Dashak Pahila Samas Choutha SadGuruStavan
Samas Choutha SadguruStavan is in Marathi. Samartha says that it is very difficult to describe or compare SadGuru. All the vertues and all best things put together and even then we can’t say that Sadguru is like this or that. Here samartha tries to compare with the best thing like Paris. Paris converts Iron into Gold. But that converted Gold can’t became like Paris, which can convert Iron into Gold. However in case of Guru, he makes his disciple like him only, so that Disciple becomes Guru and he can make his disciple like him. So it is difficult to describe or compare SadGuru.
समास चवथा सदगुरुस्तवन
श्रीराम ॥
आतां सद् गुरु वर्णवेना । जेथे माया स्पर्शो सकेना ।
तें स्वरुप मज अज्ञाना । काये कळे ॥ १ ॥
अर्थतें स्वरुप मज अज्ञाना । काये कळे ॥ १ ॥
१) सद् गुरुच्या रुपाला माया स्पर्श करु शकत नाही. आपले सर्व ज्ञान हे मायेच्या कक्षेंतील असते. त्यामुळे सद् गुरुस्वरुप आपल्यासारख्या माणसाला कळणे शक्य नसते. त्यामुळे सद् गुरुचे वर्णन करता येत नाही.
न कळे न कळे नेति नेति । ऐसें बोलतसे श्रुती ।
तेथें मज मूर्खाची मती । पवाडेल कोठें ॥ २ ॥
२) श्रुतिसुद्धा हे नाही हे नाही; कळत नाही कळत नाही म्हणून गप्प झाली. तेथे माझ्यासारख्या मूर्खाची बुद्धि त्या (गुरुस्वरुपाचे) वर्णन कसे करु शकेल.
मज न कळे हा विचार । दुर्हुनि माझा नमस्कारु ।
गुरुदेवा पैलपारु । पाववी मज ॥ ३ ॥
३) सद् गुरुस्वरुपाचा विचार मला कळत नाही म्हणून मी त्याला दुरुनच नमस्कार करतो. हे गुरुदेवा मला या मायेच्या कक्षेंतून पलीकडे न्या.
होती स्तवनाची दुराशा । तुटला मायेचा भर्वसा ।
आतां असाल तेसे असा । सद् गुरु स्वामी ॥ ४ ॥
आतां असाल तेसे असा । सद् गुरु स्वामी ॥ ४ ॥
४) सद् गुरुचे स्रवन करावे ही आशा मी धरली होती. माया मला मदत करील असे वाटत होते. पण तसे झाले नाही. म्हणून हे सद् गुरुस्वामी तुम्ही असेल तसेच असा.
मायेच्या बळे करीन स्तवन । ऐसें वांछित होतें मन ।
माया जाली लज्यायमान । काय करुं ॥ ५ ॥
५) मायेची मदत घेऊन तुमची स्तुति करावी ही इच्छा होती पण माया लाजली व ती मागे सरली त्यामुळेंच मला तुमची स्तुति करता येत नाही.
नातुडे मुख्य परमात्मा । म्हणौनि करावी लागे प्रतिमा ।
तैसा मायायोगें महिमा । वर्णीन सद् गुरुचा ॥ ६ ॥
तैसा मायायोगें महिमा । वर्णीन सद् गुरुचा ॥ ६ ॥
६) परमात्म्याचेही आकलन होत नाही म्हणून त्याचे प्रतिमा कल्पावी लागते. त्याप्रमाणे सद् गुरु स्वरुप अनाकलनीय असले तरी मायेच्या मदतीने मी त्यास्वरुपाचे वर्णन मी करेन.
आपल्या भावासारिखा मनीं । देव आठवावा ध्यानीं ।
तैसा सद् गुरु हा स्तवनीं । स्तऊं आतां ॥ ७ ॥
तैसा सद् गुरु हा स्तवनीं । स्तऊं आतां ॥ ७ ॥
७) जशी ज्याची भावना तशी देवाची कल्पना करुन मानव त्याचे ध्यान करतो., त्यालाच अनुसरुन मी आता सद् गुरुचे स्तवन करतो.
जय जया जि सद् गुरुराजा । विश्र्वंभरा विश्र्वबीजा ।
परमपुरुषा मोक्षध्वजा । दीनबंधु ॥ ८ ॥
परमपुरुषा मोक्षध्वजा । दीनबंधु ॥ ८ ॥
८) विश्र्वांत भरुन उरणार्या, विश्र्वाचे बीज असलेल्या, सर्वोत्तम परम पुरुष, मोक्षाची ध्वजा व दिनांचा बंधु असा सद् गुरु त्याचा जयजयकार असो.
तुझीयेन अभयंकरें । अनावर माया हे वोसरे ।
जैसें सूर्यप्रकाशें अंधारें । पळोन जाये ॥ ९ ॥
९) सूर्यप्रकाशाने जसा अंधकार नाहीसा होतो, तसा सद् गुरुचा अभय देणारा हात (शिष्याच्या) डोक्यावर पडला की अनावर मायेचा प्रभाव नाहीसा होतो.
आदित्यें अंधकार निवारे । परंतु मागुतें ब्रह्मांड भरे ।
नीसी जालिया नंतरें । पुन्हा काळोखें ॥ १० ॥
१०) सूर्य अंधकार घालवितो हे खरे तरी संध्याकाळ झाल्यावर परत अंधार पडायला सुरवात होते.
तैसा नव्हे स्वामीराव । करी जन्ममृत्य वाव ।
समूळ अज्ञानाचा ठाव । पुसून टाकी ॥ ११ ॥
११) सद् गुरु कृपेचे असे नाही अज्ञानरुपी मायेला ती पू्र्णपणे काढून टाकते. त्यामुळे जीवाची जन्म-मृत्युच्या चक्रांतुन सुटका होते.
सुवर्णाचें लोहो कांहीं । सर्वथा होणार नाहीं ।
तैसा गुरुदास संदेहीं । पडोंचि नेणे सर्वथा ॥ १२ ॥
१२) सोन्याचे लोखंड होत नाही तसेच दासाचे (शिष्याचे) मनांत संशय निर्माण होत नाही.
कां सरिता गंगेसी मिळाली । मिळणी होतां गंगा जाली ।
मग जरी वेगळी केली । तरी होणार नाहीं सर्वथा ॥ १३ ॥
१३) एखादी नदी गंगेला मिळाली कीं, ती गंगाच होते परत वेगळी करावयाची म्हटले तरी ती वेगळी होऊ शकत नाही.
परी ते सरिता मिळणीमागें । वाहाळ मानिजेत जगें ।
तैसा नव्हे शिष्य वेगें । स्वामीच होये ॥ १४ ॥
१४) त्या नदीला गंगेला मिळण्यापूर्वी लहान ओढा, नदी म्हणतात. तसेच शिष्य सद् गुरुची कृपा होण्याआधी सामान्य असतो पण नंतर मात्र सद् गुरुच होतो.
परीस आपणा ऐसें करीना । सुवर्णें लोहो पालटेना ।
उपदेश करी बहुत जना । अंकित सद् गुरुचा ॥ १५ ॥
उपदेश करी बहुत जना । अंकित सद् गुरुचा ॥ १५ ॥
१५) परीस मात्र असे करु शकत नाही. (परीसस्पर्शाने सोने बनलेले लोखंड) अशा सोन्याने लोखंड सोने बनु शकत नाही. मात्र गुरुकृपा झालेला शिष्य दुसर्या सामान्यांना आपल्यासारखे बनवु शकतो.
शिष्यास गुरुत्व प्राप्त होये । सुवर्णे सुवर्ण करितां न ये ।
म्हणौनि उपमा न साहे । सद् गुरुसी परिसाची ॥ १६ ॥
म्हणौनि उपमा न साहे । सद् गुरुसी परिसाची ॥ १६ ॥
१६) त्याला गुरुपद प्राप्त झालेले असते म्हणुन तो इतर लोकांना उपदेश करुन तारुन नेऊ शकतो. परीसस्पर्शाने लोखंडाचे बनलेले सोने दुसर्या लोखंडाचे सोने बनवु शकत नाही. म्हणुन परीसाची उपमा गुरुला देता येत नाही.
उपमे द्यावा सागर । तरी तो अत्यंतचि क्षार ।
अथवा म्हणों क्षीरसागर । तरी तो नासेल कल्पांतीं ॥ १७ ॥
१७) सद् गुरुला सागर म्हणावे तर तो खारट असतो, तसेच क्षीरसागरसुद्धा कल्पांती नासतो. म्हणुन गुरुला सागराची उपमा देता येत नाही.
उपमे द्यावा जरी मेरु । तरी तो जड पाषाण कठोर ।
तैसा नव्हे कीं सद् गुरु । कोमळ दिनाचा ॥ १८ ॥
तैसा नव्हे कीं सद् गुरु । कोमळ दिनाचा ॥ १८ ॥
१८) सद् गुरुला मेरुपर्वतासारखा म्हणावे तर मेरु पर्वत अचेतन व कठीण दगड आहे, गुरु काहीं तसा नाही. तो चेतनेनेयुक्त, कोमल मनाचा आहे. म्हणुन मेरु पर्वताची उपमा गुरुला देता येत नाही.
उपमे म्हणों गगन । तरी गगनापरीस तें निर्गुण ।
या कारणें दृष्टांत हीण । सद् गुरुस गगनाचा ॥ १९ ॥
या कारणें दृष्टांत हीण । सद् गुरुस गगनाचा ॥ १९ ॥
१९) सद् गुरुला गगनासारखा म्हणणेही योग्य नाही कारण आकाश शून्य दिसले तरी गुरु शून्यापलीकडचा आहे. म्हणुन ही उपमा बरोबर नाही.
धीरपणें उपमूं जगती । तरी हेहि खचेल कल्पांतीं ।
म्हणौन धीरत्वास दृष्टांतीं । हीण वसुंधरा ॥ २० ॥
२०) सद् गुरुला पृथ्वीसारखा निश्चल, निर्भय व गंभीर म्हणावे तर पृथ्वी कल्पांती नष्ट होईल पण सद् गुरु अभंग राहील. म्हणुन हीही उपमा बरोबर नाही.
आतां उपमावा गभस्ती । तरी गभस्तीचा प्रकाश किती ।
शास्त्रें मर्यादा बोलती । सद् गुरु अमर्याद ॥ २१ ॥
शास्त्रें मर्यादा बोलती । सद् गुरु अमर्याद ॥ २१ ॥
२१) सद् गुरु सूर्यासारखाही म्हणता येत नाही कारण सूर्याच्या प्रकाशाला, तेजाला मर्यादा आहेत सद् गुरुच्याबाबतींत तसे नाही.
म्हणौनि उपमे उणा दिनकर । सद् गुरु ज्ञानप्रकाश थोर ।
आतां उपमावा फणीवर । तरी तोहि भारवाही ॥ २२ ॥
आतां उपमावा फणीवर । तरी तोहि भारवाही ॥ २२ ॥
२२) सद् गुरुच्या ज्ञानाच्या प्रकाशाला मर्यादा नाही, त्यामुळे सूर्याची उपमा देता येत नाही. शेषाची उपमा द्यावी तर शेषाच्या डोक्यावर ओझे आहे सद् गुरुच्या डोक्यावर तसे नाही.
आतां उपमे द्यावे जळ । तरी तें काळांतरीं आटेल सकळ ।
सद् गुरुरुप तें निश्र्चळ । जाणार नाहीं ॥ २३ ॥
सद् गुरुरुप तें निश्र्चळ । जाणार नाहीं ॥ २३ ॥
२३) सद् गुरुला पाणी म्हणावे तर पाणी चंचळ व नष्ट होणारे तर सद् गुरुस्वरुप निश्चल व नाश न पावणारे त्यामुळे सद् गुरुला पाण्याचीही उपमा देता येत नाही.
सद् गुरुसी उपमावें अमृत । तरी अमर धरिती मृत्युपंथ ।
सद् गुरुकृपा यथार्थ । अमर करी ॥ २४ ॥
सद् गुरुकृपा यथार्थ । अमर करी ॥ २४ ॥
२४) सद् गुरुला अमृत म्हणावे तर नित्य अमृत पिणारे देवही मृत्युच्या मार्गाने जातात या उलट सद् गुरु कृपा झालेला साधक अमर होतो. त्यामुळे अमृताची उपमा देता येत नाही.
सद् गुरुसी म्हणावें कल्पतरु । तरी हा कल्पनेतीत विचारु ।
कल्पवृक्षाचा अंगिकारु । कोण करी ॥ २५ ॥
कल्पवृक्षाचा अंगिकारु । कोण करी ॥ २५ ॥
२५) सद् गुरुला कल्पतरु म्हणावे तर कल्पतरु कल्पना केलेलेच तेवढे देतो, तर सद् गुरुकृपा झाल्यावर कल्पनेपलीकडील मोक्षप्राप्ती व जन्म-मृत्युंतुन मुक्ति शिष्यास मिळते. म्हणुन ही कल्पतरुची उपमा योग्य नाही.
चिंता मात्र नाहीं मनीं । कोण पुसे चिंतामणी ।
कामधेनूचीं दुभणीं । निःकामासी न लगती ॥ २६ ॥
२६) सद् गुरुला चिंतामणीची उपमाही योग्य नाही कारण सद् गुरु शिष्याच्या मनांत चिंताच उरुं देत नाही. असा शिष्य कामनारहीत असल्याने कामधेनुची धार काढालाच जाणार नाही. त्यामुळे सद् गुरुला कामधेनुचीही उपमा देता येत नाही.
सद् गुरु म्हणों लक्ष्मीवंत । तरी ते लक्ष्मी नाशिवंत ।
ज्याचे द्वारीं असे तिष्ठत । मोक्षलक्ष्मी ॥ २७ ॥
ज्याचे द्वारीं असे तिष्ठत । मोक्षलक्ष्मी ॥ २७ ॥
२७) सद् गुरुला श्रीमंताची उपमा देता येत नाही कारण सर्व धन नाश पावते. परंतु सद् गुरुच्या द्वारी मात्र मोक्षलक्ष्मी तिष्ठत असते.
स्वर्गलोक इंद्र संपती । हे काळांतरी विटंबती ।
सद् गुरुकृपेची प्राप्ती । काळांतरी चळेना ॥ २८ ॥
सद् गुरुकृपेची प्राप्ती । काळांतरी चळेना ॥ २८ ॥
२८) स्वर्गलोक, इंद्रपद आणि त्यांचे ऐश्वर्य याचीही उपमा देता येत नाही कारण हे सर्व नाशिवंत आहे. परंतु सद् गुरुची कृपा नाश पावत नाही.
हरीहर ब्रह्मादिक । नाश पावती सकळिक ।
सर्वदा अविनाश येक । सद् गुरुपद ॥ २९ ॥
सर्वदा अविनाश येक । सद् गुरुपद ॥ २९ ॥
२९) ब्रह्मा. विष्णु व महेश यांना नाश आहे सद् गुरुपदच एक अविनाशी आहे.
तयासी उपमा काय द्यावी । नाशिवंत सृष्टी आघवी ।
पंचभूतिक उठाठेवी । न चले तेथें ॥ ३० ॥
३०) सर्व सृष्टी नाश पावणारी असल्याने दृष्यमान विश्वांतील कोणत्याही वस्तुची उपमा सद् गुरुस देता येत नाही. पंचभूतांची लुडबुड तेथे चालत नाही.
म्हणौनि सद् गुरु वर्णवेना । हे गे हेचि माझी वर्णना ।
अंतरस्थितीचिया खुणा । अंतर्निष्ठ जाणती ॥ ३१ ॥
अंतरस्थितीचिया खुणा । अंतर्निष्ठ जाणती ॥ ३१ ॥
३१) म्हणुन सद् गुरुचे वर्णन करता येत नाही, त्यास्वरुपाचे वर्णन उपमेद्वारा करुनही करीता येत नाही हे सद् गुरुस्वरुपाचेच वर्णन समजावे. जे स्वान्तर्यामी स्थित झालेले आहेत तेच सद् गुरुस्वरुपास समजु शकतात.
॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सद् गुरुस्तवननाम समास चवथा ॥
Samas Choutha SadGuruStavan
समास चवथा सदगुरुस्तवन
Custom Search
No comments:
Post a Comment