Monday, February 29, 2016

Shri Navanath BhaktiSar Adhyay 24 Part 1/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय चोविसावा (२४) भाग १/२


Shri Navanath BhaktiSar Adhyay 24 
DrumilNarayan had taken birth as Bhartari. Bhartari was son of God Mitra-Varuni. Bhartari in his early age was cared by a dear by offering milk and looking after all his needs of the age. Bhartari was growing in the forest started to eat leaves like dear. He learnt the language of the animals. One day Jaysing and his wife Renuka saw Bhartari in the forest and were surprised that such a small child had been left their by his mother and father. However they took him with them and took care of him, thinking all the time that they have to return the child to his mother and father one day upon their asking to do so. Jaysing and his family came to Kashi on the bank of Bhagirathi. They decided to stay there as Kashi being a holy place. One day he took Bhartari with him and went in the God Shiva temple. God welcomed the child calling him as Bhartari. Jaysing herd it and came to know that the child is a God. He told everything to Renuka and they decided to name the child as Bhartari, as God Shiva had called him as Bhartari. One day Bhartari became unconscious while playing with other children who ran away. Mitra-Varini saw Bhartari wounded came down from swarga and cured him. He took Bhartari to Renuka and introducing himself told everything to her right from Bhartari's birth. He told her to take care of Bhartari. Further he assured her that nobody would take Bhartari from them. Renuka told everything to Jaysing. As Bhartari grew older day by day, Jaysing and Renuka thought of his marriage and decided to leave Kashi and to go to their native village. However in the forest they met with the thieves who killed Jaysing and took the money and everything with them. Renuka also died because of the shock. Bhartari became very sad and could not understand what to do. However a group of traders saw him and took him with them. What happened next would be told to us in the next 25th Adhayay by Dhudisut Malu from Narahari family.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय चोविसावा (२४) भाग १/२
श्रीगणेशाय नमः ॥
जयजयाजी निरंजना । अलक्ष गोचरव्यक्त निर्गुणा ।
पूर्णब्रह्मा मायाहरणा । चक्रचालका आदिपुरुषा ॥ १ ॥
हे गुणातीता सर्वत्रभरिता । सगुणरुपा लक्ष्मीकांता ।
मागिले अध्यायी रसाळ कथा । मच्छिंद्रोत्सव दाविला ॥ २ ॥
एका सुवर्णविटेसाठीं । कनकगिरि करी गोरक्षजेठी ।
आतां मम वाग्वटीं । भर्तरीआख्यान वदवीं कां ॥ ३ ॥
तरी श्रोते ऐका कथन । पूर्वीं मित्ररश्मी करितां गमन ।
वातचक्रीं प्रेरुनि स्यंदन । अस्ताचळा जातसे ॥ ४ ॥
तों उर्वशी विमानासनीं । येत होती भूलोकअवनीं ।
तंव ती दारा मुख्यमंडनीं । मदनबाळी देखिली ॥ ५ ॥
देखतांचि पंचबाणीं । शरीर वेधलें मित्रावरुणीं । 
वेधतांची इंद्रियस्थानीं । येऊनि रेत झगटले ॥ ६ ॥
झगटतांचि इंद्रिय रेत । स्थान सोडूनि झालें विभक्त ।
विभक्त होतां पतन त्वरित । आकाशाहूनि पैं झालें ॥ ७ ॥
परी आकाशाहूनी होतांचि पतन । वातानें तें विभक्तपण ।
द्विभाग झालें महीकारण । येऊनियां आदळलें ॥ ८ ॥
एक भाग लोमशआश्रमा । येऊनि पावला थेट उत्तमा ।
घटीं पडतांचि तनू उत्तमा । अगस्तीची ओतली ॥ ९ ॥
यापरी दुसरा भाग । तो कौलिका ऋषीच्या आश्रमा चांग ।
येतांचि कैसा झाला वेग । तोचि श्रवण करा आतां ॥ १० ॥
कौलिक घेऊनि पात्र भर्तरी । भिक्षोद्देश धरुनि अंतरीं ।
निघता झाला सदनाबाहेरी । वस्तीपर्यटन करावया ॥ ११ ॥
परी कौलिक येतांचि बाहेर । भर्तरी ठेवूनि महीवर ।
बंद करीतसे सदनद्वार । कडीटाळें देऊिनियां ॥ १२ ॥
परी भर्तरी ठेविली अंगणांत । तों आकाशांतूनि रेत त्यांत ।
येऊनियां अकस्मात । भाग एक आदळला ॥ १३ ॥
तों इकडे कौलिक ऋषी । टाळें देऊनि गृहद्वारासी । 
येऊनि पाहे भर्तरीसी । तों रेत व्यक्त देखिलें ॥ १४ ॥
रेत व्यक्त देखतांचि पात्र । अंतःकरणीं विचारी तों पवित्र ।
चितीं म्हणे वरुणीमित्र । रेत सांडिलें भर्तरी ॥ १५ ॥
तरी यांत धृमीनारायण । अवतार घेईल कलींत पूर्ण ।
तीन शत एक सहस्र दिन । वर्षें लोटलीं कलीचीं ॥ १६ ॥
इतुकीं वर्षें कलीची गेलिया । धृमीनारायण अवतरेल भर्तरी या ।
तरी आतां भर्तरी रक्षूनियां । ठेऊं आश्रमीं तैसीच ॥ १७ ॥
मग ती भर्तरी रेतव्यक्ती । रक्षिता झाला आश्रमाप्रती ।
त्यासी दिवस लोटतां बहुतीं । पुढें कली लागला ॥ १८ ॥
मग तो कौलिक ऋषी । गुप्त विचरता प्रकट देशीं ।
भर्तरी नेऊनि मंदराचळासी । गुहाद्वारीं ठेविली ॥ १९ ॥
गुहाद्वारीं ठेवूनि पात्र ।अदृष्य विचरे तों पवित्र ।
तों कली लोटतां वर्षें तीन सहस्र । एकशतें तीन वर्षें ॥ २० ॥
तों द्वारकाधीशअंशेंकरुन । भर्तरींत संचरला धृमीनारायण ।
जीवित्व व्यक्त रेताकारण । होतांचि वाढी लागला ॥ २१ ॥
वाढी लागतां दिवसेंदिवस । पुतळा रेखत चालिला विशेष ।
पूर्ण भरतां नवमास । सिद्ध झाला तो पुतळा ॥ २२ ॥
परी मधुमक्षिकेनें पात्रांत । मधूचें जाळें केलें होतें ।
तयाचे संग्रहें व्यक्त । बाळ वाढी लागला ॥ २३ ॥
वाढी लागतां मधुबाळ । नवमास लोटतां गेला काळ ।
परी तो देहें होतां स्थूळ । भर्तरी पात्र भंगलें ॥ २४ ॥
बहुत दिवसांचें पात्रसाधन । झालें होतें कुइजतपण ।
त्यांत पर्जन्यकाळीं कड्यावरुन । पर्वत कोसळतां लोटले ॥ २५ ॥
कोसळतां परी एक पाषाण । गडबडीत पातला तें स्थान ।
परी पावतांचि पात्रासी झगटोन । भर्तरी भंग पावली ॥ २६ ॥
भर्तरी भंगतांचि बाळ त्यांत । तेजस्वी मिरवलें शकलांत ।
मक्षिकेचें मोहोळ व्यक्त । तेंही एकांग जाहलें ॥ २७ ॥
मग निर्मलपणीं बाळ व्यक्त । मिरवों लागलें स्वतेजांत ।
जैसें अभ्र वेगळें होतां दीप्त । निर्मळपणीं मिरवतसे ॥ २८ ॥
कीं स्थिरावल्या जैसे जीवन । तळा बैसलें गढूळपण । 
तें बाळ भर्तरीशुक्तिकारत्न । विमुक्त झालें वेष्टणा ॥ २९ ॥
परी कडा कोसळला कडकडीत । शब्द जाहले अति नेट ।
तेणेंकरुनि मक्षिका अचाट । भय पावोनि पळाल्या ॥ ३० ॥
येरीकडे एकटें बाळ । शब्दरुदनी करी कोल्हाळ ।
तेथें चरे कुरंगमेळ । तया ठायीं पातला ॥ ३१ ॥
तयांत गरोदर कुरंगिणी । चरत आली तये स्थानीं ।
तो बाळ रुदन करितां नयनीं । निवांत तृणीं पडलेंसे ॥ ३२ ॥
तरी अफाट तृण दिसे महीं । त्यांतही बाळ सबळ प्रवाहीं ।
चरत येतां हरिणी तया ठायीं । प्रसूत झाली बाळ पैं ॥ ३३ ॥
प्रसूत होतां बाळें दोन्ही । झाली असतां कुरंगिणी ।
पुनः मागे पाहे परतोनी । तों तीन बाळें देखिलीं ॥ ३४ ॥
माझींच बाळें त्रिवर्ग असती । ऐसा भास ओढवला चित्तीं ।
मग जिव्हा लावूनि तयांप्रति । चाटूनि घेतलें असे ॥ ३५ ॥
परी तीं खडतरपणीं दोन्हीं पाडसें तीतें । संध्याअवसरी झगटली स्तनातें । 
परी हें बाळ नेणे पानातें । स्तन कवळावें कैसें तें ॥ ३६ ॥
मग ते कुरंगिणी लोटूनि पाडस । चहूंकडे ठेवूनि चौपदास ।
मग वत्सलोनि लावी कांसेस । मुख त्याचें थानासी ॥ ३७ ॥
ऐसे लोटतां कांहींएक दिवस । तों तें रांगूं लागलें महीस ।
मग ते मृगी लावूनि थानास । संगोपन करीतसे ॥ ३८ ॥
ऐेसें करवोनि स्तनपानीं । नित्य पाजी कुरंगिणी ।
आपुलें मुखींची जिव्हा लावूनि । करी क्षाळण शरीरासी ॥ ३९ ॥
पाडसें ठेवूनि तया स्थानीं । चरुं जातसे विपिना हरिणी ।
घडोघडी येतसे परतोनी । जाई पाजूनि बाळातें ॥ ४० ॥
ऐसें करितां संगोपन । वर्षे लोटली तयांतें दोन ।
मग हरिणांमध्येचि जाऊन । पत्रें भक्षी वृक्षांची ॥ ४१ ॥
परी त्या वनचरांचे मेळीं । विचरता सावजभाषा सकळी ।
स्पष्ट होऊनि त्या मंडळीं । त्यांसमान बोलतसे ॥ ४२ ॥
हस्तिवर्ग गायी म्हैंशी व्याघ्र । जंबुक लांडगे हरिण भयंकर ।
शार्दूल रोही (मृग) गेंडा सांबर । भाषा समजे सकळांची ॥ ४३ ॥
सर्प किडे मुंगी पाळी । पक्षी यांची बोली सकळी ।
तैसेंचि कोकूनि उत्तर पावलीं । देत असे सकळांसी ॥ ४४ ॥
ऐसियापरी वनचररंगणीं । प्रत्यक्ष अवतार विचरे काननीं ।
जिकडे जिकडे जाय हरिणी । तिकडे तिकडे जातसे ॥ ४५ ॥
ऐसा पांच वर्षेंपर्यंत । हरिणीमागें तो हिंडत । 
तों एके दिवशी चरत चरत । हरिणी आली त्या मार्गें ॥ ४६ ॥
काननी चरतां मार्गे नेटे । तो बाळही आला ते वाटे ।
तों मार्गीं सह स्त्रीपुरुष भाट । मग त्या वाटे तीं येती ॥ ४७ ॥
त्या भाटा जयसिंग नाम । कांता रेणुका सुमध्यम ।
परी उभयतांचा एक नेम । एकचित्तीं वर्तती ॥ ४८ ॥
वर्तती परी कैसे अलोटी । शत्रुमित्र ऐक्यदृष्टी । 
कीं धनदवातका मोह पोटीं । समानचि वर्ततसे ॥ ४९ ॥
तन्न्यायें पुरुष कांता । प्रपंचहाटीं वर्तत असतां ।
तों सहज त्या मार्गें येतां । तया ठायीं पातलीं ॥ ५० ॥                
पातलीं परी मार्गावरती । बाळ देखिलें दिव्यशक्ती ।
बालार्क किरणी तेजाकृती । लखलखीत देखिलें ॥ ५१ ॥
कीं सहजासहज करावया गमन । महीं उतरला रोहिणीरमण ।
कीं पावकतेजकांती वसन । गुंडाळलें वाटतसे ॥ ५२ ॥
ऐशापरी तेजःपुंज । जयसिंग भाट देखतां सहज ।
मनांत म्हणे अर्कतेज । बाळ असे कोणाचें ॥ ५३ ॥
ऐसें स्त्रियेसी म्हणतसे । ऐसिया अरण्यांत असे ।
बाळ सांडूनि गेलीं सुरस । मातापितां कैसीं तीं ॥ ५४ ॥
कीं सहजचालीं चालतां । यांत चुकली याची माता ।
ऐसे अपार संशय घेतां । तयापाशीं पातली ॥ ५५ ॥
पातली परी बाळ पाहोन । भयें व्याप्त झालें मन ।
मग मृग बोलिले आरंबळोन । पळूं लागले मार्गातें ॥ ५६ ॥
तें पाहूनि जयसिंग भाटें । धांवोनि धरिली बाळकाची पाठ । 
पाठीं लागूनि धरुनि मनगट । उभा केला बाळ तो ॥ ५७ ॥
उभा धरुनि त्यातें बोलत । म्हणे बाळ सांडी भयातें ।
तूतें भेटवीन तव मातेतें । माता कोण ती सांग ॥ ५८ ॥
परी तें कुरंगभाषेकरुन । आरंबळतसे छंदेंकरुन २
नेत्रां लोटलें अपार जीवन । हांक मारी हरिणीतें ॥ ५९ ॥
परी ते हरिणी बाळ पाहून । कासावीस झाले पंचप्राण ।
परी मनुष्य भयेंकरुन । निकट येऊं शकेना ॥ ६० ॥
हरिणी आपुले ठायींच्या ठायीं । परम आरंबळे महीतें देहीं ।
येरीकडे मार्ग प्रवाहीं । भाट बोले बाळातें ॥ ६१ ॥
म्हणे वत्सा व्यर्थ कां रडसी । कोण मातापिता आहे तुजसी । 
सोडूनि गेलीं अरण्यासी । तरी भेटवूं तुज आतां ॥ ६२ ॥
परी कुरंगभाषेकरुन । ब्यां ब्यां करुनि करीत रुदन । 
मग भाट म्हणे हे वाचाहीन । मुखस्तंभ वाटतसे ॥ ६३ ॥
मग हस्तेखुणेनें पुसे त्यातें । परी खूणही तें नेणें परतें ।
मग जयसिंग म्हणे आपुले मनातें । परम अज्ञानी बाळक हे ॥ ६४ ॥
तरी आतां असो कैसें । यातें आपुल्या न्यावें वस्तीस । 
याची जननी भेटल्यास । हस्तगत यातें करुं ॥ ६५ ॥
ऐसा विचार करुनि मानसीं । उचलूनि घेतला स्वस्कंधासी ।
परी तें आरंबळोनि हरिणीसी । पाचारित अट्टाहासें ॥ ६६ ॥
परी ती कुरंगभाषा कांहीं । जयसिंगातें माहीत नाहीं ।
तैसें वाहूनि मार्गप्रवाहीं । घेऊन जात बाळका ॥ ६७ ॥
परी त्या बाळकासी घेऊनि जातां । अति आरंबळे हरिणी चित्ता ।
सव्यअपसव्य वेडा भंवता । घेऊनि हंबरडा मारीतसे ॥ ६८ ॥
बाळावरी ठेवूनी दृष्टी । धांव घेतसे पाठोपाठीं ।
ठायीं ठायीं महींतटीं । उभी राहूनि आरंबळे ॥ ६९ ॥
ऐसी हरिणी आरंबळत । दुरोनि त्यासी मार्ग गमत ।
परी तो जयसिंग पाहूनि मनांत । विचार करी आपुल्या ॥ ७० ॥
म्हणे हरिणी कवणे अर्थीं । हिडत आहे काननाप्रती ।
पाडस चुकार झालें निगुतीं । म्हणोनि हिंडे विपिनीं ही ॥ ७१ ॥
ऐसियेपरी चित्तीं भास । भासूनि गमन करीतसे मार्गास ।
गमन करितां स्वगृहास । वस्तीस जाऊनि पोहोंचला ॥ ७२ ॥
मग ती वस्ती पाहोनि हरिणी । विपीना गेली निराशपणीं ।
परी ठायीं उभी राहूनी । हंबरडा मारी आक्रोशें ॥ ७३ ॥
येरीकडे जयसिंग भाट । येतां ग्रामा झाला प्रविष्ट ।
बाळ ओपूनि कांते सुभट । वस्ती फिरुं पातला ॥ ७४ ॥
सकळ वस्तीस फेरी फिरुन । पुन्हां शिबिरा येत परतोन ।
ऐसें करिता मास तीन । लोटूनि गेले वस्तीसी ॥ ७५ ॥
परी तें बाळ आरंबळतां । भयानें राहिली सकळ व्यथा । 
मग थोडी थोडी संवय लागतां । विसर पडला हरिणीस ॥ ७६ ॥
तेचि नीतीं बाळा विसर । शनैक पडला कुरंगापर ।
भोजनपानादिक सारासार । कळों सविस्तर लागलें ॥ ७७ ॥
बोली चाली शनैःशनैक । प्रविष्ट जहालें तें बाळक ।
मग हाका मारी जननी जनक । भक्षावया मागतसे ॥ ७८ ॥
असो ऐसियापरी अलोट । ग्रामोग्रामीं हिंडे भाट । 
हिंडता हिंडता भागीरथीतट । काशीक्षेत्रीं पातला ॥ ७९ ॥
पातला परी विश्र्वेश्र्वरी । दर्शना जात देवालयांतरी । 
स्नान करुनि भागीरथीतीरी । बाळ घेऊनि गेला असे ॥ ८० ॥
विश्र्वेश्र्वराचे दर्शन करीत । तों लिंगांतूनि बोलला उमाकांत ।
यावें भर्तरीअवतारांत । दृश्य झाले तुम्हीं कीं ॥ ८१ ॥
ऐसें ऐकूनि नमस्कारितां । शब्दोदयीं झाला बोलता ।
त्याचे ते शब्द समजता । जयसिंगें ऐकिले ॥ ८२ ॥      
मग तो मनांत करी विचार । बाळ हे करितां नमस्कार । 
शिवलिंग बोले अति मधुर । भर्तरी ऐसें म्हणोनि ॥ ८३ ॥
तरी हा आहे कोण अवतारदक्ष । स्वर्गवासी आहे प्रत्यक्ष ।
परी प्रारब्धयोगें आम्हां सुलक्ष । प्राप्त झाला वाटतसे ॥ ८४ ॥
जैसा दरिद्रिया मांदुसघट । सहज चालता आदळे वाट ।
तेवीं आम्हां बाळ चोखट । प्राप्त झाले दैवयोगें  ॥ ८५ ॥
कीं चिंतातुरासी चिंतामणी । अवचट लाधला मार्गेंकरुनी ।
तेवीं मातें अवतारतरणी । प्राप्त झाला दैवानें ॥ ८६ ॥ 
कीं दुष्ट काळाची थोर रहाटी । प्राण अन्नाविण होतां कष्टी ।
तै सुरभी येऊनि कृपा होटी । थान आपुले ओपीतसे ॥ ८७ ॥
तन्न्यायें मातें झालें । निर्दैवा दैवें बाळ लाधलें ।
लाधले परी पुण्य पावलें । अवतारी दिसतो हा ॥ ८८ ॥
हें पुण्य तरी वर्णूं केवढें । जयासाठीं हा स्थूळवट दगड ।
हर्षें पावूनि संस्कारपाड । यावें भर्तरी म्हणतसे ॥ ८९ ॥
तरी आतां भर्तरी नाम । थोर पाचांरु वाचेकारण ।
ऐसी चित्तीं कल्पना योजून । पुन्हां शिबिरा पातले ॥ ९० ॥
पातले परी कांतेलागून । सर्व निवेदिलें वर्तमान ।
म्हणे हा पुत्र तुजकारण । अवतारदक्ष सांपडला ॥ ९१ ॥
परी हा अवतारदक्ष कैसा । म्हणशील तरी वो वाग्रसा ।
तरी शिव प्रत्यक्ष बोलिला ऐसा । यावें भर्तरी म्हणोनी ॥ ९२ ॥
अगे हा बाळ करितां नमन । ध्वनि हे निघाली लिंगांतून ।
ती म्यां ऐकिली आपुल्या कानें । म्हणोनि म्हणतों अवतार हा ॥ ९३ ॥
तरी आतां येथूनि यातें । भर्तरी ऐसें नाम निश्र्चित ।
पाचारुनि अंतर्भूत । पालन करीं बाळाचें ॥ ९४ ॥
ऐसें सांगूनि तो युवती । टाकूनि गेला फेरीप्रती । 
परी श्रोते चित्तीं कल्पना घेती । शिव कां बोलिला भर्तरी ॥ ९५ ॥
यावें भर्तरी ऐसें वचन । किमर्थ वदला उमारमण ।
तरी तो भर्तरींत पावला जन्म । म्हणोनि शिव बोलिला असे ॥ ९६ ॥
भर्तरीअवतार सघन । यावें भर्तरी ऐसें म्हणोन ।
तरी आतां ऐसें ऐका वचन । कथा पुढें परिसावी ॥ ९७ ॥
ऐसें जयसिंग रेणुकेसी । सांगूनि वर्तमान तियेसी ।
भर्तरी नाम आनंदेसी । पाचारीत उभयतां ॥ ९८ ॥
त्या उभयतांचे जठरांतरीं । संतति नसे संसारविहारीं ।
म्हणोनि स्नेहाची मोहित लहरी । बोलली असे तयातें ॥ ९९ ॥
रेणुका नित्य बैसवोनि अंकीं । चुंबन घेतसे लालनअंकीं ।
नाना पदार्थ मागितल्या कीं । आणूनि देती उभयतां ॥ १०० ॥
Shri Navanath BhaktiSar Adhyay 24  श्रीनवनाथभक्तिसार अध्याय चोविसावा (२४) 


Custom Search

No comments: