Tuesday, February 2, 2016

Navanatha Bhaktisar Adhyay 14 Part 1/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय चौदावा ( १४ ) भाग १/२


Navanatha Bhaktisar Adhyay 14 
Mainavati received the Brahmdyana from her guru Jalindar. Now she thought that her son Gopichand should also receive the true knowledge from her guru. So she advised him that the main purpose of our life is to receive true knowledge. Gopichand's father was also a brave king, handsome however when time came his body went to ash within no time. Lord of Death is waiting. Hence Gopichand should obtain the knowledge from guru Jalindar. Gopichand told her that he knows that Mainavati is telling all this to him for his benefit. However he has not found a guru who would be of that much knowledge. Further this is not the right time to leave the kingdom and his family members. However he is not declining what Mainavati had told him. He will do it at appropriate time. Loomavanti was very favorite wife of King Gopichand. She was listening what Mainavati was telling Gopichand. She thought that Gopichand will leave the kingdom. She was selfish as such she wanted that Gopichand should not leave the kingdom. She told Gopichand that Mainavati and Jalindar had made a plot so that Gopichand would go out of Kingdom and then Jalindar would along with Mainavati would leave there as they wish and become head of the kingdom. This was a lie and Gopichand believed it and thrown Jalindar into a deep pit. However Jalindar knew what was going to happen in future hence he kept quiet and done nothing. What happen next will be told to us by Malu who is son of Dhudi from Narahari Family in the Next Adhyay 15.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय चौदावा ( १४ ) भाग १/२
श्रीगणेशाय नमः ॥ 
जयजयाजी पंढरीनाथा । समचरणीं भक्ततापशमिता ।
कटीं कर नासाग्रीं दृष्टी ठेविता । होसी रंजिता मुनिमानसा ॥ १ ॥
ऐसा स्वामी तूं करुणाकर । तरी तूं बोलवीं भक्तिसार ।
मागिले अध्यायीं कथानुसार । परम कृपें वदविला ॥ २ ॥
त्या कृपेचा बोध सबळ । ब्रह्म उदधि पावला मेळ ।
पात्रा मैनावती सबळ । सरिताओघीं दाटली ॥ ३ ॥
ॐ नमो ब्रह्मार्णवीं दाटली परी । ऐक्यरुप झाली नारी ।
मोहें पुत्राचे परिवारीं । गुंतलीसे जननी ते ॥ ४ ॥
मनासी म्हणे अहा कैसें । त्रिलोचनरायाचें जाहले जैसें ।
त्याचि नीतीं होईल तैसें । मम सुताचें काय करुं ॥ ५ ॥
जंव जंव पाहे त्यातें दृष्टीं । तंव तंव वियोग वाटे पोटीं ।
हृदयीं कवळूनि जठरवेष्टी । होत असे मोहानें ॥ ६ ॥
अहा पुत्राचे चांगुलपण । दिसे जैसा प्रत्यक्ष मदन ।
परी काय करावें चांगुलपण । भस्म होईल स्मशानीं ॥ ७ ॥
उत्कृष्टपणें करोनि कष्ट । धाम उभाविलें अति श्रेष्ठ ।
परी वन्हीबळें लागल्या काष्ठ । तेवीं असे काळाग्नी ॥ ८ ॥
पहा पल्लवपत्रझाड । अति विशाळ लावला पाड ।
परी गाभारी वेष्टितां भिरुड । उशाशीं काळ बैसला ॥ ९ ॥
तन्न्याये दिसूनि येत । वायां जाईल ऐसा सुत ।
कीं कद्रूलागीं चोखट अमृत । फिकारपणें मिरविले ॥ १० ॥
कीं यत्नेंकरुनि कचें दुर्घट । संजीवनीचा केला पाठ ।
परी देवयानीचा शाप उल्हाट । यत्र व्यर्थ तो झाला ॥ ११ ॥
कीं सुंदर जाया कर्मे जारिणी । परी पतिभयाचा धाक मनीं ।
तेवीं तो उशाशीं काळ बैसोनि । सकळ जनां मिरवला ॥ १२ ॥
कीं कुसुमशेज मृदुलाकार । परी उसां घालूनि निजे विखार ।
ते सुखनिद्रेचा व्यापार । सुखा लाहे केउता ॥ १३ ॥
तन्न्यायें झालें येथ । राजवैभव अपरिमित ।
परी काळचक्राची सबळ बात । भ्रमण करीत असे पैं ॥ १४ ॥
ऐसी सदासर्वकाळ । चित्तीं वाहे माय तळमळ ।
परी सुतासी बोध कराया बळ । अर्थ कांहीं चालेना ॥ १५ ॥
तंव कोणी ऐके दिवशीं । शीतकाळ मावमासीं ।
उपरी सहपरिचारिकेंसीं । उष्ण घेत बैसलीसे ॥ १६ ॥
ते संधींत गोपीचंद । चौकीविभागीं सकळ स्रीवृंद ।
वेष्टूनि स्नान कराया सिद्ध । चंदनचौकीं बैसला ॥ १७ ॥
चंदनचौकी परी ते कैशी । हेमतगंटी रत्न जैशीं ।
जडावकोंदणी नक्षत्रांसीं । राजवृंदीं चमकतसे ॥ १८ ॥
सकळ काढूनि अंगींचें भूषण । वरी विराजे राजनंदन ।
उष्ण उदकीं कचरीत दंतधावन । चौकीवरी बैसला ॥ १९ ॥
तों सौधउपरी मैनावती । झाली स्वसुतातें पाहती ।
देखिला जैसा पूर्ण गभस्ती । तेजामाजी डवरला ॥ २० ॥
राजसेवकांचे भोवतें वेष्टन । परिचारिका वाहती जीवन ।
परी त्या मंडळांत नृपनंदन । चांगुलपणीं मिरवतसे ॥ २१ ॥
जैसा अपार नक्षत्रपंक्ती । आव्हानी उडुगणपती ।
कीं हेमचौकीं कोंदणस्थिति । रत्नतेजीं मिरवत ॥ २२ ॥
ऐसा पाहतां स्वनंदन । मोहें आलें उदरवेष्टन ।
तेणें लोटलें अपार जीवन । चक्षूंतूनि झराटलें ॥ २३ ॥
परी ते बुंद अकस्मात । मोहें घ्राणाचे उद्भव व्यक्त ।
गोपीचंद चातकातें । स्पर्शावया धांवले हो ॥ २४ ॥
म्हणाल बुंद चक्षुदकीं । नोहे उरते सत्कर्मवाकीं ।
उत्तम फळांचें लक्षूनि सेकी । व्यक्त जलें ते अंगासी ॥ २५ ॥
बुंद नव्हती ते चिंतामणी । हरुष केला भवकाचणीं ।
कीं कृतांतभयातें संजीवनी । भूपशरीरा आदळले ॥ २६ ॥
कीं अर्के पीडित भारी । नृपजन वेष्टला नगरीं ।
 तैं ते उतरले घन मनहरी । बुंदवेश धरुनियां ॥ २७ ॥
कीं काळक्षुधेचा पेटला अनळ । तेणें शरीर झालें विकळ ।
ते संधींत होऊनि कृपाळू । कामधेनु उतरली ॥ २८ ॥
कीं दरिद्राचें अतिवेष्टन । तैसा येथें मिरविला कुबेर येऊन ।
तन्न्याय सुबुंद घन । रावहृदयीं आदळले ॥ २९ ॥
शरीरीं होतां बुंद लिप्त । परी उद्भवस्थिती लागली त्यांत ।
म्हणूनि ऊर्ध्व करुनि मूर्धातें । नभालागीं विलोकी ॥ ३० ॥
हृदयीं होऊनि राव शंकित । म्हणे बुंद कैंचा उद्भवला येथ ।
तरी अंबर झालें असेल व्यक्त । घनमंडळ आगळें ॥ ३१ ॥
म्हणूनि ऊर्ध्व करुनि दृष्टी । पाहता झाला नभापोटीं ।
परी ते निर्मळपणें वृष्टी । झाली कोठूनि म्हणतसे ॥ ३२ ॥  
ऐसा विचार करितां चित्तीं । दृष्टिगोचरी संभविती ।
तों रुदन करितां मैनावती । निजदृष्टीं देखिली ॥ ३३ ॥
करीत होता दंतधावन । तैसाचि उठला नृपनंदन ।
उपरी त्वरा वेगीं चढून । मातेपाशीं पातला ॥ ३४ ॥
जातांचि पदीं ठेवूनिया माथा । उभा जोडूनि हस्तां ।
म्हणे सांग जी कवण अर्था । उचंबळलीस जननीये ॥ ३५ ॥
मजसारखा तूतें सुत । राज्याधीश महीं व्यक्त ।
ऐसा असूनि दुःखपर्वत । कोठूनि उदेला तंव चित्तीं ॥ ३६ ॥
पाहें पाहें प्रताप आगळा । न वर्णवे बळ वळियांकित महीपाळा ।
मिरवती दर्पकंदर्प केवळा । करभारातें योजिती ॥ ३७ ॥
ऐसी असतां बळसंपत्ती । बोललें कुणी दुःखसरितीं । 
तरी मम कोपाचा दाहक गभस्ती । सांवरेल कोणातें ॥ ३८ ॥
जेणें पाहिलें असेल नयनीं । उगीच तीव्र दृष्टी करोनि ।
तरी तयाचे क्षणें चक्षु काढोनि । तव करी माय ओपीन गे ॥ ३९ ॥
किंवा दाविलें असें बोटीं । तरी तींच बोटें काढीन शेवटीं ।
तरी कवण अर्थ उदेला पोटीं । रुदन कराया जननीये ॥ ४० ॥
अष्टविंशति स्रीमंडळ । कीं त्यांनीं ओपिलें कडुवट फळ ।
तरी शिक्षा करुनि तयां सबळ । मोक्षपंथा मिरवीन ॥ ४१ ॥
किंवा माझिये दृष्टी सेवेशीं । उदया पावला अंतर शेषीं ।
म्हणूनि उदय शोकानिशी । दर्शविली त्वां मातें ॥ ४२ ॥
तरी कोणता कवण अर्थ । माते वदे प्रांजळवत ।
कामनीं वेधक असेल चित्त । तोचि वेध निवटीन मी ॥ ४३ ॥ 
म्हणसील कार्य आहे थोर । करुं न शके सुत पामर ।
तरी हा देह वेंचूनि समग्र । अर्थ तुझा पुरवीन मी ॥ ४४ ॥
जरीं ऐशिया दृष्टीं । अंतर पडेल काय पोटीं ।
तरी धिक्कार असो मज शेवटीं । पुत्रधर्म मिरवावया ॥ ४५ ॥
मग श्र्वान सूकर काय थोडीं । अवतार मिरविती द्वारीं पवाडी । 
याचि नीति तया प्रौढीं । निर्माण झालों मी एक ॥ ४६ ॥
अहा पुत्रधर्म मग कैसा । माता पिता दुखलेशा । 
पाहूनि चित्तीं परी हरुषा । भूभार तो नर एक ॥ ४७ ॥
आपण मिरवे राणिवा प्रकरणीं । मातापिता दैन्यवाणीं ।
तयाचे भारें सकळ मेदिनी । विव्हळ दुःखे होतसे ॥ ४८ ॥
कांतेलागी शृगांर व्यक्त । मातेसी वसन नेसावया भ्रांत ।
तयाचे भारीं धरा समस्त । विव्हळ दुःखी होतसे ॥ ४९ ॥
कांतेसी नेसावया वस्त्र भरजरी । माता ग्रंथीं चीर सावरी ।
तयाचे भारें सकळ धरित्री । विव्हळ दुःखे होतसे ॥ ५० ॥   
कांतेसी इच्छा समान देणें । मातेसीं खावया न मिळे अन्न ।
तयाचे भारें पृथ्वी सधन । विव्हळ दुःखे होतसे ॥ ५१ ॥   
कांतेसी बसावया उंच आसन । मातेसी कष्टवी दासीसमान ।
तयाचे भारे धरारत्न । विव्हळ दुःखी होतसे ॥ ५२ ॥
रंभेसमान कांता ठेवी । भूतासमान माता मिरवी ।
तयाचे भारें धरादेवी । विव्हळ दुःखी होतसे ॥ ५३ ॥
जन्म घेतला जियेचे पोटीं । तीते म्हणे परम करंटी ।
तयाचे भारें धरा हिंपुटी । विव्हळ दुःखी होतसे ॥ ५४ ॥
कांता सर्व सुखाचे मेळीं । माता दुःखे अश्रु ढाळी ।
तयाचे भारें धरा विव्हळी । अति दुःखी होतसे ॥ ५५ ॥
कांतेलागीं मृदु भाषण । मातेसी हृदयीं खोंची बाण ।
तयाचे भारें धरारत्न । विव्हळ दुःखी होतसे ॥ ५६ ॥
आपण मिरवे राणिवासरसा । पितया काळा मातंग जैसा ।
तयाचे भारें धरा क्लेशा । विव्हळ दुःखी होतसे ॥ ५७ ॥
आपण कंठी कुड्या पहुडी । पित्याशिरीं बत्या जोडी ।
तयाचे भारें धरा मुख मुरडी । विव्हळ दुःखी होतसे ॥ ५८ ॥
आपण भक्षी सदा सुरस अन्न । पितर मागती भिक्षा कदन्न ।
तयाचे भारें धरारत्न । विव्हळ दुःखी होतसे ॥ ५९ ॥
तरी ऐसिये पुत्र सृष्टीं । गळावेत गर्भीहून शेवटीं ।
तन्न्याय अर्थ पोटीं । माझा न धरी जननीये ॥ ६० ॥
जे तुज वेधक मनकामना । तयासाठीं वेचीन प्राणा ।
परी माये वो तव वासना । पूर्ण करीन निश्र्चयेसी ॥ ६१ ॥    
ऐसी बोलता स्वसुत वार्ता । प्रेमाब्धि उचंबळला चित्ता ।
मग हितार्थरत्न द्यावया हाता । वाग्लहरी उचंबळे ॥ ६२ ॥
म्हणे बा रे ऐक वचन । प्रेम उदयाचळीं तूं दिव्यरत्न ।
उदय पावलासी चंडकिरण । शत्रुतम निवटावया ॥ ६३ ॥
तया ठायीं अंधार । मज पीडा काय बा करणार ।
परिस लाधल्या वसतिस दरिद्र । स्वप्नामाजी नांदेना हो ॥ ६४ ॥
बा रे तव प्रताप दर्प । पादरज झाले भूप ।
ऐसें असतां कोप कंदर्प । मातें कोण विवरील ॥ ६५ ॥
बा रे तीव्र प्रतापी स्थावर केसरी । तयाचे लेकुरा वारण मारी ।
हा विपर्यास कवणेपरी । मिरवूं लाहे जगातें ॥ ६६ ॥
राया नरेंद्रा तुझी मी माता । मातें कोण होय गांजिता । 
परी चिंता उदरी मोहव्यथा । शोकतरु उद्भवला ॥ ६७ ॥
बा रे तव स्वरुप पूर्ण अर्क । पाहतां मातें उदेला शोक ।
म्हणशील जरी अर्थदायक । कवणापरी उदेला तो ॥ ६८ ॥ 
बा रे तव पिता तव समान । स्वरुप उदेलें अर्कप्रमाण ।
परी काळ अस्थाचळीं जाऊन । गुप्त झाला पुरुष तो ॥ ६९ ॥
अहा अपार तो स्वरुपाब्धी । अंती वेष्टी वडवानळसंधी ।
पडतां बा रे विशाळ बुद्धी । भस्म झाला क्षणांतरीं ॥ ७० ॥
अस्थी जळाल्या काष्ठासमान । लोभ दाहिलें जेउतें तृण ।
मांसस्नेहाचें होऊनि शोषण । स्वरुपातें लोपला तों ॥ ७१ ॥
तंव त्या भयाची हुडहुडी मोठी । बा रे मज उदेली पोटीं ।
तुझें स्वरुप पाहतां दृष्टीं । भयातें उठी उठावे ॥ ७२ ॥
बा रे कृतांत महीं विखार । घुसघुशीत वारंवार ।
टपूनि बैसला जैसा मांजर । मूषकातें उचलावया ॥ ७३ ॥
जैसा व्याघ्र जपे गाई । कीं मीन वेंची बगळा प्रवाहीं ।
तैसें जगातें तन्न्यायीं । कृतांत आहारी नटलासे ॥ ७४ ॥   
तरी तो व्याघ्र ऐसा सबळ । जिंकूनि योजावा पिंजरीं मेळ ।
बा रे तैं भयाचा वडवानळ । मग स्पर्शणार नाहीं देहातें ॥ ७५ ॥
बा रे विखार डंखी दुःख । तेंचि वेंचिल्या सकळ सुख ।
कंटकीं धरिल्यास सकळ वृश्र्चिक । वेदनेतें मिरवेना ॥ ७६ ॥
ऐसेपरी रचूनि युक्ती । सकळ हरावा कृतांत गती ।
व्यर्थ शरीराची माती । करुं नये जन्मल्यानें ॥ ७७ ॥
आपण आपुलें पहावें हित । सारासार नरदेहांत ।
पाहें वश्य करुनि रघुनाथ । चिरंजीव झाला बिभीषण ॥ ७८ ॥
पाहें नारद वैष्णव कैसा । विष्णु राधी नरवेषा । 
तों श्रीगुरु वरदेषा । अमरपणीं मिरविला ॥ ७९ ॥
त्याचि नारदासी कृपाधन । बोलला श्रीव्यास महीकारण ।
तेणें पिकलें ब्रह्मपण । शुक महाराज तिसरा ॥ ८० ॥
त्याचा कौशिक अनुगृहीत । तेणें करोनि शरणागत ।
कृष्णयाज्ञवल्की तारुनि निश्र्चित । तेणें तारिला रामानुज ॥ ८१ ॥
ऐसा प्रसाद सांप्रदाय मिरवून । ते पुरुष झाले ब्रह्मसनातन ।
तेवीं तूं बाळा माझा नंदन । जगामाजी मिरवीं कां ॥ ८२ ॥
ऐसें बोधितां मैनावती । संपली येथूनि तिची उक्ति ।
परी श्रोते कवि ते संप्रदाय पुसती । सांगा म्हणती चातुर्य ॥ ८३ ॥
ऐसा प्रश्र्न कवि पाहून । सांगे संप्रदाय पूर्ण ।
रामानुजापासून । योगिया संत पैं झाला ॥ ८४ ॥
तयापासूनि मुकुंदराज । मुकुंदराजाचा जैत्पाल भोज ।
जैत्पालाचा धर्मानुज । बोधल्यादिक पैं त्याचे ॥ ८५ ॥
यापरी द्वितीय संप्रदायी । माता सुतातें लोटी बोधप्रवाहीं ।
उमेनें आराधोनि शिवगोसावी । चैतन्यसंप्रदायीं मिरवला ॥ ८६ ॥
त्यानें बोधिला कपिलनामी । आणि दुसरा राघवचैतन्यस्वामी ।
राघवाचा ब्रह्मचैतन्य नेमी । तयाचा केशवचैतन्य ॥ ८७ ॥
केशवाचा बाबाचैतन्य । श्रीतुकाराम त्याचा धन्य धन्य ।
हा चैतन्यसंप्रदाय उत्तम मान्य । संतगणीं मिरवितो ॥ ८८ ॥
यापरी तिसरा संप्रदाय । महाश्रेष्ठ म्हणती स्वरुपमय ।
तरी प्रथम बोधिला कमलोद्भव । हंसरुपें श्रीविष्णुनें ॥ ८९ ॥
ते विधीचे सकळ हित । अत्रीनें घेतले सकळ पंथ ।
अत्रीपासूनि झाले दत्त । तयापासूनि नाथ सकळ ॥ ९० ॥
यापरी सांप्रदाय पाहें । चवथा नंद महीतें आहे ।
सूर्यापासूनि याज्ञवल्की पाहे । ब्रह्मवेत्ता मिरवला ॥ ९१ ॥
तयापासूनि सहजानंद । सहजानंदाचा कूर्म अवतार प्रसिद्ध ।
कूर्मानें उपदेशिला ब्रह्मानंद । ब्रह्मानंदाचा योगानंद कीं ॥ ९२ ॥
योगानंदाचा चिदानंद । जगीं मिरवत आहे प्रसिद्ध ।
तरी तुवां गोपीचंद । हित करुनि घेई कां ॥ ९३ ॥
तेणेंकरुनि अमरपणीं । जगीं मिरविसी महाप्राज्ञी ।
यास्तव बा रे माझे नयनीं । अश्रू लोटले तुजलागी ॥ ९४ ॥
याउपरी बोले नृपनाथ । बोलसी माते सत्यार्थ ।
परी प्रस्तुतकाळीं ऐसा नाथ । कोण मिळेल आम्हातें ॥ ९५ ॥
मुळींच असेल अमरपणीं । जो ओपील अपरवाणी ।
ऐसा गोचर आम्हांलागुनी । कोठूनि होईल जननीये ॥ ९६ ॥
ऐसी ऐकूनि तयाची मात । माता बोलती झाली त्यातें ।
बा रे तैसाचि आपुले गांवांत । जालिंदरनाथ मिरवला ॥ ९७ ॥
स्वरुप सांप्रदाय परिपूर्ण । तूतें करील ब्रह्मसनातन ।
तरी तूं कायावाचामनें करुन । शरण जाईं तयासी ॥ ९८ ॥
बा रे तुझें वैभव थोर । राजकारणी कारभार ।
परी मायिक सकळ विस्तार । लया जाईल बाळका ॥ ९९ ॥
तरी तनमनधनप्राण । शरण रिघावें तयाकारण ।

आपुलें हित अमरपण । जगामाजीं मिरवीं कां ॥ १०० ॥
Navanatha Bhaktisar Adhyay 14 
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय चौदावा ( १४)


Custom Search

No comments: