DevataKrut Suryasya Divya Stutihi
DevataKrut Suryasya Divya Stutihi is in Sanskrit. It is done by God Brahma, God Vishnu, God Shiva and Other Gods. It is said in it that God Surya is remover of sins, diseases. He is giver of all sorts of happiness and Intelligence and property, money.
देवताकृत सूर्यस्य दिव्य स्तुती
आदिदेवोऽसि देवानामैश्र्वर्याश्र्च त्वमीश्वरः ।
आदिकर्तासि भूतानां देवदेवो दिवाकरः ॥ १ ॥
जीवनः सर्वभूतानां देवगन्धर्वरक्षसाम् ।
मुनिकिंनरसिद्धानां तथैवोरगपक्षिणाम् ॥ २ ॥
त्वं ब्रह्मा त्वं महादेवस्त्वं विष्णुस्त्वं प्रजापतिः ।
वायुरिन्द्रश्र्च सोमश्र्च विवस्वान् वरुणस्तथा ॥ ३ ॥
त्वं कालः सृष्टिकर्ता च हर्ता भर्ता तथा प्रभुः ।
सरितः सागराः शैला विद्युदिन्द्रधनूंषि च ॥ ४ ॥
प्रलयः प्रभवश्चैव व्यक्ताव्यक्तः सनातनः ।
ईश्र्वरात्परतो विद्या विद्यायाः परतः शिवः ॥ ५ ॥
शिवात्परतरो देवस्त्वमेव परमेश्र्वरः ।
सर्वतः पाणिपादान्तः सर्वतोऽक्षिशिरोमुखः ॥ ६ ॥
सहस्रांशुः सहस्रास्यः सहस्रचरणेक्षणः ।
भूतादिर्भूर्भुवः स्वश्र्च महः सत्यं तपो जनः ॥ ७ ॥
प्रदीप्तं दीपनं दिव्यं सर्वलोकप्रकाशकम् ।
दुर्निरीक्षं सुरेन्द्राणां यद्रूपं तस्य ते नमः ॥ ८ ॥
सुरसिद्धगणैर्जुष्टं भृग्वत्रिपुलहादिभिः ।
स्तुतं परममव्यक्तं यद्रूपं तस्य ते नमः ॥ ९ ॥
वेद्यं वेदविदां नित्यं सर्वज्ञानसमन्वितम् ।
सर्वदेवादिदेवस्य यद्रूपं तस्य ते नमः ॥ १० ॥
विश्वकृद्विश्वभूतं च वैश्वानरसुरार्चितम् ।
विश्र्वस्थितमचिन्त्यं च यद्रूपं तस्य ते नमः ॥ ११ ॥
परं यज्ञात्परं वेदात्परं लोकात्परं दिवः ।
परमात्मेत्यभिख्यातं यद्रूपं तस्य ते नमः ॥ १२ ॥
अविज्ञेयमनालक्ष्यमध्यानगतमव्ययम् ।
अनादिनिधनं चैव यद्रूपं तस्य ते नमः ॥ १३ ॥
नमो नमः कारणकारणाय ।
नमो नमः पापविमोचनाय ।
नमो नमस्ते दितिजार्दनाय ।
नमो नमो रोगविमोचनाय ॥ १४ ॥
नमो नमः सर्ववरप्रदाय ।
नमो नमः सर्वसुखप्रदाय ।
नमो नमः सर्वधनप्रदाय ।
नमो नमः सर्वमतिप्रदाय ॥ १५ ॥
॥ इति देवताकृत सूर्यस्य दिव्य स्तुतीः ॥
मराठी अर्थ
भगवान ! तुम्ही आदिदेव आहा. ऐश्र्वर्याने संपन्न असल्याने तुम्ही देवतांचे ईश्र्वर आहात. संपूर्ण भूतांचे ( प्राण्यांचे ) आदिकर्ता तुम्हीच आहा. तुम्ही देवाधिदेव दिनकर आहात. संपूर्ण प्राणी, देवता, गन्धर्व, राक्षस, मुनि, किन्नर, सिद्ध, नाग तसेच पक्षी यांचे जीवन तुम्हींच आहात. तुम्हीच ब्रह्मा, तुम्हीच महादेव, तुम्हींच विष्णु, तुम्हीच प्रजापति, तसेच तुम्ही वायु, इन्द्र, सोम, विवस्वान तसेच वरुण आहात. तुम्हीच काल, सृष्टिचे कर्ता, धर्ता, संहर्ता आणि प्रभु आहात. नदी, समुद्र, पर्वत, वीज, इन्द्रधनुष्य, प्रलय, सृष्टि, व्यक्त, अव्यक्त, तसेच सनातन पुरुष तुम्हीच आहात. तुमचे हात व पाय सगळीकडे आहेत. डोळे, डोके आणि मुख पण सगळीकडे आहे. तुमचे सहस्र किरण, सहस्र मुख, सहस्र चरण, आणि सहस्र नेत्र आहेत. तुम्ही सर्व भूतांचे आदिकारण आहात. भूः, भुवः, स्वः, महः, जनः, तपः, आणि सत्यम् हे सर्व तुमचेच स्वरुप आहे. तुमचे जे अत्यंत तेजस्वी, सर्व प्रकाशक, दिव्य, प्रकाश पसरविणारे व देवतांकडून फार परिश्रमाने बघितले जाणारे जे रुप आहे त्याला आमचा नमस्कार. देवता व सिद्ध ज्याचे सेवन करतात, भृगु, अत्रि आणि पुलह आदि महर्षि ज्याच्या स्तुतीमध्ये मग्न आहेत, तसेच जे अत्यंत अव्यक्त आहे त्या तुमच्या स्वरुपाला आमचा नमस्कार. संपूर्ण देवतांमध्ये तुमचे उत्कृष्ट रुप जे वेदवेत्ता पुरुषांकडूनच जाणले जाणण्यास योग्य आहे, नित्य व सर्वज्ञानसंपन्न आहे त्याला आमचा नमस्कार. तुमचे या विश्र्वसृष्टिची रचना करणारे जे विश्र्वमय, अग्नि व देवतांनी पूजीत, संपूर्ण विश्र्वाला व्यापून टाकणारे आणि अचिन्त्य स्वरुप त्याला आमचा नमस्कार. तुमचे जे रुप यज्ञ, वेद, लोक, तसेच द्रुमलोकी परमात्मा नावाने विख्यात आहे त्याला नमस्कार. जे अविज्ञेय, अलक्ष्य, अचिन्त्य, अव्यय आहे त्या आपल्या स्वरुपाला नमस्कार. प्रभो तुम्ही कारणाचे कारण आहात. तुम्हाला वारंवार नमस्कार. पापांपासून मुक्त करणार्या तुम्हाला वारंवार नमस्कार. तुम्ही दैत्यांना पीडा देणारे व रोगांपासून सुटका करणारे आहात. तुम्हाला वारंवार नमस्कार. तुम्ही सर्वांहुन वर, सुख, धन आणि उत्तम बुद्धि देणारे आहात. तुम्हाला वारंवार नमस्कार.
अशा रीतीने देवांनी सूर्यदेवाची केलेली स्तुती पूर्ण झाली. DevataKrut Suryasya Divya Stutihi
देवताकृत सूर्यस्य दिव्य स्तुती
Custom Search
No comments:
Post a Comment