Shri Navanath BhaktiSar Adhyay 28
One day Bhartari and Pingla were enjoying their company and talking how they love each other. All of a sudden Pingala told Bhartari that she wished to die earlier to Bhartari. She told him that she could not think living without Bhatari. Bhartari told her it was not in their hand and each one had to live own destiny. However he asked Pingala what should do if Bhartari dies earlier to her death. Immediately Pingla told him that if such thing happens then she would also end her life along with him. Bhartari then changed the subject. One day Bhartari went for hunting and thought that he would play mischief with Pingla. Hence he wet his dress in the blood of the dear and handed over to a messenger, asking him to carry it to Pingla and tell her that Bhartari was killed by the wild animals. The messenger did exactly what had been told to him by Bhartari. Pingala became very sad and she without enquiring anything further finished her life. Bhararti came in the village and knew that Pingla had finished her life after hearing that Bhartari had been killed by wild animals. Bhartari repented and knew what a bad thing he had done. He became sad and for more than 12 years stayed at the place calling Pingala, Pingla where she had ended her life. God Dattatreya sends Goraksha to Bhartari to bring him on the track of Nathpanth. What happened next will be told to us by Dhundisut Malu from Narahari family in the next 29th adhyay.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय अठ्ठावीस (२८) भाग १/२
श्रीगणेशाय नमः ॥
जयजयाजीजगदुद्धारा । अखिल निरंजना निर्विकारा ।
भक्तमानसचकोरचंद्रा । प्रेमांबुधारा ओसरसी ॥ १ ॥
तरी तूं असतां कृपाळु आई । माय माझे विठाबाई ।
तरी आतां ग्रंथप्रवाहीं । येऊनियां बैसे गे ॥ २ ॥
मागिले अध्यायीं प्रेमेंकरुन । वैभवीं मेळविला राव विक्रम ।
भर्तरीसंगमीं पिंगलालग्न । दत्तानुग्रह लाधला ॥ ३ ॥
उपरी मृगया करुनी । अवंतिकास्थाना जाउनी ।
राजधामी कनकासनीं । सभामंडपीं बैसला ॥ ४ ॥
क्षणैक बैसूनि त्वरितात्वरित । पाकशाळे गेला नृपनाथ ।
पक्वान्न सेवूनि अंतःपुरांत । पिंगलागृहीं संचरला ॥ ५ ॥
कनकामंचकीं सुमनशेजीं । राव बैसवी पिंगला अर्जी ।
षोडशोपचारेंकरुनि पूजी । श्रद्धापूर्वक पिंगला ॥ ६ ॥
परम प्रीतीं भावारुढ । रायें दर्शविलें चित्तीं कोड ।
मग करी कवळूनि स्नेहपाडें । निकट घेत पिंगला ॥ ७ ॥
तीतें वामांकीं बैसवोन । परम प्रीतीनें घेत चुंबन ।
वाचेनें म्हणे तुजसमान । अन्य दारा नावडती ॥ ८ ॥
अगे पिंगले माझें मन । भावी मम देहीचें ऐक्यरत्न ।
जैसे मित्र आणि रश्मिचिन्ह । ऐक्यदेहीं मिरवती ॥ ९ ॥
कीं राजमौळी तेजें आगळा । द्वितीये शोभली त्याची कळा ।
तेवीं मातें तूं पिंगला । मम चित्तावरी धावें ॥ १० ॥
अगे हे पिंगले माझा भाव । पिंगलाभर्तरी ऐक्यनांव ।
एकचि देही मज वाढवी । भासे भास शुभानने ॥ ११ ॥
जैशी शर्करा आणि गोडी । नामें भिन्न परी ऐक्यप्रौढी ।
तेवीं तूं पिंगला माझे पाठीं । भासे भास शुभानने ॥ १२ ॥
जैसा उदधी आणि लहरी । परी ऐक्यता सागरीं ।
तेवीं मातें तूं सुंदरी । भास भाससी शुभानने ॥ १३ ॥
ऐसें म्हणूनि परम प्रीतीं । पुन्हां चुंबन घेत नृपती ।
मग भोगूनि सकाम रीती । संतुष्ट चित्तीं मिरवला ॥ १४ ॥
मग विचार सुचला एक गहन । आनंदें बैसती प्रीतीकरुन ।
बैसल्या पिंगला बोलूनि वचन । विडा त्रयोदशगुणी देतसे ॥ १५ ॥
म्हणे हे महाराजा नृपवरा । मम देहींचे प्राणप्रियेश्र्वरा ।
मम मानसचकोरचंद्रा । प्रेमांबुधारा मिरवतसे ॥ १६ ॥
तरी तुम्हां आम्हां गांठी । गांठी गांठिल्या त्या परमेष्ठीं ।
गांठिल्या परी चित्तदेठीं । ऐक्यभास भासतसे ॥ १७ ॥
जैसें लवण उदकीं मिश्रित । भिन्न न दावी दृष्टींत ।
तन्न्याये ऐक्यचित्त । रावराणी शोभत ॥ १८ ॥
तरी ऐसा मिश्रित अर्थ । उदया पावला असे ऐक्यचित्त ।
परी नेणूनि परम कृतांत । जगामाजी मिरवतसे ॥ १९ ॥
चित्तीं चित्तभय काया । हरण करीत असे राया ।
तरी नेणों आपण विषयचिंतें या । बुद्धि जरी संचरली ॥ २० ॥
संचरतां परी एक त्यांतें । मातें दिसत उचितार्थ ।
तुम्हांआधीं मातें मृत्यु । सुगम चित्ता वाटतसे ॥ २१ ॥
तरी हें ऐसें इच्छिल्याप्रमाण । ईश्र्वरसत्तें जरी आलें घडोन ।
मग परम बरवी दैवीवान । जगीं असें मी एक ॥ २२ ॥
ऐसें बोलतां शुभाननी । राव ऐकूनि बोले वाणी ।
नेणों सखे ईश्र्वरकरणी । पुढील कांहीं वदवेना ॥ २३ ॥
मजआधीं तूं कामिनी । मृत्यु पावों इच्छिसी मनीं ।
परंतु नेणो निर्दयपणीं । मित्रात्मज (यम) मिरवतसे ॥ २४ ॥
तो कदा न जाणे वेदविधी । सदा वर्तसे बिघडबुद्धीं ।
नेणों मज मृत्यु तुजआधीं । आल्या काय करिशील ॥ २५ ॥
ऐसें ऐकून वदे पिंगला । नेणों कैसें असे जी भाळां ।
रेखिली विधीनें अकळ कळा । कळत नाहीं महाराजा ॥ २६ ॥
परी ऐशा घडल्या गोष्टी । मी रहाणार नाहीं महींपाठीं ।
देह दाहूनियां हव्यवाटीं । गमन करील तुम्हांसह ॥ २७ ॥
राव ऐकूनि बोले वचन । पुरे आतां तुझें बोलणें ।
प्राणांहूनि प्रिय कोण । घात त्याचा करवेना ॥ २८ ॥
तरी हे बोल उगलेचि फोल । माझिया तोषाचें करिसी मोल ।
परी समय येतां तव पाऊल । मागेंचि धांव घेणार ॥ २९ ॥
तरी अनुभव माझिये चित्ता । सहज आहे मजला पाहतां ।
अगे राज्यासनीं विपुल वार्ता । सेवक श्रवण माझे करविती ॥ ३० ॥
करविती परी कैशा रीतीं । समरंगणींचा भाव दाविती ।
शत्रूअनलीं प्राणाहुती । वेंचूं ऐसे म्हणताती ॥ ३१ ॥
तरी समय पडतां दृष्टीं । जीवित्व रक्षिती बारावाटीं ।
मग कोण कोठील मोह पोटीं । जीवित्वाचा वरिती गे ॥ ३२ ॥
तरी हें तैसें तुझें बोलणें । दावीत मातें चांगुलपण ।
परी समय पडतां अर्थ भिन्न । दुसराचि आहे गे ॥ ३३ ॥
कीं बहुरुपियाचे खेळमेळीं । होऊनि बैसती महाबळी ।
परी ते शूरपणाची नव्हाळी । समरभूमीं चालेना ॥ ३४ ॥
कीं श्र्वानपुच्छाची कैशी उग्रता । परी हार तेचि पडे बळी देखतां ।
जैसी पालीची दृष्टी देखतां । वृश्र्चिक नांगी उतरीतसे ॥ ३५ ॥
तन्न्यायें तव बोलणें । मातें दिसतें सहजस्थितीनें ।
ऐसें बोलतां भर्तरीनंदने । पिंगला वदे स्वामीसी ॥ ३६ ॥
म्हणे महाराजा प्राणेश्र्वरा । या बोलाचा वाग्दोरा ।
कंठीं बांधिला आहे नरा । काया वाचा मानसीं ॥ ३७ ॥
तरी आतां व्यर्थ बोलून । नेणों घडेल अर्थ कोण ।
ईश्र्वरसत्तेचें प्रमाण । ब्रह्मादिकां कळेना ॥ ३८ ॥
परी माझिये भावनेऐसें । येत आहे स्वचित्तास ।
विधवा शब्द शरीरास । लिप्त होणार नाहीं कीं ॥ ३९ ॥
जरी म्हणाल कैशावरुन । जरी काया वाचा चित्त मन ।
तुम्हांलागीं केलें अर्पण । साक्ष असे ईश्र्वर तो ॥ ४० ॥
ईश्र्वर तो सत्याश्रित । आहे म्हणती सकल जगतीं ।
तरी वैधव्य शब्द जगमुखांत । मातें लिप्त होणार नाहीं कीं ॥ ४१ ॥
असो बीज पेरिलें तैसें फळ । द्रुमकोमादि सकल ।
तेवीं माझी चाली सरळ । फळ उमटेल तैसेंचि ॥ ४२ ॥
ऐसें बोलून निवांतपणीं । स्तब्ध राहिली कामिनी ।
परी रायाचे अंतःकरणीं । शब्द सदृढ मिरवले ॥ ४३ ॥
मिरवले परी ठेविले मनांत । चमत्कार पाहूं कोणे दिवसांत ।
असो हे जल्प बहु दिनांत । सारिते झाले प्रीतीनें ॥ ४४ ॥
सहज कोणें एके दिवशीं । राव जातसे पारधीसी ।
मृगया खेळतां विपिनासी । आठव झाला कांतेचा ॥ ४५ ॥
कीं आम्ही उभयतां दोघें जण । बैसलो होतों सुखसंपन्न ।
तयामाजी मृत्यु बोलोन । निश्र्चयविलें कांतेनें ॥ ४६ ॥
कांतेनें झालिया गतप्राण । तुम्हासवें करीन गमन ।
तरी त्या बोलाचे साचपण । आज पाहूं निश्र्चयें ॥ ४७ ॥
ऐसी चित्तीं योजना करुन । मृगया करीत फिरे कानन ।
तों अकस्मात देखिला नयनें । मृग एक नेटका ॥ ४८ ॥
राव देखतां तयापाठीं । लागूनि शीघ्र महीं आर्हाटी ।
शीणचि त्या जीवीं बहू मेळथाटीं । मृग जीवंत धरियेला ॥ ४९ ॥
धरियेला परी हस्तेंकरुन । तयाची ग्रीवा छेदून ।
मुकुटासह काढूनि भूषणें । रुधिरें वस्त्रें भिजविलीं ॥ ५० ॥
भिजवोनियां सेवकाहातीं । देतां झाला शीघ्र नृपती ।
अन्य भूषण उभवूनि कांती । सुखासनीं बैसला ॥ ५१ ॥
उत्तम छाया पाहून । तयाखालीं नृप जाऊन ।
उत्तम चीर कनकवर्ण । मृदु गालिचा अंथरला ॥ ५२ ॥
तयावरी बैसूनि नृपती । मंडळी दुरावूनि बैसे एकांतीं ।
परी रुधिरवस्त्रें जयाहातीं । तयालागीं पाचारी ॥ ५३ ॥
म्हणे ही रक्तवस्रें घेऊन । सेवका पिंगलेचें गांठी स्थान ।
वस्त्रें तीतें गोचर करुन । राव निमाला म्हणावें ॥ ५४ ॥
निमाला परी कैसे रीती । जरी पिंगळा बोलेल उक्ती ।
तरी व्याघ्र संघांनी जीवित्व आहुती । घेऊनियां पळाला ॥ ५५ ॥
ऐसें वदोनि रायें भृत्यातें । गुप्त पाठविलें अवंतिकेतें ।
राजसदना जाऊनि भृत्यें । पिंगलेतें विलोकिलें ॥ ५६ ॥
मौळी चीरासह सकळ । रुधिरव्याप्त वस्त्रें सबळ ।
पुढें ठेवूनि करकमळ । जोडूनियां बोलतसे ॥ ५७ ॥
म्हणे जी महाराज महीस्वामिनी । मृगया करीत राव काननीं ।
अवचित व्याघ्र जाळींतुनीं । उठला राया न कळतां ॥ ५८ ॥
मागाहूनि साधूनि उड्डाण । राव धरिला ग्रीवेकारण ।
धरितांचि हरुनि प्राण । रुधिर पिऊन पळाला ॥ ५९ ॥
आतां त्याचें करुनि दहन । चमू येईल सकळ परतोन ।
ऐसें पिंगलेनें ऐकून । हृदय पिटी आक्रोशें ॥ ६० ॥
हृदय पिटूनि महीवरती । भावें आपटी निष्ठुरगती ।
अहा म्हणूनि केश हातीं । धरोनियां लुंचीतसे ॥ ६१ ॥
शब्द करुनि अट्टाहास । हंबरडा मारुनि उदास ।
पुन्हां महीतें मस्तकास । वारंवार आफळीतसे ॥ ६२ ॥
मृत्तिका घेऊनि टाकी मुखांत । म्हणे हा हा जी प्राणनाथ ।
मातें कैसे टाकूनि गेलांत । परत्रदेशभुवनासी ॥ ६३ ॥
अहा महाराजा प्राणेश्र्वरा । कूपीं कापिला कैसा दोरा ।
अहा तव प्रीतीचा मोहझरा । आजि कैसा आटला जी ॥ ६४ ॥
अहो मम प्राणनाथा । मजविण तुम्हां क्षण गमत नव्हता ।
प्रीती सोडूनि कैसे आतां । परत्र देशा गमलेती ॥ ६५ ॥
ऐसें म्हणोनि आरंबळत । तो अंतःपुरीं समजली मात ।
स्त्रिया राजाच्या द्वादश शत । आरंबळत पातल्या ॥ ६६ ॥
एक हृदय पिटिती आपुले हस्तीं । एक धांवती महीं पडती ।
एक ऐकतांचि झाली वरिती । महीलागीं मूच्छित ॥ ६७ ॥
एक हंबरडा फोडूनि ऊर्ध्व । म्हणती आमुचा गेला निध ।
आतां महीतें स्त्रीवृंद दीनवत झालों कीं ॥ ६८ ॥
ऐसें म्हणोनि आरंबळती । एकमेकींच्या गळां पडती ।
हृदय पिटूनि आपटिती । महीलागीं मस्तक तें ॥ ६९ ॥
ऐसा सकळ अंतःपुरांत । कोल्हाळ झाला अद्भुत ।
परी पिंगला दारा प्रीतीं बहुत । शोक करी आक्रोशें ॥ ७० ॥
म्हणे महाराजा निढळवाणी । मज कैसे गेलेत जी सांडोनी ।
मोहाचा सकळ तरणी । लोपोनियां महाराजा ॥ ७१ ॥
बाळाहूनि मोह अत्यंत । मजविषयीं पाळीत होतांत ।
तो मोह दवडूनि निष्ठुरवत । सांडूनि कैसे गेलात ॥ ७२ ॥
अहो तुम्ही राया सिंहासनीं । बैसत असतां राजकारणीं ।
परी मम स्मरण होतां मनीं । या धांवूनि सदनांत ॥ ७३ ॥
ऐसें म्हणोनि धरणीवरी शरीर । पिंगला टाकी वारंवार ।
आजि सकळ सांडोनि राज्यभार । कैसा गेलासी महाराजा ॥ ७४ ॥
पाहूनि माझें मुखमंडन । पुन्हां सेविसी राज्यासन ।
मोह आजि सकळ सांडोन । कैसा गेलासी महाराजा ॥ ७५ ॥
अहा पिंगला अंडजखाणी । कोठें गेलीसे मम पक्षिणी ।
दाही दिशा ओस करोनी । अचर रानीं चरावया ॥ ७६ ॥
मम पाडसासी हरिणी । परत्र तृण गोड पाहुनी ।
तिकडेचि गुंतली लोभेकरुनी । माझा लोभ सांडोनियां ॥ ७७ ॥
अहा मज आंधळ्याची काठी । हिसकूनि नेली निर्दयें पोरटी ।
कीं क्षुधिताची अन्नवाटी । जिंतूनि नेली भणंगे ॥ ७८ ॥
अहा राया मजवांचून । तूतें गमत नव्हतें एक क्षण ।
आजि निष्ठुर मन करुन । कैसा गेलासी महाराजा ॥ ७९ ॥
अहा राया उत्तम पदार्थ । जो महीलागीं उत्पन्न होत ।
तो मम आधीं नृपनाथें । भक्षिला नाहीं कधीं कीं ॥ ८० ॥
मातें बैसवोनि निजअंकास । मुखीं ओपित होतां ग्रास ।
ऐसेंपरी सांडोनि प्रीतींस । परत्र कैसे गेलात ॥ ८१ ॥
ऐसेपरी नाना गुण । आक्रंदतसे आठवून ।
मग ते सेवकांतें पाचारुन । शय्यासाहित्य करवीतसे ॥ ८२ ॥
रायमौळींचा चीरमुकुट । परिधानी कबरीं अलोट ।
स्फुरण दाटोनि मग बळकट । उत्तम चीरीं कवळिला ॥ ८३ ॥
स्वामीचें वस्त्र परिधान करुन । घेती झाली सतीचें वाण ।
स्मशानवाटिकेचें साधन । सिद्ध केलें तत्काळ ॥ ८४ ॥
मग सकळ समारंभासहित । येती झाली स्मशानवाटिकेंत ।
अग्निकुंडीं विधानेंकरुनि त्यांत । सबळ अग्नि चेतविला ॥ ८५ ॥
अग्नि लावितां विधानशक्तीं । दाहुनि वर्तला अंगारनीतीं ।
धगधवोनि कुंडाप्रती । पावक शक्ती दावीतसे ॥ ८६ ॥
ऐसिया प्रकरणीं पेटविला वन्ही । होतां पातली सौदामिनी ।
अग्निकुंडीं शिळा स्थापोनी । निरोप मागेसर्वांतें ॥ ८७ ॥
सकळां जय देऊनि आशीर्वचन । जय जय भर्ता ऐसें म्हणोन ।
तुझा देह तुला अर्पण । शीघ्रकाळीं होवो कां ॥ ८८ ॥
ऐसें म्हणोनि अग्निकुंडांत । सांडिती झाली स्वशरीरातें ।
परी त्या पावकीं होतां स्थित । गुंडाळोनि गेली सर्वस्वी ॥ ८९ ॥
मग ते याचक अपार जन । धन्य म्हणती तियेकारण ।
स्वहित केलें पिंगलेनें । स्वामी सवें गमूनियां ॥ ९० ॥
अहा पिंगला ऐसें म्हणती । पवित्र जाया सत्यवती ।
उदार कर्ण स्वकुळाप्रती । परकुळातें तारील ॥ ९१ ॥
भर्तरीपरी करितां परलोक । विव्हळ चित्तीं करिती शोक ।
म्हणती आम्हां प्रजेचें दोंदिक । ईश्र्वरें कैसें नेलें हो ॥ ९२ ॥
ऐसें म्हणोनि आक्रंदती । भर्तरी म्हणोनि आठविती ।
असो पावकीं दोहोनि सती । लोक निघाले माघारे ॥ ९३ ॥
आपुल्याला सदनीं जाऊन । बैसले असती मुख वाळवोन ।
अहा भर्तरी ऐसें म्हणोन । श्र्वासोच्छ्वास सोडिती ॥ ९४ ॥
आणि राजसदनीं स्त्रियांचा मेळ । शोक करीत अति तुंबळ ।
तो येरीकडे विपिनीं नृपाळ । मृगया करुनि येतसे ॥ ९५ ॥
तो अस्तासी गेला चंडमणी । रात्र दाटली परम विपिनीं ।
म्हणोनि राजा उठोनी । नगराप्रती चालिला ॥ ९६ ॥
पावकतेजीं दैदीप्यमान । हिलोल मार्गीं प्रदीप्त करुन ।
जातां भृत्य पाठविला वस्त्रें देऊन । आठव तयाचा पैं झाला ॥ ९७ ॥
राव बैसूनि सुखासनीं । येतां मार्गीं मशाली पेटवोनि ।
त्यांत चंद्रज्योति शशिसमानी । दिशेलागीं उजळती ॥ ९८ ॥
आठव होताचि म्हणे चित्तांत । अबुद्धिपणें स्त्रियांची जात ।
नेणों गृहीं कैसी मात । घडोनि आली असेल कीं ॥ ९९ ॥
म्यांही केली मूढपण । शोध केला नाहीं अणिका पाठवोन ।
सकळ भ्रांतींत चित्त गोंवोन । पाठीं लागलों मृगाच्या ॥ १०० ॥
Shri Navanath BhaktiSar Adhyay 28 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय अठ्ठावीस (२८)
Custom Search
1 comment:
Love marriage sathi 28 adhyay vachu shakte ka? Majhya ghartle ani amhi dogh lagna sathi tayar ahot. Pan taychya ghartle nahi boltat tay sathi kai upay sangal ka?
Post a Comment