Friday, August 29, 2014

Shri GaneshAshashtak ( Marathi ) श्रीगणेशाष्टक ( मराठी )

Shri GaneshAshashtak ( Marathi ) 
This stotra is translation of Shri GaneshAshashtak ( Sanskrit ). It is from Ganesh Purana, UpasanaKhanda. In the falashruti God Ganesh himself telling that whosoever recites this stotra for three days everyday three times then all his work where he expects success will be completed. the person who recites this Ashtak stotra on every Chaturthi for eight such Chaturthies he is blessed with eight sidhies. The person who recites this stotra ten times every day for a month will become free from any custody or from king's punishment. The person who wants Knowledge will be blessed with knowledge. Who wants money will receive money. Who is desirous of a son; will become a father of son. Anybody desiring of many things will receive all on reciting this stotra 21 times every day.



श्रीगणेशाष्टक ( मराठी )
जगी देव जो चंद्रकांती विराजे 
चतुर्बाहु तो शुभ्रवस्त्रांत साजे ।
सदा सर्व कार्यांत सिद्धि मिळाया 
तया श्रीगणेशा नमूया भजूया ॥ १ ॥
झणि शोषि जो विघ्नसिंधू स्वहस्ती 
भवामाजि दुःखासि झाला अगस्ति ।
स्वचित्ती सदा ब्रह्ममिद्या ठसाया 
तया श्रीगणेशा नमूया भजूया ॥ २ ॥
जगी अंत शक्तीस ज्याच्या असेना 
जयापासुनि जन्मले जीव नाना ।
जगीं देव सारे जयाचीच माया 
तया श्रीगणेशा नमूया भजूया ॥ ३ ॥
जया निर्गुणापासुनि अप्रमेय 
गुणांची जगीं निर्मिती नित्य होय ।
जनांची सदा दुःखविघ्नें हराया 
तया श्रीगणेशा नमूया भजूया  ॥ ४ ॥
त्रिधाभेदरुपे सदा जे विराजे 
असे विश्व ज्याकारणें युक्त तेजे ।
अशा त्या गुणेशा सदा आठवूया 
तया श्रीगणेशा नमूया भजूया ॥ ५ ॥
जयापासुनि दानवा किन्नरांना 
मिळे जन्म तैसाचि त्या चारणांना ।
प्रभुपासुनि बुद्धिचा लाभ व्हाया 
तया श्रीगणेशा नमूया भजूया ॥ ६ ॥
जगी वारणा यक्षसंघा सृजी जो
स्वये श्वापदां जन्म दे नित्यही जो ।
तसे पक्षिकीटांदिकांना जगीं या 
तया श्रीगणेशा नमूया भजूया ॥ ७ ॥
जयापासुनि वृक्षवल्ली जगीं या
विनाशास अज्ञान ते येथ जाया ।
विनम्रा सदा सौख्य ठेवा मिळाया 
तया श्रीगणेशा नमूया भजूया ॥ ८ ॥
जयापासुनी आत्मरुपी विलास 
सदा लाभतो मोक्ष इच्छी तयास ।
मनोवांछिता पुत्रसंपत् मिळाया
तया श्रीगणेशा नमूया भजूया ॥ ९ ॥
जयापासुनी शत्रुमार्गांत विघ्न
जयापासुनी शोकमोहास जन्म ।
जगीं सौख्य लाभूनि विघ्ना हराया 
तया श्रीगणेशा नमूया भजूया ॥ १० ॥
जयापासुनि शेष शक्तीस घेतो 
जयापासुनि काम तो जन्म घेतो ।
सदा पृथ्विला येथ आधार द्याया 
तया श्रीगणेशा नमूया भजूया ॥ ११ ॥
जगीं शक्ति ज्याची असे हो अनंत 
जयापासुनि लोक झाले समस्त ।
चिदानंदरुपा इथें तोषवाया
तया श्रीगणेशा नमूया भजूया ॥ १२ ॥
जयापासुनि स्वर्ग झाले अनेक
जया वर्णिता जाहले वेद मूक ।
जनीं मानसी शुद्ध सत्त्वा पहाया 
तया श्रीगणेशा नमूया भजूया ॥ १३ ॥
गणेशास त्रैलोक्यि सारे स्तवीती 
ऋषी देवही गान त्याचे करीती ।
असा देव हृन्मंदिरीं तो वसाया
तया श्रीगणेशा नमूया भजूया ॥ १४ ॥
जया वर्णितां श्रौतविद्या निमाली 
' असे ना ' ' असे ना ' असे ती म्हणाली ।
परब्रह्मरुपा मनी आठवूया 
तया श्रीगणेशा नमूया भजूया ॥ १५ ॥
त्रिसन्ध्यी सदा तीन वेळा म्हणेल
भवाब्धीतुनी तो सुखाने तरेल ।
जगीं अष्टसिद्धी इथे मेळवाया 
तया श्रीगणेशा नमूया भजूया ॥ १६ ॥
जरी कोणी केला सदा पाठ ह्याचा 
चतुर्थी दिनीं आठदां अष्टकाचा ।
असे आठदां पाठ हे नेमें करुया 
तया श्रीगणेशा नमूया भजूया ॥ १७ ॥
दहादां म्हणावे जरी एक मास
तरी सर्व बंधासि तोडील खास ।
जगीं योग्य सुता मेळवावा
तया श्रीगणेशा नमूया भजूया ॥ १८ ॥
म्हणे जो जगीं स्तोत्र प्रेमे सदैव 
तया प्राप्त होईल देव स्वभाव ।
प्रभुच्या सवें एकरुपत्व व्हाया 
तया श्रीगणेशा नमूया भजूया ॥ १९ ॥
असे स्तोत्र सांगून झाले अदृश्य 
जयाच्या स्तुतीनें जगीं सर्व वश्य ।
सदा भुक्ति मुक्ति भवी प्राप्त व्हाया 
तया श्रीगणेशा नमूया भजूया ॥ २० ॥
वसावे सदा मानसीं नित्य देवा 
करा सर्वही जीवनी भक्ति ठेवा ।
अशी गाउनी प्रार्थना तोषवाया
तया श्रीगणेशा नमूया भजूया ॥ २१ ॥
( श्री गणेश पुराणान्तर्गत श्रीगणेशाष्टकाचा अनुवाद )
Shri GaneshAshashtak ( Marathi ) 
श्रीगणेशाष्टक ( मराठी )

Custom Search

No comments: