Thursday, March 3, 2016

Shri Navanath Bhaktisar Adhyay 25 Part 1/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय पंचविसावा (२५) भाग १/२


Shri Navanath Bhaktisar Adhyay 25 
Bhartari was with the traders. One night when they were resting foxes started barking loudly. Bhartari knew what foxes are shouting. He told traders that some thieves are coming to rob them. Hence everybody became alert and ready to fight with thieves, what they do and thieves ran away. After sometime again foxes were started shouting. Bhartari told traders that now he knew from their shouting that a demon is passing from North to South who was very dangerous. However who so ever would kill the demon would become king of Awanti as well as would become owner of four precious gems the demon was having. Among the traders there was a brave man named as Vikram. He immediately rose to fight with the demon. Who was demon? The demon was a gandharva. His name was Chitrama and because of the curse of Goddess Parvati came down to earth. Now who was Vikram? Vikram was son of another gandharva named as Surochan who was cursed by God Indra and came to earth in the form of a donkey. Now in the next 26th Adhyay Dhundisut Malu would tell more about this.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय पंचविसावा (२५) भाग १/२
श्रीगणेशाय नमः ॥
जयजयाजी वासुदेवा । वासनाद्वासुदेवा मायाअवयवा ।
म्हणोनि तूंतें माधवा । सगुणस्थिती विराजे ॥ १ ॥
हे चक्रचालका यदुपती । वदवीं आतां रसाळ युक्ती ।
जेणें श्रोते आनंद पावती । नवरसांतें वेधूनियां ॥ २ ॥
मागिले अध्यायीं भर्तरीनाथ । अवंतिके आला व्यवसायातें ।
तें जननादि पाळण यथाश्रुत । वदविलें महाराजा ॥ ३ ॥
यापरी पुढें कथा गहन । वदवीं नवरसां सुढाळपण ।
ऐसें वदतां रुक्मिणीरमण । संतोष चित्तीं जाहला ॥ ४ ॥
जाहला तरी आतां श्रोतीं । कथा स्वीकारा श्रवणार्थीं ।
व्यवसायिक घेऊनि भर्तरीप्रती । अवंतिकेसी पातले ॥ ५ ॥
पातले परी ग्रामाजवळी । करिते झाले शिबिरस्थळी ।
रचोनि गोण्या कनकपट सकळी । शिबिरावरी विराजले ॥ ६ ॥
ऐसियेपरी व्यवसायिक । उतरते झाले स्थानस्थायिक ।
तों अस्ताचळा गेला अर्क । व्यवसायिक मिळाले ॥ ७ ॥
अग्नि पेटवूनि एक्या ठायीं । शेक घेती वयवसायी ।
तों निकट येऊनि जंबुक महीं । कोल्हाळ केला एकचि ॥ ८ ॥
कोल्हाळ केला परी स्वभाषेंत । बोलके झाले जंबुक समस्त ।
व्यावसायिक हो या स्थितीं । बैसूं नका सावध व्हा ॥ ९ ॥
तुम्हांवरी आहे धाडी । महातस्कर बळी प्रौढी । 
द्रव्य हरुनि नेतील तांतडी । सावध होऊनि बसा रे ॥ १० ॥
ऐसें जंबुक बोलतां वाणीं । भर्तरी ऐकता झाला कानीं । 
ऐकतांचि विचार अंतःकरणीं । करिता झाला महाराजा ॥ ११ ॥  
मनांत म्हणे व्यवसायिक अन्न । आपण करीत आहों भक्षण ।
तरी यांतें श्रुत करुन । उपकारातें सारावें ॥ १२ ॥
कीं मातेचा उपकार । जेवीं फेडतसे खगेंद्र । 
तेवीं व्यवसायिकांचा उपकार । जंबुकांचें भाष्य तेचि रीतीं सांगावें ॥ १३ ॥
मग म्हणे सकळ व्यवसायिंका । तुम्ही असावध राहूं नका ।
तस्कर धाड घालूं आले ऐका । येत आहेत तुम्हांवरते ॥ १४ ॥
म्हणती कळलें कशावरुन । तरी जंबूक-बोल स्वभाषेंकरुन ।
भुंकत तरी भाषा मज कळून । येत आहे महाराजा ॥ १५ ॥
तरी मीं तुमचें भक्षिले अन्न । म्हणुनि वदलों गुप्त न ठेवून ।
ऐसें बोले भर्तरी वचन । विश्र्वासातें दाटले ॥ १६ ॥
मग ते व्यवसायिक जन । नाना शस्त्रे करुनि धारण ।
बैसते झाले सावधपणें । काष्ठवणी योजूनियां ॥ १७ ॥
पोटीं घालूनि मालभरती । सावध पहारे देती भंवती ।
तों तस्कर धाडी शतानुशतीं । येऊनियां पोंचले ॥ १८ ॥
पोंचले परी व्यवसायिक । परम झुंजार ब्रीददायिक ।
यंत्रधायें तस्कर सकळिक । जर्जर केलें सर्वस्वी ॥ १९ ॥
परम जर्जर तस्कर होतां । मग वित्ताची सोडूनि वार्ता । 
पळते झाले शस्त्रघाता । साहवेना शस्त्रघात ॥ २० ॥
असो तस्कर शतानुशतें । पळूनि गेले शस्त्राघातें । 
मग निवारण होऊनि हडबडत । बैसले शांत व्यवसायिक ॥ २१ ॥
शांत होऊनि भर्तरियासी । घेऊन बैसले मंडपासी ।
परी सावधपणीं लोटलिया निशी । दीड प्रहर राहिला ॥ २२ ॥
राहिला दीड प्रहर रात्र । पुन्हां जंबुक येऊनि तेथ । 
भुंकती सर्व मंडळासहित । व्यवसायिक ऐकती ॥ २३ ॥
ऐकती परी भर्तरीतें । पुन्हां पुसती प्रश्र्न उक्तें । 
कीं पुन्हां जंबुक येऊनि येथें । काय बोलले तें सांग ॥ २४ ॥
ऐसें बोलतां व्यवसायिक । सांगता झाला वरदायक । 
म्हणे आतां कोल्हे-भुंके । वदले आहेत तें ऐका ॥ २५ ॥
तरी उत्तरदिशेहूनि आतां पांथिक । येत आहे दक्षिणे जात ।
शिववरदी महासमर्थ । राक्षस जाण असे तो ॥ २६ ॥
तयापाशीं चार रत्नें । असती तेजस्वी देदीप्यमान । 
तरी त्यातें येईल जो मारुन । पूर्णलाभ तो लाभेल ॥ २७ ॥
परी तो लाभ म्हणाल केउता । तरी तयाचा रुधिरटिळा रेखितां ।
पावेल लाभ सार्वभौमता । अवंतिकेमाजी दक्ष तो ॥ २८ ॥
तरी त्यातें योजूनि मरण । रुधिरें वस्र आणावें भरुन । 
ग्रामद्वारीं टिळा रेखून । विजय भाळीं रेखावा ॥ २९ ॥
ऐसें भर्तरी बोलतां त्यांतें । तों विक्रम नृप होतां तेथें ।
ऐकतांचि शस्त्र हातातें । कवळूनियां चालिला ॥ ३० ॥
यापरी श्रोते कल्पना घेती । शिववरदें त्या दानवाप्रती ।
काय धन लाभलें क्षितीं । तेंचि कथानक सांगावें ॥ ३१ ॥        
मग कवि म्हणे तो दानव । पूर्वीं स्वर्गींचा होय गंधर्व ।
चित्रमा गंधर्व तयाचें नांव । महाप्रतापी आगळा ॥ ३२ ॥
तो सहजस्थितीं कैलासासी । जाता झाला भावें मानसीं ।
तों उमेसह द्यूतकर्मासी । शिव बैसले खेळत ॥ ३३ ॥
तों चित्रमा गंधर्वनाथ । येऊनि पोंचला अकस्मात ।
तों उमेसहित उमाकांत । भावेंकरुन नमियेला ॥ ३४ ॥
नमितां देखिलें नीलकंठें । मग आश्र्वासन देऊनि सन्निध नीट ।
विराजवूनि गंधर्वभट । तुष्ट केला मानसीं ॥ ३५ ॥
निकट गंधर्वा बैसवून । खेळ खेळती दोघें जण ।
तों अंबेनें खेळीं डाव जिंकोन । शिवावरी आणियेला ॥ ३६ ॥
आणिला परी अक्षभास । द्विविध भासला उभयतांस ।
तेणेंकरुनि प्रतिवादास । प्रवर्तलीं उभयतां ॥ ३७ ॥
शिव म्हणे पडले अठरा । अंबा म्हणे पडले बारा ।
ऐसा बोलण्यांत फेरा । उभयतांसी पडियेला ॥ ३८ ॥
मग तीं उभय विवादती । विवादितां गंधर्वा पुसती ।
तेणें शिवपक्ष धरुनि चित्तीं । अष्टादश पडले म्हणतसे ॥ ३९ ॥
परी ते पडले बारा खरेपणीं । असतां क्षोभली मृडानी ।
म्हणे गंधर्वा शिवपक्ष धरोनी । बोलतोसी ऐसें तूं ॥ ४० ॥
परी तव देहीं असत्यवस्ती । आहे सदृढ पापमती ।
तरी तूं जाऊनि मृत्युक्षिती । राक्षसरुपें वर्तसील ॥ ४१ ॥
ऐसें बोलतां दक्षनंदिनी । गंधर्व व्यापला कंपेकरोनी ।
अंगीं रोमांच उठवूनी । शिवचरणीं लागला ॥ ४२ ॥ 
म्हणे महाराजा चंद्रमौळीं । तव पक्ष धरितां येणें काळीं ।
मुखा लागली शापकाजळी । तरी आतां काय करुं ॥ ४३ ॥
ऐसें म्हणोनि अश्रु भरुन । आले उभय लोचन ।
तेणेंकरुनि चित्तीं प्रसन्न । पशुपती दाटला ॥ ४४ ॥
म्हणे चित्रमा गंधर्वनाथा । न करीं शापाची सहसा चिंता ।
सुरोचन गंधर्व महीपर्वती । शक्रशापें वर्तला कीं ॥ ४५ ॥
वर्तला परी तया क्षितीं । पुत्र होईल तयाप्रती ।
तया पुत्राचेनि हातीं । मुक्त होशील सुजाणा ॥ ४६ ॥
तो शस्त्रघातें राक्षसतनूतें । तव प्राणातें करील विभक्त ।
येरी म्हणे लाभ त्यांत । मज मारावया कायसा ॥ ४७ ॥
शिव म्हणे तूतें मुक्त करितां । रुधिरटिळक रेखितां माथां ।
तेणें टिळकें सर्व शोभतां । मही भोगील भोगातें ॥ ४८ ॥
तो चित्रमा गंधर्व बोलत । त्या पुत्रासी काय हें माहीत ।
तरी तो येऊनि मम वधातें । प्रवर्तेल महाराजा ॥ ४९ ॥         
ऐसें ऐकूनि उमाकांत । म्हणे धृमिनअवतार भर्तरीनाथ । 
त्याचें मुखें होईल श्रुत । सुरोचनपुत्रासी ॥ ५० ॥
ऐसें बोलतां पंचानन । मग स्वस्थ झालें तयाचें मन ।
मग दिव्यदेहा आश्रमीं ठेवून । दानवदेहीं अवतरला ॥ ५१ ॥
आवतरला परी बळहीन । येत होता मार्गेकरुन ।
तों शस्त्र घेऊनि विक्रम । काननाप्रती प्रवर्तला ॥ ५२ ॥
यापरी आणिक श्रोते बोलती । सुरोचन गंधर्व महीवरती ।
शक्रशापें पातला निगुती । कैशा अर्थीं तें वदावें ॥ ५३ ॥
कवि म्हणे वो ऐका वचन । अमरपुरीं पाकशासन ।
सभेस्थानीं सभा करुन । गंधर्वादिक बैसले ॥ ५४ ॥
पुढें अप्सरा नृत्य करिती । नेटके हावभाव दाविती ।
तिल्लोत्तमा आणि मेनका युवती । अर्कज्योती लावण्य ॥ ५५ ॥
कैसें त्यांचें चांगुलपण । ग्रंथीं किती करुं वर्णन ।
तरी तयांचे स्वरुप पाहतां मदन । मूर्च्छागत होतसे  ॥ ५६ ॥
ज्या सभास्थानीं नाट्य करितां । दाविती चमचमका समता ।
जयांचे नेत्रकटाक्ष पाहतां । जपी तपी नाडती ॥ ५७ ॥
मग मुनी येऊनि लुंगी कांसोटी । सोडूनि धांवती तयांचे पाठीं ।
मग कैचें आचरण योगराहाटी । होती कष्टी कंदर्पे ॥ ५८ ॥
ऐसी गुणज्ञानस्वरुपस्थिती । लावण्यलतिका चंद्रज्योती ।
नाट्य करिती ते सभेप्रती । वेधे चितीं कंदर्प ॥ ५९ ॥
ते नाट्य करितां सुरपणीं । सुरोचन गंधर्व पंचबाणी ।
अति वेधला निशीदिनीं । लाज सोडोनि तिजकारणें ॥ ६० ॥
 परम वेधतां पंचबाणीं । देवसभेतें मदें न गणूनी ।
एकाएकीं सभेंत उठोनी । मेनकेतें स्पर्शीतसे ॥ ६१ ॥
धरुनि मेनकेचा हस्त । कुच हस्तानें करी व्यक्त । 
तें पाहूनि शचीनाथ (इंद्र) । परम चित्ती क्षोभला ॥ ६२ ॥
म्हणे सभास्थानीं सोडोनि लाज । कवळीत रंभेतें कामिककाजें ।
तरी हा ऐसा अधमध्वज । पदच्युत होवो कां ॥ ६३ ॥
जयातें न कळे रागरंग । हीनबुद्धि कामिकयोग । 
तरी हा पतन पावो स्वर्ग । महागर्दभ होवो कां ॥ ६४ ॥
ऐसें बोलतां पाकशासन (इंद्र) । तत्काळ झाला तेथूनि पतन ।
पतन होता सहस्रनयन (इंद्र) । तुष्ट केला स्तुतीनें ॥ ६५ ॥
म्हणे महाराजा अमरनाथा । उश्शाप द्यावा मातें आतां ।
हें कर्म घडलें असतां । परी क्षमा करावी जी ॥ ६६ ॥
तूं यावंत प्रज्ञाराशी । सदा कळवळा हृदयीं पाळिशी ।
तरी पोटीं घालूनि अपराधासी । क्षमादान ओंपावें ॥ ६७ ॥
तूं माय मी लेंकरुं सहसा । न गणीं माझे अपराधलेशा ।
तरी तूं दृष्टि समपीयूषा (अमृतासारखी) । मिरवी कां मजवरी ॥ ६८ ॥
ऐसें स्तुतीचें वदता वचन । संतुष्ट झाला पाकशासन ।
म्हणे द्वादशवर्षीं पुन्हां परतोन । स्वस्थानातें येशील कीं ॥ ६९ ॥
येशील परी कैसें कर्म । मिथुळाधीश जो नरेंद्रोत्तम ।
ज्यातें सत्यवर्मा नाम । महीलागीं मिरवतसे ॥ ७० ॥
तयाची कन्या लावण्यराशी । सद्विवेकी पुण्यराशी ।
तीतें वरानी कृत्रीमासीं । विक्रमातें तोषवावें ॥ ७१ ॥
 ती विष्णुविक्रममूर्ती ऐसी । स्वशक (विक्रमशक) मिरवेल महीसी ।
तो येतां तव उदरासी । मुक्त होशील महाराजा ॥ ७२ ॥
पाहतां विक्रमसुताचें मुख । हरेल सर्व शापदुःख । 
मग भूलोकातें होवोनि विन्मुख । स्वर्गलोकवासी होसी तूं ॥ ७३ ॥
ऐसें बोलता सहस्रनयन । गंधर्व पावला तुष्टभान । 
जैसें मृत्युवेळीं पीयूषपान । लाभतसें दैवानें ॥ ७४ ॥
कीं अत्यंत द्रारिद्र्य झाल्यासी प्राप्त । दैवें मांदुसलाभ (धनलाभ) होत ।
कीं सरिताओघीं जात वहात । सांगडी हाता लागली ॥ ७५ ॥
 कीं परम दुष्काळीं न मिळे अन्न । भणंगरुपी दावी दुरुन । 
तें आपांगिलें सुरभीनें (कामधेनूनें) । तैसें झालें गंधर्वी ॥ ७६ ॥
असो मग तो सुरोचन । तया झाले स्वर्गपतन ।
वायुचक्रीं मिथुळाकानन । सेविता झाला येऊनी ॥ ७७ ॥
परी तो येतांचि स्पर्शितां मही । होऊनि गेला गर्दभदेही ।
मग रासभपंक्ती काननप्रवाहीं । चरुं लागे नित्यशा ॥ ७८ ॥
तंव त्या गांवीं कुल्लाळ कमठ । उत्तम नामें असे सुभट ।
तो संचरोनि काननावाटे । गर्दभातें शोधीतसे ॥ ७९ ॥
शोध शोधितां कमठ कुल्लाळ । देखिलें गर्दभमंडळ । 
त्या गर्दभांत हा शापबाळ । गर्दभरुपी मिरवतसे  ॥ ८० ॥
मग तेणें हांकोनि समस्त । नेता झाला स्वसदनांत ।
त्यांजसवें गर्दभ त्यांत । कुल्लाळशाळे गेला असे ॥ ८१ ॥    
गेला परी बहु दिवस । तया कुल्लाळगृहीं असे ।
यावरी कमठ तो स्वसदनास । दरिद्रांत पावला ॥ ८२ ॥
तेणे करुनि गर्दभ समस्त । ओपिले परा घेऊनि वित्त ।
परी तो गर्दभ स्वसदनांत । रक्षोनियां ठेविला ॥ ८३ ॥
रक्षिला परी एकटा द्वारीं । गर्दभ मनीं विचार करी ।
एकांती एकट्यापरी । कमठ कुल्लाळें ठेविला ॥ ८४ ॥
मग रात्र पाहोनि दोन प्रहर । कुल्लाळातें बोले उत्तर ।
कीं सत्यवर्म्याची कन्या सुंदर । करुनि द्यावी मज कांता ॥ ८५ ॥
ऐसें दिनोदिन पुकारितां । कमठ कानीं होय ऐकता ।
मग सदनाबाहेरी येवोनि तत्त्वतां । निजदृष्टीनें विलोकी ॥ ८६ ॥
विलोकी परी कोठें कांहीं । पाहत्याप्रती वसत नाहीं । 
कोण बोलतो बोल प्रवाहीं । तोही कोण कळेना ॥ ८७ ॥
ऐसा होऊनि साशंकित । पुन्हां सदनामाजी जात ।
तो गर्दभ पुन्हां पाचारुनि त्यातें । दारा द्यावी म्हणतसे ॥ ८८ ॥
पुन्हां कमठ येत परतोन । पाहतां बोले याचें वदन ।
परी गर्दभ बोलतो ऐसें वचन । हें तों कोणा कळेना ॥ ८९ ॥
मग साशंकित होय चित्तीं । कोण बोले तो गृहाप्रती ।
संशय येत तया चित्तीं । उभा राहे कुमठ तो ॥ ९० ॥
कमठ सन्मुख उभा असतां । गर्दभ विचार करी चित्ता ।
म्हणे भ्रांति फेडावी आतां । आपुलिया शब्दाची ॥ ९१ ॥
मग कमठा जवळी पाचारुन । बोलता झाला गर्दभ वचन ।
म्हणे महाराजा संशयें दारुण । पाहात अससी किमर्थ तूं ॥ ९२ ॥
परी मी नित्य बोलतों वाणी । तूं ऐकतोसी कानीं । 
तरी सत्यवर्म्याची मज नंदिनी । करुनि देईं ते भाजा ॥ ९३ ॥
ऐसें गर्दभ बोलतां वचन । कमठ खोचें भयेंकरुन । 
जरी हे ऐकिलें परानें । तरी शिक्षा होईल आमुतें ॥ ९४ ॥    
अहा अहा रे प्रत्यक्ष गर्दभ तंव । मिसळूनि पहासी सोयराणीव ।
मेरु मशक तेवीं मानव - । सम रंगण मिरविशी ॥ ९५ ॥
कोठें राजा कोठें रजक (परीट) । कोठें तूं रे मागणार भीक ।
कोठें मेरु कोठें मशक । अर्की खद्योत (काजवा) मिरवला ॥ ९६ ॥ 
ऐसा विचार कमठ करीत । म्हणे बरवें नव्हें यांत ।
तरी आतां त्यजूनि ग्रामातें । परदेशाप्रती वसावें ॥ ९७ ॥
तरी आतां विपर्यास । कळतां सत्यवर्मरायास ।
तो शिर छेदूनि कसायास । अर्पील जाण निर्धारें ॥ ९८ ॥
ऐसा विचार करितां चित्तीं । तों उदयासी पावला गभस्ती ।
मग कांतेसी सांगूनि गर्दभनीती । पलायनासी निश्र्चय केला पैं ॥ ९९ ॥
परी ती मूढ दोघें जण । जयांलागीं नसे ज्ञान । 
कीं प्रत्यक्ष पशूनें बोलावें वचन । हें आश्र्चर्य वाटेना ॥ १०० ॥
Shri Navanath Bhaktisar Adhyay 25  श्रीनवनाथभक्तिसार अध्याय पंचविसावा (२५) 


Custom Search

No comments: