Thursday, December 15, 2016

Kaveri Stutihi कावेरीस्तुतिः


Kaveri Stutihi 
Kaveri Stutihi is in Sanskrit. It is beautiful composition by Shri Vasudevanand Saraswati. He says in this Stuti that Kaveri Nadi makes people free from sins. It washes the sins of the people who take a bath in the river Kaveri. There is a grass in the basin of the river Kaveri, which has got medicinal qualities by which many deceases are removed. Thus Kaveri Nadi defeats Yama dutas and protects people who live on the bank of Kaveri River.
कावेरीस्तुतिः 
कावेरी निम्नगा वारिलहरीपापहारिणी ।
तारिणी पापिनामेनां भजेहं पापहारिणीम् ॥ १ ॥
मराठी अर्थ
१) श्रीकावेरी नदी ही आपल्या तरंगांनी पातके नष्ट करणारी,उताराकडे वाहात जाणारी, पापी लोकांचा उद्धार करणारी व पापांना घालविणारी आहे. अशा या श्रीकावेरीनदीचे मी स्मरण, भजन आदि करतो.
स्वसा कृष्णानद्यास्त्रिजगदमवद्यामितगुणा 
स्वसाराद्यावद्यामखिलमलपद्यामतिघृणा ॥ 
नृणां गोप्त्र्याच्छाद्य दरमसृतपद्यां हितकरीं 
व्यधात्सा कावेरी सरिदवतु नः पुण्यलहरी ॥ २ ॥
२) श्रीकावेरीनदी ही श्रीकृष्णानदीची बहीण आहे. ती तिन्ही जगाला स्त्युत्य किंवा वंद्य आहे. ती अपरिमीत गुणांची आहे. ती आपल्या शक्तीने अखिल मल दूर करणारी आहे. ती अतिशय दयाळू आहे. सर्व मनुष्यांची भीती दूर करुन त्यांचे रक्षण करणारी पुण्यतरंगांची श्रीकावेरीनदी आमचे सर्वांचे हित करणारी अशी होवो. 
उदीचीस्था गंगा पृथुतरतरंगातिकपटा 
भटान्याम्यानुच्चैर्दरकरगिरा या जयति हि ।
इयं कावेरी तु प्रसभमपि तानंतिकगता-
न्निवर्त्य स्वर्लोकं नयति निजलोकं श्रुतिमता ॥ ३ ॥
३) श्रीभागीरथीनदी ही उत्तरेकडे अर्थात् उत्तर दिशेकडे असून तिच्या लाटा फारच मोठ्या आहेत. तिच्या तीरावर कत्तृणनामक औषधीरुप सुगंधी गवत आहे. ती " चला, चालते व्हा, निघा, थांबू नका " इत्यादि जोरदार व भीती उत्पन्न करणार्‍या शब्दांनी यमराजांच्या दूतांना जिंकून परत पाठविते. मात्र ही श्रीकावेरीनदी तर जवळ आलेल्या यमदूतांना स्वसामर्थ्याने यमलोकाकडे परत पाठविते व आपल्या भक्तजनांना स्वर्गांत किंवा आपल्या स्थानांत घेऊन जाते.
अतो जल्पं जल्पं सरिदमृतकल्पं तव यश-
स्तटे भ्रामं भ्रामं तव खलु निकामं शुचि यशः ।
मुदा मज्जं मज्जं तव पयसि जन्माद्यकहरं 
सदा स्मारं स्मारं तव भवहमाहात्म्यमवरम् ॥ ४ ॥
४) हे कावेरीनदी ! यासाठींच तुझ्या अमृतासारख्या यशाचे मी सारखे गायन करतो. तुझ्या किनार्‍यावर भ्रमण करीत करीत तुझी निर्मल कीर्ती भरपूर ऐकतो आणि गातो. तुझ्या पाण्यांत आनंदाने किंवा प्रेमाने डुंबत राहिले म्हणजे जन्ममरणादि सर्व दुःखे नष्ट होतात म्हणून मी तुझ्या उदकांत सतत स्नानादि करीत असतो आणि तुझे श्रेष्ठ असे माहात्म्य संसारतापनाशक आहे म्हणून त्याचे स्मरण मी सदैव करीत असतो.
अये कावेरि त्वतटसमटनादेवमनिशं 
नयेत्कालं मेलं तव किल जलं पुण्यधुनि शम् ।
तटे श्वेतारण्यप्रभृतिवरकाशीसदृशषण्-
महाक्षेत्राण्यन्यान्यपि तव जयंत्याधिविलये ॥ ५ ॥
५) हे पुण्यवती श्रीकावेरीनदी ! तुझ्या तटावर रात्रंदिवस राहून काळ घालविल्यामुळे तुझे पवित्र उदक माझे अखंड कल्याणमंगल करुन सुखाशी मेळ घालून देईल (अशी खात्री आहे). तुझ्या मनोव्याधिनाशक अशा तीरावर श्वेतारण्यादि वरकाशीसारखी सहा महाक्षेत्रे व इतरही सामान्य तीर्थक्षेत्रे तुझा अखण्ड जयजयकार करीत असतात.
कावेरी सिन्धो ननु दीनबन्धो कारुण्यसिन्धो भवघोरसिन्धोः ।
मां तारय त्वं पतितोग्रतस्ते तत्राप्यपेक्षार्हति साध्विनस्ते ॥ ६ ॥
६) हे सरिद्वरे अर्थात् नदीश्रेष्ठे ! तू बंधूप्रमाणे दीनांचे हित करणारी व करुणासागर अशी आहेस. या घोर अशा संसारसागरातून तू माझा उद्धार कर. हा पतित तुझ्या समोर पडलेला आहे. तरी हे साध्वी ! तुझ्या कृपेची आम्हाला अपेक्षा आहे.  
पतितोद्धरणाय साध्वि चेदवतारस्तव भूतले न चेत् ।
पतितं हि समुद्धरिष्यसि स्वजनुस्त्वं विफलं करिष्यसि ॥ ७ ॥
७) हे साध्वी ! हे पतिव्रते श्रीकावेरीनदी ! या पृथ्वीवर तुझा अवतार पतितांच्या उद्धारासाठी आहे. जर तू पतितांचा उद्धार करणार नसशील किंवा केला नाहीस तर तुझा जन्म अर्थात् अवतार निष्फल करशील.
कृच्छ्रादिकव्रतमिहाचरणीयमग्रे
नेष्येथ सद्गतिमितीच्छसि चेत्वदग्रे ।
वच्मि प्रसह्य खलु सह्यसुते पुनासि ।
त्वं सह्य इत्यृषिवचो विमतं करोषि ॥ ८ ॥
८) हे सहनशील श्रीकावेरीनदी ! " मनुष्याने आधी कृच्छ्रचान्द्रायणादिव्रतांचे आचरण करावे मगच मी त्याला सद्गतीला नेईन " असे जर तुझे म्हणणे असेल तर किंवा असे तू इच्छित असशील तर अगर तुझी अशी इच्छा असेल तर त्यावर माझे असे म्हणणे आहे, " हे सह्यांद्रिकन्ये ! तू आपल्या स्वसामर्थ्याने-बलात्काराने लोकांना पवित्र करतेस " असे जे ऋषिमुनींचे वचन आहे ते तू खोटे करतेस; कारण तू अत्यंत सहनशील अशी आहेस. 
दीक्षा गृहीताजगरी गरीयसी यद्रोधसि श्रीगुरुणारुणाभसा ।
कायाधवायापि मुदर्पितास्तुवत् कावेरिकां तां खलु वासुदेवः ॥ ९ ॥
९) हे सर्वश्रेष्ठ श्रीकावेरीनदी ! तुझ्या तीरावरच अरुणासारखी कांती असलेल्या श्रीगुरुंनी अर्थात् श्रीदत्तात्रेयांनी श्रेष्ठ अशी आजगरी म्हणजे अजगरासारखे निश्चिन्त पडून राहण्याची दीक्षा घेतली व कायाघन म्हणजे कयाधुपुत्र जो प्रल्हाद त्यालाही आनंद दिला. 
अशा या श्रीकावेरीनदीचे हे स्तवन वासुदेवाने अर्थात् श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंदसरस्वती महाराजांनी केले आहे.  

॥ इति श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचिता कावेरीस्तुतिः संपूर्णा ॥   Kaveri Stutihi
   कावेरीस्तुतिः   


Custom Search
Post a Comment