचित्त मनुष्याचे ते भक्तीनें अर्पण केलेले पदार्थ मी (मोठ्या प्रेमानें) स्वीकारतों.
२७) हे कौन्तेया, तूं जें करतोस, जें खातोस, जें हवन करतोस, जें दान देतोस व जें तप करतोस ते सर्व मला अर्पण कर.
२८) असें केल्यानें शुभाशुभ फलरुपी कर्मबंधनांतून तूं मुक्त होशील, आणि कर्मफलांचा संन्यास करण्याचा जो हा योग त्यानें युक्तात्मा म्हणजे शुद्धांतःकरण आणि मुक्त होत्साता मला येऊन मिळशील.
२९) मी सर्व भूतांना सारखा आहें. माझा कोणी नावडता नाहीं, कोणी आवडता नाहीं. पण जे मला भक्तीनें भजतात, ते माझ्या ठिकाणी असतात, आणि मी देखील त्यांच्या ठिकाणीं असतों.
३०) अत्यंत दुर्वतनी मनुष्य देखील जर अनन्य भक्तीनें माझी उपासना करील, तर तो साधूच समजावा. कारण त्याच्या बुद्धीचा निश्र्चय चांगला झालेला असतो.   
३१) तो लवकरच धर्मात्मा होतो आणि शाश्र्वत शांतीला पोंचतो. हें अर्जुना, माझा भक्त कधीही अधोगतीला जात नाहीं हें तूं पक्कें समज.
३१) कारण हे पार्था, माझा आश्रय करुन स्त्रिया, वैश्य, शूद्र किंवा नीच कुलांत जन्मलेले लोक देखील परमश्रेष्ठ गतीला जातात.
३२) तर मग जे पुण्यवान ब्राह्मण किंवा राजर्षि माझें भक्त असतील त्यांना सद्गति मिळेल हें काय सांगावें? ह्याकरितां अनित्य व दुःखकारक अशा मृत्युलोकीं तूं जन्म पावला आहेस, म्हणून माझेंच भजन कर. 
३३) माझ्या ठिकाणीं मन ठेव, माझा भक्त हो, माझा पूजक हो, व मला नमस्कार कर. ह्याप्रमाणें मत्परायण होऊन आपला योग चालविलास म्हणजे तूं मलाच येऊन मिळशील.

याप्रमाणें श्रीकृष्णांनी गायिलेल्या उपनिषदांतील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रांतील '  राजविद्याराजगुह्य योग ' या नावांचा नववा अध्याय संपूर्ण झाला.  
Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 9 राजविद्या राजगुह्य योग अध्याय ९ 



Custom Search

No comments: