Wednesday, June 1, 2016

Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 13 क्षेत्रक्षेत्रज्ञ योग अध्याय १३


Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 13 
Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 13 is in Sanskrit. Name of this Adhyay is Kshetra- Kshetrajna Yoga. What that Kshetra is, what it is like, what its modifications are; Whence it arises, and what its forms are; and also what the other entity (the Kshetrajna) is, told to Arjuna in this Ahyay by God ShriKrishna.
क्षेत्रक्षेत्रज्ञ योग अध्याय १३
श्रीभगवानुवाच
इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते ।
एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः ॥ १ ॥
क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत ।
क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम ॥ २ ॥
तत्क्षेत्रं यच्च यादृक् च यद्विकारि यतश्र्च यत् ।
स च यो यत्प्रभावश्र्च तत्समासेन मे शृणु ॥ ३ ॥
ऋषिभिर्बहुधा गीतं छन्दोभिर्विविधैः पृथक् ।
ब्रह्मसूत्रपदैश्र्चैव हेतुमद्भिर्विनिश्र्चितैः ॥ ४ ॥
महाभूतान्यहङ्कारो बुद्धिरव्यक्तमेव च ।
इन्द्रियाणि दशैकं च पञ्च चेन्द्रियगोचराः ॥ ५ ॥
इच्छा द्वेषः सुखंदुःखं संघातश्र्चेतना धृतिः ।
एतत्क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम् ॥ ६ ॥
अमानित्वमदम्भित्वमहिंसा क्षान्तिरार्जवम् ।
आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः ॥ ७ ॥
इंद्रियार्थेषु वैराग्यमनहङ्कार एव च ।
जन्ममृत्युजराव्याधिदुःखदोषानुदर्शनम् ॥ ८ ॥
असक्तिरनभिष्वङ्गः पुत्रदारगृहादिषु ।
नित्यं च समचित्तत्वमिष्टानिष्टोपपत्तिषु ॥ ९ ॥
मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी ।
विविक्तदेशसेवित्वमरतिर्जनसंसदि ॥ १० ॥
अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम् ।
एतज्ज्ञानमिति प्रोक्तमज्ञानं यदतोऽन्यथा ॥ ११ ॥
ज्ञेयं यत्तत्प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वाऽमृतमश्नुते ।
अनादिमत्परं ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते ॥ १२ ॥
सर्वतः पाणिपादं तत्सर्वतोऽक्षिशिरोमुखम् ।
सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति ॥ १३ ॥
सर्वेन्द्रियगुणाभासं सर्वेन्द्रियविवर्जितम् ।
असक्तं सर्वभृच्चैव निर्गुणं गुणभोक्तृ च ॥ १४ ॥
बहिरन्तश्र्च भूतानामचरं चरमेव च ।
सूक्ष्मत्वात्तदविज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत् ॥ १५ ॥
अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव च स्थितम् ।
भूतभर्तृ च तज्ज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णु च ॥ १६ ॥
ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसः परमुच्यते ।
ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य धिष्ठितम् ॥ १७ ॥
इति क्षेत्रं तथा ज्ञानं ज्ञेयं चोक्तं समासतः ।
मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते ॥ १८ ॥
प्रकृतिं पुरुषं चैव विद्ध्यनादि उभावपि ।
विकारांश्र्च गुणांश्र्चैव विद्धि प्रकृतिसंभवान् ॥ १९ ॥
कार्यकारणकर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते ।
पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते ॥ २० ॥
पुरुषः प्रकृतिस्थो हि भुंक्ते प्रकृतिजान् गुणान् ।
कारणं गुणसंगोऽस्य सदसद्योनिजन्मसु ॥ २१ ॥
उपद्रष्टाऽनुमंता च भर्ता भोक्ता महेश्र्वरः ।
परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परः ॥ २२ ॥
य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणैः सह ।
सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते ॥ २३ ॥
ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना ।
अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे ॥ २४ ॥
अन्ये त्वेवमजानन्तः श्रुत्वाऽन्येभ्य उपासते ।
तेऽपि चातितरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः ॥ २५ ॥
यावत्संजायते किंचित्सत्त्वं स्थावरजङ्गमम् ।
क्षेत्रक्षेत्रज्ञसंयोगात्तद्विद्धि भरतर्षभ ॥ २६ ॥
समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्र्वरम् ।
विनश्यत्स्वविनश्यन्तं यः पश्यति स पश्यति ॥ २७ ॥
समं पश्यन् हि सर्वत्र समवस्थितमीश्र्वरम् ।
न हिनस्त्यात्मनात्मनात्मानं ततो याति परां गतिम् ॥ २८ ॥
प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः ।
यः पश्यति तथात्मानमकर्तारं स पश्यति ॥ २९ ॥             
यदा भूतपृथग्भावमेकस्थमनुपश्यति ।
तत एव च विस्तारं ब्रह्म संपद्यते तदा ॥ ३० ॥
अनादित्वान्निर्गुणत्वात् परमात्माऽयमव्ययः ।
शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते ॥ ३१ ॥
यथा सर्वगतं सौक्ष्म्यादाकाशं नोपलिप्यते ।
सर्वत्रावस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते ॥ ३२ ॥
यथा प्रकाशयत्येकः कृत्स्नं लोकमिमं रविः । 
क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं  प्रकाशति भारत ॥ ३३ ॥
क्षेत्रक्षेत्रज्ञयोरेवमन्तरं ज्ञानचक्षुषा ।
भूतप्रकृतिमोक्षं च ये विदुर्यान्ति ते परम् ॥ ३४ ॥
॥ इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ' क्षेत्रक्षेत्रज्ञयोगो ' नाम त्रयोदशोऽध्यायः ॥ 
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
मराठी अर्थ
श्रीभगवान म्हणाले
१) अर्जुना, ह्या शरीराला क्षेत्र असें म्हटलें जाते. ह्या क्षेत्र असें म्हटलें जातें. ह्या क्षेत्राला जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असें ह्या शास्त्रांतील ज्ञाते पुरुष म्हणतात.
२) हे भारता, सर्व क्षेत्रांमध्यें क्षेत्रज्ञ तो मी आहें असें जाण. क्षेत्र व क्षेत्रज्ञ ह्यांच्याविषयींचें जें ज्ञान तेंच खरें ज्ञान असें माझे मत आहे.
३) तें क्षेत्र म्हणजे काय, कोणत्या प्रकारचें, त्याचे विकार कोणते, त्यांत कशापासून काय होतें, तसेंच तो क्षेत्रज्ञ कोण व त्याचा प्रभाव काय हें मी संक्षेपानें सांगतों ऐक.
४) हे क्षेत्र-क्षेत्रज्ञांचें ज्ञान अनेक ऋषींनीं बहुत प्रकारें, विविध छंदांच्या द्वारें व कार्यकारणरुप हेतु दाखवून निश्र्चित केलेल्या ब्रह्मसूत्रांतील पदांनींही गायिलेले आहे.
५-६) पंचमहाभूतें, अहंकार, बुद्धि आणि अव्यक्त प्रकृति, अकरा इंद्रियें, पांच इंद्रियांचे पांच विषय, इच्छा, द्वेष, सुख, दुःख, देहांतील इंद्रियांची जुळणी, सचेतनत्व व धैर्य इत्यादि घटक व त्यांचे विकार ह्यांचा समुदाय असें हे क्षेत्र, संक्षेपानें सांगितले आहे.
७-१०) अभिमानाचा अभाव, दंभ नसणें, अहिंसा, क्षमाशीलता, वागणुकींत सरळपणा, गुरुसेवा, शुचिर्भूतपणा, स्थैर्य, मनोनिग्रह, इंद्रियांच्या विषयाचे ठिकाणी विरक्त, निरहंकार वृत्ति, जन्म, मरण, वार्धक्य व रोग हे आपल्यामागे लागलेले दोष आहेत अशी बुद्धि असणें, अनासक्ति, स्त्री-पुत्र-गृह इत्यादिकांत लंपट नसणे, इष्ट किंवा अनिष्ट प्राप्त झालें तरी नेहमीं चित्ताची समता, माझ्या ठायी अनन्यभवाची अढळ भक्ति, निवडक किंवा एकान्त जागीं राहणें, सामान्य जनांचा समुदाय न आवडणें, 
११) अध्यात्मज्ञान नित्य आहे अशी बुद्धि असणें, व तत्त्वज्ञानाच्या सिद्धांतांचें परिशीलन, ह्या सर्व गुणांना ज्ञान म्हणतात. आणि जे ह्याच्या विरुद्ध दुसरें ज्ञान तें अज्ञान होय. 
१२) आतां जें जाणिल्यानें अमृत म्हणजे मोक्ष मिळतो तें ज्ञेय मी तुला सांगतों. सर्वश्रेष्ठ ब्रह्म हेंच तें ज्ञेय असून, तें अनादि आहे. तें सत् किंवा असत् ही म्हणतां येत नाही.
१३) त्याला सर्व बाजूंनीं हात व पाय आहेत, सर्व बाजूंनी डोळे, मस्तकें व मुखे आहेत, सर्व बाजूंनीं कान आहेत आणि तें सर्वांना व्यापून राहिलें आहे.  
१४) त्यांत सर्व इंद्रियांच्या गुणांचा भास होणारा असून वस्तुतः त्याला कोणतेंच इंद्रिय नाहीं. तें सर्वांपासून असक्त म्हणजे अलग असून सर्व भूतांचें धारणपोषण करणारें आहे. तें निर्गुण आहे व गुणभोक्तेंही आहे.
१५) तें ब्रह्म सर्व सृष्ट पदार्थांच्या बाहेर आहे व आंतही आहे. तें अचल आणि चल देखील आहे. तें सूक्ष्म असल्यामुळें जाणण्याला दुष्कर आहे. तसेंच तें दूर असून जवळही आहे. 
१६) हें ब्रह्म सर्वत्र अखंड असूनही सर्व प्राण्यांच्या रुपांत विभागल्यासारखें दिसतें. तें भूतमात्राचें धारणपोषण करणारे, ग्रासणारे आणि उत्पत्तीही करणारें आहे, असें जाणावें.
१७) तें ब्रह्म तेजांचेंही तेज असून अंधाराच्या अत्यंत पलीकडचें आहे असें म्हटलें जातें, तें ज्ञानरुप व ज्ञेयरुप ज्ञानानेंच कळणार असून सर्वांच्या हृदयांत तेंच अधिष्ठित आहे.
१८) याप्रमाणें क्षेत्र, तसेंच ज्ञान व ज्ञेय (ब्रह्म) यांचे संक्षेपतः वर्णन केलें. हें सर्व जाणण्यानें माझा भक्त माझ्या स्वरुपाला प्राप्त होतो. 
१९) प्रकृति (जड समुदाय) व पुरुष (चैतन्य) हीं दोन्ही अनादि आहेत असें जाण, आणि रागद्वेषादि विकार व गुण हे प्रकृतीपासून उत्पन्न होतात असें समज.
२०) पांच कर्मेंद्रियें, पांच ज्ञानेंद्रियें, पांच विषय व मन मिळून सोळाकार्यें; तसेंच पांच महाभूतें, अहंकार व बुद्धि मिळून सात कारणें, आणि सर्वत्र दिसून येणारें त्यांचे कर्तृत्व यांस मूळ प्रकृति ही कारण असते असें म्हणतात व सुखदुःखाच्या भोगाला पुरुष कारण असतो असे म्हणतात.                         
२१) कारण प्रकृतींत पुरुष अधिष्ठित झाला म्हणजे प्रकृतीच्या गुणांचा तो उपभोग घेतो आणि त्याचा ज्या ज्या गुणांशीं संबंध येतो, त्याप्रमाणें चांगल्या अगर वाईट योनींत तो जन्म पावतो.
२२) क्षेत्रज्ञ पुरुष हा प्रकृतिहून अगदी वेगळा व अत्यंत श्रेष्ठ असा परमात्माच आहे. तो या क्षेत्ररुपी देहांत सापडल्यामुळें या प्रकृतीचे खेळ जवळ राहून पाहाणारा, त्यांना अनुमोदन देणारा, देहांचें पोषण करणारा, सुखदुःखांचे अनुभव घेणारा, किंबहुना या प्रकृतिकृत खेळाचा सूत्रधार असा धरला जातो. 
२३) याप्रमाणें पुरुष निर्गुण व प्रकृतीच काय ती सगुण असें जो मनुष्य तत्त्वतः जाणतो, तो कसाही वागत असला तरी पुन्हां जन्म पावत नाहीं,
२४) कोणी योगी शुद्ध झालेल्या सूक्ष्मबुद्धीने ध्यानाच्या द्वारें आत्म्याला हृदयाच्या ठायीं पाहातात. कोणी ज्ञानयोगानें, तर कोणी कर्मयोगानें त्याला प्राप्त करुन घेतात.
२५) परंतु असें ज्ञान नसलेले दुसरे पुरुष गुरुकडून हें ज्ञान श्रवण करुन त्याची उपासना करतात. उपदेशावरच श्रद्धा ठेवणारे ते पुरुष देखील मृत्युला तरुन जातात.
२६) हे भरतश्रेष्ठा, स्थावर-जंगम अशी कोणतीही वस्तु उत्पन्न होते ती क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संयोगापासून होते असें जाण.
२७) परमेश्र्वर सर्व भूतांच्या अंतरी सारखा राहाणारा व सर्व भूतें नाश पावली तरी नाश न पावणारा असा आहे असें जो पाहतो, त्यानें खरें तत्त्व ओळखलें म्हणावयाचे.
२८) कारण जो पुरुष ईश्र्वर सर्वत्र सारखाच भरलेला आहे असें समबुद्धीनें पाहातो, तों आत्मघातकी होत नाही म्हणून उत्तम गतीला जातो. 
२९) जो आपल्या हातून होणारी कर्मे ही सर्वथैव प्रकृतीकडूनच केली जात आहेत असें ओळखतो, त्याचप्रमाणें आत्म्याला अकर्ता असें जाणतो, तोच खरा तत्त्वज्ञ होय.
३०) जेव्हां सर्व भूतांचा भिन्नभिन्नपणा एका आत्म्यामध्येंच स्थित आहे आणि आत्म्यापासून हा सर्व विस्तार झाला आहे असें दिसूं लागेल, तेव्हांच ब्रह्माची प्राप्ति होते. 
३१) अर्जुना, हा परमात्मा अनादि व निर्गुण असल्यामुळें अविकारी आहे. शरीराशीं त्याचा संबंध असला तरी तो स्वतः कांहीं करीत नाही व त्याला कोणत्याही कर्माचा लेप म्हणजे बंध लागत नाहीं.
३२) आणि सूक्ष्मत्वामुळें सर्व वस्तूंत असणारें आकाश जसें कोठेंही लिप्त होत नाही, तसाच सर्वत्र सर्व देहांत व्यापून राहणारा हा आत्माही देहाच्या गुणांत लिप्त होत नाही.
३३) हे अर्जुना, ज्याप्रमाणें एकटा सूर्य या सर्व जगाला प्रकाशमान करतो, त्याचप्रमाणें एकटाच क्षेत्रज्ञ आत्मा या सर्व क्षेत्राला प्रकाशित करतो.
३४) याप्रमाणें क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या दोहोंतील भेद व सर्व भूतांच्या ( मूलभूत ) प्रकृतीचा मोक्ष ज्ञानदृष्टीनें जे जाणतात, ते परमश्रेष्ठ पदाला जाऊन पोंचतात.
याप्रमाणे श्रीकृष्णांनी गायिलेल्या उपनिषदांतील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रांतील ' क्षेत्रक्षेत्रज्ञ प्रकरण ' या नांवांचा तेरावा अध्याय संपूर्ण झाला.  
Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 13 क्षेत्रक्षेत्रज्ञ योग अध्याय १३


Custom Search
Post a Comment